तुरुंग

तुरुंग

जसे नादति सूर सुखाचे
दु:खाचीही किणकिण असते
असेच स्मरतां तुझे हांसणे
सुखदु:खाची सीमा विरते

चुंबूनी घेता तुझी कुंतले
ओठांवरती धुसफूस दिसते
मजला ठाऊक त्यांची खोडी
कशाकशाची भ्रांत न उरते

कसे सोडवू या हृदयाला
तुरूंग बटांचा;सहजी फसते
कोण देश हा कसले जग हे?
माझे मीपण मला न स्मरते!

-गिरीराज

छान कविता.....

मिपा वर स्वागत...
छान कविता आहे.. अजुनी अशाच येऊ देत...

चांगली कविता

चांगली कविता आहे.

प्रशांत.

जसे नादति

जसे नादति सूर सुखाचे
दु:खाचीही किणकिण असते

खरे आहे, ही 'दु:खाची किणकिण' तर अनेक उत्तमोत्तम काव्यांना जन्म देऊन गेली आहे.

असेच स्मरतां तुझे हांसणे
सुखदु:खाची सीमा विरते

खरे आहे असतात अशा काही सुंदर्‍या ज्यांमुळे सुखदु:खाची सीमा खरोखरच उरत नाही. Smile
पुण्याचे पेशवे

चांगली आहे..

मिपावर स्वागत. कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

वा!

कसे सोडवू या हृदयाला
तुरूंग बटांचा;सहजी फसते
कोण देश हा कसले जग हे?
माझे मीपण मला न स्मरते!

वा! कविता छानच लिहिली आहेस रे गिरीराज!

तात्या.

मस्त

गिरीराज , छान !

वा!

चुंबूनी घेता तुझी कुंतले
ओठांवरती धुसफूस दिसते
वा!
कसे सोडवू या हृदयाला
तुरूंग बटांचा;सहजी फसते

कल्पना आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू

+१ हेच म्हणतो.

चतुरंग

धन्यवाद..

धन्यवाद मित्रहो! Smile