रे माझ्या गळणार्‍या केसा...

स्व's picture
स्व in जनातलं, मनातलं
26 Jul 2010 - 6:16 pm

आम्ही विशी गाठेस्तोवरच केस गळतीनं आम्हाला गाठलं. नक्की काय करायला हवं ते ठरवे पर्यंत काही महिनेच गेले अस्तील पण आम्ही पार चाळीशीला भिडलेलं, बर्‍यापैकी टक्कल पडायला सुरुवात झालेलं शीर टोपीखाली ठेउन मिरवायला लागलो.
(होमिपथी,आयुर्वेदिक )उपचार ,उपास तापास्,भूत बाधा ,मानसोपचार केश-रंगकाम, जिरेटोप चढवणं(weaving/bonding) असे सर्व उपचार करुन, जाणार्‍या हरेक केसासोबत आम्ही त्याच्या दहापट पैसे घालवुन बस्लो.
तर अशी ही आमच्या विविध मार्गनं केलेल्या प्रयत्नांची दिशा आणी दशा:-
१.महाविद्यालयाच्या तिसर्‍या वर्षाच्या मध्याला कुणा हितचिंतकानं हळु हळु केस गळती लागल्याचं निदर्शनास आणलं.
२.काही दिवसातच डॉ सतिश वैष्णव ह्यांची केश समस्येवर "शर्तिया इलाज" सारखी वाटाणारी,होमिपथी वाली पेप्रातील जाहिरात बघुन तिक्डं डेरेदाखल.
३. तिथला फायदा दिसायला वेळ लागतोय म्हणल्यावर त्याच्यासोबतच सर्व धार्मिक्,दैविक,मांत्रिक असले paranatural उपाय सुरु.
४.दोन्-अडीच वर्षानंतरही सर्व पथ्ये पाळत असून सुद्धा उपयोग होत नाही म्हटाल्यावर,उपचार करणार दैवत आम्ही बदललं. पुण्यामध्ये "डॉ बात्रा" (हे ही होमिपथिकच)ह्यांचं शिष्यत्व पत्करलं.
६.सुमारे तीन वर्षे सलग उपचार घेउन काय उप्योग होत नाय म्हटल्यावर शहाणा माणूस थांबला अस्ता.
आता आम्ही अतिशहाणे असल्यानं आयुर्वेदिक च्या मागं पडलो.
वर्षभर झाले,उपयोग फारसा नाही. आता अनुपम खेर, अमरिश पुरी,राकेश रोशन ह्यांच्या लायनीत लागलोय.(पैशाच्या हिशोबानं असतो तर बरं झालं असतं तिच्य्आय्ला.)
७.शेवटी weaving करुन घेतलं.कुणा दुसर्‍याचेच केस दत्तक घेउन ते आपलेच आहेत असं मानलं.
पण हे सोंग काही दिवसाच्या वर वठवता आलं नाही.
८.आता hair transplant करण्याचा विचार आहे.(तेव्हढा एकच प्रकार राहिलाय, म्हटलं cosmetic surgeon ला तरी कौपशी ठेवावं, सगळ्यांना वाटात सुटालो आहोत तर.)

मिळालेला बोधः-
केस गळणं हे क्रियापद "गाळणीतुन चहा गळणं" ह्यासारखं घ्यावं.गाळणीत चहा घेउन कुणाला फिरता येतं का? नाय ना, बस्स मग.
लागलेली गळती (typical mail baldness pattern)सहसा थांबत नाही.
"खल्वाटो निर्धनम् क्वचित्" ह्या उक्तिच्या आशेवर जिवंत रहावं> आज नाय तर उद्या अंबानीच्या पप्पापेक्षाही अधिक पैका आपल्याला मिळेल्,ह्यावर विश्वास ठेवावा. नसेल तर.
डोक्याच्या शेतात केस गळु लागले,की चिंतांचं पीक येतं. निदान ते कमी ठेवावं.
काही जणांना नको तिथं केस असतात, काढायचे श्रम पैसे फार जातात्,त्यापेक्षा आपल्याला केस नाहित ह्यातच समाधान मानावं.
शेवटी काहीही झालं तरी केस जाणं ही एक सिरिअस केस आहे.
टाळक्यावरुन गेलेले केस बघताना अगदी आपल्या हातची केस दुसर्‍याच वकीलाकडे गेल्याच्या दु:खापेक्षा हे दु:ख नक्केच मोठं आहे.
मेसचं खाउन केस जातात हे ऐकुन आता तोंडाला फेस आलाय.
"गळणारे केस"ह्या समस्येला कसे करावे face ह्या चिंतेत आम्ही अजुनही आहोत.
ह्या चितेनं अजुन केस जातहेत.
एकदा टक्कल पडलं की मग त्यावर काही उगवण्यापेक्षा घरच्या सपाट फरशीवर भरघोस धान्य उगणं सोप्प आहे.

