जेम्स लेन ह्याच्या 'शिवाजी - अ हींदु कींग इन इस्लामिक इंडीया' ह्या पुस्तकावरची बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली आहे.त्या पुस्तकात शिवप्रेमी मराठी माणसला बोलताना लाज वाटावी अस लिखाण आहे.
ज्या मराठीप्रेमी(?) नेत्यांनी 'ह्या पुस्तकाची एकही प्रत विकु देणार नाही' व तत्सम वाक्य मीडीयासमोर बोलली त्यांना एकच सांगु इच्छीतो की तुम्ही कीतीही बोललात तरी पुस्तकाला आधीच ब-यापैकी प्रसिद्धी मिळाली आहे.व महाराष्ट्रात आपण कीतीही रोखल तरी 'ऑक्सफर्ड' आपला धंदा चांगला चालवुन घेणार.हे नेते निदान भारतात तरी ह्या पुस्तकाची विक्री होण थांबवु शकतील?
सुप्रीम कोर्टाने कोणत्या मुद्दांना विचारात घेउन ही बंदी उठवली आहे?
मराठी माणसांनी एवढा विरोध करुनही व तो विरोध योग्य असुनही जर 'व्यक्तीस्वातंत्रा'च्या नावाखाली हे अस छापुन येणार असेल हा कायदा का पाळायचा?
कोणता कायदा बंदी आणलेल्या पुस्तकाचे समर्थन करतो? कोणता कलम वगैरे वापरुन हे मराठी इतिहासाला बदनाम करणार पुस्तक छापु दील जातय,त्याबद्दल कोर्ट का नाही सांगत?
जेम्स लेन्,सुप्रीम कोर्ट्,ऑक्सफर्ड प्रकाशन व त्या लेखकाला लिखाणात मदत करणारे सर्व लोक ह्या सर्वांचा निषेध!!
नोंद : मी फक्त निषेध नाही करणार जिथे ते पुस्तक दीसेल तिथे 'कारवाई' करणार,परीणाम काहीही होओत!! X(
प्रतिक्रिया
10 Jul 2010 - 11:26 pm | शानबा५१२
संकुचित विचार नाही 'प्रॅक्टीकल' विचार करतोय हे तुम्हालाही मान्य करावच लागेल सर............मराठा शुर होते,तसे प्राचिन काळात लोक उडायचीसुध्दा म्हणुन काय काहीही अपेक्षा करायच्या :) इथे राज्यात बंदी आणताना नाकी नउ येतात त्यात जगाचा विचार कसा करणार?
हे कधी केंद्र सरकार मनावर घेइल का?.........नाही.
'लेन' साप व 'पुस्तक' भुइ असेल तर आज आपण भुइलाच बदडु शकतो.
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 5:14 pm | कानडाऊ योगेशु
माझ्यामते आक्षेपार्ह मजकुर वगळुन पुस्तक प्रकाशित करण्याची परवानगी दिली गेली आहे त्यामुळे पुस्तकाच्या नव्या आवृत्तीत तो मजकुर असण्याची शक्यता नाही.
पण हे पुस्तक तसेही मी वाचले नसतेच.शिवाजी महाराजांवर मराठीतच इतके साहीत्य उपलब्ध असताना उगाच एखादे इंग्लिश पुस्तक घेऊन घरातील रद्दी का वाढवावी?
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
11 Jul 2010 - 9:42 am | प्रकाश घाटपांडे
गरीब, बेराजगार, अल्पशिक्षित, अपरिपक्व जनतेला हाताशी धरुन त्यांच्यात द्वेषाच्या आधारावर एखादी अस्मितेची नशा निर्माण करायची त्याला 'स्वाभिमान` हे नाव द्यायचं व त्याचा झुंडशाहीसाठी कुशलतेने वापर करायचा. या नशेत ती जनता आपले मूलभूत प्रश्न विसरते. एखाद्या दारुडयाला भूक लागली की त्याला अन्नाऐवजी दारुच द्यायची. हळूहळू त्याचे शरीर भूक लागल्यानंतर अन्नाऐवजी दारुचीच मागणी करु लागते. जो ती मागणी पूर्ण करतो तो त्याला आपला हितचिंतक वाटतो. जो त्याला अन्न द्यायचा प्रयत्न करतो तो त्याला शत्रू वाटतो. आज देशासमोरील प्रश्न काय आहेत याचे संकलन केले तर प्राधान्यकमावर असलेले अन्न वस्त्र निवारा हे प्रत्येक भारतीयाला मिळणे हा मुलभुत हक्क आहे त्या बद्दल कोणी बोलत नाही. आरोग्य, स्वच्छ पिण्याचे पाणी,स्वच्छतागृहे,वाहतुकीसाठी रस्ते, इतर दळण वळणाच्या सुविधा,शिक्षण,रोजगार असे कितीतरी एकमेकांशी गुंतलेले प्रश्न समस्या सोडवायला, त्याचा पाठपुरावा करायला, त्यासाठी जनआंदोलने उभारायला काय इतिहासातल्या वा पुराणातल्या व्यक्ति येणार आहेत का? मान्य आहे कि ती स्फुर्ती स्थाने आहेत. पण त्याच नशेत किती काळ अडकून पडायचे आता?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
11 Jul 2010 - 10:27 am | शानबा५१२
मी ह्या लेखावरच्या प्रतिक्रीयांवर माझ म्हणन सांगण जरुरी समजतो,मी काही सदस्यांशी सहमतही आहे नी काहींशी असहमतसुध्दा.
प्रॅक्टीकली विचार केला तर,हे मला तरी वाटत माझ्या हाताबाहेर आहे.बोलायला काय मी ढीग बोलीन पण त्याचा कीतीसा परीणाम होणार आहे?
हा लेख लिहला कारण तळमळ आहे,पुस्तकाबद्दलचा सर्वांचा आकस वाढवायचा आहे आणि तो वाढला असेल अस वाटत.(आणि निर्णयाचा निषेधही करायचा होता)
आणि एक सरळ बोलु तर 'ह्या' समस्या ज्यांना नाहीत ते 'ह्या समस्याबद्दलचा' विषय चव गेलेल्या च्विंगमप्रमाणे तोंड वाकड करुन चगळणार.आपला/माझा स्वार्थ पुर्ण होतोय ना मग कशाला पचपचीत विषय हाताळायचा,असा विचार करणारी डोकी वाढत आहेत.
तेव्हा बेरोजगार,गरीबी वगैरे बद्दल भाष्य करणे,तेपण इथे,आणि त्यातुन काही निष्पण्ण(?) होइल अशी अपेक्षा ठेवण म्हणजे मला तर अतिशयोक्ती वाटते.
(प्रकाश सर तुमच लिखाण खुप दीवसांपासुन वाचतोय्,पण उपक्रमवर 'चालु' व्हायला एखादा मस्त विषय नाही भेटताय.विज्ञान(मानवपयोगी,ठोस) व रसायनांवर काही बोलायच असेल तर नक्की आवडेल.)
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
11 Jul 2010 - 11:49 am | बट्ट्याबोळ
एक विचार मनात डोकावून गेला-
शिवाजी जेव्हा तयार झाले तेव्हा त्यांना कोणाचा इतिहास होता?
तरी त्यांनी इतिहास घडवलाच!!
आम्हाला शिवाजी, संभाजी, बाजीराव, भाऊ, शिंदे, होळकर, टिळक, फुले, सावरकर आहेत, पण आमच आयुष्य झंड आहे ...
इतिहासाचा उपयोग मर्यादित आहे ... आणि दुधारी तलवारिप्रमाणे त्याचा उपयोग लोकांना चांगल्या / वाइट गोष्टींसाठी भडकवण्यासाठी होउ शकतो ...
