मिपाचा पाककृती हे सदर खूप छान आहे..अगदी त्याला कसलीच तोड नाही हे नक्कीच!! .
मी मिपा ची नियमित वाचक आणि आता सदस्य पण आहे.
पण आज कालच्या पाकृ मध्ये मला फोटो session जास्त आणि पाकृ मधला लेखकाचा रस कमी वाटतोय.
फोटो शिवाय मजा नाही मान्य !!! अगदी १०१ % ...
पण काही फोटो प्रकाशित केले नाहीत तरी काही हरकत नाही.(उदा. चिरलेले कांदे किंवा टोमाटो)
मोजकेच आणि गरजेचे फोटो द्यावे आस माझ मला वाटतय त्यामुळे पाकृ सुटसुटीत आणि नीट वाटेल..
त्यामुळे पाकृ ची चव काही कमी होणार नाही आणि वाचकांचा प्रतिसाद हि नाही ....
हे सगळ मी निर्मल मनाने सांगतेय..ह्यात मला काही कोणाला उद्देशून म्हणायचे नाही...आणि konach मन हि दुखवायचा नाही..
तुम्हाला काय वाटत मिपाकरांनो?
टीप:- हे सगळ मला वाटलं म्हणून लिहलय......... मिपाकारांचा मत हवाय.
प्रतिक्रिया
9 Aug 2010 - 11:23 am | सूर्यपुत्र
आत्तापर्यंत लक्ष दिले नव्हते. पण गेल्या आठवड्याच्या एकंदरीत चर्चा पाहता या सदराकडे दुर्लक्ष करु नये हे जाणवले....
"एक तरी पाककृती करावी शहाणी....."
9 Aug 2010 - 12:14 pm | स्मिता चावरे
आणि पूर्वीची वाचन खूण साठवण्याची सोयही असावी.
9 Aug 2010 - 4:04 pm | झक्कास...
अगदी सहमत.
फोटो जास्त वाटत आहे प्रत्येक पाकृ मध्ये.
रेसिपी देणाऱ्या सदस्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आस वाटत.
आणि त्यांनी हे सदर दुर्लक्षित केल हे जाणवतेय.
निश्चितच.
9 Aug 2010 - 5:01 pm | गणपा
>> आणि त्यांनी हे सदर दुर्लक्षित केल हे जाणवतेय.
असं का वाटलं बुवा?
ओह प्रतिक्रिया आल्या नाहीत म्हणुन?
जरा हे पण पहा
278 वाचने.
बाकी वरील मताची नोंद घेतली आहे.
9 Aug 2010 - 5:03 pm | अर्धवट
गणपा, फोटो कमी केलेस तर सुपारी देइन तुझ्या नावाची..
9 Aug 2010 - 4:58 pm | शानबा५१२
हे सगळ मी निर्मल मनाने सांगतेय.
निर्मळ मनानेच बघा की मग.
अहो कधी कधी कांदा कीती बारीक कापायचा व तत्सम गोष्टी कळतात.व पाक्रुही छान समजावुन सांगितलेली असते.
9 Aug 2010 - 5:04 pm | प्रसन्न केसकर
फोटो प्रमाणाबाहेर होताहेत असे मला वाटत नाही. अनेकदा फोटोंमुळे पाककृतीच्या क्रियांचे बारकावे कळतात आणि त्या कळणे सोपे जाते असा अनुभव आहे.
9 Aug 2010 - 5:19 pm | ऋषिकेश
नाहि पटले
9 Aug 2010 - 7:55 pm | मी-सौरभ
केवळ फोटो टाकण्याला आक्शेप घेता येइल पण माहिती सह फोटो असतील तर न आवडायच कारण नाही.
10 Aug 2010 - 10:18 am | शानबा५१२
नक्कीच सौरभ् हेच म्हणतो.
बाकी लेख एकदम क्रांतिकारक आहे!
10 Aug 2010 - 9:51 am | मनि२७
मिपा करांना माझ्या मताचा चांगलाच राग आलेला दिसतोय...
अगदी फोटो न टाकल्यास सुपारी वगैरे देताय हि लोक...
असो....
10 Aug 2010 - 11:21 am | अर्धवट
राग तुमचा नाही आला हो तै. तुमचं मत तुम्ही मांडलत, योग्य आणि संयत शब्दात.. तुमच्यावर कसला राग, तुम्हाला तो हक्क आहेच की..
पण गणपानं फोटो कमी केले तर मात्र नक्की राग येइल.
10 Aug 2010 - 10:04 am | सहज
अहो अमराठी / देवनागरी न समजणार्या कुकला हे स्टेप बाय स्टेप फोटो हातात ठेवून दिले की पाकृ फारशी समजुन द्यायची भानगड नाही ना हो. उलट समजुन देताघेता शब्दात अडकून चव हरवायची. हे फोटोच बेस्ट!
फोटो हवेच!
10 Aug 2010 - 10:13 am | शिल्पा ब
फोटो हवेतच...