केसाला लागलेली गळती, खिशापर्यंत पोहोचु नये म्हणुन (दिवसेंदिवस उजाड दिसत जाणारं)थोडं डोकं वापरावं.
अधिक सविस्तर (जमलं तर उपचार, उपचार प्रकार, लागणारा खर्च आणी त्याचा उपयोग ह्याबद्दल)लिहिनच wig वगैरे फिट करुन आल्यावर.

तंत्रराहणीप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

अवलिया's picture

26 Jul 2010 - 6:18 pm | अवलिया

विजुभाउ आठवले

विजुभाऊ's picture

27 Jul 2010 - 9:50 am | विजुभाऊ

विजुभाउ आठवले
--अवलिया

ह्ल्क्त... ब्व्ल्त.. अच्र्त..
असो.
गळणार्‍या केसांबद्दल तक्रार करून काहीच होत नाही. उलट केस जास्त गळतात.
केस असते तर मी कसा दिसलो असतो याची चिंता करण्यापेक्षा. केस गळाल्याचे फायदेही असतात.
१) लोक उगाचच आपल्याला तत्वज्ञ /बुद्धीमान समजतात
२) आपली मते विचारतात.
३) हापिसात कष्टाची कामे सहज टाळता येतात
४) कश्टमर मिटींग मध्ये कोणीतरी सिनियर आदमी है म्हणून आपले प्रेझेन्टेशन सिरीयसली ऐकतात
५) डोक्यात पावसाचे पाणी मुरत नाही.
६) तुम्ही कधीच म्हातारे होत नाहीत. केस कधीच पिकत नाहीत ( त्या अगोदरच गळालेले असतात)
७) तुमचे वय वाढत नाअही . म्हणजेचतुम्ही चिर तरूण रहाता. (लोक केसांवरून वय ठरवतात)
८) तेले.. शांपू... कटिंग यांचे वायफळ खर्च टळतात
९)कंगवे खिशात मिरवत बसण्याची गरज उरत नाही
१०)उवा कोंडा वगैरे पासून समूळ मुक्तता मिळते.
११)आरसा नसला तरी फारसे नडत नाही

केस गळाल्याचे तोटे
१) तोंड धुताना साबण कुठपर्यन्त लावावा ते समजत नाही.

ज्यांच्या डोक्यावर भरपूर केस असतात त्यांच्या थोबाडावर "खल्वाटो काचित निर्धनः " असे संस्कृत वचन फेकून मारावे.

स्व's picture

27 Jul 2010 - 7:19 pm | स्व

१) लोक उगाचच आपल्याला तत्वज्ञ /बुद्धीमान समजतात:-
हित्तच तर लोच्या आहे. नेमके मग काही देखणे चेहरेही (आदरानं का असेना) जर्रशे जपुनच्,दुस्रुनच बोलतात.
२) आपली मते विचारतात.
:- मत सांगितली तर मत-मतांतरे होतात.
३) हापिसात कष्टाची कामे सहज टाळता येतात
:- अनुभव उलट आलाय अगदि.काय मिष्टेक होतिये ते बघावं लागेल.
४) कश्टमर मिटींग मध्ये कोणीतरी सिनियर आदमी है म्हणून आपले प्रेझेन्टेशन सिरीयसली ऐकतात
:- हे मात्र अगदि खरय बुवा.
५) डोक्यात पावसाचे पाणी मुरत नाही.
:-अहो पण तेच पाणी धो-धो करुन झोडापतं ना...

६) तुम्ही कधीच म्हातारे होत नाहीत. केस कधीच पिकत नाहीत ( त्या अगोदरच गळालेले असतात)
:-मध्यम्वयीन माणसाचे केस गेले तर तो म्हातार होत नाही.
पण एखाद्याचे विशीतच गेले तर तो मध्यमवयीन नाही का दिसत?
७) तुमचे वय वाढत नाअही . म्हणजेचतुम्ही चिर तरूण रहाता. (लोक केसांवरून वय ठरवतात)
:- वरच उत्तर.
८) तेले.. शांपू... कटिंग यांचे वायफळ खर्च टळतात
:_- उपचाराचे खर्च वाढतात ना सर्कार.(उपचार करायला गेलात तरच.)
९)कंगवे खिशात मिरवत बसण्याची गरज उरत नाही
:- अगदि अगदि...कबुल.
१०)उवा कोंडा वगैरे पासून समूळ मुक्तता मिळते.
:- कोंड्यातुन अजुन नाय मिळाली ब्वा.केस नाहित पण कोंडा आहे!
(जरासं भारत सर्कार सारखं आहे हो, रस्ते नाहित पण खड्डे आहेत.)
११)आरसा नसला तरी फारसे नडत नाही
:- हो हे खरच.
शिवाय तयार व्हायला वेळ लागत नाही.
तुम्ही झोपेतुन उठुन आलात तरी कुणाला पत्ता लागत नाही.
केस गळाल्याचे तोटे
१) तोंड धुताना साबण कुठपर्यन्त लावावा ते समजत नाही.
हे खरय. म्हणूनच उपाय हा की तोंड धुवु नये.
बाकी,आपलं अनुभव विश्व ह्याबाबतीत तगडं दिसतय.
अनुभवाचे बोल आहेत खरं.

मिसळभोक्ता's picture

31 Jul 2010 - 5:34 am | मिसळभोक्ता

विजूभाऊ म्हणजे अगदीच गॉन केस आहेत का ?

रेवती's picture

26 Jul 2010 - 6:24 pm | रेवती

हे हे हे!
मजेशीर आहे हा प्रकार!
मलाही आज सकाळीच केसगळतीची आणि त्यामुळे बाकिच्या आठवणी आल्या होत्या.
लिहावे का त्याबद्दल असा विचार करतीये!;)

शानबा५१२'s picture

26 Jul 2010 - 6:29 pm | शानबा५१२

hair transplant करा.
बोरीवलीमधे करा वसुधन अर्जिनमधे.
समाधानकारी रेझल्ट मिळतील. पण १-२ लाख मोजावे लागतील.नक्की कीती ते केवढा एरीया कव्हर करायचा आहे त्यावर अवलंबुन आहे.पण तुमची केस दुर गेलेय म्हणुन एवढे लागतील.
सेहवागसारख बायोफायबर नका लावु(७०,००० रु).इन्फेक्शन व्हायचा धोका असतो.

जय महाराष्ट्र.

मी कोण???...................डॉक्टरचा 'तो'!

अगदी माझाच अनुभव जशाच्या तसा लिहिल्यासार्ख वाटला. माझेही खूप केस गेलेत आणि टक्कल पडायला लागले आहे. (भोवरा जाईलसं वाटतं)

स्वानुभव फारच हसत खेळत मांडला आहे.
काही अंशी केस गळुन टक्कल पडणे हे अनुवांशीक असते.
ज्याचे (केस) गळे त्यालाच कळे.

तुर्तास छप्पर जागच्या जागी आहे,
पण २-४ पांढरे केस डोकं वर काढायला लागलेत. :(

शुचि's picture

26 Jul 2010 - 8:45 pm | शुचि

भरदार केशकलप म्हणजे "क्राऊनिंग ग्लोरी" असते हे जरी खरं असलं तरी केवळ बाह्यरूपाने माणसाचं व्यक्तीमत्व घडत नाही. मी अनेक रूबाबदार , देखणे पण विरळ केसांचे लोक पाहीले आहेत. त्यांचा रूबाबदारपणा बहुतांशी बाह्यरूपाशी निगडीत नसून त्यांची स्वतःबद्दलची जी एक "इमेज" होती तिच्याशी निगडीत होता. आत्मविश्वास, सर्वंकष विकास अनेक गोष्टी त्यात आल्या. सांगायचा मुद्दा हा - गळलेल्या केसांनी देखणेपणात अजीबात उणीव येत नाही उलट "मॅच्युअर" लूक येतो जो भारदस्त आणि आश्वासक असतो.

बहुतेक पुरुष तर वय वढतं तसे देखणे दिसतात म्हणजे त्यांच्या तरूण वयाच्या तुलनेत. टेक माय वर्ड.

वाहीदा's picture

10 Aug 2010 - 2:16 am | वाहीदा

गळलेल्या केसांनी देखणेपणात अजीबात उणीव येत नाही उलट "मॅच्युअर" लूक येतो जो भारदस्त आणि आश्वासक असतो.

अगदी सहमत !

अरुंधती's picture

26 Jul 2010 - 9:21 pm | अरुंधती

तुमचा अनुभव तुम्ही खिलाडू वृत्तीनं मांडल्याबद्दल अभिनंदन!
आता तुमच्यावर कोणी 'केसानं गळा कापला' असा आरोप करु शकणार नाही हे त्यातल्या त्यात सुख म्हणायचं! ;-)

चतुरंग's picture

26 Jul 2010 - 9:27 pm | चतुरंग

(खुद के साथ बातां : दात काड्।ऊ नकोस रंगा, तुझीही केस फारशी प्रॉमिसिंग नाहीये! :T)
तुमच्या लेखावरुन आम्हाला आमचेच एक विडंबन आठवले! ;)

अवलिया,रेवती,शानबा,पुष्कर्,गणपा,शुची, अरुंधती ,रंगा(काका :) ) आणि समस्त वाचकांचे आभार.
@रेवती:- बिलकुल होउन जाउ द्या एक लेख त्याच्यावरही....

@शानबा:- माहितीबद्दल धन्यवाद .व्य नि केला आहे.
@पुष्करः- चला सम दु:खी मिळाला कुणी तरी.( (आपल्याला नसणारे) केस हा आपल्याला जोडणारा एक धागा आहे ;-) )
@गणपा:- अहो पांढरे का असेनात, पण आहेत ना काहितरी डोक्यावर, स्वतःच्या मालकीचे. आहेत हे त्यातल्या त्यात उत्तम.

@शुचटक्कविरळ केसातही सौंदर्य खुलत असेल तर उत्तम .(ह्याचीही कुठं ट्रीट्मेंट मिळेल काय ?)
@अरुंधती:- हम्म हे ही खरच. पण केस नाहित हे बघुन आधी अगदि "केसेसेच" सॉरी कसेसेच व्हायचं हो.
असो,चालायचच. आयुष्यात अजुनही मोठ्या गोष्टी असु शकतात हे कळलं/जाणवलं की साध्या गोष्टीचा बाउ करणं आपोआप सुटातं(किंवा वस्तुस्थितीचा स्वीकार केल्यावर येणारं मनःस्वास्थ्य हे शिक्वुन जातं.). हा खिलाडुपणा असाच आलेला.
@चतुरंगः- कुठलं विडंबन बुवा? जरा दुवा वगैरे द्या की.
(सतत इथच वाचनमात्र असलो, तरीही कवितांच्या वाट्याला जात नै ना, म्हणुन सुटलं असावं. )

बाकी एकेका ट्रीटामेंट्चा अनुभव लिहिणार होतो, पण तो काय विंटरेष्टिंग होइना ,नुस्तच माहितीची लिष्ट होती, म्हटलं माहितीच्या महापुरात, ह्या जालावर आपण लिहुन करणार तरी काय.

अवांतरः- फार्,फार uneasy वाटत होतं आज, लिहुन झालो मोकळा. वाचलं चार लोकांनी, आता जरा अजुन हल्कं वाटतय.

परंतु वेगळ्या रंगात ती लिंक दिसत नसल्याने आधी तुमच्या लक्षात आली नसावी. आता रंगबदल केलाय! ;)

छोटा डॉन's picture

26 Jul 2010 - 10:27 pm | छोटा डॉन

केस गळणे म्हणजे नक्की काय असते हे कुणी मला सांगेल का प्लीज ?
ह्याचा अर्थ न कळाल्याने मला आख्खा लेखच समजायची अडचण होते आहे. ;)

तुझ्या केसांकडे पाहून बायकाही शरमेने माना खाली घालतात हे आम्हाला माहीत आहे! ;)
(बाय द वे अजून तुला कोणत्या शांपू कंपनीने साईन कसे काय केले नाही? ;?)

