चोचले

सहज's picture
सहज in जनातलं, मनातलं
28 Sep 2007 - 8:13 pm

(प्रस्तावना - प्रा.डॉ. बिरूटे सरांनी उपक्रमावर "मराठी साहीत्यातील स्त्रीवाद" चर्चाप्रस्ताव मांडला तो व त्यातील प्रतिसाद वाचून हे स्फूट. वाटल्यास आधी मूळ चर्चा वाचून घ्या. "मध्यमवर्गीय पांढरपेश्या" मनाला अश्लील वाटू न देता "प्रौढांसाठी" लेखन करता येईल का? हा स्वत:ला दिलेला चॅलेन्ज. भावना दुखावल्या असतील तर माफी तसेच हा संवैधानीक इशारापण समजा. आगे आपकी मर्जी. शुध्दलेखन तुमच्या मनासारखे जमले असते तर आम्हालाही आवडले असते, पण तेवढ घ्या सांभाळून.)

मित्रपरीवारासाठी लिखाण करताना कशाला हवाय काटेकोरपणा? सांभाळून घेतील, काही कमी जास्त असेल तर सांगतील. रोज जाणवतय, वाचनभूकेने सगळेजण येतात, पण डबा फारच थोडेजण आणतात. बाकीचे एकच का होईना, घास खात असतात.

भूक रोजच लागते, संगणक सूरू केला रे केला तिकडे जायची उबळ तर विचारू नका, पावले आपोआप वळतात. आपण पण काहीतरी नेले पाहीजे, नेहमीच कसे मोकळ्या हाताने जायचे. वा वा! छान झालेय म्हणून बोटे चाटतो. पण मस्त डिश करून काही पूढे मांडत नाही. सगळे देखते रह जायेंगे असा काही तरी पदार्थ हा नेलाच पाहीजे. माझ्या कल्पनाशक्ती आईने काही तरी मला छान पदार्थ करूनच दिला पाहीजे असा की सगळ्यांना आवडला पाहीजे. म्हणजे सर्वसमावेशक, सर्व भावना असलेला "यू" सर्टीफीकेटवाला सिनेमा सारखा का? . नाही "यू/ए" असा चालेल, बरेच जण म्हणत असतात की त्यांच्याकडे असा बघत नाहीत पण त्यांना कोणी "यू/ए" किंवा "ए" जरी लावला तरी हरकत नाही. मागे घाटपांडयांनी नाही का एक कलात्मक एकपात्री नमकीन आणला होता. चांगला होता असे सगळेजण म्हणाले, सगळ्यांनी चाखला.

त्याच अस आहे, आमच्याकडे नेहमी साखर, गूळ असलेलाच स्वयंपाक होतो पण वेळ आली की झाडून सगळ्यांना चमचमीत पदार्थ कसे काय आवडतात/ हवे असतात बुवा. पण आधीच सांगतो, मला जास्त तिखट खायची सवय नाही, पोटाला दुसर्‍या दिवशी त्रास होतो. मला स्वतःला आवडते गोड म्हणजे बहूतेक आजवर तेच खात आलोय, आम्हाला तेच वाढल गेलय, पण चमचमीतचे आर्कषण काही औरच!

ठीक आहे नेहमी सारखा लाडू, शिरा, शेवयाची खीर, शिक्रण, शंकरपाळ्या नाहीच अगदी चॉकलेट, के़क, आइस्क्रीमपण (बाहेरून विकत आणलेले) नाही. आपण नॉनवेज डीशच स्वतः बनवायची व न्यायची. बाहेर खातोच की फक्त आता घरी बनवून न्यायची. कल्पनाशक्ती आई म्हणाली की बघ आता तू मोठा झाला आहेस, यापूढे तुझा तूला स्वै:पाक जमायला हवा. मला जेवढे येते तेवढे शिकवले मी. तूच रेसीपी बघ, तुला तुझ्या मित्रांना काय आवडते ते तूलाच माहीती आहे तर तसे बनव. सांभाळ हो, आता मी ह्या स्वयंपाकघरातून निवृत्ती घेणार. सांभाळ.

