निवेदनः संपादकांच्या अधिकारांबाबत नाराजी व्यक्त करून वातावरण कलुषित केल्याचे प्रायश्चित्त म्हणून काही दिवस स्वसंयमाची रजा घ्यायचे ठरवले होते. त्यामुळे गढुळलेले वातावरण निवळेल असे वाटले होते.
परंतु दुसर्या बाजूकडून अपेक्षित असलेला संयम दिसला नाही. आणि मुद्दाम खाजवून काढल्याप्रमाणे धागे -- धागे येत राहिले. (आणि ते उडाले नाहीत). म्हणून प्रायश्चित्त रद्द करून पुनरागमन करीत आहे. ते धागे उडाले नसल्याने हा ही उडणार नाही अशी अपेक्षा आहे.
अजून एक: कविता या लेखनप्रकारात माझा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे यातल्या व्हेटरन्सनी सांभाळून घ्यावे ही विनंती. :)
कोणती युक्ती अता मी वापरू |
लोकशाही फार लागे वावरू ||
जाहले निर्माण नव येथे जरी |
आणि वाढे आमुची संख्या जरी ||
मूळ कारण लोकशाही, ती सरेना |
दीन, पदभ्रष्ट तिज कैसे करू ||
जाब हे कंटक अम्हा पुसती कसे |
काय मी येथे तयाला उत्तरू ||
"तो न मी" हे पालुपद मी सांगतो |
घाम फ़ुटतो पाहता त्या रूबरू ||
माझिया सत्तेस काही धार नाही |
सर्व शक्ती मालकाची "क्या करूं?" ||
क्रमश: - ?
डिस्क्लेमरः
१.(सहज यांच्या प्रतिसादावरून) = वरील वर्णन प्रत्येक पाध्यांना लागू नाही. किंवा सगळे पाध्ये असाच विचार करतात असे नाही.
२. काही पाध्यांशी झालेल्या संपर्कात "नेहमी सगळ्याच गोष्टी उघड करता येत नाहीत" असा सूर होता. त्यामुळे समोर दिसणार्या गोष्टींतून सदस्यांचे काय समज होऊ शकतात याचे उदाहरण म्हणूनही ही कविता पाहता येईल.
नितिन थत्ते
प्रतिक्रिया
23 Jul 2010 - 12:06 pm | मितभाषी
माझिया सत्तेस काही धार नाही |
सर्व शक्ती मालकाची "क्या करूं?"
>>>>>>>
हा हा हा लै भारी. =)) =)) =)) =))
येवु द्या अजुन.
23 Jul 2010 - 1:29 pm | अवलिया
जे झाले ते झाले... खाली सहजरावांनी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांनी संयमाने घ्यावे, याला माझी तरी काही हरकत नाही. म्हणुन पहिला प्रतिसाद स्वहस्ते संपादित करत आहे.
आशा आहे बदल सर्वांच्यात आणि सर्वत्र दिसावा :)
--अवलिया
चला ! सगळे मिळुन बदल घडवु !! :)
23 Jul 2010 - 1:44 pm | वेताळ
तुम्ही किती पण प्रयत्न करा.
आपल्यावर जो शिक्का पडलाय तो काय बदलायचा नाही.
वेताळ
23 Jul 2010 - 12:38 pm | भाऊ पाटील
वा थत्तेकाका!
कविता बर्यापैकी जमली आहे. अभिनंदन!!
23 Jul 2010 - 12:42 pm | सहज
थत्ते सर्व संपादकांना पिंजर्यात उभे केले तर हा तिढा कधीच सुटणार नाही. सर्व सदस्यांचे काही चुकत नाही तसे सर्वच संपादकांचेही चुकत नसणार.
