नका जावू अशा पावसात
सिच्यूऐशन: रातीचा पाउस पडूं र्हायलाय आन हिरो पहारा करायच्या डुटीला जावूं र्हायलाय......
भर रातीचं आभाळ फाटलं
मनी काहूर काळजीचं दाटलं
येळीअवेळी बाहेर पडता
जीवा घोर लागं
कारभारी....नका जावू अशा पावसात ||धृ||
उगा काळजी लागं
दिसभर पडं संततधार
रातीलाही नाही उतार
घरातच र्हावा तुमी माझ्यासंगती
घ्यावं मला उबार्यात
कारभारी नका जावू पावसात ||१||
रातीला तुमी डुटीला* जाता
उलटी सारी कामं करता
एकलीचा माझा येळ जाईना
कशी काढू मी रात
कारभारी नका जावू पावसात ||२||
बाईलमानूस मी घरात बसते
तुमच्या प्रितीची आटवन येते
दोघं र्हावू सोबतीला
येवूद्या तिसरं कुनी पाळण्यात
कारभारी नका जावू पावसात ||३||
*डुटी च्या ऐवजी 'पहार्याला' असाही शब्द टाकता येतो जेणे करून हिरवीन चा नवरा 'सैन्यात पहारेकरी' आहे अशी सिच्यूयेशन करत येईल.
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०७/२००८
प्रतिक्रिया
22 Jul 2010 - 8:12 pm | Dhananjay Borgaonkar
आला रे आला..पाभे आला.
बाईलमानूस मी घरात बसते
तुमच्या प्रितीची आटवन येते
दोघं र्हावू सोबतीला
येवूद्या तिसरं कुनी पाळण्यात
कारभारी नका जावू पावसात
येक नंबर..
---------------
धनंजय बोरगांवकर
22 Jul 2010 - 8:17 pm | शानबा५१२
मी स्वःताला वॉचमनचा गणवेष चढवला व एक चित्र डोळ्यासमोर उभ केल पण................
हे वाचल व घरीच बसलो. :D :D :D :D :D :D :D
पाष्या अस काय त लिह की...गुड्या काय उभारुन राहीला!
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
22 Jul 2010 - 8:39 pm | शानबा५१२
आताच तुझा ब्लॉग नीट बघितला,तुझ्या ब्लॉगला सलाम रे पाष्या!!
आजपासुन माझी श्वाक्षरी(????????) तुझ्या ब्लॉगला अर्पण.
ब्लॉग असावा तर असा!!!..............सम्रुध्द(??) व परीपुर्ण.
इतरांनी शिका पाष्याकडुन काहीतरी!!
_________________________________________________
ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!
23 Jul 2010 - 7:38 am | पाषाणभेद
शानबा तुम्ही वर लिहीलेले वाचून मला लाजल्यासारखे झाले.
आपणास धन्यवाद.
बाकी दुसरे कडव्यात आताचे आयटी अन बीपीओ मधे कामे करणार्यांसाठी असा बदल केला जावा:
रातीला तुमी डुटीला* जाता
आय.टी. ची सारी कामं करता
एकलीचा माझा येळ जाईना
कशी काढू मी रात
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही