ये परतीचा वारा...

यशोधरा's picture
यशोधरा in जनातलं, मनातलं
7 Jul 2010 - 1:51 am
मुक्तकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

7 Jul 2010 - 2:43 am | मुक्तसुनीत

संवेदनशीलतेने केलेला कवितेचा रसास्वाद आवडला. कुठल्या संग्रहातली कविता आहे ?

यशोधरा's picture

7 Jul 2010 - 2:49 am | यशोधरा

अर्रर्र.. फसलं की मग लिखाण... असो. :)

रसास्वाद नाही. ३ वेगवेगळ्या कवितांमधली कडवी/ ओळी लिहिताना आठवली तशी वापरली आहेत. सूट होतात असं वाटलं..

नंदन's picture

7 Jul 2010 - 3:01 am | नंदन

मुक्तक आवडलं.

त्याच्या अफाट पसार्‍याची कळत नकळत पुसटशी जाणीव होते आणि त्याचबरोबर स्वतःच्या नगण्यतेचीही. पुन्हा एकदा प्रश्न पडतात, कशासाठी केला होता अट्टाहास? हर्ष, खेद मावळतात.

--- बोरकरांच्या कवितेत हे द्वंद्व अनेक ठिकाणी दिसून येतं. जगताना येणार्‍या अनुभवांची समृद्धता आणि त्याचवेळी स्वतःच्या नगण्यतेची जाणीव. वर दिलेल्या समर्पक उदाहरणांसोबतच 'रसलंपट मी तरी मज अवचित गोसावीपण भेटे', 'कळत जाते तसे...' अशा अनेक ओळी.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

वाचक's picture

7 Jul 2010 - 8:19 am | वाचक

जी. ए. - सुनिताबाई पत्रव्यवहारात चर्चिला गेलेला एक मुद्दा आठवला - बोरकर एवढे भाववृत्तीचे कवी असून त्यांनी गांधीचे चरित्र काव्यबद्ध करण्याचा निर्णय कसा घेतला त्याबद्दल जी. एंना फार कुतूहल होते.

मुक्तसुनीत's picture

7 Jul 2010 - 8:21 am | मुक्तसुनीत

होय हे मीदेखील वाचले आहे.
खरे म्हणजे यात इतके आश्चर्यचकित होण्यासारखे काय आहे कळत नाही. यापेक्षा मोठे मोठे पॅराडॉक्सेस पहायला मिळतात.

अरुण मनोहर's picture

7 Jul 2010 - 3:17 am | अरुण मनोहर

खूप छान लिहीलं आहे. पुन्हा पुन्हा वाचलं. प्रत्येकवेळी वाक्यांच्या मागे जाऊन विचार केला, तेव्हा जीवनाच्या अथांगतेची नव्याने जाणीव झाली.

मीनल's picture

7 Jul 2010 - 5:05 am | मीनल

सहमत.
खूप छान लिहिले आहे.
कलात्मक/ साहित्यिक/ वास्तविक? कुठचे आहे हे लेखन?
की हे सर्वच?????
उत्तम!!!!

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

रेवती's picture

7 Jul 2010 - 6:55 am | रेवती

संवेदनाशील लेखन आवडलं!
हे सगळं मनातल्या मनात चालू असतं पण शब्दबद्ध करता येणं महत्वाचं!
तुला ते चांगलं जमलं म्हणून कौतुक!

रेवती

टारझन's picture

7 Jul 2010 - 8:58 am | टारझन

प्रतिसाद टंकुन दिल्याबद्दल आभारी आहे रेवती :)

- (द लेजेंडरी वारा ऑफ) परती

पहाटवारा's picture

7 Jul 2010 - 9:31 am | पहाटवारा

यशोधरा, तुझे हे मनातले दवंबिन्दू टिपुन कागदावर जसेच्या तसे ऊतरवण्याचे स्किल खरंच अप्रतीम आहे. मागे देवघरातील समईच्या ऊजेडात वाटलेली मनःशांती हि तु अशीच सुरेख टिपलेली !
येउद्या असेच लेख अजुन !
-पहाटवारा

स्पंदना's picture

7 Jul 2010 - 10:39 am | स्पंदना

दवबिन्दु!!
पहाटवार्‍यान अगदी अचुक वर्णन केल या शब्दबिंदुंच !!
खरच दवबिंदुं प्रमाणे नाजुक हळुवार, परावर्ति..सल्युट !!
धन्यवाद यशोधराजी.
अश्याच लिहित रहा.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

यशोधरा's picture

7 Jul 2010 - 10:10 am | यशोधरा

वाचक आणि प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद. :)

दशानन's picture

7 Jul 2010 - 10:18 am | दशानन

मुक्तक आवडलं.

