उगाच काहितरी

शिल्पा ब's picture
शिल्पा ब in जे न देखे रवी...
2 Jul 2010 - 11:26 pm

दुखवट्याचा देखावा करून मनात आनंदाच्या उकळ्या फुटाव्या
तसेच काहीसे झाले आहे

फुर्रर्र्र फुर्र्रर्र्र्र फुर्र्र्रर्र्र्र सुंसुंसुंसुंसुंसुंसुंसुं

नुसताच सर्टिफिकेटचा कागद घेऊन डोक्यात मात्र काहीच नसावे
असेच काहीसे झाले आहे

कुंडीत टोम्याटोचे झाड लाऊन टरबूज यावा अशी अपेक्षा करावी का
पण असेच काहीसे झाले आहे

हृदयात धडधड होऊन प्रेमाच्या ऐवजी हार्ट आट्याक यावा
असेच काहीसे झाले आहे

प्रेमाचा वॉलपेपर लावून आपले हित साधावे
असेच काहीसे झाले आहे

सुरुवातच कडू कडू केल्यावर शेवट तरी कसा गोड गोड होणार
तसे करायची इच्छा मात्र होत आहे

अशीच कडवाहट ठेवली तर आम्ही नाही ज्ज्ज्जा !!!
---------------------------------------------
(आम्हालाही जालींदरबाबांचा आशीर्वाद मिळाला)

अद्भुतरसप्रेमकाव्यकवितामुक्तक

प्रतिक्रिया

पंगा's picture

2 Jul 2010 - 11:32 pm | पंगा

वरवर वाचून फारसा अर्थबोध झालेला नसला तरी दोनतीनदा नीट वाचल्यास होईल, अशी आशा आहे. (नाहीतर विचारूच.)

पण प्रयत्न बरा वाटला. तेवढा दुसर्‍या कडव्यातला "संबंधित" हा शब्द काढून टाकता येईल का? जास्तीचा, अनावश्यक आणि ओढूनताणून बसवल्यासारखा वाटतो. (काढून टाकला तरी अर्थाला बाधा येऊ नये. पण कडवे सुटसुटीत दिसेल.)

- पंडित गागाभट्ट.

शिल्पा ब's picture

2 Jul 2010 - 11:34 pm | शिल्पा ब

सूचना अमलात आणली आहे.

बाकी सगळ्याचाच अर्थ कशाला काढायचा?
उगाच काहीतरी लिहिल्यावर बरं काय चांगलं काय .... काय?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

2 Jul 2010 - 11:35 pm | पंगा

'उगाच काहीतरी'सुद्धा चांगले असू शकते.

करावे ते चांगले करावे, मग ते उगाच काहीतरी का असेना... काय?

- पंडित गागाभट्ट.

शानबा५१२'s picture

3 Jul 2010 - 9:40 am | शानबा५१२

नुसताच सर्टिफिकेटचा कागद घेऊन डोक्यात मात्र काहीच नसावे
असेच काहीसे झाले आहे

अरेरे,अस कुणाच झाल?आपल की काय??
ही कविता(??????????) कुणाला तरी उद्देशुन लिहलेय अस मला का वाटतय?? :)

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

शिल्पा ब's picture

3 Jul 2010 - 9:16 pm | शिल्पा ब

जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला उद्देशून ते कडवं आहे तर तसं समजा...आमची काही हरकत नाही...

आम्ही शाळेत गेलेलो नसल्याने सर्टिफिकेटचा आणि आमचा काही संबंध नाही...तरी आम्ही आपले सगळ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटण्यात वाकबगार झालो आहोत..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शानबा५१२'s picture

3 Jul 2010 - 9:56 pm | शानबा५१२

जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला उद्देशून ते कडवं आहे तर तसं समजा...आमची काही हरकत नाही...

अरे काय चाललय हे सर्व माझ्याबद्दल गैरसमज का करुन घेतात??
मी फक्त विचारल असच..........माझ्याकडे काय डोंबलाची सर्टीफीकेट्स आहेत???
त्या कोण मुगनय्नी उगाच माझ्या प्रतिसादावर काहीही लिहत आहेत..........माझ्या 'बुध्दी'(???) वर शंका काढत आहेत!!
आणि आता तुम्ही!!

तरी आम्ही आपले सगळ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटण्यात वाकबगार झालो आहोत..

अच्छा म्हणजे सर्टीफीकेट्स ह्यासाठी वापरतात तर...इथेसर्वच तस करतात.....मला सोडुन.........सर्व खुपजण(कोण कोण ते माहीती असेलच.........जास्त स्त्रीया आहेत) भांडखोर आहेत......
माझे 'पेपर्स' येतील तेव्हा समजेल ह्या अजाणांना!!!!! >:)
मस्करी नाही येतील .........खरच येतील....आत्ताच लागतो कामाला.........
बाय गुड्डे!!!

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे