मंद जाहल्या तारका.......
मंतरलेले दिवस ते
चंद्र होता साक्षीला,
पुनवेच्या राती रुपेरी
प्रेमरंगी तुजसवे नाहल्या.
रात्र होती तरुण
अन यौवनी मी तुजसवे,
मोरपंखी मधुर स्वप्नात तू
गंध रातराणीचा दरवळे.
मदहोश मी, बेधुद तू
चंद्र मजकवे सामावला,
हलकेच डोकाउनी नभातून
तारकाहि गाली लाजल्या.
आजही रात्र तैसीच आहे
गंध तोच रातराणीचा दरवळे
? ? ? ? ? ? ?
चंद्र नाही आज मजकवे
तारकाहि मंदावल्या.नभीच्या
निरंजन वहाळेकर
प्रतिक्रिया
28 Jul 2010 - 2:47 pm | पाषाणभेद
आठवणीतील रात्र जमली आहे.
"मदहोश" हा शब्द कसा वाटला?
28 Jul 2010 - 3:26 pm | निरन्जन वहालेकर
धन्यवाद ! सुचनेचे स्वागत !
पण पूर्वीसारखी "संपादन" ची सोय दिसत नाही म्हणून "मदहोश" ऐवजी " बेभान " हा शब्द बदलता आला नाही