हं एका फटक्यात ती हे म्हणून मोकळी झाली. ती स्वतः स्वतंत्र झाली की मला स्वातंत्र्य देऊन गेली काहीच कळेना. बापरे परीक्षेची घडी म्हणतात ती आलीकी, आता रे काय करायचे? आयुष्यात गृहीत धरलेल्या गोष्टी जेव्हा एका क्षणात नाहीश्या होतात, तेव्हाची ती हतबलता वेळ आल्याशिवाय कळायची नाही. आता मित्रांना चमचमीत पदार्थ कसा द्यायचा. सरळ बाहेरून विकत आणून देऊया ना. कोणाला कळतय, घरातल्या डब्यातून नेऊया. नको एकेक तय्यार खवय्ये आहेत क्षणार्धात ओळखतील कूठल्या हॉटेल, धाब्या, खानवळी, रेस्टॉरंट मधून आणलेय.

काय तू स्वतःला खवय्या समजतोस. वेगवेगळे खाल्ले म्हणतोयस अगदी सर्व प्रकारच्या चवी अनुभवल्या आहेस, एक डिश बनवता येत नाही. सगळ जादा मेहनत न करता अचानक समोर मिळाल की असेच होते. समज की तुला एखाद्या निर्मनूष्य बेटावर टाकलेय व आता तूझे तूला जगायचे आहे. हॉटेल नाही, की ग्रोसरी शॉप नाही. जंगल आहे निर्सग व तू....

आत्ताच दोस्ताला विचारल की काय रे नॉनवेज डीश आवडते ना, आज करशील का तू? तो म्हणतो नाही रे बॉ कूठला प्राणी कधी मारला नाही. तर ते सगळ सोला, कापा नुस्त्या वासानेच भोवळ येते. कसे जमणार. पण राव करायला जमले तर झकासच. सगळे जण चिकन करी, मसाला नेहमीचा आवडीने खातात. मला स्वतःला मासा आवडतो पण कित्येकजण ते काटे, वास ह्याला वैतागून नको म्हणतात. आता सवय झालीय. आपण छान मासाच, मोठा सालमन करून देऊया का? काटे नसलेला फिलेट करूया, हेल्दी असतो. डॉक्टरपण म्हणतात आरोग्याला चांगला. सगळ्यांना आवडेल असा नाही म्हणा, पण मला आवडतो आता.

शुद्ध शाकाहारी लोक, त्यांची तर्‍हाच वेगळी. आम्हाला नॉनवेज म्हणून नाक मुरडतात पण स्वतः मात्र ते "फॉरबीडन फ्रूट" आहे असे सांगून स्वतःचा तो शाकाहारच समजून घेतात. मांजर डोळे मिटून दूध पिते हाच प्रकार आहे.

हे नॉनवेज आवडणारे पूरूषमंडळीपण बघा फक्त बाजारातून रॉ मटेरीयल सूरवातीला आणतील, नंतर तेही काम पण बाईनेच करावे ही अपेक्षा. बाईने बेत ठरवायचा, लागणारे घटक आणायचे, मुरत ठेवायचे, वेळेवर करून गरमागरम लागेल तेवढे भरवायचे, नंतर आवराआवरीपण. आम्ही फक्त खाणार, ढेकर देणार व परत हक्काने फर्माइश करणार. सगळे ए टू झेड स्वतःचे स्वतः करू शकणारा एखादा असेल पण स्वतः करून नेहमी नेहमी बायकोला भरवणारा आहे कोणी? किती बायकांकडून ऐकायला मिळाले आहे की अहो एकदा केल तरी बास आहे नेहमी नाहीच मागत खरच आम्हाला आवडेल असे अधून मधून एकदा सर्व्ह करून घ्यायला. मनापसून इच्छा असते, ती बर्‍याचदा रास्त अपेक्षा पण म्हणता येईल. पण हो आता तेवढच बाकी राहीलय महाराणी सरकार, म्हणून परत बोळवण करून तिला आपली जागा, सर्वांसमोर दाखवून दिली जातेच.

