मोहम्म्द रफी साहेबांची आज पुण्यतिथी!

संजय अभ्यंकर's picture
संजय अभ्यंकर in जनातलं, मनातलं
31 Jul 2010 - 10:02 pm

स्व. रफी साहेबांना प्रणाम!
ऐकूया त्यांचे आजरामर गाणे.

संगीतसद्भावनाबातमी

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

31 Jul 2010 - 10:18 pm | चिरोटा

रफी साहेबांना प्रणाम.३० वर्षे झाली त्यांना जावून पण त्यांच्या आवाजाची जादू अजुनही आहे.versatile singer अशी ओळख असलेले रफी साहेब अगदी पडद्यावरच्या कुठल्याही नटाला हुबेहुब शोभेल असा स्वर देत.प्रदिप कुमार्,राजेंद्रकुमार्,शम्मी कपूर,शशी कपूर्,धर्मेंद्र्,जॉय मुखर्जी,जितेंद्र ह्यांच्या 'करीयर' मधून रफी साहेबांचा आवाज वगळला तर काय उरते? जवळ्पास शून्य!!
भजन असो वा कव्वाली वा प्रणय गीत ,नौशाद असो वा ओ.पी वा सी.रामचंद्र ,प्रत्येक गाण्याला,संगीतकाराला रफी साहेबांनी १००% न्याय दिला.
----

(डॉ. दाढ्यांच्या आणि प्रदीप ह्यांच्या अभ्यासू प्रतिक्रियांची वाट बघणारा) चतुरंग

नितिन थत्ते's picture

31 Jul 2010 - 10:30 pm | नितिन थत्ते

थोर गायक.
पडद्यावर जो कोणी कलाकर ते गीत सादर करणार आहे मग तो सर जो तेअरा चकराये मधला जॉनी वॉकर आसो वा चाहे कोई मुझे जंगली कहें मधला शम्मी, त्याला मिळता जुळता आवाज असायचा रफीसाहेबांचा.
त्यांना जाउन ३० वर्ष झाली?

ते गेले तेव्हा दुरर्शनवर लागलेल सुहानी रात ढल चुकी अजुनही डोळ्यांपुढे तरळते.

हुप्प्या's picture

1 Aug 2010 - 4:42 am | हुप्प्या

निगर्वी, मृदूभाषी आणि अत्यंत महान प्रतिभावंत गायक. हेवेदावे आणि अहंकार ह्या प्रकारांपासून (जे ह्या इंडस्ट्रीत नेहमीचेच असतात) अलिप्त. उर्दू भाषेची उत्तम जाण असल्यामुळे गाण्याचे उच्चारही आदर्शवत.

संगीताचे सुवर्णयुग ज्या कलाकारांनी निर्माण केले त्यातला एक महत्त्वाचा वाटा ह्यांचा होता.
ह्या बहारीच्या काळातील हिट गाणी चाळीस, पन्नास, साठ वर्षे उलटून गेली तरी पुन्हा पुन्हा ऐकली जातात.

ह्या गायकाची विशेषतः सुरवातीच्या काळातील गाणी ऐकली की आवाजातील जादू, नजाकत आणि ताकद हे सगळे अनुभवायला मिळते.

असंख्य गुणी अभिनेते तसेच अनेक ठोकळे, ह्या सुरेल गायकाच्या पार्श्वगायकीमुळे आणि उत्तम गीत, संगीतामुळे यशस्वी झाले.

परंतु एकंदरीत नटनट्यांच्या तुलनेत ह्या कलावंताना पुरेसा मोबदला मिळत नसे ह्याची मला खंत वाटते. असे व्हायला नको होते.

कित्येक सिनेमे असे आहेत जे लोकांना फार आठवत नसतील पण त्यातली रफीसाहेबांसारख्या समर्थ गायकांची गाणी लोकांच्या मनात अजरामर आहेत.

माझा त्यांना मनापासून सलाम.