संपादकांना आत्मपरिक्षण करु द्या, त्यांचे पाध्ये व इश्यु त्यांना सॉर्ट-आउट करु द्या. व सदस्यांची देखील तितकीच जबाबदारी आहे. दुर्दैवाने सदस्य केस बाय केस स्वतंत्र विचारपुर्वक प्रॉब्लेम हाताळायचा सोडून सर्व संपादकांविरुद्ध आवाज करु लागले तर मग सत्तेतल्या ज्यांचे चुकते तरी त्यांचे फावते आहे. अर्थात सत्तेवरच्या कोणाचे कधी चुकत नाही असा समज असेल तर मग काही अर्थच उरत नाही. "कंटकांचे मनोगत" यायला एकाहुन आधीक विडंबक तयारीचे आहेत.
बरेचदा किंचीत दृष्टिकोनातला व गैरसमजुतीचा भाग जास्त असतो व दोन्ही बाजुने संयम सुटल्याने प्रश्न चिघळत आहे.
सगळ्यांनी जरा थंड घेउया काही दिवस. टु बी फेअर संपादकांना काल बरेच काम करावे लागले. त्यांना देखील जालापलीकडे आयुष्य आहे.
23 Jul 2010 - 12:55 pm | श्रावण मोडक
यातला समंजसपणाचा सूर सगळ्यांमध्ये आला तरी खूप भरून पावलं म्हणता येईल!
23 Jul 2010 - 1:12 pm | नितिन थत्ते
समंजसपणाचा सूर दिसावा याच्याशी सहमत आहे.
सहज यांच्या प्रतिसादानुसार डिस्क्लेमर टाकला आहे.
आधिकारिक धोरणावरील चर्चेतच माझ्याकडून संयमाची घोषणा झाली आणि संयमाची अंमलबजावणीही माझ्याकडून झाली.
माझ्या निवेदनात उल्लेखलेल्या धाग्यांवरही मी प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती.
काल चिंतातुरजंतु यांचा धागा उडवण्यावरून पुन्हा गदारोळ झाला म्हणून आज धागा टाकला.
नितिन थत्ते
23 Jul 2010 - 1:53 pm | llपुण्याचे पेशवेll
आमचे प्रतिसाद वातावरण बिघडवणारे असतात म्हणून इथे प्रतिसाद टाकत नाही. [(
पुण्याचे पेशवे
येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील
23 Jul 2010 - 2:16 pm | मराठमोळा
थत्ते साहेबांनी पुन्हा खराटा हातात घेतला की काय? :P
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
23 Jul 2010 - 4:32 pm | क्रेमर
विडंबन मस्तच झाले आहे. प्रतिसादांमुळे धागा उडायला (निमित्त मिळायला) नको म्हणून आणखी लिहित नाही.
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
बाकी चालू द्या.
23 Jul 2010 - 8:25 pm | पंगा
विडंबन (किंवा हे जे काही असेल ते) मस्तच झाले आहे याच्याशी सहमत आहे. प्रतिसादामुळे मिसळपाव प्रशासनाला त्रास व्हायला (निमित्त मिळायला) नको म्हणून आणखी लिहू शकत नाही.
- पंडित गागाभट्ट.
_____________________
बाकी हे असेच चालायचे. चालू द्या.
23 Jul 2010 - 4:38 pm | परिकथेतील राजकुमार
थत्ते चाचांच्या कवितेमुळे गावात सलोखा प्रस्थापीत करु पाहणार्या रहिम चाचाची आठवण झाली.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
23 Jul 2010 - 5:44 pm | केशवसुमार
थत्तेशेठ,
यावे यावे आमच्या विडंबन पंथात आपले स्वागत..
(विडंबक)केशवसुमार
मनोगताचा हा भाग उत्तम. फक्त दुसर्या कडव्यात यमक सांभाळायला हवे होते (आणि संख्या वाढ ही अमची सुरू).. क्रमश:चा पुढचा भाग लवकर टाका
(वाचक)केशवसुमार
साला हे संपादक आणि विडंबक अशा दोन टोप्यांमुळे आमचा लोचा झाले आहे.. विडंबकाने लिहीले की लोक संपादका ने लिहीले आहे म्हणतात..
