बुद्धीबळ नियमांचे भाषांतर - बुद्धीबळप्रेमींना एक आवाहन - प्रकल्प पूर्ण झाला.

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
14 Jul 2010 - 8:27 pm

बद्दु ह्यांच्या बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ह्या धाग्यावरुन एक कल्पना सुचली.

मराठीत बुद्धीबळाचे नियम मला आंतरजालावर मिळाले नाहीत. एकट्याने भाषांतर करणे वेळखाऊ आहे. परंतु मिसळपावावरील बुद्धीबळप्रेमींनी त्यांचा थोडा थोडा वेळ देऊ केला तर हा भाषांतराचा उपक्रम आपण मिळून करु शकू.

फिडेच्या नियमावलीचा दुवा - तिथे जाऊन जर त्यातला एकेक मुद्दा (किंवा उपलब्ध वेळानुसार अधिक मुद्दे) भाषांतरित करायचे ठरवले तर आठदहा मिपाकरांना हे सहज शक्य व्हावे.
ज्यांना ह्यात सहभागी व्हायची इच्छा आहे त्यांनी ह्याच धाग्यावरती ते कोणते मुद्दे भाषांतरासाठी घेऊ शकतात ह्याचे क्रमांक द्यावेत म्हणजे पुढच्या लोकांना त्यांनी कोणते मुद्दे घ्यावेत हे समजायला सोयीचे जाईल.

सगळे भाषांतरित नियम माझ्याकडे व्यक्तिगत निरोपाने ३१ जुलै पर्यंत पाठवावेत. नियमातले तांत्रिक शब्द तसेच ठेवले तरी चालतील. त्यावर मी संस्करण करेन.

मी स्वतः सगळे संकलन करुन एक पुस्तिकाच पीडीएफ प्रकारात मिसळपावावर प्रसिद्ध करायची जबाबदारी घेतो.

चतुरंग
-------------------------------------------------
ता. क. ताजी स्थिती -
मिसळपावकरांनी आवाहनाला अतिशय उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार! :)
प्रस्तावना + १३ कलमे अशा सर्वांची ताजी स्थिती पुढीलप्रमाणे आहे.

प्रस्तावना - श्रावण मोडक - भाषांतर पूर्ण
कलम १ -निस्का - भाषांतर पूर्ण
कलम २ -उदय - भाषांतर पूर्ण
कलम ३ - बोका - भाषांतर पूर्ण
कलम ४ - यशोधरा - भाषांतर पूर्ण
कलम ५ - गणपा - भाषांतर पूर्ण
कलम ६ - ज्ञानेश - भाषांतर पूर्ण
कलम ७ - मराठे -भाषांतर पूर्ण
कलम ८ - महेश हतोळकर
कलम ९ - मिलिंद
कलम १० - मस्तानी - भाषांतर पूर्ण
कलम ११ - प्रभो - भाषांतर पूर्ण
कलम १२ - निखिल देशपांडे -भाषंतर पूर्ण
कलम १३ - बद्दु - भाषांतर पूर्ण
कलम १४ - श्रावण मोडक - भाषांतर पूर्ण

आता लवकरात लवकर भाषांतरे येऊदेत म्हणजे पुस्तिकेचा प्रकल्प मार्गी लागेल! :)