आपण मान्य करतो की स्वयंपाक करायला आवडेल. बायकोला खूश बघायला तर नक्कीच आवडेल. पण मग आहे तसे खायचे हा!, जास्त अपेक्षा ठेवायच्या नाही, मला थोडीतरी मदत पाहीजे. असा करारनामा का लगेच मागायचा? इतर पुरुषांसारखे हेच नको, असेच पाहीजे, हे नको मला, असे बाईने का बरे म्हणायचे नाही? बाईने केले तर ती डोक्यावर चढून बसली, स्वःता कमवते म्हणून इतका माज? इतकी वर्षे आजूबाजूचे पुरूष असे करत असताना, का बर नाही एकदाही मित्राला सांगावेसे वाटले की बाबारे तू पण जरा मदत करत जा घरी. कचेरीतून तू घरी येतोस पण तिला दिवा मालवला तरी काम असते व सकाळी तुझ्या आधी ती तिच्या कामावर हजर असते. गंमत आहे बघा, लहानपणा पासून आईने लाडावून ठेवलेले हे पुरूष झणझणीत अंजन घातल्या शिवाय ताळ्यावरच येत नाहीत. बाईदेखील माणूस आहे कीती सहन करणार, मग ती पण आपल्या परीने शॉर्टकट मारायला बघणार. परफॉरमन्स बिघडणार. ती काय मशीन नाही आहे, त्यामूळे तर जास्त कॉम्प्लीकेशनस पण होऊ शकतात. हे सगळ व्हायच्या आधीच दोघांनी मिळून, आपापल्या चवी सांभाळून, एकत्र स्वयंपाक उत्तम केला की कायमच चोचले पुरवले जातील.

डोक्यात विचारचक्र चालू आहे आपण कूठली डिश करायची, परत तिकडे जायची वेळ आली आहे. फटकन कल्पना सूचली की परिक्षेची वेळ संपली की झाला असेल नसेल तेवढा पेपर परत करावाच लागतो ना. तर आज ही वरची आपली घालमेल, स्वयंपाकाबद्दलची कल्पना देऊ या. खात्री आहे की आमच्या स्फूटावरून, आधीच चांगला स्वयंपाक येणारी लोक अजून समजून छान डिश करतील. कसे?

बाकी वेळ आली की आणीनच एक झणझणीत पदार्थ!

तोवर ह्या बडीशेपेच्या गोळ्या. मी आणी बायको नेहमी गोड पदार्थ खाताना एकमेकांना हे वाक्य टाकत असतो.
Just think of all those men & women on the Titanic who said, "No, thank you," to dessert that night. And for what!

हे ठिकाणप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

28 Sep 2007 - 9:39 pm | प्रियाली

>> पण स्वतः करून नेहमी नेहमी बायकोला भरवणारा आहे कोणी?

नसावा. आवडीने स्वयंपाक करणारे अनेक आहेत. (एक आमच्या घरातही आहे) पण हे माझे रोजचे काम आहे असं समजून करणारा नसावा. सकाळी उठून बायकोसाठी चहा टाकणारे अनेक असावेत पण तिला टोस्टवर बटरपेक्षा क्रिमचीज आवडते हे आणि असे लक्षात ठेवून रोज ब्रेकफास्ट तिच्या पुढ्यात ठेवणारा नसावा. बरेच पुरुष आनंदाने स्वयंपाक करताना दिसतात, त्यापैकी आपल्या बायकोला आवडते म्हणून मी हा स्वयंपाक करतो म्हणणार्‍यांचे प्रमाण अधिक असते की ती नॉनवेज खात नाही, तिला हे आमच्या पद्धतीचे जमत नाही म्हणून मी हे करतो - असे सांगणारे नवरे अधिक असतात त्याचा मला अंदाज नाही. (या क्याटेगरीत न बसणार्‍या पुरुषांनी मला माफ करा.) त्यातून तुम्ही म्हणता तसे बाईने 'हे क्काय यात मीठच कमी आहे किंवा काय पाणचट आहे.' असे शेरे दिले की प्रतिक्रिया काय होत असेल?

>>Just think of all those men & women on the Titanic who said, "No, thank you," to dessert that night. And for what!

शेवट आवडला.

सहजराव, लिहित जा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Sep 2007 - 10:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्या चर्चाप्रस्तावावरुन इतके सुंदर स्फूट सुचत असेल आणि प्रत्यक्षातही तसे असेल म्हणजे मित्र परिवारात आणि घरीही जर आपल्या हातांनी उत्तम जेवण बनणार असेल( पण नसेलच बनवत तुम्ही, माझा विश्वास आहे,तर आम्ही आमच्या चर्चा प्रस्तावाचे ख-या अर्थाने चीज झाले असे म्हणू !:) खरे तर उभयता मिळून पदार्थ करायला पाहिजेत,  बिघडले तर जवाबदारी ढकलायला आपण मोकळे ! स्फूट झक्कास झालंय  ! येऊ दे आणखी असेच खमंग, आम्ही आहोतच डीशमधे ओतून घ्यायला ! :) आपला किचनकडील प्रवास  पाहून, आम्हीही एक दिवस किचन मधे चिकनची तंगडी शिजवत दिसलो तर आश्चर्य वाटून घेऊ नका म्हणजे झालं !  :)  आपले लेखन दिलसे आवडतेच आम्हाला, सहजराव लिहित राहा !

अवांतर;) शुद्धलेखनाला संकेतस्थळावर घाबरणारे दोनच माणसे, एक तुम्ही आणि एक आम्ही ! आपल्या लेखनाचे शुद्धलेखन तपासणा-यांना देव कधीही क्षमा करणार नाही ! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रमोद देव's picture

28 Sep 2007 - 11:21 pm | प्रमोद देव

सहजराव लेख अतिशय सहज उतरलाय!आवडला.
पण बायकोला खरेच मदत करता ना? की हे नुस्ते मनातले विचार आहेत? आणि सौ. ने लेख वाचला तर मात्र खरोखरच काम करायला लागेल. तेव्हा आत्तापासूनच कंबर कसा!

चित्रा's picture

28 Sep 2007 - 11:50 pm | चित्रा

मागे घाटपांडयांनी नाही का एक कलात्मक एकपात्री नमकीन आणला होता. चांगला होता असे सगळेजण म्हणाले, सगळ्यांनी चाखला.
:-)

बरा लिहीता की लेख तुम्ही! तुमचे वाचून इथे कधीही घरात मदत न केलेल्या पुरुषाने ती केली (खाण्याव्यतिरिक्त) तर खूपच झाले म्हणायचे. लिहीत जा असेच.

राजे's picture

29 Sep 2007 - 1:16 am | राजे (not verified)

:-)
बस अविवाहीत व्यक्ती इतकाच प्रतिसाद लिहू शकतो.

राजे
(*हेच राज जैन आहेत)

सहज's picture

29 Sep 2007 - 6:29 am | सहज

प्रतीसादाबद्दल सर्वांचे आभार!

राजे, कदाचीत तुम्हाला "एकटा" (सिंगल ह्या अर्थी म्हणायचेय) कारण अविवाहीत म्हणजे "लग्नाशिवाय"असा देखील अर्थ होतो आजकाल. :-)

---------------------------------------------------------------------------------------------
अजून नवीन कथा लिहावी का धनंजयांसारखे स्व-समीक्षण लिहावे?

बेसनलाडू's picture

29 Sep 2007 - 7:22 am | बेसनलाडू

मस्त लेख. खूप आवडला. आमचे वाचनाचे चोचले असेच पुरवत रहा राव! म्हणजे "तुझं वाचन किती, तू बोलतोस किती" असं कुणी पचकलं की आम्ही आमच्या वाचनाचे दुवे देऊ ;)
(अधाशी)बेसनलाडू

आजानुकर्ण's picture

29 Sep 2007 - 8:48 am | आजानुकर्ण

मला स्वयंपाक करायला आवडतो. :)

लेख आवडला. 'चविष्ट' आहे. :)

विसोबा खेचर's picture

29 Sep 2007 - 9:13 am | विसोबा खेचर

मस्त रे! छान लेख लिहिला आहेस. मनापासून लिहिला आहेस. औरभी लिख्खो..

