“ घेतला वसा षंढतेचा ”
आपल्याच लेकरांचे
रक्त जेव्ह्ना सांडते,
मातेचेहि उर तेव्ह्ना
आक्रंदतांना फाटते
“ सिमेपारचा ” दहशतवाद
सोयीची भाषा असे,
फोफावतो तो सर्वत्र येथे
खंत त्याची आम्हा नसे
.
पाहतो उध्वस्त घरे, शहरे
अन उष्ण रुधीरांचे सडे,
तरीहि शिकवतो जगतां आम्ही
षंढतेचे नैतिक धडे.
पायघड्या पसरुनी अता
स्वागत कसाबाचे करा,
घेउनी षंढतेचा वसा,
लांगुलचालन पाक्यांचे करा.
.
काय येवढे काश्मिराचे
देश आपुला छोटा नसे,
एक काश्मीर नाही म्हणोनी
काय अडते फारसे ?
निरंजन वहाळेकर
प्रतिक्रिया
4 Aug 2010 - 12:22 pm | पाषाणभेद
आक्रंदन पटले.
4 Aug 2010 - 12:57 pm | पक्या
>>काय येवढे काश्मिराचे
देश आपुला छोटा नसे,
एक काश्मीर नाही म्हणोनी
काय अडते फारसे ?
छान टोला मारलाय !
>>तरीहि शिकवतो जगतां आम्ही
षंढतेचे नैतिक धडे.
इथे षंढतेचे नैतिक धडे ह्या ऐवजी नैतिकचे षंढ धडे असे हवे असे वाटते.
5 Aug 2010 - 7:36 am | निरन्जन वहालेकर
नैतिकचे षंढ धडे असे हवे. अगदी योग्य. पण पुनरसम्पादनाचि पुर्विप्रमाणे सोय नाही. मार्गदर्शनाबद्दल आभार.
6 Aug 2010 - 9:03 pm | गंगाधर मुटे
मस्त कविता.