छान लिहले आहेस यशो.

अवलिया's picture

7 Jul 2010 - 10:33 am | अवलिया

माननीय यशोधराजी,
माननीय सदस्या
मिसळपाव.कॉम

आपले मुक्तक वाचले. आपल्याला प्रतिभेचे दैवी देणे आहे, त्यामुळे मनातल्या भावना चपखल शब्दांत मांडण्याचे आपल्याला कसब प्राप्त झाले आहे. आपल्या हातुन साहित्यसेवा अविरत घडावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आपल्यासारख्या साहित्यिकांच्या साधनेमधे व्यत्यय येतो, त्या गोष्टींना जबाबदार असलेल्या प्रवृत्तींचे निराकरण लवकर होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो.

दृपलसारख्या कंटेट म्यानेजमेंट सिस्टीम्समुळे हे संकेतस्थळ उभे राहिले आहे त्याबद्दल मी दृपलचा तसेच दृपलटिमचा आभारी आहे. श्री तात्या अभ्यंकर यांच्या प्रयत्नाने हे संकेतस्थळ स्थापन झाले मी त्यांचा आभारी आहे. त्याला अनेक इतर संकेतस्थळे कारणीभुत ठरली, मी त्यांचा आभारी आहे. संपादकांनी केलेले कार्य थोर आहे. त्यांचा महिमा अपार आहे. त्यांचे गुणगान करण्यास मानवी वाणी पुरेसी नाही याची जाणीव आहे. पण तरीही आभार हे मानलेच पाहिजेत. सर्व संपादकांचा मी आभारी आहे. हा प्रतिसाद वाचणा-या वाचकांचा मी आभारी आहे. ज्यांचे ज्यांचे आभार मानणे आवश्यक आहे अशा सर्वांचा मी आभारी आहे. सर्वात महत्वाचे हे संकेत स्थळ चालु ठेवणा-या श्री नीलकांतचा मी आभारी आहे.

खरोखर आज मोठा मंगल दिवस आहे. सर्व संपादकांच्या आशीर्वादाने आणि कृपाकटाक्षाने मी हा प्रतिसाद लिहु शकलो आहे. हा प्रतिसाद टिकला आहे. माझे सर्व संपादकांना साष्टांग नमन आहे. माझी खात्री आहे, संपादकांची अशीच कृपा माझ्यासारख्या अल्पमती, निर्बुद्ध बालकावर राहिल. अजुन काय लिहु? शब्दच सापडत नाहीत. मुढावस्था म्हणजे काय याचा मला आज प्रत्यय येत आहे.

सर्वांचे मंगल होवो, शुभ होवो हीच कामना..

आपलाच

नाना उर्फ अवलिया.

संपादकांचा महिमा अपार । संपादकांची थोरवी अपार ॥
कसे मानु त्यांचे आभार । मी तर केवळ पामर ॥

यशोधरा's picture

7 Jul 2010 - 10:37 am | यशोधरा

अवलियाजी, LOL! हे काय! आणि धन्यवादही. :)

राजे, धन्यवाद :)

शैलेन्द्र's picture

7 Jul 2010 - 11:20 am | शैलेन्द्र

वा सुंदर,

"शीड फिटे वाट मिटे, का धरु सुकाणू
वल्हवाया का उगीच बळ बळेच आणू?
जायचे जिथे तिथेच नेईल नेणारा
ओसरली भरती, ये परतीचा वारा..."

कवितेच्या शब्दंचा अर्थ काढु नये म्हणतात... वार्‍याने शिळ घालावी तशी तिला मनात घुमु द्यावी.. तुमच्या लेखात अशाच सुरेख लहरी ऊठल्यात...

श्रावण मोडक's picture

7 Jul 2010 - 11:45 am | श्रावण मोडक

सुरेख आणि ताकदीचे मुक्तक!

स्वाती दिनेश's picture

7 Jul 2010 - 12:36 pm | स्वाती दिनेश

सुरेख आणि ताकदीचे मुक्तक!

हेच म्हणते,
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Jul 2010 - 1:08 pm | बिपिन कार्यकर्ते

सुंदर ! सुंदर !! सुंदर !!!

मिळूद्या मला मुळाशी, सारी मिटून दारे
मोकाट वारियांनो थोडे मुकाट व्हा रे....

मध्यंतरी मृत्यूविषयी डोक्यात काही विचार चालू होते, आणि तशातच बोरकरांची ही कविता अचानक सापडली. अतिशय परिणाम करून गेली. आज परत या ओळी समोर आल्या.

खुद के साथ बातां: या ताई नेहमी नेहमी का लिहित नाहीत? :)

बिपिन कार्यकर्ते

Dhananjay Borgaonkar's picture

7 Jul 2010 - 1:16 pm | Dhananjay Borgaonkar

जिवनाचा प्रवास अप्रतिम मांडला आहे.

घाटावरचे भट's picture

7 Jul 2010 - 2:00 pm | घाटावरचे भट

छान मुक्तक!!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

7 Jul 2010 - 2:36 pm | भाग्यश्री कुलकर्णी

खासच.

मितभाषी's picture

7 Jul 2010 - 2:52 pm | मितभाषी

असेच म्हणतो.

भावश्या.

यशोधरा's picture

7 Jul 2010 - 6:15 pm | यशोधरा

पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार.

हल्लीच महिन्यापूर्वी माझा बाबा गेला. त्याच्याशी माझं फार लोभस असं मैत्र होतं. त्यालाही माझ्याशी गप्पा मारायला आवडायचं. त्याच्या लहानपणीचे किस्से, नोकरीनिमित्ताने त्याने जवळ जवळ भारत पालथा घातला, ते किस्से आणि कधी कधी अशाच गप्पा. संवाद साधण्यासाठी आणि तो टिकून रहावा, वृद्धिंगत व्हावा म्हणूनही. एकंदरीतच आयुष्याबद्दल त्याने फार डोळसपणे चिंतन, मनन केलं होतं आणि त्याबद्दल खूप आत्मीयतेने तो बोलायचाही. ते ऐकतानाही खूप छान वाटायचं.

त्याच्या आयुष्याबद्द्ल, त्याच्या मृत्यूबद्दल विचार करताना हे सगळं मनात येत राहिलं. जसं जमलं तसं इथे उतरवलं.

मात्र, त्याला त्याचं कोडं कधीच उकललेलं होतं.

चतुरंग's picture

7 Jul 2010 - 8:25 pm | चतुरंग

यशोधरा, ह्या मुक्तकामागचा विचार हा तुझ्या बाबाचे जाणे आहे. ती वेदना ह्या मुक्तकाला जन्म देऊन गेली!

(सहसंवेदक)चतुरंग

राघव's picture

8 Jul 2010 - 2:57 am | राघव

रंगदांशी सहमत.

यशोधरातै,
तुमचा नीटस, संवेदनशील लेख अन् तुमचीच वरील प्रतिक्रिया वाचून माझ्या मनातल्या एका कल्पनेला शब्द स्फुरले. म्हणून ही कविता तुमचीच!

राघव

यशोधरा's picture

8 Jul 2010 - 1:52 pm | यशोधरा

धन्यवाद राघव. खूप सुरेख जमली आहे कविता.

विसोबा खेचर's picture

7 Jul 2010 - 7:03 pm | विसोबा खेचर

सुंदर लेखन..!

तिमा's picture

7 Jul 2010 - 7:11 pm | तिमा

आमचाही आता शेवटाकडे प्रवास चालू झाला आहे. असे विचार हल्ली मनांत येतच होते. तुम्ही त्याला मूर्तरुप दिलेत.
बर्‍याच जुन्या गोष्टी आठवल्या की आता असे वाटते की त्यावेळी आपण इतका अट्टाहास का केला ? जास्त समजुतीने का वागलो नाही ? छोट्या छोट्या गोष्टींमधे का उगाच दुसर्‍यांचे मन दुखावले? पण ते त्यावेळेस समजत नाही.
त्यामुळे मी हल्ली माझी मते आग्रहीपणे मांडत नाही. समोरच्याचे चुकत असेल तर एकदा सल्ला देतो. परत परत मागे लागत नाही.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

धमाल मुलगा's picture

7 Jul 2010 - 8:55 pm | धमाल मुलगा

काय बोलु माई माझे?
शब्द संपले! भाव मात्र अजुनही झिरपताहेत.....

संदीप चित्रे's picture

7 Jul 2010 - 10:09 pm | संदीप चित्रे

लेख छान ओघवता आहे आणि कवितांच्या ओळी एकदम चपखल जागी वापरल्या आहेस.
लेख वाचताना मनाच्या एका कप्प्यात बोरकरांच्याच 'संधिप्रकाशात..'च्या ओळी (डॉ. सलील कुलकर्णीने संगीतबध्द केलेल्या) निनादत होत्या.

उपास's picture

8 Jul 2010 - 3:04 am | उपास

ह्याच साठी केला सारा हट्टाहास, शेवटचा दिसं गोड व्हावा..
मारव्याची झाक जाणवतेच आहे शेवटी..
आवडलच अगदी..
उपास मार आणि उपासमार

मेघवेडा's picture

8 Jul 2010 - 2:22 pm | मेघवेडा

मुक्तक आवडलं. नक्षत्रांचे देणे, कळ्या आणि थोडी ओली पाने आठवली! :)