लोकहो,
मिसळपावच्या सर्व सभासदांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो, आणि नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्री व्याडेश्वरचरणी प्रार्थना.
आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत
पंचांगाबद्दल खुलासा:-
दिनांक ०६/०४/२००८ रोजी आपले नवीन वर्ष सुरू होत आहे. या दिवशी सकाळी गुढी उभारून, नवीन पंचांगाची पूजा केली जाते.
या वर्षी गुढीपाडव्याला क्षयतिथी आली आहे. याचा अर्थ शुद्ध प्रतिपदा कोणत्याही सूर्योदयाला नाही. सकाळी ९ वाजून २६ मिनीटांपर्यंत अमावास्या आहे. त्यानंतर प्रतिपदा लागते आहे. ती दिनांक ०७ एप्रिल रोजी सकाळी ०६.०९ पर्यंत म्हणजे सूर्योदयापूर्वी संपते आहे. त्याखोलात आम्ही आत्ता जात नाही. पण सांगण्याचा मुद्दा हा की गुढी सकाळी ०९.२६ नंतरच उभारावी.
देवांची पूजा, पंचांगाचे पूजन, गणेशपूजन हे सर्व विधी सकाळी ०९.२६ पूर्वी करू नयेत.
आपला,
(शास्त्रीबुवा) धोंडोपंत
प्रतिक्रिया
5 Apr 2008 - 9:37 am | पिवळा डांबिस
नववर्षाच्या अनेक शुभेच्छा!!
धोंडोपंत, एक शंका आहे. आमच्यासारख्या पश्चिमनिवासी लोकांकरता! आम्ही हे सगळे सण कालनिर्णयमधे दिल्याप्रमाणे पाळावे की टाईम डिफरन्स लक्षात घेऊन त्याप्रमाणे १२ तास उशीराने पाळावेत?
अवांतर: हा टारगटपणा नाही, खरोखरची शंका आहे, मलाही आणि इतर अनेक इथे रहाणार्या लोकांसाठी.
आपला,
पिवळा डांबिस
5 Apr 2008 - 5:46 pm | सुवर्णमयी
आपण राहता त्या गावात/ त्यापासून जवळ जर एखादे हिंदू मंदीर असेल तर तेथे विचारून बघा. येथे पंचांगानुसार केव्हा कोणती तिथी आहे ते सांगतात. त्यानुसार करा. दर वेळी १२ तास उशीरा असे होत नाही अथवा करुन चालत नाही असा माझा अनुभव आहे. माझ्या आठवणीत काही सण अमेरिकेतील मंदीराने भारतीय लोकांबरोबरच केलेलेही आठवत आहेत.
5 Apr 2008 - 9:30 pm | पिवळा डांबिस
सुवर्णमयी,
अधिक माहितीबद्द्ल आभार. चांगली आयडिया आहे, आता मालिबू टेंपललाच फोन करून विचारतो...
आ.
पिवळा डांबिस
5 Apr 2008 - 9:33 pm | व्यंकट
http://www.mypanchang.com/panchang2008.html
व्यंकट
5 Apr 2008 - 10:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंत, पाडव्याच्या आपणास आणि मिसळपावच्या सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा !!!
अवांतर :) मराठी नववर्षात मिपावर साहित्य,समाज, राजकारण,खादाडी आणि सर्वच विषयावरील मनसोक्त लेखन वाचायला मिळेल. त्याचबरोबर, मिपाचे सदस्य कार्यालयातील जालाचा वापर करुन अवांतर गप्पांनी मिपाचा डाटा भरणार नाही, असेही वाटते. (ह. घ्या. )
5 Apr 2008 - 11:07 am | रिमझिम
माझ्याही मिसळपाव परिवाराच्या सर्व सदस्यांना नववर्षाच्या अनेक शुभेच्छा!!
नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे जावो !!
रिमझिम :)
5 Apr 2008 - 11:13 am | व्यंकट
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
व्यंकट
5 Apr 2008 - 11:18 am | शरुबाबा
नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे जावो !!
5 Apr 2008 - 1:05 pm | अनामिका
गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
चैताचा महिना आला...
मराठीच्या वर्षाचा आरंभ झाला...
दिवस तो शुभमुहुर्ताचा,
गुडी उभारुन मान उंचवण्याचा...
सजायला लागली मंदीरे
सजायला लागली घरे...
भिंतीवरी घराच्या चढवु लागली...
रंगरंगोटीची नव नवीन थरे...
साडेतीन मुहुर्ताचा दिस म्हणून
खरेदीचा बेत आखू लागले...
फुलांच्या माळानी दाराची तोरणे सजवू लागले...
आता सुरू झाली गुढीची तयारी
तीला नेसवली साडी नवारी...
नटली गुढी मराठमोळ्या परंपरेची...
मान उंचावुन सांगते ती गाथा शुरविरांची...
चला गुळ खोबरं वाटूया...
गुढीसमोर पुरणपोळीचा नैवद्य ठेवूया...
ह्या भरकटलेल्या समाजाला गुढीचं पावित्र्य सांगून
सहकुटुंब दोन्ही हाताने वंदन करूया...
मित्र मैत्रिणिनो गुढीपाडवा म्हणजे
चैत्र शुध्द्प्रतिपदा ...
तुम्हाला या मराठी वर्षाची...
जाण राहुदे सदासर्वदा...
आता उभारा गुढी समजूतीची
उभारा ग़ुढी माणुसकीची...
पेटवा मशाल तारूण्याची...
मग चला तर ग़ुढीपाडवा साजरा करू...
अन शान वाढवूया या विजयी महाराष्ट्राची...
गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
"अनामिका"
5 Apr 2008 - 2:00 pm | इनोबा म्हणे
समस्त मिसळपाव गावकर्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!
अवांतर :) मराठी नववर्षात मिपावर साहित्य,समाज, राजकारण,खादाडी आणि सर्वच विषयावरील मनसोक्त लेखन वाचायला मिळेल. त्याचबरोबर, मिपाचे सदस्य कार्यालयातील जालाचा वापर करुन अवांतर गप्पांनी मिपाचा डाटा भरणार नाही, असेही वाटते. (ह. घ्या. )
हे मात्र जमणार नाही. (हे पण ह. घ्या.)
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
5 Apr 2008 - 2:33 pm | मनीष पाठक
मित्र मैत्रिणिनो गुढीपाडवा म्हणजे
चैत्र शुध्द्प्रतिपदा ...
तुम्हाला या मराठी वर्षाची...
जाण राहुदे सदासर्वदा...
आम्हीही हेच म्हणतो.
सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
मनीष पाठक
5 Apr 2008 - 2:50 pm | विसोबा खेचर
शास्त्रीबुवांना आणि समस्त मिपाकरांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा...
शिवाय उद्या आम्ही स्वतंत्र भेटकार्ड बनवून शुभेच्छा देऊच! :)
तात्या.
5 Apr 2008 - 3:45 pm | गोट्या (not verified)
नववर्षाच्या अनेक शुभेच्छा!!
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
5 Apr 2008 - 8:24 pm | विद्याधर३१
हिन्दु नववर्षाच्या सर्व मिपाकराना हर्दिक शुभेछा....
मिपाची गुढी अशीच उन्च गगनावरी जाउ दे हीच मनोकामना..
विद्याधर
5 Apr 2008 - 8:35 pm | ब्रिटिश टिंग्या
सर्व मिपाकरांना व नॉन-मिपाकरांना नुतन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख्-समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही इश्वरचरणी प्रार्थना!
(शुभेच्छुक) टिंग्या :)
5 Apr 2008 - 11:03 pm | संजय अभ्यंकर
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
6 Apr 2008 - 8:02 am | प्रमोद देव
समस्त मिसळपावकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!
6 Apr 2008 - 9:22 am | प्रशांतकवळे
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रशांत
6 Apr 2008 - 9:55 am | मदनबाण
मि.पा च्या सर्व सभासदांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
मदनबाण