छोटा डॉन's picture

26 Jul 2010 - 10:35 pm | छोटा डॉन

ते ठिक आहे हो ...
पण "केस गळतात म्हणजे नक्की काय होते?" हा प्रश्न अजुन तसाच आहे की ;)

अवांतर :
केस न गळण्याचे आणि मस्त सिल्की होण्याचे रहस्य म्हणजे "कुठलाच शाम्पु न वापरणे" हे होय.
हवा असेल तर आम्ही १ शेप्रेट लेख लिहु ह्यावर .... फक्त पुरुषांसाठी ( म्हणजे पुरुषांच्या केसाला आणि लाईफस्टाईलला अ‍ॅप्लिकेबल असणारा )
बाकी धागाप्रवर्तकाच्या दु:खात सहभागी आहे. :(

स्व's picture

27 Jul 2010 - 7:10 pm | स्व

केस गळणे म्हणजे एक एक करुन तुमचे केस खाली (किंवा कुठंही,नको तिथं) पडाणे.
झाडाची पानं जशी निष्प्राण होउन खाली पडतात, अगदि तस्सच.
किंवा, खराब बाइंडिंग असेल तर एखाद्या पुस्तकाची पानं कशी सटासट पडातात, अगदि त्याच ष्टायलित भरभर डोक्यावरील केस जात राहणे.
मी आयुष्याची पहिली वीस वर्षे कुठलाच शाम्पू वापरला नाही.अगदि साधी घरी बनवलेली शिकेकाइ किंवा क्वचित आयुर्वेदिक डॉकटर देतील ती कोरफड मिश्रित शिकेकाइच लावाय्चो.
असो, पण अजुनही "घने बालो का राझ" जाणून घ्यायला आवडेल.
निदान शिल्लक असलेले शिलेदार तरी वाचवता येतील, इतरांना,मित्रांना(ज्यंचे आहेत त्यांना) माहिती देता यील..एखादी खरड तरी टाका किंवा एखादा फर्मास लेख होउन जाउ द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Jul 2010 - 7:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> एखादा फर्मास लेख होउन जाउ द्या. <<
तुमचे सग्ळे शिलेदार धाराशायी होतील पण हा लेख येणार नाही. त्यापेक्षा खरडीची मागणी अवास्तव नाही.

डाण्राव, फेकून माराच तुम्ही एक भारी खरडखेचर या स्व-केशी पीडीताला!

मस्त कलंदर's picture

8 Aug 2010 - 10:50 pm | मस्त कलंदर

"घने बालो का राझ" जाणून घ्यायला आवडेल.

सोप्पंय.. किमान चार वडे ज्यात तळून होतील तितके तेल रोज चपचपून डोक्याला थापायचे... बाल काले, घने लंबे राहतात.

अर्थात मग त्यानंतर, तु तूझी हेअरस्टाईल का बदलत नाहीस, किती दिवस तीच ठेवणार अशा प्रश्नांना मी अमक्या महिन्यात ही स्टाईल ट्राय केली होती, ढमक्या महिन्यात त्या याची-त्याची हेअरस्टाईल केली होती, असे समजावून सांगावे लागते. ऐकणार्‍याला केसांच्या त्या लांबी, रंग, फॅशन्/स्टाईल यात कधीच फरक जाणवलेला नसतो हेवेसांनल!!!

(मारतोय आता डॉन्या.... पळते त्याच्या आधी)

राजेश घासकडवी's picture

9 Aug 2010 - 11:04 am | राजेश घासकडवी

हवा असेल तर आम्ही १ शेप्रेट लेख लिहु ह्यावर .... फक्त पुरुषांसाठी ( म्हणजे पुरुषांच्या केसाला आणि लाईफस्टाईलला अ‍ॅप्लिकेबल असणारा )

डानराव, हवा आहे म्हणजे काय? पुढचे काही दिवस (महिने...) मी त्याची डोळ्यात प्राण आणून वाट बघणार आहे.

तेवढं थोडं बटांना रंग लावून घेण्याच्या अनुभवाविषयीही लिहा...

मराठमोळा's picture

26 Jul 2010 - 10:44 pm | मराठमोळा

हेहेहेहे...
खुशखुशीत लेख..
मज्जा आली वाचताना. :)

केस गळणे, कोंडा होणे, चेहर्‍यावर मुरुमे येणे, गोरे होणे यासाठी पब्लीक काही करायला तयार होतं. जगाच्या पाठीवर उपलब्ध असलेल्या आणी नसलेल्या सर्व प्रकारच्या क्रीम, जेल, शांपु, तेले, माती, पाने फुले, जडीबुटी, औषध गोळ्या, दही, दुध, पीठ, डाळी साळी सगळं चोपडुन झालं तरी यांना काही फरक पडत नाही ब्वॉ.

