गुढीपाडव्याच्या शुभेच्छा..! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
6 Apr 2008 - 11:21 am

संस्कृतीसद्भावनाशुभेच्छा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Apr 2008 - 12:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या,
पाडव्याच्या आपणास आणि मिपाच्या माझ्या सर्व मित्रांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

असे म्हणतात की ज्याचा वर्षाचा पहिला दिवस मंगल त्याचे संपुर्ण वर्ष मांगलिक !
नवीन वर्षाच्या सुरवातीला नवीन माणूस, नवा दिवस किंवा नवीन जे काही असेल त्याची छाप आपल्यावर वर्षभर पडते, त्याचे स्मरण कायम राहते !!!

आता या शुभेच्छातील चित्रे आम्ही वर्षभर डोळ्यासमोर आणायचे का ? :)

अवांतर :) नवीन वर्षात आमच्या मित्राचे 'अनुष्का' वेड कमी होऊ दे !!! :) ( ह. घ्या. )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

6 Apr 2008 - 1:50 pm | विसोबा खेचर

अवांतर :) नवीन वर्षात आमच्या मित्राचे 'अनुष्का' वेड कमी होऊ दे !!! :) ( ह. घ्या. )

अहो बिरुटेशेठ, याला वेड नाही म्हणत हो! नशा म्हणतात, नशा..!! :)

आणि मला सांगा, नशेत वाईट काय आहे हो? फक्त ती कुणी, कशाची करावी याला महत्व आहे! नशेचेदेखील काही नियम आहेत. ते पाळून नशा करण्यास काहीच हरकत नाही!

हां, आता एखाद्याने दारूची नशा करून बायकापोरांना झोडपले तर ते अर्थातच वाईट आणि निंदनीय!

किंवा एखादी साधी, सोज्वळ, सुस्वरूप पत्नी असलेल्या एखाद्याने अनुष्काचा जप केला तर तेही बरं नव्हे!

आता आपल्या पेठकरशेठचंच उदाहरण घ्या! अहो इथे अनुष्काची चित्रं मी टाकतो, परंतु मुळात घरी एक साधी, सोज्वळ, सुस्वरूप पत्नी असलेले आमचे पेठकरसाहेब मात्र इथे मी टाकलेली अनुष्काची चित्रे पाहून उसासे टाकत असतात! मग मला सांगा बिरुटेशेठ, धोका कुणाला अधिक आहे?;)

त्यापेक्षा आम्ही बरे! अहो बोलूनचालून ती अनुष्का पडली एक फाकडू नटी! आणि आपण पडलो एक खुशालचेंडू माणूस, पत्नीच्या वगैरे बंधनात न अडकलेला, कुणालाही नैतिकदृष्ट्या बांधिल नसलेला!

बस! अपना दिल आ गया छोरीपे! पडलो साला तिच्या प्रेमात! :)

काय, पटलं की आही आमचं विवेचन? :)

आपला,
(अनुष्काचा पागलप्रेमी) तात्या.

--

किसीपे हुस्न का गुरूर जवानी का नशा
किसीके दिलपे मोहोब्बत की रवानी का नशा
किसीको देखके सांसोसे उभरता है नशा
बिना पियेभी कही हदसे गुजरता है नशा
नशेमे कौन नही है, मुझे बतावो जरा
किसे है होश, मेरे सामने तो लावो जरा
नशा है सबपे, मगर रंग नशे का है जुदा!
खिली खिली हुई सुबहपे, है शबनम का नशा
हवापे खुशबूका, बादलपे है रिमझिम का नशा
कही सुरून है खुशियोका, कही ग़म का नशा
नशा शराबमे होता तो, नाचती बोतल!

प्रभाकर पेठकर's picture

6 Apr 2008 - 2:40 pm | प्रभाकर पेठकर

आता आपल्या पेठकरशेठचंच उदाहरण घ्या! अहो इथे अनुष्काची चित्रं मी टाकतो, परंतु मुळात घरी एक साधी, सोज्वळ, सुस्वरूप पत्नी असलेले आमचे पेठकरसाहेब मात्र इथे मी टाकलेली अनुष्काची चित्रे पाहून उसासे टाकत असतात!

घ्या म्हणे उसासे टाकतो. अहो उसासे टाकले तर हसे नाही का होणार? आम्ही आपले तुम्हा तरूणांचा हेवा करतो. आणि ते ही सर्व सांसारिक बंधने पाळून. तूम्ही कसे म्हणता 'नशा कशी नशेचे नियम पाळून करावी', अरे तसेच आहे हे.

आणि लग्न केले म्हणजे मेल्या, बाकी सगळ्यांना काही राख्या नाही बांधल्या. अगदी 'राखी सावंत'लाही नाही...

विसोबा खेचर's picture

6 Apr 2008 - 2:47 pm | विसोबा खेचर

आणि लग्न केले म्हणजे मेल्या, बाकी सगळ्यांना काही राख्या नाही बांधल्या. अगदी 'राखी सावंत'लाही नाही...

हा हा हा! :))

प्रभाकर पेठकर's picture

6 Apr 2008 - 1:17 pm | प्रभाकर पेठकर

तात्यां, गुढीं बांकी छांन उभांरलींस होंऽऽ अगदीं टेंकूऽऽन....!