या लेखाचा उद्देश स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या कालखंडाविषयी माहिती देणे हा आहे. त्यानिमित्ताने लोकशाहीला असलेले धोके आणि धोक्यांची लक्षणे आणि त्यांपासून बचाव करण्याची गरज यांवर चर्चा करण्याचा आहे.
१९७१ च्या मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीत "गरीबी हटाओ" या घोषणेच्या जोरावर काँग्रेस पक्षाने मोठे यश मिळवले. निवडणुकीनंतर थोड्याच काळात पूर्व पाकिस्तानचा प्रश्न निर्माण झाला. डिसेंबरात पाकिस्तानबरोबर युद्ध होऊन बांगला देशाची मुक्तता होऊन हा प्रश्न निकालात निघाला.
युद्धातल्या यशामुळे इंदिरा गांधींची लोकप्रियता शिगेला पोचली. त्यांच्या कट्टर विरोधकांनीही 'दुर्गा' या शब्दात त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.
पण युद्धाचे जे आर्थिक परिणाम असतात ते होतातच. अर्थव्यवस्थेत प्रचंड तूट निर्माण झाली. १९७२ मध्ये देशाच्या काही भागात दुष्काळ पडला.
त्यामुळे भाववाढ प्रचंड प्रमाणात वाढली. त्याचबरोबर साठेबाजी, काळाबाजार आणि भ्रष्टाचार वाढत होता. या विरुद्ध लोकांच्या मनात असंतोष निर्माण झाला होता. या असंतोषाला वाट करून देत विद्यार्थ्यांना हाताशी धरून जयप्रकाश नारायण यांनी 'संपूर्ण क्रांती'चे आंदोलन सुरू केले. बिहार मध्ये सुरु झालेल्या या आंदोलनाचे लोण पुढे गुजरातमध्ये पसरले.
एकूणात परिस्थिती इंदिरा गांधींच्या नियंत्रणाबाहेर जात आहे असे चित्र होते. गरीबी हटण्याचे तर काही चिह्न दिसत नव्हते.
त्याच वेळी अजून एक महत्त्वाची घटना घडली. १९७१ च्या निवडणुकीत इंदिरा गांधींकडून पराभूत झालेले राजनारायण यांनी निवडणुकीत भ्रष्टाचार केल्याच्या, सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याच्या कारणावरून अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या खटल्याचा निकाल लागला. न्यायालयाने बहुतेक आरोप फेटाळून लावले असले तरी यशपाल कपूर यांच्या आपल्या पदाच्या राजीनामा देण्याच्या टायमिंगवरून इंदिरा गांधींची निवडणूक रद्द झाली. (टाईम मॅगेझीनने या निकालाचा उल्लेख Firing the Prime Minister for Traffic Ticket असा केला होता). इंदिरा गांधींनी सर्वोच्च न्यायालयात अपील करून (सूक्तासूक्त मार्गाने) निर्णय फिरवून घेतला.
तेव्हा सगळ्या विरोधी पक्षांनी इंदिरा हटाव आंदोलनाची घोषणा केली. जयप्रकाश नारायण यांनी 'हे सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीस, सैन्ये यांनी सरकारचे आदेश पाळू नयेत' असे आवाहन केले.
तेव्हा बंगालचे मुख्यमंत्री असलेले सिद्धार्थ शंकर रे यांच्या सल्ल्यावरून इंदिरा गांधींनी राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांना आणिबाणी घोषित करायला सांगितले. "सिद्धार्थ रे घोषणेचे कागद सहीसाठी घेऊन येतील" असे राष्ट्रपतींना सांगण्यात आले. राष्ट्रपतींनी फुली मारलेल्या जागी सही करून २५ जून १९७५ च्या रात्री आणिबाणी घोषित केली.
लगोलग सेन्सॉरशिप लागू झाली. आणि विरोधकांना गजाआड करण्याचे सत्र सुरू झाले. घटनात्मक हक्क तात्पुरते निलंबित झाले.
