तुझ्या श्वासांचा विळखा
तुझ्या नजरेची मिठी
तुला पाहता लाजून
झुके पावलांशी दिठी
तुझे मौनही बोलके,
गूज डोळ्यांनी सांगते
भाव जाणून त्यातले
गीत मनात रंगते
दुराव्यात जवळीक
जपणारी तुझी प्रीत
तिचा अनाहत नाद,
तिचे स्वर्गीय संगीत
तिची अवीट माधुरी
स्वप्न जागवी बिलोरी
तुझी क्षणांची संगत
माझी जन्माची शिदोरी
प्रतिक्रिया
28 Jul 2010 - 7:40 pm | श्रावण मोडक
वा. आवडली.
परत वाचली. 'नाही पुण्याची मोजणी' हेच डोक्यात घोळत राहिलंय...
विडंबकांना मात्र फुलटॉस. आणारे पॉपकॉर्न...
28 Jul 2010 - 7:32 pm | प्रभो
आवडली.
28 Jul 2010 - 8:15 pm | तर्री
रचना / अर्थ छान.
पहीले कडवे तुलनेने कमअस्सल .
अजून रचना येवू द्या ....
29 Jul 2010 - 10:03 am | फ्रॅक्चर बंड्या
फारच छान ..
29 Jul 2010 - 2:54 pm | मनीषा
तुझी क्षणांची संगत
माझी जन्माची शिदोरी
आवडली कविता .
29 Jul 2010 - 8:30 pm | स्पंदना
दिलखेच !
30 Jul 2010 - 1:41 am | राघव
मस्त!
30 Jul 2010 - 1:57 am | दत्ता काळे
कविता आवडली.
दिठी' हा शब्द बहुतांशी अभंगात, भक्तिगीतात आढळतो. त्यामुळे वाचताना थोडा रसभंग झाला.
'तुझे मौनही बोलके,
गूज डोळ्यांनी सांगते
भाव जाणून त्यातले
गीत मनात रंगते
- फार सुंदर.
30 Jul 2010 - 3:11 am | धनंजय
खूप दिवसांनी क्रान्ति यांची सुरेख कविता वाचायला मिळाली. धन्यवाद.
30 Jul 2010 - 3:16 am | चतुरंग
ह्या कवितेत सुध्दा दिसते!
खूपच छान कविता. :)
31 Jul 2010 - 11:58 am | वैभव देशमुख
चांगली रचना
31 Jul 2010 - 1:38 pm | रणजित चितळे
कविता खुप आवडली
रणजित चितळे
31 Jul 2010 - 1:46 pm | परिकथेतील राजकुमार
अ प्र ति म !
तुझे मौनही बोलके,
गूज डोळ्यांनी सांगते
भाव जाणून त्यातले
गीत मनात रंगते
हे खासच.
31 Jul 2010 - 5:28 pm | चित्रा
छान कविता..
1 Aug 2010 - 6:36 pm | मदनबाण
सुंदर कविता... :)