क्रीडाशिक्षणविचारमाहिती

प्रतिक्रिया

-----------------------------------
प्रास्ताविक/प्रस्तावना
बुद्धीबळाच्या या नियमांमध्ये / विधींमध्ये एखाद्या सामन्यात निर्माण होणार्‍या प्रत्येक संभाव्य परिस्थितीवरचा तोडगा निघेलच, असे नाही; तसेच सर्वच्या सर्व प्रशासकीय मुद्यांचाही त्यातून निवाडा होईल, असेही नाही. एखाद्या परिस्थितीचे पूर्वानुभवानुसार नियमन होत नसल्यास या नियमावलीमध्ये / विधींमध्ये तिच्याशी साधर्म्य असणार्‍या ज्या परिस्थितीचा विमर्ष झालेला आहे तिचा अभ्यास करून उचित निर्णय घेता येऊ शकतो. निवाडा करणार्‍या पंचांमध्ये आवश्यक क्षमता, विवेक आणि निखळ निरपेक्षता असेल हे या नियमावलीसाठी / विधींसाठी गृहीत धरण्यात आले आहे. एखादा नियम अवास्तव तपशीलवार असेल तर त्यामुळे निवाडा करणार्‍या पंचाच्या निर्णयस्वातंत्र्याचाच संकोच होऊ शकतो आणि त्यामुळे न्याय्यबुद्धी, तर्ककठोरता आणि अन्य विशेष घटकांच्या आधारे एखाद्या प्रश्नावर तोडगा काढण्यास प्रतिबंध होऊ शकतो.
या दृष्टिकोणाचा (की दृष्टिकोनाचा?) सर्व खेळाडू आणि महासंघांनी स्वीकार करावा, असे आवाहन फिडे करीत आहे.
एखादा सदस्य महासंघ अधिक तपशीलवार नियम / विधी लागू करू शकतो, जर ते नियम / विधी :
१. फिडेची ही अधिकृत नियमावली / या विधींमधील तरतुदींना बाधा आणत नसतील / तरतुदींच्या विरोधात जात नसतील,
२. त्या-त्या संबंधित महासंघाच्या प्रदेशापुरते मर्यादित असतील, आणि
३. फिडेच्या कोणताही सामना, अजिंक्यपद स्पर्धा किंवा पात्रता स्पर्धा, किंवा फिडेचा कोणताही किताब किंवा मानांकन स्पर्धा यासाठी लागू नसतील.
---------------------------------------
चतुरंग

निस्का's picture

14 Jul 2010 - 9:40 pm | निस्का

:)

चतुरंग's picture

1 Aug 2010 - 9:21 pm | चतुरंग

२ जणांचे काम अजूनही बाकी आहे! ३१ जुलैची मुदत संपली.
अजून दोन दिवस ग्रेस पीरिअड, नाहीतर भाषांतराचे काम दुसरीकडे सोपवावे लागेल. :)

मी कलमांचा मसुदा एकत्र करायला सुरुवात केली आहे.

प्रभो's picture

14 Jul 2010 - 8:40 pm | प्रभो

उत्तम उपक्रम....

आमचं इंग्रजी-मराठी भाषांतराचे ज्ञान दिव्य असल्याने किती जमेल ते माहीत नाही.... ;)
तरी प्रयत्न करतो..

चतुरंग's picture

14 Jul 2010 - 8:49 pm | चतुरंग

जमून जाईल आणि आपल्याकडे इंग्लिश जाणकारांची कमी नाही त्यांना विचारता येईल की अडले तर होय की नाही नंदन, धन्याशेठ आणि मुसुशेठ! ;)

चतुरंग

मेघवेडा's picture

14 Jul 2010 - 8:46 pm | मेघवेडा

मला जमेल तेवढं नक्की करीन! उत्तम उपक्रम रंगाशेट! :)

चतुरंग's picture

14 Jul 2010 - 8:50 pm | चतुरंग

जे सेक्शन करु शकाल त्याचे क्रमांक कृपया द्यावेत!

चतुरंग

विसोबा खेचर's picture

14 Jul 2010 - 8:53 pm | विसोबा खेचर

मी स्वतः सगळे संकलन करुन एक पुस्तिकाच पीडीएफ प्रकारात मिसळपावावर प्रसिद्ध करायची जबाबदारी घेतो.

रंगा, ही कल्पना तुला सुचली आणि ती तू उचलून धरलीस याचे कौतुक वाटते. या मुळे मायमराठीत बुद्धिबळाच्या नियमावलीची एक सुंदर ई-पुस्तिका तयार होईल यात शंका नाही..

माझ्या अनेकानेक शुभेच्छा.. :)

तात्या.

-- "Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it.."

