ही कल्पना बरीच आधी सुचली होती.. पण शब्द सापडत नव्हतेत.. यशोधरातैंचा ये परतीचा वारा... हा लेख वाचून शब्द आपोआप स्फुरायला लागलेत.. म्हणून ही कविता त्यांचीच! :)
जीवन म्हणजे सागर असतो
शांत गंभीर भासणारा..
वादळांस प्रसवणारा..
नवा प्रलय दाखवणारा..
जीवन म्हणजे वादळ असतं
खंबीर झाडांना उचकटून टाकणारं..
रूळलेल्या वाटांमधून घोंघावणारं..
पुढ्यांत येईल ते उध्वस्त करणारं..
जीवन म्हणजे असतो किनारा
वादळाला उरावर घेणारा..
उध्वस्ततेतून सावरणारा..
नवलाईची बीजं रोवणारा..
मृत्यू म्हणजे अनाहूत चाहूल
खंबीर झाडांना उचकटून टाकणारी!
पुढ्यांत येईल ते उध्वस्त करणारी!
नवलाईची बीजं रोवणारी!
नवा प्रलय दाखवणारी!!
शुभम्
प्रतिक्रिया
8 Jul 2010 - 8:02 am | निरन्जन वहालेकर
सांगितल्या प्रमाणे न विसरता शब्द पाळला. आनद वाटला जीवनाचा विचार नेहमीच सुखद असतो.
छान कल्पना ! कविता आवडली !.
जीवन म्हणजे सरिता सम,
अल्हड बालपणी खळाळणारं,
तारुण्यांत सैरावैरा वाहणारं,
संसार सागराच्या उधाणांत विलीन होणारं.
8 Jul 2010 - 9:08 pm | क्रान्ति
मस्त मांडलीय कल्पना. :)
क्रान्ति
अग्निसखा
8 Jul 2010 - 9:17 pm | यशोधरा
जीवन म्हणजे असतो किनारा
वादळाला उरावर घेणारा..
उध्वस्ततेतून सावरणारा..
नवलाईची बीजं रोवणारा..
हे सगळ्यात आवडलं.
9 Jul 2010 - 9:53 am | राघव
जीवनाचे वर्णन करतांना जी वाक्यं चपखल बसतात.. तीच वाक्यं मृत्यूचे वर्णन करतांनाही चपखल बसतात असे वाटले! तीच कल्पना इथे मांडायचा प्रयत्न केलाय.
राघव