=)) =)) =))
=)) =)) =))

तुम्ही सगळे स्मायली वापरताय का? मला स्मायली अव्हेलेबल पण नाही आहेत आणि तुमच्या स्मायली पण नीट दिसत नाही आहेत? आत्ता या विचारान माझे चार केस हातात आले बघा.

'स्व' केस गळायची वाट नका बघु सरळ शेव्ह करा..आणी वर राकेश रोशन सारख सांगा' इतक स्वच्छ वाटत शॉवर घेताना' म्हणुन तो रोज त्याच डोक शेव्ह करतो.

लेख छान झालाय.

(अवांतरः- तिकडे 'यु नाम' वा ' ट्रायको केअर' 'बिजिंग १०१' नाही आल अजुन? त्यात पण खुप खिसा हलका होतो.)

केसांची केस चांगलीच हाताळलीय!

मितभाषी's picture

27 Jul 2010 - 9:54 am | मितभाषी

स्व भावना खेळकरपणे मांड्ल्यात. छान. :)
पण केस गळण्याचे एवढे दु:ख्/खंत का ते मला कळत नाही. आता आमचेही अर्ध्याच्यावर विमानतळ झालय, त्याला काय करणार????

राहिले ते मावळे ।।
गेले ते कावळे ।।

असं म्हणायच आणि बिन्धास्त जगायच.

टकलु भावश्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Jul 2010 - 11:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच लिहीलंत हो!

माझेही केस बर्‍यापैकी गळतात. एकदा केस कापायला गेल्यावर पार्लरमधली बाई, "तुझे केस खूप कमी झाल्येत गं. काही करत का नाहीस?". माझं खडूस उत्तर लगेच तयार, "कमी झाल्येत ना केस. आता मला डिस्काऊंट हवं." पुढच्या वेळपासून कमेंट्स आल्या नाहीत! ;-)

मी-सौरभ's picture

3 Aug 2010 - 12:38 am | मी-सौरभ

=)) =))

मस्त कलंदर's picture

8 Aug 2010 - 10:54 pm | मस्त कलंदर

एकदा केस कापायला गेल्यावर

कापायचेच तर मग पार्लरमध्ये कशाला जायचे??? घरातच कापायचे ना मग..
आता जर कापवूनच घ्यायचे असतील तर मग मात्र पर्याय नाही. :p

केशवसुमार's picture

9 Aug 2010 - 12:34 am | केशवसुमार

कापायचेच तर मग पार्लरमध्ये कशाला जायचे??? घरातच कापायचे ना मग..

आता मिपावरचा पुढचा कळिचा मुद्दा.. तुमच्या नवर्‍याला केस कापता येतात का..:)
केसु

केशवसुमार's picture

9 Aug 2010 - 12:51 am | केशवसुमार

स्वशेठ, तुम्ही कुठल्याही गोष्टीची चिंत्ता करता.. त्यामुळेच ...मी २ प्रतिसादांची भर घातली आहे..;)
(मदतगार)केशवसुमार
तुमची केस अवांतर प्रतिसाद स्पेशालीस्ट कंपूला द्या.. शतक नक्की..
(सल्लागार)केशवसुमार
बाकी 'स्व' अनुभव एकदम खेळकर पणे मांडला आहे..
(वाचक)केशवसुमार
बंगलूरू मधल्या आमच्या रुम मेटची आठवण झाली.. त्याला असेच कुणी तरी बहू गुणी तेल सुचवले होते.. ३ महिन्यात रिझल्ट दिसले नाहीतर पैसे परत.. ३ महिने हा बाबा रोज आरश्या पुढे उभा राहून प्रत्येक केसाचा हिशोब ठेवायचा..वाढले का कमी झाले.. आणि ३ महिन्यांनी २ महिने पैसे परत मिळवण्या साठी त्याच्या बरोबर त्या वैदूच्या घरी चक्करा मारून माझे केस जायची वेळ आली होती.. यथा आवकाश सर्व केस गेलेच..
(स्मरणशील)केशवसुमार

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Aug 2010 - 9:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अडगळरावांचं विडंबन वाचून पुन्हा हा धागा आठवला.