गोडबोले सरांचा परिचय!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
28 Sep 2007 - 2:31 am

राम राम मंडळी,

माझे संगीतक्षेत्रातले स्नेही डॉ अशोक गोडबोले हे मिसळपावचे एक सन्माननीय सदस्य आहेत. परंतु 'मिसळपावचे सदस्य' एवढीच त्यांची ओळख मला थोडी अपुरी वाटते. आणि म्हणूनच मी या विद्वान व्यक्तिबद्दल येथे चार शब्द लिहू इच्छितो.

मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चारही भाषांवर असामान्य प्रभूत्व, संतसाहित्याचा गाढा अभ्यास, संस्कृतचा प्रकांडपंडित आणि संस्कृत साहित्याचा अतिशय दांडगा व्यासंग, ही गोडबोले सरांची वैशिष्ठ्ये म्हणता येतील. गणित व तत्वज्ञान, वाङ्मय हे सरांचे अतिशय आवडीचे विषय. त्याचप्रमाणे गोडबोले सर मराठी, संस्कृत, व हिंदी भाषेतून काव्यरचनाही अतिशय उत्तम करतात. काही साहित्यकृतींचा इंग्रजी अनुवादही सरांनी केला आहे व त्याची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

सरांचं शिक्षण एम ए, व त्यानंतर पीएचडी.

भारतीय स्थलसेनेच्या तोफखाना विभागातून राजपत्रित अधिकारी या पदावरून निवृत्त. त्यानंतर पनवेल जवळील रसायनी येथील शाळेत काही काळ प्राचार्य होते.

चर्चासत्र व भाषण संदर्भात युरोपमधील विविध देशात व अन्य परदेशी विद्यापिठात शोधनिबंध सादर.

प्रकाशित पुस्तके -

१) दासोपंतांचे हिमालयीन कर्तृत्व.
२) 'विश्वमानव स्वामी विवेकानंद' या डॉ वि रा करंदीकर यांच्या त्रिखंडात्मक मराठी चरित्राचा इंग्रजी अनुवाद.
३) क्रान्तदर्शी सावरकर.
४) रामरक्षा बोध.
५) संस्कृतमधील काही सुभाषितांचा इंग्रजी अनुवाद असलेले ढवळे प्रकाशनाचे 'सार्थ सुभाषितानि' हे पुस्तक प्रसिद्ध.
६) परागकण दासबोधातले.
७) श्रीअथर्वशीर्षप्रकाश.
८) रामरक्षा बोध.
९) 'अष्टदृष्टी भारत' आणि श्री विश्वास पाटील लिखित 'पानिपत' या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद ही पुस्तके सध्या प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.

मंडळी, वरील केवळ यादी वाचूनच सरांचा व्यासंग वाचकांच्या सहज लक्षात यावा! :)

संगीताचीही सरांना अत्यंत आवड आहे पण ते 'तुमच्या रागाबिगतलं आपल्याला काही समजत नाही, तुम्हीच समजावून सांगा बुवा!' या एकाच सबबीखाली सर मला सहन करतात! :)

आणि 'तात्या अभ्यंकराने संगीताबद्दल बोलणे म्हणजे एस्किमोने आईस्क्रीमबद्दल बोलल्यासारखे आहे' असं गंमतीने म्हणतात! :)

असो! मंडळी, एवढी व्यासंगी आणि विद्वान व्यक्ति माझी स्नेही आहे याचा मला अभिमान वाटतो. तसेच मिसळपावकरताही ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. सरांनी त्यांच्या कामच्या व्यापातून मिसळपावकरताही अवश्य वेळ काढावा आणि येथे लिहावे असे वाटते!

तात्या अभ्यंकर.

साहित्यिकशिक्षणप्रकटन

प्रतिक्रिया

वाचक्नवी's picture

7 Apr 2008 - 8:54 pm | वाचक्नवी

वांगमय (च्यामारी हा शब्द कसा लिहितात कुणास ठाऊक?:)
व्हीएए-कॅपिटल जी-एमए-वायए असा .--वाचक्‍नवी

धन्यवाद!
आपल्या सांगण्याप्रमाणे बदल केलाय!
संपादक

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Apr 2008 - 9:39 pm | llपुण्याचे पेशवेll

शिफ्ट + 'जी' अशा कळा दाबाव्या... म्हणजे ङ लिहीता येतो.
पुण्याचे पेशवे

तात्या, गोडबोलेसरांचा परीचय करुन दिल्याबद्दल आभारी आहे.
गोडबोले सरांचेही स्वागत. त्याचे विविधांगी लेखन वाचायला आवडेल.
पुण्याचे पेशवे

आनंदयात्री's picture

8 Apr 2008 - 11:18 am | आनंदयात्री

तात्या तुम्ही त्यांना सांगा मिपा वर यायला अन त्यांचे अनुभव ज्ञान आपल्याबरोबर वाटायला. संस्कृत मधला ज्ञानी माणुस, तोफखाना विभागात काम केलेला नक्कीच अनुभव समृद्ध असणार.
बाकी "दासोपंतांचे हिमालयीन कर्तृत्व" हे पुस्तक कशाबद्दल आहे ??

केशवराव's picture

8 Apr 2008 - 6:21 pm | केशवराव

तात्या ,
एका जुन्या मित्राची मि.पा. वर अशी भेट झाली ; खुप खुप बरे वाटले. हेच गोडबोले सर [अशोकराव ] आर्.सी.एफ.च्या किहीम शाळेवर मुख्याध्यापक होते. आमच्या ग्रुपचे ते एक सदस्य होते. अजुनही पनवेलला भेट - गाठ होते. आमचे एक मित्र श्री. विश्वास भिडे यांचेकडे.
भाषेवर विलक्षण प्रभुत्व असलेला हा माणुस; संगीत, वांङ मय, धर्मकारण, रामायण - महाभारत आणि कितीतरी गोष्टींवर सहज बोलायचा ..... बस ऐकत रहावे.
' मोहन रानडे ' वर त्यांनी केलेली कोटी-----' मोह नरा नडे '
अशा आमच्या सरांनी मि.पा. वर लिहीले तर बहारच येईल. वाट पहात आहोत.
गोडबोले सरांचा स्नेही....... केशवराव.