मिपा पाककृती..
लेखनप्रकार
मिपाचा पाककृती हे सदर खूप छान आहे..अगदी त्याला कसलीच तोड नाही हे नक्कीच!! .
मी मिपा ची नियमित वाचक आणि आता सदस्य पण आहे.
पण आज कालच्या पाकृ मध्ये मला फोटो session जास्त आणि पाकृ मधला लेखकाचा रस कमी वाटतोय.
फोटो शिवाय मजा नाही मान्य !!! अगदी १०१ % ...
पण काही फोटो प्रकाशित केले नाहीत तरी काही हरकत नाही.(उदा. चिरलेले कांदे किंवा टोमाटो)
मोजकेच आणि गरजेचे फोटो द्यावे आस माझ मला वाटतय त्यामुळे पाकृ सुटसुटीत आणि नीट वाटेल..
त्यामुळे पाकृ ची चव काही कमी होणार नाही आणि वाचकांचा प्रतिसाद हि नाही ....
हे सगळ मी निर्मल मनाने सांगतेय..ह्यात मला काही कोणाला उद्देशून म्हणायचे नाही...आणि konach मन हि दुखवायचा नाही..
तुम्हाला काय वाटत मिपाकरांनो?
टीप:- हे सगळ मला वाटलं म्हणून लिहलय......... मिपाकारांचा मत हवाय.
वाचन
2483
प्रतिक्रिया
0