तात्या.

स्वाती दिनेश's picture

29 Sep 2007 - 12:51 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला,
आवडीने स्वयंपाक करणारे अनेक आहेत. (एक आमच्या घरातही आहे) पण हे माझे रोजचे काम आहे असं समजून करणारा नसावा.
या प्रियाली यांच्या वाक्याशी अगदी स्वानुभवाने सहमत!
स्वाती

विकास's picture

30 Sep 2007 - 7:44 pm | विकास

सहजराव,

आपला लेख आवडला. अगदी सहजशैलीतील आहे. असेच अजून वाचायची वाट पाहातोय.

खरे लगेच उत्तर देयचे होते पण काय करणार, घरात माणसांचा राबता, मग, रांधा-वाढा-उष्टी काढा मधे डोके वर काढायला वेळच मिळाला नाही! :-)

सर्किट's picture

1 Oct 2007 - 10:21 am | सर्किट (not verified)

मी काही वर्षे घरी स्वयंपाक केला. मग लग्न झाले. स्वयंपाकघरातली सर्व रचना बदलली. सगळे कंप्लीटली इल्लॉजिकल झाले. मीठ, तिखट, साखर सर्व काही एकाच आकाराच्या डब्यांत. का? तर म्हणे, "आमच्या कडे तसंच होतं". तेव्हापासून माझा स्वयंपाक बंद झाला.

- सर्किट कपूर

सहज's picture

1 Oct 2007 - 11:44 am | सहज

:-) तरी खरय म्हणा त्यांच्या मनासारख / तिकडच्यासारखच तसंच होऊ दिले   की देखील चोचले पूरवले जातात नाही का?

शेवटी आम खानेसे मतलब, पेड, गूठली सब कंप्लीटली ....

टारझन's picture

26 May 2010 - 8:03 am | टारझन

काण्ट स्टॉप रिप्लाईंग !! वंडरफुल पोस्ट :)

मीठ, तिखट, साखर सर्व काही एकाच आकाराच्या डब्यांत. का? तर म्हणे, "आमच्या कडे तसंच होतं".

=)) =)) सर्किट्याला ऐकुन घ्यावं लागलं ? सर्किटाईन कशी असेल ? जस्ट कॅन इमॅजिन ;)

-

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2010 - 8:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला.....! :)

सहजरावांचे धागे कोण वर आणतंय रे.....?

-दिलीप बिरुटे

टारझन's picture

26 May 2010 - 8:36 am | टारझन

सहजरावाचे धागे कोण वर आणतंय रे.....?

कोण साला रिकामा धागे वर आणुन र्‍हायलाय रे ... ????

अवांतर : लेख डबल डबल आवडला ? =))

-(प्राडाँचा राईट हँड चा आंगठा) ठॉ.ठॉ. ठॉठॉठॉ करुदे

गणपा's picture

26 May 2010 - 4:38 pm | गणपा

हा हा हा मस्त लेख :)
वाचलाच नव्हता.
>>सहजरावाचे धागे कोण वर आणतंय रे.....?
जो कोण आणतोय त्याला आमचे धन्यवाद ;)

परिकथेतील राजकुमार's picture

26 May 2010 - 4:43 pm | परिकथेतील राजकुमार

जो कोण आणतोय त्याला आमचे धन्यवाद .

मस्त खुसखुशीत लेखन.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

इंटरनेटस्नेही's picture

26 May 2010 - 6:14 pm | इंटरनेटस्नेही

आयुष्यात गृहीत धरलेल्या गोष्टी जेव्हा एका क्षणात नाहीश्या होतात, तेव्हाची ती हतबलता वेळ आल्याशिवाय कळायची नाही.