(कोंडीत सापडलेला)केशवसुमार
सहजशेठ ने सुचलेल्या शिर्षकात विडंबन तयार केले होते..पण आता इथे प्रतिसादातून बर्याच वाल्यांचे वाल्मिकी (नाना तुमच्या रामायणावरच्या लेखनाचा ह्यात काहिही संदर्भ नाही गैरसमज नको)होताना बघून ते विडंबन न प्रकाशित करायचा निर्णय घेतला.. ह्या मुळे जर वातावरण सुधारणार असेल तर तेही करून बघू ..नाना म्हणतो तसे चला ! सगळे मिळुन बदल घडवु !!
(मिपाकर)केशवसुमार
23 Jul 2010 - 6:04 pm | नितिन थत्ते
साक्षात केसूकडून कौतुक झालेले पाहून हुश्श झाले. :)
>>फक्त दुसर्या कडव्यात यमक सांभाळायला हवे होते
बरोबर आहे. पण ते जमले नाही. तुम्हीच सुचवा ;)
>>साला हे संपादक आणि विडंबक अशा दोन टोप्यांमुळे आमचा लोचा झाले आहे.. विडंबकाने लिहीले की लोक संपादका ने लिहीले आहे म्हणतात..
संपादकाच्या विषयात विडंबन नाही केले की झाले. :)
>>नाना म्हणतो तसे चला ! सगळे मिळुन बदल घडवु
सहमत आहे. क्रमश: रद्द करावे म्हणतो :?
नितिन थत्ते
23 Jul 2010 - 6:04 pm | आमोद शिंदे
चालू द्या...
23 Jul 2010 - 6:15 pm | चतुरंग
(खुद के साथ बातां : रंगा, आता केसुशेठने केले नाहीये तर तूही विडंबन करु नयेस हे बरे. आता केसुरंगाला पण कोणीतरी सांगा रे!)
(ओ आय्डी)चतुरंग
23 Jul 2010 - 6:25 pm | श्रावण मोडक
हाहाहाहा... तरी बरं 'खुदके साथ बाता'च आहे. ;) गाईचं गोमूत्र असं एम्फॅसीस अॅड झालेलं नाहीये. ;)
23 Jul 2010 - 6:28 pm | चतुरंग
अॅपल ज्यूस आणि बिअर ह्यांचे शेजारी शेजारी ठेवलेले ग्लास लांबून सारखेच दिसतात! ;)
(अॅपल ज्यूस)चतुरंग
23 Jul 2010 - 6:31 pm | अवलिया
भरलेले की रिकामे?
--अवलिया
23 Jul 2010 - 6:33 pm | चतुरंग
हॅ हॅ हॅ असो. तुम्हाला पूर्वापार चालत आलेले उत्तर माहीतच आहे की! ;)
(अता अवांतर पुरे!)
(भरलेला)चतुरंग
23 Jul 2010 - 6:33 pm | श्रावण मोडक
खरंय सालं. आमच्यासारखे त्यामुळंच गंडतात. अॅपल ज्यूस म्हणून हाती घेतो तो ग्लास नेमका बिअरचा निघतो... ;)
23 Jul 2010 - 6:41 pm | रामदास
प्रगतीचे हे पाऊल पडते
संघटनेचा मंत्र जपा रे
ध्वज विजयाचा उंच धरा रे ......हे गाणे आठवले.
थत्ते ,नाना आणि सर्वांचे अभिनंदन.
23 Jul 2010 - 7:35 pm | विकास
सहमत!
मला फक्त "दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल" हे गाणे आठवले. ;)
23 Jul 2010 - 8:27 pm | राजेश घासकडवी
मूळ कारण लोकशाही, ती सरेना |
या ओळीत खवचटपणा अगदी ठासून भरला आहे. छानच.
क्रमशः लवकरच येऊ द्यात.