मंत्रीमंडळातल्या काही बुजुर्ग नेत्यांनी याला विरोध केला पण त्यांना गप्प बसण्यास सांगण्यात आले. इंदरकुमार गुजराल यांनी राजीनामा दिला.
लोकनियुक्त सरकारला शांतपणे कामच करू द्यायचे नाही असे विरोधकांचे वागणे असल्यामुळे हे पाऊल उचलावे लागल्याचे सांगण्यात आले.
आणीबाणीच्या काळात संप वगैरेना बंदी होती. त्यामुळे सुरुवातीस उत्पादन वाढत असलेले दिसू लागले. जातीय दंगली बंद झाल्या. काही काळ तरी सरकार काम करीत असल्याचे दिसू लागले. सामान्यांनाही सरकारी कर्मचारी वेळेवर कामावर येत असल्याचे चित्र दिऊ लागले. काही प्रमाणात तेही खूष होते.
विनोबा भावे यांनी अनुशासन पर्व या शब्दात आणिबाणीचे समर्थन केले.
आता सगळे काही आलबेल होईल अशी जनतेची भावना झाली.
ही तात्पुरती आणिबाणी आहे असे सुरुवातीस सांगितले गेले होते पण नंतर ती हटण्याचे नाव दिसेना.
या काळात संजय गांधी, यशपाल कपूर, राजीव धवन आणि बन्सीलाल यांच्या चौकडीने इंदिरा गांधींना घेरून टाकले. सारे निर्णय या चौकडीच्या सल्ल्याने होऊ लागले.
विरोधी पक्षाच्या नेत्यांना मिसा (Maintenance of Internal Security Act) कायद्याखाली विनाचौकशी तुरुंगात डांबण्यात आले.
शेवटी १९७७ च्या सुरुवातीस निवडणुकीची घोषणा झाली. निवडणुका होऊन काँग्रेस पराभूत झाली. इंदिरा गांधी स्वतः पराभूत झाल्या. संजय गांधी सुद्धा पराभूत झाले.
पंतप्रधान निवडणुकीत पराभूत होण्याची भारताच्या इतिहासातली ही एकमेव घटना आहे.
आणीबाणी आवश्यक होती का नव्हती यावर भरपूर चर्वितचर्वण झाले. इंदिरा गांधी यांनीही आणीबाणी ही आपली चूक झाल्याचे कबूल केले.
या एपिसोडने सत्ताधारी सत्तेचा कसा गैरवापर करू शकतात तसेच त्याचे कशा प्रकारे समर्थन करू शकतात हे दिसून आले.
शिवाय या घटनेमुळे भारताच्या लोकशाहीवर कधीही न पुसला जाणारा एक डाग निर्माण झाला.
प्रतिक्रिया
12 Jul 2010 - 11:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
फारच त्रोटक लिहीलं आहे ... नितिन, आणखी सविस्तर लिहीता येईल काय?
अदिती
12 Jul 2010 - 11:56 pm | आळश्यांचा राजा
हं. सविस्तर हवंय. पण मला वाटतं प्रतिसादांमधून सविस्तर माहिती मिळत जाईलच.
फार चांगला विषय. इतिहास, पॉलिटीची, तसेच इंदिरा गांधी आणि समकालीन नेत्यांच्या चरित्रांची चांगली उजळणी सुरू होईल.
आळश्यांचा राजा
13 Jul 2010 - 12:26 am | पुष्करिणी
+ १
मला आणीबाणीविषयी फारशी माहिती नाही, वाचायला आवडेल.
अवांतर : लालूप्रसाद यादवांनी त्यांचा मुलीचं नाव १९७५ साली जन्मली म्हणून मिसाभारती ठेवलं.
पुष्करिणी
12 Jul 2010 - 11:31 pm | बहुगुणी
..पण आजच्या घडीला या घटनांचा relevance नीटसा कळला नाही. (म्हणजे २५ जून १९७५ च्या रात्रीला झालेल्या या घटनेला आता ३५च्या वर वर्षे होऊन गेली, त्यामुळे आज हा लेख लिहावासा का वाटला हे कळलं नाही.)
आजच्या परिस्थितीतही 'लोकशाहीला असलेल्या धोक्यांची लक्षणे' दिसताहेत असं काहीसं म्हणायचं आहे का? तशी लक्षणं असली तर ती कुठली याचा उहापोह वाचायला आवडेल.
13 Jul 2010 - 8:21 am | नितिन थत्ते
>>आजच्या परिस्थितीतही 'लोकशाहीला असलेल्या धोक्यांची लक्षणे' दिसताहेत असं काहीसं म्हणायचं आहे का? तशी लक्षणं असली तर ती कुठली याचा उहापोह वाचायला आवडेल.
धोक्याची लक्षणे आजच्याच नाही तर प्रत्येक काळात दिसत असतातच. काही वाक्ये आपल्याला वेळोवेळी सत्ताधार्यांकडून ऐकू येतात. उदा.
"सध्याच्या कठीण परिस्थितीत ......."
"अशा विरोधामुळे विकासाला बाधा येते"
मूळ लेखातले अधोरेखित वाक्यदेखिल अनेकदा ऐकू येते.
इंदिरा गांधींना आणिबाणीनंतर चाखाव्या लागलेल्या पराभवामुळे प्रत्यक्ष आणिबाणी येण्याची शक्यता फार कमी झाली आहे ही गोष्ट खरीच. परंतु विरोध दाबून टाकण्यासाठी पार्श्वभूमी म्हणून यांचा उपयोग होतच असतो.
नितिन थत्ते
13 Jul 2010 - 12:07 am | प्रियाली
इंदिरा गांधी मला फार आवडतात. त्यांचे नाक मला तेवढेसे आवडत नाही. नाकाच्या बाबतीत त्यांनी मायकेल जॅकसन किंवा शिल्पा शेट्टी कडून थोडे धडे घ्यायला हवे होते आणि नाकावर शस्त्रक्रिया करून घ्यायला हवी होती. अर्थात, त्या नाकात बोलत नव्हत्या हेच खूप झाले आणि त्या मायकु आणि शिल्पुपेक्षा थोड्या आधी जन्माला आल्या. अॅक्च्युअली, त्या आधी जन्माला आल्या म्हणूनच आणिबाणी आणू शकल्या. म्हणजे, आणिबाणी १९७५ ला आली ना तेव्हा मायकु आणि शिल्पुने नोज-जॉब्ज करून घेतले नव्हते. शिल्पु तर जस्ट जल्मली होती. ;) इंदिरा गांधींची ती केसांची पांढरी बट मात्र मला खूप आवडते. माझे केस पांढरे होऊ लागले की मीही तश्शीच हेअरश्टाईल करणार आहे. तशी तिला लोक गुंगी गुडिया म्हणायचे पण ही बाई मला खूप आवडायची म्हणून तिला आणिबाणी माफ आहे. आणिबाणीचे समर्थन मी असे करते.
(मठ्ठ) प्रियाली.
असो. लेख त्रोटक वाटला आणि लेखाचे प्रयोजन कळले नाही. वर्तमान राजकारणाशी त्याची सांगड घातली असती तर लेख अधिक रोचक झाला असता. सोनियाबाई आणि त्यांचे साथिदार भविष्यात आणिबाणी आणतील असे वाटते का?
(ढ) प्रियाली.
13 Jul 2010 - 3:15 pm | विजुभाऊ
या प्रतिसादाला काय म्हणायचे ते कोणी विषद करून सांगेल का? :(
13 Jul 2010 - 12:24 am | मुक्तसुनीत
काही लोकांना अवंतीनगरीची कथा रचावी लागते तर काहीना इतिहासाच्या दस्तावेजीकरणाचा देखावा उभा करावा लागतो. काही लोक सरळ कुत्रे-मांजरीची रूपके घेऊन येतात.
एकूण काय, लोकांना करमणूक करण्याकरता वेडेवाकडे, प्रसंगी अर्वाच्य प्रतिसाद चालतात. अशा प्रकाराचे निषेध करणे सोडा, त्याचा चवीचवीने आस्वाद घेतला जाताना दिसतो. मात्र असला कचरा उडवल्यावर मात्र अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा कैवार येतो. हे सारे रोचक खरे. :-)
13 Jul 2010 - 1:06 am | राजेश घासकडवी
लेख वाचनीय आहे पण त्रोटक आहे. अनेक उल्लेख ओझरते आले आहेत. उदाहरणार्थ यशपाल कपूर यांचा राजीनामा, व टायमिंगचं महत्त्व, मिसाखाली झालेले अत्याचार वगैरे. कृपया हा लेख जिचा संक्षेप आहे अशी माला लिहावी ही विनंती.
तसंच सद्यस्थितीशी (देशातल्या अगर जालीय) वरील लेखाचा संबंध असेल तर तो स्पष्टपणे लिहावा. अन्यथा इतर लेखनालाही जालीय संदर्भ लावून त्यांचे गैर अर्थ लावण्याचे प्रकार होतात. मुसु आणि प्रियाली यांसारख्या संपादकांचे काहीही न कळणारे प्रतिसाद येतात ते वेगळंच. 'खालील लेखनात जालीय संदर्भ नाहीत' अशी ग्रीन डॉट सिस्टीम सुरू करावी का? संपादकांना काय वाटतं?
राजेश
13 Jul 2010 - 1:13 am | प्रियाली
एखाद्या लहान पोरालाही कळावे इतक्या सहज* (ढ) भाषेत प्रतिसाद आहे माझा. त्यात न कळण्यासारखं काय आहे?
बाकी, ग्रीन डॉटची आय्ड्या बरी असली तरी असा डिस्क्लेमर लेखात टाकता येईलच पण मग -
या "चित्रपटाच्या कथानकाचा संबंध मृत किंवा जिवंत व्यक्तिशी नाही." असे लिहिले की आम्ही चित्रपट वास्तवाशी निगडित आहे असे म्हणून निश्चिंत होत असू.
* आपले सदस्य सहज हे ढ आहेत असे दूरान्वयेही सुचवायचे नाही. ;)
13 Jul 2010 - 1:35 am | राजेश घासकडवी
तुम्हाला या कल्पनेची शक्ती लक्षात आलेली दिसत नाही. ग्रीन डॉट हा फूड अँड ड्रग अॅड्मिनिस्ट्रेशन कडून मिळवावा लागतो! तो नसलेलं सगळं नॉन व्हेज!
13 Jul 2010 - 1:38 am | प्रियाली
ग्रीन डॉट हा फूड अँड ड्रग अॅड्मिनिस्ट्रेशन कडून मिळवावा लागतो! - हे मला माहित होतं.
तो नसलेलं सगळं नॉन व्हेज! - हे मला माहित नव्हतं. ;)
म्हणजेच ग्रीन डॉटाची शक्ती माहित नव्हती. ;) माहितीत भर पडली.
13 Jul 2010 - 1:44 am | सुनील
ग्रीन डॉटची आय्ड्या मेनका गांधींची! (बघा, भारतात गांधी नावाला पर्याय नाही. जाल तिथे गांधी!).
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Jul 2010 - 2:12 am | पंगा
देवनागरी लिपीच्या मर्यादेच्या कारणास्तव या वाक्यातील पहिल्या शब्दाचा उच्चार संदिग्ध आहे. प्रस्तुत प्रतिसादाच्या संदर्भात नेमका कोणता उच्चार अभिप्रेत आहे हे (प्रतिसादातील आजूबाजूच्या वाक्यांचा संदर्भ विचारात घेऊनसुद्धा) पुरेसे स्पष्ट होत नाही.
कृपया योग्य तो खुलासा होऊ शकेल काय? धन्यवाद.
- पंडित गागाभट्ट.
13 Jul 2010 - 2:29 am | सुनील
अॅज यू लाईक इट! अर्थात अर्थात फारसा फरक पडत नाही (दोन्ही अर्थात ह्या शब्दांचे अर्थ अर्थातच वेगळे आहेत, हे तुमच्या लक्षात आले असेलच!).
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Jul 2010 - 3:20 am | पंगा
हम्म्म्... ठीक आहे.
अवांतरः यावरून एक भित्तिलिखित आठवले (असेच सेकंडहँड - म्हणजे भिंतीवर नव्हे, तर कोठल्यातरी लेखात वगैरे- वाचलेले):
फ़रमाया है...
Life is not A Midsummer Night's Dream
Nor is it a Tempest
It is but A Comedy Of Errors
And you can take it As You Like It.
(माशा आल्या! सुभानसुद्धा आला!)
असो.
- (चार भिंतींतला) पंडित गागाभट्ट.
अर्थात!
(या वाक्यातील 'अर्थात!'चा अर्थ कृपया 'म्हणजे मला काय मठ्ठ किंवा ढ समजलात काय?' असा घ्यावा.)
- (असंदिग्ध) पंडित गागाभट्ट.
13 Jul 2010 - 1:30 am | मुक्तसुनीत
उच्च प्रतीच्या कलाकृतींचे वैशिष्ट्य म्हणजे , ज्याला त्याला ती आपापले संदर्भ लावून आस्वादिता येते. (पहा : "अरे तुझी टोपी ..." कविता व तिचे रसग्रहण.) प्रस्तुत लेखही या वर्गातला असे समजायला हरकत नाही. याचेच वर्णन मराठीत (थोSSडी शब्दांची उलटापालट करून म्हणायचे तर ) "वरून कीर्तन आतून तमाशा " असे करता येईल... ;-)
13 Jul 2010 - 2:29 am | Nile
सहमत आहे. सर्वच संपादकांचे प्रतिसाद डोक्यावरुन गेले. (थत्तेकाकांना पण सामावुन घेतला की काय त्या गोटात?)
तरी हा निषेध असेल तर आवडला. पण तो इतका त्रोटक झाला आहे की अनुशासकांनाही कळेल का असा प्रश्न उभा राहतो.
-Nile
13 Jul 2010 - 10:06 am | नितिन थत्ते
>>तरी हा निषेध असेल तर आवडला. पण तो इतका त्रोटक झाला आहे की अनुशासकांनाही कळेल का असा प्रश्न उभा राहतो.
ह्म्म्म्म
नितिन थत्ते
13 Jul 2010 - 10:12 am | नितिन थत्ते
>>'खालील लेखनात जालीय संदर्भ नाहीत' अशी ग्रीन डॉट सिस्टीम सुरू करावी का?
हा डॉट लेखकाने मारायचा की संपादकांनी?
लेखकाला लेखन नॉनव्हेज आहे असे म्हणायचे असेल पण संपादकांनी ग्रीन डॉट मारला (किंवा उलट) तर काय?
>>मुसु आणि प्रियाली यांसारख्या संपादकांचे काहीही न कळणारे प्रतिसाद येतात ते वेगळंच
कदाचित संपादकांना अधिक माहिती असते म्हणून असेल.
नितिन थत्ते
13 Jul 2010 - 1:23 am | सुनील
आनी बानी
साखरेची गोनी
उचलायची कोनी?
तूनी का मीनी?
टीप - प्रियाली आणि मुसुशेठ यांचे प्रतिसाद रो(सु)चक आहेत! ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Jul 2010 - 10:18 am | प्रकाश घाटपांडे
चारोळी आवडली. यमके अगदी खासच
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
13 Jul 2010 - 5:44 pm | सुनील
वाटलच! तुम्हाला नीकारान्त यमके आवडतात, असे ऐकिवात होते!!