जबरदस्त!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

अश्फाक's picture

26 May 2010 - 10:01 pm | अश्फाक

+१ हेच म्हनतो

फटू's picture

26 May 2010 - 7:53 pm | फटू

अगदी मित्रांशी दिलखुलास गप्पा माराव्यात इतक्या "सहज"तेने लिहिलंय.

बायकोचा अनुभव नाही परंतू हल्ली आईला माझ्या जेवणाच्या आणि कपडे धुण्याच्या नखर्‍यांचा कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेतो.
पुर्वी घरी जाताना सॅक आठवडाभर घातलेल्या कपडयांनी भरलेली असायची. आता तसं होत नाही. कपडे इथेच शुक्रवारी धुतले जातात.

दिड वर्ष अमेरिकेत भांडी घासण्याच्या अनुभवाने खुप शहाणा झालोय. हेच शहाणपण बायकोच्याही कामी आलं तर अगदी गुणी नवरा मिळाला म्हणून धन्य होईल :P

- फटू

स्वाती२'s picture

26 May 2010 - 8:30 pm | स्वाती२

मस्त लिहिलयं.

अविनाशकुलकर्णी's picture

10 Jun 2010 - 9:12 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त...आवडला धागा

प्रमोद देव's picture

23 Jun 2010 - 9:13 pm | प्रमोद देव

प्रकाटाआ

अरुंधती's picture

23 Jun 2010 - 10:03 pm | अरुंधती

छान लिहिले आहे! ह्या लेखावरुन स्फूर्ती घेऊन अनेक पतीदेवांना आपल्या सहधर्मचारिणीसोबत स्वयंपाक करण्याची प्रेरणा मिळो व खमंग खाण्याचा खर्‍याखुर्‍या अर्थाने रसास्वाद घ्यायला मिळो! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

राजेश घासकडवी's picture

24 Jun 2010 - 10:38 am | राजेश घासकडवी

तुम्हाला सापडलेल्या व आवडलेल्या चमचमीत 'पाककृती' लिहायला विसरू नका. :)

या डिशमध्ये घातलेला मसाला गमतीदार आहे. अळूचं फदफदं खाता खाता त्याचा शाही कुर्मा कधी होतो कळत नाही. बाकी जोडीने करायचा 'स्वयं'पाक हे cotradiction in terms नाही का?

मात्र पुढच्या वेळी इतकं तरल लिहू नका. साल्मन मधले काटे काढून टाकले, त्याचा रंग बदलला, आणि लोकांनी तो खोबरं म्हणून खाल्ला तर काय उपयोग? प्रतिसाद देणारे बिचारे अळूबद्दल, खोबर्‍याबद्द्ल लिहितात...:)

"आमच्या कडे तसंच होतं". तेव्हापासून माझा स्वयंपाक बंद झाला.

अरेरे...

त्यातून तुम्ही म्हणता तसे बाईने 'हे क्काय यात मीठच कमी आहे किंवा काय पाणचट आहे.' असे शेरे दिले की प्रतिक्रिया काय होत असेल?

फारच तेजोभंग होत असेल.

थांबतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jun 2010 - 10:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहजकाका, झरणी आणि सुरी दोन्ही म्यान केल्या आहेत का? आणि का?

(राजेश आणि सहजच्या हातचं कधी खायला मिळेल या विचारात) अदिती

राजेश घासकडवी's picture

24 Jun 2010 - 8:14 pm | राजेश घासकडवी

(राजेश आणि सहजच्या हातचं कधी खायला मिळेल या विचारात) अदिती

तुला दोघांनी स्वतंत्रपणे केलेला स्वयंपाक म्हणायचं आहे असं गृहित धरतो...:) उगाच लेखाच्या सुरुवातीला लिहिलेल्या मध्यमवर्गीय कल्पनांना तडा जायला नको...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jun 2010 - 8:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

अवलिया's picture

24 Jun 2010 - 8:16 pm | अवलिया

कोण सहज का ? बर बर

--अवलिया