यशोधरा's picture

14 Jul 2010 - 8:54 pm | यशोधरा

मलाही त्या भाषांतरात भाग घ्यायचाय, पण ते नियम लय ड्यांजर भाषेत लिवल्याती! तवा भ्या वाटतया! @)

चतुरंग's picture

14 Jul 2010 - 8:56 pm | चतुरंग

यशोताई, आगेबढो हम तुम्हारे साथ है!
सुरुवात कर गं जमेल. तुला बुद्धीबळ खेळायला थोडंच सांगतोय मी! खातंय मार आता रंगा. ;)

चतुरंग

यशोधरा's picture

14 Jul 2010 - 9:02 pm | यशोधरा

>>तुला बुद्धीबळ खेळायला थोडंच सांगतोय मी! >> रंगादा, आपको हरनेसे डर लगताय ना? मेरे को मालूम! =))

आर्टीकल २ मी करेन. तेच सोपं वाटतय. :)

उदय's picture

14 Jul 2010 - 8:55 pm | उदय

खेळाचे सर्वसाधारण नियमः
भाग १: खेळाची पद्धत आणि उद्देश
१.१ बुद्धीबळाचा खेळ २ प्रतिस्पर्ध्यामध्ये खेळला जातो ज्यात दोन्ही खेळाडू आळीपाळीने चाल करतात. यासाठी चौकोनी पट वापरला जातो ज्याला बुद्धीबळपट म्हणतात. पांढर्या सोंगट्यानी खेळणारा खेळाडू खेळाची सुरुवात करतो. खेळाडूकडे "चाल आहे" असे म्हटले जाते, जेव्हा त्याचा प्रतिस्पर्धी "चाल करतो". (पहा भाग ६.७)

उदय's picture

14 Jul 2010 - 9:14 pm | उदय

१.२ खेळाचे उद्दिष्ट असे आहे की खेळाडूने प्रतिस्पर्धी खेळाडूच्या राजाला असा "शह द्यायचा" की राजाला नियमानुसार कुठलीही चाल करता येऊ नये. जो खेळाडू हे उद्दिष्ट साध्य करतो त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूच्या राजाला "शह-मात" केली आणि खेळ जिंकला असे म्हटले जाते. स्वतःच्या राजाला शह असताना प्रतिस्पर्धी खेळाडूच्या राजाला शह द्यायचा किंवा स्वतःच्या राजाने प्रतिस्पर्धी खेळाडूच्या राजाला शह द्यायचा हे नियमानुसार नाही. ज्या खेळाडूचा राजा "शह-मात" झाला, तो खेळाडू खेळ हरतो.

१.३ जर खेळाची स्थिती अशी असेल की कुठल्याच खेळाडूला "शह-मात" करता येणार नसेल, तर तो खेळ अनिर्णित होतो.

चतुरंग's picture

14 Jul 2010 - 9:29 pm | चतुरंग

उदय, तुमच्या सहभागाबद्दल धन्यवाद! :)
एक सुचवणी - एकेका मुद्याचे भाषांतर दरवेळी धाग्यावर टाकण्यापेक्षा एकदम सगळे मुद्दे (जेवढे तुम्हाला करायचे आहेत) ते घेऊन व्यक्तिगत निरोपात संपूर्ण भाषांतर एकदम टाकलेत तर माझे संकलनाचे काम सुकर होईल.

चतुरंग

उदय's picture

14 Jul 2010 - 9:43 pm | उदय

काही गडबड होऊन लिखाण गायब होऊ नये म्हणून जसे जमेल तसे लिहून टाकत आहे. नाहीतर सगळी मेहनत पाण्यात. तरी क्षमस्व. मला "अरे" म्हटलेले अधिक आवडेल. (IT मध्ये तसेच चालते.) :)

बोका's picture

14 Jul 2010 - 9:33 pm | बोका

आर्टीकल ३ मी करेन

चतुरंग's picture

14 Jul 2010 - 9:46 pm | चतुरंग

चतुरंग

उदय's picture

14 Jul 2010 - 9:34 pm | उदय

भाग २: बुद्धीबळपटावरील सोंगट्यांची प्रारंभिक स्थिती
२.१ बुद्धीबळपट हा ८x८ आकाराच्या ६४ चौरसात असतो ज्यात चौरस आळीपाळीने फिकट ("पांढरे" चौरस) आणि गडद ("काळे" चौरस) असतात.
बुद्धीबळपट अश्या पद्धतीने मांडला जातो, ज्यामुळे खेळाडूच्या उजव्या बाजूचा अखेरचा चौरस हा "पांढर्‍या" रंगाचा असेल.