हिरवा ठिपका
(वरील हिरव्या ठिपक्याचा अर्थ असा की, सदर प्रतिसादास कोणतेही जालीय संदर्भ नाहीत. असल्यास योगायोग समजावा.)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Jul 2010 - 2:15 am | विकास
खालील प्रतिसादातील पहीला भाग हा अवांतर नसून वरील त्रोटक पण (अनेक दिवसांनी जालावर वाचायला येत असताना) नितीनरावांचा माहितीपूर्वक लेख वाचताना जे काही समांतर आठवले ते लिहीण्याचा प्रयत्न आहे. नितीनना कायमच माझे मोठे प्रतिसाद आवडत असल्याने तसा त्यांचा मान राखत प्रयत्न केला आहे. ;)
कधी काळी महाराष्ट्रात एक ख्यातनाम किर्तनकार होऊन गेले. त्यांचे नाव होते पिलोबा फलटणकर. त्यांच्या रसाळ वाणीने श्रोतृवर्ग मंत्रमुग्ध होत असे. किर्तनात जी काही कथा सांगत असतील त्यातील दु:खाने स्त्रीयाच काय पण पुरूषांच्या डोळ्यातून पण हमखास पाणी येत असे तर पराक्रम ऐकताना रक्त उसळत असे आणि विनोद सांगितला तर काय नुसता हशा पिकत असे. तर अशा या पिलोबा फलटणकरांना त्यांच्या लोकप्रियतेबरोबर त्याचा हेवा करणारे पण बरेच होते. त्यातील बरेचसे हे किर्तनकारच होते हे सांगायला नको. तर अशा या किर्तनकारांच्या चमूने त्यांना एकदा आव्हान दिले, जर एकाच वेळेस तुम्ही अर्ध्या श्रोतृवर्गास रडवलेत आणि उरलेल्यांना हसवलेत तरच तुम्ही खरे नावाचे पिलोबा!
आमच्या या पिलोबांनी मनापासून हे आव्हान स्विकारले. एका देवळात किर्तनाचा मोठा कार्यक्रम होता. श्रोतृवर्ग मंडपात वर्तुळाकारात बसला होता. मधे पिलोबा उभे राहून चिलीया बाळाची करूण कहाणी सांगू लागले. गोष्टीत, एक वेळ येते जेंव्हा, "साधूच्या रूपातील शंकर राजा-राणीस त्यांच्या एकमेव पुत्रास, चिलीया बाळास मारायला सांगतो, तसे ते करतात आणि मग नंतर तो साधू म्हणतो की तो निपुत्रिकाच्या हातचे खात नाही म्हणून!", अरेरे काय हे दुर्दैव, आता आम्ही काय करावे? असा प्रश्न त्या आधीच दु:खी झालेल्या राजाराणीस पडतो... गोष्ट ऐकताना श्रोतृवर्गाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. इकडे राजा देवाचा धावा करायला लागतो, त्याचे वर्णन करताना पिलोबा हातातील वीणा वाजवत, नामसंकीर्तन करत नाचू लागतात. त्यांच्या चेहर्यावरील भाव आणि वर्णन ऐकताना अर्धवर्तुळातील लोकांना हमासाहमसी रडायला येते. त्याच वेळेस पिलोबा, हळूच आपल्या धोतराचे कासोटे मागे सोडतात आणि तसेच तल्लीनतेने नाचत रहातात. परीणामी ज्या उर्वरीत अर्धवर्तुळातील लोकांना ते पाठमोरे असतात, त्यांच्यात हास्याचे फवारे उडू लागतात.
अशा प्रकारे पिलोबा फलटणकरांनी एकाच वेळेस अर्ध्या लोकांना हसवले तर उरलेल्यांना रडवले!
बोला पुंडलीक वरदे हारी विठ्ठल!
श्री ज्ञानदेव तुकाराम!