आपण भारतातील स्वतःच्या डॉमिनेशन चा विचार करावा ... खूप पल्ला गाठायचा आअहे ... जेम्स लेन प्रकरणात आपण वापरले जातोय
12 Jul 2010 - 4:53 pm | जयंत कुलकर्णी
बरोबर आहे.
मुद्दा हा आहे की तरूणांना या नालायकांपासून वाचवायचे कसे? म्हणजे जे तरुणांना चुकीच्या मार्गावर नेऊन सोडतात आणि गायब होतात त्यांच्यापासून.
मी उल्लेख केलेल्या IBM लोकमतच्या चर्चेमधे संभाजी ब्रिगेड्चे पुढारी प्रविण गायकवाड यांनी कबूली दिली की रा. रा. पाटीलांनी व पवारांनी त्याना वापरले. खरे तर संभाजी ब्रिगेड्चा पण त्यात स्वार्थ होताच हे नाकारण्यात अर्थ नाही.
कुठला होता ह स्वार्थ ?
हे जे नवीन पुढारी आहेत, त्यांना झटपट पुढारी व्हायचे आहे. जुनी धेंड दूर झाल्याशिवाय हे कसे साध्य होणार.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
11 Jul 2010 - 10:14 am | तिमा
सर्व राजकीय नेते मनांतून 'जेम्स लेन'ला धन्यवाद देत असतील. प्रत्येकाला फक्त पेटवून द्यायचे आहे.
'कानाखाली आवाज' काढणार्यांना मानसिक परिपक्वता यायला अजून १०० वर्षे लागतील.
तोपर्यंत चालू देत.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
11 Jul 2010 - 10:24 am | शानबा५१२
चालु द्या.....सर्वांचच चालु द्या.........मी अगदी मनापासुन बोलतो ह्यातल राजकरण न समजणारे अपरीपक्व असतील तर मी १००% अपरीपक्व आहे/राहीन.
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
11 Jul 2010 - 10:43 am | शानबा५१२
पान क्र.९३ वरचा मजकुर कोणाला वाचायचा असल्यास तो व्यनी केला जाईल.
उद्देशाबद्दल शाशंक लोकांनी त्रास घेउ नये ही विनंती.
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
12 Jul 2010 - 6:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>पान क्र.९३ वरचा मजकुर कोणाला वाचायचा असल्यास तो व्यनी केला जाईल.
पान क्र.अ ९३ वरील मजकूर मला वाचायचा आहे. कृपया व्य.नी करा.
आणि जो काय मजकूर असेल तो मराठीत अनुवाद करुन इथे टाकायला हरकत नसावी असे वाटते. अर्थात आपल्याला तो मजकूर इथे टाकायचा नसेल तर टाकू नका, माझा आग्रह नाही.
-दिलीप बिरुटे
12 Jul 2010 - 2:28 am | शिल्पा ब
केव्हढ हे लिखाण आणि केव्हढा हा बौद्धिक कीस...
कोण हा जेम्स लेन? त्याची लायकी काय? त्याचा अभ्यास काय? त्याच्या पुस्तकाला का इतकी प्रसिद्धी देताय ?
कोणीतरी परदेशी शेंगदाणा काहीतरी फालतू लिखाण काय करतो त्याला इतके महत्त्व काय द्यायचे?
इतकी बोंबाबोंब करून तुम्ही त्याचीच प्रसिद्धी करीत आहात हे काही कळत नाही का तुम्हाला?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 Jul 2010 - 11:54 am | कवितानागेश
हा परदेशी शेंगदाणा कुठे सापडेल बरं?
मला शेंगदाण्याची चटणी फार आवडते!
============
माउ
12 Jul 2010 - 9:58 pm | शिल्पा ब
परदेशी दुकानात सापडेल...आताशा देशी दुकानातही सापडतो म्हणे...
मलाही शेंगदाण्याची चटणी फार्फार आवडते..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 Jul 2010 - 3:00 pm | मैत्र
पुस्तकावर बंदी असायला हवी पण त्याचा राजकीय फायदा / जातींमध्ये फूट पाडणे, भांडारकरसारख्या प्राच्यविद्या म्हणजे अतिप्राचीन इतिहासा संबंधित संस्थेची नासधूस करणे हे आग रामेश्वरी चाच प्रकार आहे. विरोध करताना उलट घडलं तर स्वागतार्ह आहे. मला वाटतं बोरी वर हल्ला हा मूळ उद्देशापेक्षा ब्रिगेडला आपलं अस्तित्व आणि nuisance value दाखवून देण्याची एक मोठी संधी आणि brain washing करून एका परदेशीय मूर्खाची ढाल करुन इथल्या लोकांमध्ये फूट पाडण्याचा कट होता.
काही काळापूर्वी इतर खूप जुन्या इतिहासाबद्दल वाचताना काही ठिकाणी संस्थेबद्दल उत्तम आणि आदराने लिहिलेलं वाचण्यात आलं. अभिमान वाटला की आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राचीन इतिहासाच्या क्षेत्रात इतकं नाव असलेली संस्था पुण्यात आहे.
पुस्तकात एका पानात त्या बिनडोक माणसाने काही विधाने केली आहेत. बाकी पुस्तक ठीक ठाक आहे आणि बहुधा शिवभारत काव्यावर आधारित संदर्भ आहेत. एकदा अचानक पणे पाहण्यात आले होते एका टिपिकल इंग्रजी पुस्तकांच्या दुकानात.
असो. याचा लाभ उठवण्यासाठी का होईना सगळ्या जाती आणि नेते एकत्र आले तर महाराजांनाच आनंद होईल. ज्यांनी महाराष्ट्राला एकत्र आणण्याचे इतके प्रयत्न केले त्यांच्याच नावावर इथे दुफळी माजवली गेली आहे आणि पुढे होत राहील याचं महाराजांना काय वाटेल याचा विचारच नाही. गुरुचा अपमान झाला तर तिथल्या तिथे बदला घ्या. पण गुरूच्या विचारांचाच पूर्ण अपमान झाला आपण स्वतः केला तर काही फरक पडत नाही. रयतेच्या एका कणसाला हात लावू नका सांगणारे महाराज आणि भवानीची पूजा करणारा महाराष्ट्र खरा का नाव पण माहीत नाही खरं खोटं माहीत नाही आणि शेकडो वर्ष जूने महाराजांशी कसलाही संबंध नसलेली हस्तलिखितं, वस्तू आणि एक सरस्वतीची मूर्ती फोडणारे आपलेच भाईबंद खरे...
जेव्हा जेव्हा अमुक आणि तमुक जातींनी एकत्र राहून महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा विचार केला तेव्हा तेव्हा काहीतरी विशेष घडवून दाखवलं आणि इतिहासात महाराष्ट्राचं नाव मोठं झालं - उदा. शिवाजी महाराज, संभाजींच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी जबरदस्त चिवटपणे दिलेला लढा, थोरल्या बाजीरावाने आणि माधवरावाने शाहूंच्या आणि गादीच्या आदरात आणि निष्ठेत वाढवलेली सत्ता. नाना, बापू आणि महादजी या निष्ठावंत कारभार्यांनी काही वर्ष सांभाळलेली गादी.
जसे म्हणतात की इतिहास साक्षी आहे. पण इतिहासापासून न शिकणे हा माणसाचा आणि मराठी माणसाचा गुणधर्म आहे.
मराठी म्हटलं की मग भय्ये आणी मद्रासी दिड दमडीचे. एक जात म्हटलं की दुसरे सगळे ह खो .. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ, मराठवाडा. एतद्देशीय आणि कायमस्वरुपी वा तात्पुरते परदेश निवासी. आपल्या खुज्या संकुचित (confined is the right word) मनोवृत्ती गोंजारत सांभाळत राहायच्या.