२.२ खेळाच्या सुरुवातीला एका खेळाडूकडे १६ फिकट रंगाच्या सोंगट्या ("पांढर्‍या" सोंगट्या) असतात आणि दुसर्‍या खेळाडूकडे १६ गडद रंगाच्या सोंगट्या ("काळ्या" सोंगट्या) असतात.
ह्या सोंगट्या पुढीलप्रमाणे असतात.
१ पांढरा राजा
१ पांढरी राणी
२ पांढरे हत्ती
२ पांढरे उंट
२ पांढरे घोडे
८ पांढरी प्यादी
१ काळा राजा
१ काळी राणी
२ काळे हत्ती
२ काळे उंट
२ काळे घोडे
८ काळी प्यादी

२.३ बुद्धीबळपटावरील सोंगट्यांची प्रारंभिक स्थिती पुढीलप्रमाणे असते.

२.४ ?

कृपया तुमची खरडवही बघा.

चतुरंग

यशोधरा's picture

14 Jul 2010 - 10:53 pm | यशोधरा

आता मी वेगळे आर्टीकल घ्यावे का? नंबर २चा तर निकाल लागलाच!

चतुरंग's picture

14 Jul 2010 - 10:53 pm | चतुरंग

धाग्यावर खाली बघ कोणी काय काय घेतले आहे ते.

चतुरंग

यशोधरा's picture

14 Jul 2010 - 10:56 pm | यशोधरा

मी ४ नंबरचं घेते. आता कोणी ढापलंत ना, तर.... >:P

उदय's picture

14 Jul 2010 - 11:06 pm | उदय

६ वं पण घे. :P

यशोधरा's picture

14 Jul 2010 - 11:13 pm | यशोधरा

नक्कीच तुम्ही मॅनेजर असणार! :D :P

उदय's picture

19 Jul 2010 - 8:49 am | उदय

नाही हो, मी कारकून आहे. खरा मॅनेजर चतुरंग आहे, त्याने बघा सगळ्यांना कसे बरोबर कामाला लावले. :)

यशोधरा's picture

19 Jul 2010 - 8:53 am | यशोधरा

रंगादादा, तुमचा पण मॅनेजर आहे, हे मात्र खरं! :)

गणपा's picture

15 Jul 2010 - 3:04 am | गणपा

द्येवा तेवडं राणी* च्या जागी वजीर करता आल तर पाह्य.

मराठी बुद्धिबळाचा डाव असला म्हणजे राज्याच्या जोडीला वजीरच हवा.
अस माझं मत आहें बाकी जनाधार काय म्हणतो?

* समस्त स्त्रिवर्गा बद्दल नितांत आदर आहे.
नायतर येत्यात संम्द्या साळकाया माळकाया हातात खेटर घिउन. ;)

भाऊ पाटील's picture

15 Jul 2010 - 1:19 pm | भाऊ पाटील

लय भारी हो गणपाशेठ

रेवती's picture

17 Jul 2010 - 7:31 pm | रेवती

समस्त स्त्रिवर्गा बद्दल नितांत आदर आहे
हां मग ठीक आहे. नाहीतर आम्ही एकेक भारी पदार्थांचा मारा करून तुला गारद करू. ;)

रेवती

हो, वजीर हेच जास्त बरोबर वाटते. शब्दशः भाषांतर करताना घोळ झाला. चतुरंगला पाठवायच्या मसुद्यात वजीर असे लिहितो.

गणपा's picture

15 Jul 2010 - 3:05 am | गणपा

.

पिंगू's picture

14 Jul 2010 - 10:14 pm | पिंगू

रंगाशेठ आपल्या उपक्रमाचे स्वागत आहे.. सध्यातरी कामात व्यस्त असल्याने सहभागी होता येणार नाही.. ही खंत आहेच.. :( बाकी सर्व सहभागी मंडळींना शुभेच्छा...