पंढरीनाथ महाराज की जय!
------------------------
असो. तुमच्या मूळ लेखात जॉर्ज फर्नांडीसचा रेल्वे संपाचा उल्लेख राहीला आहे, जो पण आणिबाणीस काही अंशी कारणीभूत होता.
बाकी आणिबाणी नसावी पण अनुशासन असावे असे माझे वैयक्तीक मत आहे. अनुशासन हे केवळ शासकांमधेच गरजेचे नसते, तर जनतेत पण लागते. जिथे ते असते, तेथे दिर्घकालीन प्रगती/यश/वैभव आदी असते. म्हणूनच विनोबांच्या अनुशासन पर्व या शब्दाला विरोध नसावा, पण त्यांच्या आणिबाणीस तसे समजण्यास नक्की असावा.
आणिबाणी उठल्यावर, निवडणूकीच्या रणधुमाळीत एक घोषणा होती:
संजीव, राजीव वात्रट कार्टी, निवडून आणा जनता पार्टी!
पुढे जनतेने जरी जनता पार्टीस निवडून दिले तरी त्यांच्यातच अनेक वात्रट निघाले, आणि सत्तेबरोबर आणायचे शहाणपण काही आले नाही की जबाबदारी आली नाही. अर्थात, सत्ताधारी होऊनही विरोधक म्हणून वागण्याची, स्वतःची जन्मजात सवय मोडू शकले नाहीत, ही एका अर्थी भारतीय लोकशाहीची तत्कालीन शोकांतिकाच ठरली.
असो.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
13 Jul 2010 - 3:53 am | पंगा
कथा पूर्वी ऐकलेली आहे. मात्र तपशिलांत दोन फरक होते असे वाटते.
(१) मी ऐकलेल्या आवृत्तीत कीर्तनकाराचे नाव पिलोबा फलटणकर असे नव्हते, असे आठवते. (नेमके काय होते ते आठवत नाही. पण 'पिलोबा फलटणकर' नक्की नव्हते. पण त्याने अर्थात फारसा फरक पडू नये.)
(२) मी ऐकलेल्या आवृत्तीतील कीर्तनकार (जाणूनबुजून अर्ध्या लोकांना हसवण्यासाठी) कासोटा सोडून नाचत नाहीत. 'आड्यन्सला रडवले तर खरे; आता यातल्या अर्ध्यांनाच कसे हसवायचे' याची त्यांना खरोखरच चिंता पडलेली असते. शेवटी कितीही झाले तरी इज्जतीचा प्रश्न हो! पण तेवढ्यात योगायोगाने त्यांच्या पार्श्वभागावर खाज सुटते, आणि प्रतिक्षिप्त क्रियेने ते (एकीकडे कीर्तन चालूच ठेवून दुसरीकडे) एका हाताने धोतर वर करून कराकरा खाजवू लागतात, इ.इ.
(अर्थात कथेच्या परंपरेस जागून हरदासी लायसन वापरले असल्यास माझी हरकत नाहीच. ;))
- (विनाहरकत) पंडित गागाभट्ट.
अतिअवांतरः 'गळिताच्या हंगामात हस्तप्रक्षालनोत्सुकांचे पीक अमाप' असा कायसासा वाक्प्रचार की म्हण, काहीतरी आहे, नाही? (की माझाच काहीतरी गोंधळ होतोय?)
- (सूचक) पंडित गागाभट्ट.
13 Jul 2010 - 3:17 pm | मितभाषी
त्या काळात वात्रटपणाला काही सिमाच राहील्या नव्हत्या. लोकसंख्येला आळा घालण्यासाठी सक्तेची नसबंदी आणली आणि नसबंदीच्या टार्गेट पुर्ण करण्यासाठी अनेक अविवाहितांचीही बळजबरीने नसबंदी केली होती.
.
.
.
भावश्या
13 Jul 2010 - 3:19 pm | अवलिया
वा !
--अवलिया
13 Jul 2010 - 3:34 pm | ऋषिकेश
हा लेख त्रोटक तर आहेच शिवाय आणीबाणीविषयी फारशी नवी माहितीही देत नाहि (केवळ उल्लेख करून विषय वदलतो). त्यामुळे वर्तमानपत्रात एखाद्या प्रासंगिक विषयावर घाईघाईने माहिती जमवून दिलेल्या लेखासारखे स्वरूप असलेला लेख आता इथे तो देण्यामागचा उद्देश (लेखात सांगुनही) कळला नाहि. प्रस्तुत अभ्यासु लेखकाकडून ही अपेक्षा नाहि
काहितरी नवा / रोचक तपशील द्या राव! मग बघा कशी ऐसपैस चर्चा करता येईल
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
13 Jul 2010 - 4:06 pm | परिकथेतील राजकुमार
+१ सहमत आहे.
हे म्हणजे नववधु दुधाचा ग्लास घेउन खोलीत आल्या आल्या वराने लाईट बंद केलेला दाखवल्यासारखे झाले.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
13 Jul 2010 - 5:35 pm | ऋषिकेश
यानिमित्ताने उपक्रमावर लिहिलेल्या पहिल्या लेखनाची (तीही याच विषयावरच्या) व चर्चाप्रस्तावाची आठवण झाली.
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
13 Jul 2010 - 3:58 pm | विजुभाऊ
मी कोणावरही व्यक्तीगत टीका केलेली नसताना किंवा धाग्यावर असलेल्या विषयाशी संबन्ध सोडून लिखाण केलेले नसतानाही माझा प्रतिसाद उडाला याचे मला वैशम्य वाटत आहे.
यात वैयक्तीक रागलोभ आलेले नसावे अशी अपेक्षा करतो
एक सामान्य मिपाकर विचारतो की तो प्रतिसाद उडवण्याचे कारण कळू शकेल का?
13 Jul 2010 - 4:33 pm | समंजस
लोकशाहीला असलेले धोके आणि धोक्यांची लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्याची गरज या बद्दल फक्त एवढच बोलता येईल की, लोकशाहीत प्रत्येकानी म्हणजेच वर पासून खाल पर्यंत म्हणजेच राज्यकर्त्यांपासून ते सामान्यजनां पर्यंत सगळ्यानींच असलेल्या-नसलेल्या अधिकारांच्या जाणीवांसोबतच कर्तव्य आणि मर्यादेच्या सुद्धा जाणीवा असू द्यायला हव्यात. तसेच कुठ पर्यंत ताणायचं, कुठे थांबायचं ही सुद्धा जाणीव असणे आवश्यक :)
13 Jul 2010 - 5:10 pm | sagarparadkar
आणिबाणी कोणत्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आली ह्याचे अगदी सखोल विवेचन श्री. कुमार केतकर यांनी लोकसत्ताच्या एका रविवार पुरवणीत केले आहे.
आंतर्राष्ट्रीय सन्दर्भ फारच खोलात जावून स्पष्ट केले आहेत. जसे की निक्सन्-किसिन्जर जोडीचे उद्योग, शेख मुजिबूर रेहमान यांची हत्या आणि बरेच काही.
तो लेख वाचून त्या वेळी आणिबाणी अपरिहार्य होती असंच वाटलं. त्या लेखाचा प्रतिवाद करणारा लेख वाचनात आला नाही, म्हणून असेल कदचित.
13 Jul 2010 - 9:24 pm | धनंजय
"ट्रॅफिक-तिकिटामुळे पदच्युती" हा दृष्टांत-कथेचा मुद्दा आहे काय?
हा दृष्टांत-मुद्दा मी मागे वापरलेला होता. "स्वातंत्र्याची आणि अभिमानाची चळवळ चालवण्यासाठी रस्त्याच्या उलट्या बाजूला गाडी चालवणे" [डाव्याऐवजी उजव्या बाजूला] - असा तो दृष्टांत होता.