हे पुस्तक फक्त हजारो घटनांपैकी एक.
अवांतर : कादंबरी लिहिणार्या आणि तुकारामांना संतसूर्य म्हणणार्या आनंद यादवांचा आणि महाबळेश्वर संमेलनाचा पुरता धुव्वा करणार्या वारकर्यांच्या नेत्यांना अजून विठ्ठल आणि त्याहून जास्त ज्ञानेश्वर, रामदासांबद्दलच्या अति उघड उग्र आणि गलिच्छ लिखाणाचं पुढे वावडं नाही. ज्या पालख्या शेकडो वर्ष एकत्र आहेत आणि ग्यानबा तुकाराम हा महाराष्ट्राची संस्कृती आहे तिथे त्यातल्या एका गटाला दुसर्याबद्दलचे हीन लिखाण जोवर स्वतःला बोचत नाही तोवर सोयरसुतक वाटत नाही तिथे एकीची भाषा काय करायची. आळंदीची पालखी पंढरपुरात जाणार नाही अशी भूमिका घेतल्यावर कायदा करू, शिक्षा करू, बंदी घालू म्हणणारे सरकार अजून काहीही करत नाही. उलट देहूकरांनी आमची पालखी जाईल, वारकर्यांना त्रास नको अशी भूमिका घेतली. इथे काय महत्त्वाचे?
असो नुकत्याच पालख्या मार्गस्थ झाल्या आणि दोन्ही मुद्द्यांमधल्या समान धाग्यामुळे आठवण झाली.
12 Jul 2010 - 11:55 am | कवितानागेश
http://www.hvk.org/articles/0104/159.html
============
माउ
12 Jul 2010 - 5:32 pm | जयंत कुलकर्णी
जेम्स लेनच्या लिखाणावरची शानबा यांची प्रतिक्रिया फार तीव्र व प्रामाणीक आहे.
त्याचे मी मनापासून कौतूक करतो.
ते लिखाणच तसे आहे. मी वाचलेले आहे. पण सगळ्यात धोकादायक आहे ते त्याचा उपयोग करून समाजात फूट पाडणे. ते सुध्दा जातीच्या आधारावर. याने नुकसानच होणार. माझी एकच शानबांसारख्यांना एकच कळकळीची विनंती आहे की याच्या मागे लपून राजकारणी (त्यात संभाजी ब्रिगेडवाले पण आले) जो त्यांचा फायदा करून घेत आहेत यात सुळावर चढणार फक्त सामान्य माणसे. हा धोका ओळखून पुढची पावले टाकावीत.
या धाग्यावर माझा हा शेवटचा प्रतिसाद !
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
12 Jul 2010 - 5:42 pm | शानबा५१२
जयंत सर आपल्यासारखा दर्जेदार लेखकाने,विचारवंताने(विशेषण अगदी योग्य विचार करुन दीलीत) असल लिहाव ही माझ्यासाठी उत्साहवर्धक गोष्ट आहे.
'शिवाजी महाराज' हा विषय माझ्यासाठी व घरातल्या काही सदस्यांसाठी खुप सेन्सीटीव विषय आहे.
जेव्हा ही बातमी आली तेव्हा एका सदस्याने चमफ ची भाषा वापरली त्यावरुन ह्यांना माहीती आहे 'जेम्स लेन' ह्याचे मलाच आश्चर्य वाटले......असो.
जयंत सर,
आपल्याकडे खुप काही आहे,आम्हाला शिकवायला.
आपण शिकवत रहा,आम्ही शिकत राहु.
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
12 Jul 2010 - 9:03 pm | अविनाशकुलकर्णी
अजुन नेमाड्यांचा "हिंदु" बाजारात आला नाहि...त्यावर वादंग होणार
13 Jul 2010 - 9:39 am | प्रकाश घाटपांडे
या गदारोळात अजुन एक दुवा
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.