- (बुद्धीबळप्रेमी) पिंगू

गणपा's picture

14 Jul 2010 - 10:49 pm | गणपा

कलम क्रमांक ५ आपल्या कडं लागल :)

प्रभो's picture

14 Jul 2010 - 10:51 pm | प्रभो

कलम ११ वर मी कलम 'चाल'वेन.. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2010 - 10:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उपक्रमासाठी शुभेच्छा....!

>>>मी स्वतः सगळे संकलन करुन एक पुस्तिकाच पीडीएफ प्रकारात मिसळपावावर प्रसिद्ध करायची जबाबदारी घेतो.

व्वा..! पुस्तकाच्या प्रतिक्षेत....!

-दिलीप बिरुटे
[आळशी]

सहज's picture

15 Jul 2010 - 1:23 pm | सहज

पुस्तकाच्या प्रतिक्षेत....!

गणपाच्या सुचनेवर विचार व्हावा, राजा, वजीर, हत्ती, उंट, घोडा व प्यादे अश्याच नावाने बुद्धीबळाच्या सोंगट्या माहीत आहेत.

निखिल देशपांडे's picture

14 Jul 2010 - 11:13 pm | निखिल देशपांडे

कलम १२

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

मराठे's picture

14 Jul 2010 - 11:38 pm | मराठे

७ कोणी घेतलं नसेल तर मी करतो.

महेश हतोळकर's picture

14 Jul 2010 - 11:42 pm | महेश हतोळकर

८व माझ्या कडे लागलं

मस्तानी's picture

15 Jul 2010 - 12:17 am | मस्तानी

मी दहावा करण्याचा प्रयत्न करीत आहे ...

Manoj Katwe's picture

15 Jul 2010 - 8:02 am | Manoj Katwe

http://www.saakava.com/Index.aspx
ह्या संकेत स्थळाचा काय उपयोग होतो आहे के पहावे.
इथे इंग्लिश to मराठी translator आहे. (जरा प्राथमिक आहे हे संकेत स्थळ )

उपक्रमासाठी शुभेच्छा....!

आणि पुस्तकाच्या प्रतिक्षेत....!

धन्यवाद.

ज्ञानेश...'s picture

15 Jul 2010 - 9:58 am | ज्ञानेश...

मी घेतो रंगाशेट.

इतर कलमांना वाली मिळाला नाही, तर तेसुद्धा दत्तक घ्यायची माझी तयारी आहे.

मस्त आहे तुमचा उपक्रम ! =D>

कलम १३ माझ्या नावाने जमा करा.

मिलिंद's picture

15 Jul 2010 - 10:52 am | मिलिंद

खरंतर मी तेरावं करणार होतो (तेराव्या कलमाचं भाषांतर -- बाकी काही ((नाहीतर विषयांतर व्हायचं मिपावर)) )

पण आता मला वाटतं फक्त ९ वं शिल्लक दिसतयं - तेच करावं असा विचार आहे

Dipankar's picture

15 Jul 2010 - 11:47 am | Dipankar

मी ही मदत करु शकेन या विकांतात प्रयत्न करतो

धाग्यात दर्शवल्याप्रमाणे ५ कलमांचे भाषांतर मला मिळाले आहे.
उरलेले काम सदस्य पूर्ण करतील ह्याबद्दल शंका नाही.
वाट बघतोय. सहकार्याबद्दल धन्यवाद! :)

चतुरंग

jaypal's picture

17 Jul 2010 - 7:43 pm | jaypal

हा निव्वळ वैचारीक खेळ असुन मारामारी केवळ पटावरील सोंगट्यांनी सोंगट्यांशीच करावी. एकमेकास शारिरीक इजा करु नये.

chess
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

चतुरंग's picture

17 Jul 2010 - 7:49 pm | चतुरंग

पुस्तिकेच्या शेवटी हा तुझा खास सचित्र संदेश देईन मी!
एकदम आवडेश! B)

(पटावरील बोका)चतुरंग

श्रावण मोडक's picture

17 Jul 2010 - 9:46 pm | श्रावण मोडक

हा अशक्य माणूस आहे. कुठं काय आणून ठेवेल सांगता येत नाही. दंडवत मालक आपल्याला!

मी-सौरभ's picture

19 Jul 2010 - 12:03 am | मी-सौरभ

-----
सौरभ :)

मी-सौरभ's picture

19 Jul 2010 - 12:08 am | मी-सौरभ

१४ व कलम पन हाय???

-----
सौरभ :)

बद्दु's picture

21 Jul 2010 - 11:38 am | बद्दु

माल (म्हणजे कलम १३, हो नाहितर भलताच सन्शय यायचा !) तयार आहे. कुठे पाठवु ?

चतुरंग's picture

23 Jul 2010 - 1:51 am | चतुरंग

किंवा व्यनि ची सुविधा अजून उपलब्ध नसेल तर इथेच टाका. :)
धन्यवाद! :)

चतुरंग

बद्दु's picture

25 Jul 2010 - 10:31 am | बद्दु

कलम १३ ला मराठीतुन उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. बरेचशे शब्द वेळेवर सुचत नाही त्यामुळे भाषान्तर मनासारखे झाले नाही. असो.

कलम १३. न्यायाधीशाची भूमिका ( प्रिफेस (?) बघा )
13.1 बुद्धिबळाचे नियम तंतोतंत पाळले जात आहेत याची न्यायाधीशानी खात्री करावी.
13.2 न्यायाधीशानी स्पर्धेचे अंतिम हित अबाधित राहील याची काळजी घ्यावी. स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होईल याकडे लक्ष द्यावे तसेच खेळाडूना इतरांकडून कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच स्पर्धेच्या प्रगतीकडे लक्ष ठेवावे .
13.3 न्यायाधीश खेळाकडे पूर्णवेळ लक्ष देईल, विशेषत: खेळाच्या अंतिम टप्प्यात, खेळाडूंवर (स्पर्धेच्या नियमाप्रमाणे) आपले मत लादू शकतात तसेच वेळप्रसंगी खेळाडूंना समायोचीत दंड सुद्धा करू शकतात.
13.4 न्यायाधीश खेळाडूना खालील प्रकारे दंड करू शकतात.
१. सूचना देऊन
२. प्रतीस्पर्धी खेळाडूचा उरलेला (?) वेळ वाढवून
३. दंडित खेळाडूचा उरलेला (?) वेळ कमी करून
४. दंडित खेळाडूला पराभूत घोषित करून
५. दंडित खेळाडूला मिळालेले गुण कमी करून
६. प्रतीस्पर्धी खेळाडूला मिळलेल्या गुणांमध्ये त्या विशिष्ट डावामध्ये शक्य तितके जास्त गुण
वाढवून देऊन
७. दंडित खेळाडूला प्रतीयोगीतेच्या बाहेर करून.
13.5 बाहेरील वातावरणाचा त्रास होत आहे असे आढळून आल्यास न्यायाधीश एका किंवा दोन्ही खेळाडूना जास्तीचा वेळ बहाल करू शकतात.
13.6 बुद्धिबळाच्या नियमांमध्ये निर्देशित केलेल्या बाबी व्यतिरिक्त अन्य वेळेला न्यायाधीश खेळात हस्तक्षेप करणार नाही. नियम ८.५ प्रमाणे जोपर्यंत एक तरी ध्वज खाली होत नाही तोपर्यंत किती चाली झाल्या याची कल्पना देणार नाही. खेळाडूला त्याच्या प्रतिस्पर्धी ने चाल पूर्ण केली अथवा घड्याळ दाबून वेळेची नोंद केली अथवा नाही याची कल्पना देणार नाही.

13.7 दर्शकानी अथवा इतर खेळाडूनी चालू असलेल्या खेळाबाबत कुठलीही टिप्पणी करू नये. न्यायाधीश अशा दर्शकाना प्रसंगी बाहेर घालवू शकतात. कुठल्याही प्रकारची अनिमियतता आढळल्यास दर्शकानी ती केवळ न्यायाधीशाच्या नजरेस आणून द्यावी.

13.8 न्यायाधीशाच्या परवानगी व्यतिरिक्त खेळाडूने सभागृहात किंवा नजीकच्या/ लगतच्या परिसरात मोबाईल फोनचा अथवा इतर कुठल्याही तत्सम इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करू नये.
.........

श्रावण मोडक's picture

24 Jul 2010 - 8:25 pm | श्रावण मोडक

आर्टिकल १४ कुणीच घेतलेले दिसले नाही. म्हणून ते येथे देतोय -
कलम १४ - फिडे
बुद्धिबळ विधी / नियमावलीसंदर्भातील कोणत्याही पेचावर निर्णय देण्यास सदस्य महासंघ फिडेला सांगू शकतात.

वेगवेगळ्या कारणांनी बराच लांबलेला हा छोटासा प्रकल्प अखेर पूर्ण झाला आहे.
मिसळपावावर पीडीएफ डॉक्यूमेंट चढवण्याचे काही प्रयत्न केले परंतु त्यात बरीचशी अक्षरे काही कारणाने गंडलेली दिसतात. शेवटी गूगलडॉक्सवर ही छोटेखानी पुस्तिका चढवलेली आहे.
जालावरती कोणीही ही पुस्तिका वाचून बुद्धीबळ नियमांचा अभ्यास करु शकेल. माझ्या माहितीनुसार निदान जालावरती तरी मराठीतून बुद्धीबळाचे नियम देण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा.
ह्या प्रकल्पासाठी लेखनभार सांभाळलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

-चतुरंग

ता.क. ह्या पुस्तिकेत काही त्रुटी/चुका आढळल्यास कृपया खरड/व्यनितून सूचना द्यावी त्यानुसार दुरुस्ती केल्या जाईल! :)

परिकथेतील राजकुमार's picture

27 Apr 2011 - 7:01 pm | परिकथेतील राजकुमार

धन्याचे वादस :)

श्रेयनामवलीतील काही नावे पूर्ण अनोळखी आहेत. पण तरीही सर्वांचे आभार.

चतुरंग चतुरंग चतुरंग चतुरंग चतुरंग चतुरंग ... (हे नटरंग नटरंग..) ह्या चालीत वाचावे ;)

नरेशकुमार's picture

29 Apr 2011 - 11:39 am | नरेशकुमार

download केले आहे. छान आहे. समजावुन घेत आहे. खुप अवघड आहे.

निनाद's picture

29 Apr 2011 - 12:19 pm | निनाद

उत्तम कार्य. हे तडीस नेल्याबद्दल अभिनंदन!

हे सगळे युनिकोड मध्येच यायला हवे असे वाटते.
एक नवीन धागा उघडून असे करता येईल का?
कदाचित क्रिकेट सारखा एक वेगळा बुद्धीबळाचा विभागच कार्यान्वित केला तर उत्तम!

चतुरंग-जी,
इंडोनेशियन भाषेत बुद्धिबळाला 'चातुर' (catur) म्हणतात व हा शब्द नक्कीच बुद्धीच्या चातुर्यावरून आलेला आहे. उच्चार मात्र चातुर!
चतुरंग मधील 'चतु' हा 'चार'वरून आलेला शब्द असला तरी 'चतुर+अंग' अशी नवी फोड करून मी हा प्रतिसाद टाकला आहे!

एक अतिशय उत्तम प्रकल्प तडिस नेल्याबद्दल श्री. चतुरंग यांचे अभिनंदन आणि आभार.

प्रास's picture

29 Apr 2011 - 1:16 pm | प्रास

हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा मिसळपावचे सदस्यत्व नसल्याने या बाबत अनभिज्ञ होतो. छान प्रकल्प आहे. पुस्तिका वाचेनच.

चतुरंगजींचे आणि या प्रकल्पाला हातभार लावणार्‍या सर्व सभासदांचे हार्दिक अभिनंदन!

आतिवास's picture

14 Nov 2013 - 1:27 pm | आतिवास

अत्यंत उपयुक्त पुस्तिका. सहभागी मिपाकरांचे आभार.