कालू कौआ

सहज's picture
सहज in जे न देखे रवी...
28 Jun 2010 - 9:07 am

गेल्या भारत दौर्‍यात बायकोच्या लहानपणची काही आवडती पुस्तके, कॉमिक्स आवराआवरीत सासुबाईंना हाती लागली व लगेच आजीने ती वाचायला पाठवली. विकांताला वाचायची ड्युटी करता करता "बबन हजाम" नावाच्या एका धमाल बालकथा पुस्तकात एक छान सुंदर कविता दिसली. एकाच वेळी लहान मुलांना व मोठ्यांना (मस्त संदर्भ लागून) आवडणारी ही कविता तुमच्यासमोर मांडायचीच असे ठरवले.

कवयित्री आहेत श्रीमती अनुपा लाल. दिल्ली युनिव्हर्सीटी मधुन इंग्लीश साहीत्यात पोस्ट ग्रॅज्युएट केल्यानंतर गेली चाळीस वर्षे अनेक वर्तमानपत्रे, देशविदेशात विविध मासीके, नियतकालीके इ तसे २० पुस्तके त्यात बालकथा, मुन्शी प्रेमचंद यांच्यावर, त्यांच्या कथांवर तसेच इंडीयन पॉटरी (कुंभारकाम / कला??) अश्या वेगवेगळ्या विषयांवर विपुल लेखन केले आहे. ही कविता इंग्लीश मधे आहे पण किमान इंग्लीश येणार्‍या सगळ्यांनाच समजु शकेल अशी सहज, सोपी. तसा हा लेख नियमात बसावा म्हणुन मी मराठी अनुवाद केला आहे पण तो वाचला नाहीत तर उत्तम. खर तर तो अनुवाद तसा भुक्कड आहे त्यामुळे मी तो प्रतिसादात टाकीन इथे नको :-)

कवितेचे नाव आहे "कालू कौआ" (उगाच इंग्लीश मधे लिहायचे म्हणुन कवयित्रीने ब्लॅक क्रो असे नाव दिले नाही हे विशेष आवडले)

Ladies are peculiar
I am sure you will agree
When I tell you how my neighbour
has behaved with me

I left a dead and tasty mouse
for her dinner Sunday night
Would you believe she fainted-
not from joy, but fright?

I waited till she'd recovered;
I said, "How do you feel?"
She said, "Go away, you nasty crow!"
and let out such a squeal!

I felt most insulted;
I'm sure you would have too
So I stopped being friendly
for almost week or two

When next I went to see her,
I found to my surprise,
She'd bought herself a puppy
of a small and ugly size

A lady needs a better pet
was all that I could say
So I pecked and pecked that nasty pup
until he ran away

My neighbour was alone again;
I thought she'd like a chat
But she shooed me off impolitely-
what can you say to that?

Still, I'm generous; I forgave her
Next day, I went again
I found she'd bought a parrot
Thin, miserable and plain!

I felt sorry for the parrot
imprisoned in a cage
"You shouldn't be sitting idle,"
said I, "not at your age"

So I unlocked the cage door
and watched him fly away
I said,"Kalu Kauwa, good for you,
This is your good deed for the day!"

Once more my neighbour was alone
so I stopped to say hello
I feel neighbours should be friendly,
And I'm a friendly crow

She was reading a newspaper
I hopped up to her chair
She just went on reading
As if I wasn't there

Good morning I cawed cheerfully
and it was a lovely day
She threw her paper straight at me:
"You nuisance! Go away!"

I didn't flinch or budge an inch
I just picked the paper up,
And, looking sad and dignified
I put it near her cup.

She laughed and said "You crazy crow!"
and offered me some bread
I wanted to reject it
but accepted it instead

I still visit her occasionally,
She always says hello
Ladies are peculiar
I'm glad that I'm a crow

बबन हजामची कथा कधीतरी नंतर :-)

हास्यकविताबालगीत

प्रतिक्रिया

बायका असतात थोड्या चक्रम
खात्री आहे व्हाल सहमत
अता माझी शेजारीण घ्याना
तुम्हीच ऐकुन म्हणाल 'अलबत'

ताजा चविष्ट उंदीर दिला
मस्त रात्रीच्या डिनरला
झीट येउन पडली दारात
आणि चेहरा पांढरा पडला

वारा घालून शुद्धीवर आणता
कसे वाटतेय? विचारले
"हाड! मेल्या वात्रट कावळ्या "
बोंबलून मला हाकलले.

केवढा अपमान वाटला मला
तुम्हालाही वाटेल ना?
मग मीही बोलणे टाकले
पुढच्या दोन आठवड्याना

मैत्रीखातर परत गेलो
डोळ्यावर विश्वास न बसला
टिचभर कुत्रा तिच्याभोवती
लाळ घोटताना एक दिसला

किमान देखणा प्राणी पाळावा
असे बुवा वाटले मला
दोन दिवस टोचा मारुन
त्याला मी पळवून लावला

एकटी बिचारी पुन्हा शेजारीण
म्हणून गेलो गप्पांसाठी
शूऽ शूऽ करुन परत हाकले
काय म्हणू ह्या वागण्याला?

माफ किया, हम है दिलवाले!
दुसर्‍या दिवशी गेलो परत
तर एका पिंजर्‍यामधे दिसला
बंद करून ठेवलेला पोपट

रोडावलेला, रडका पोपट
दया बिचार्‍याची मज आली
न हलता बसण्याची पाळी
या वयी त्या का आली?

मोकळा केला दु:खामधून
उघडुन त्याचा दरवाजा
उडू दिले त्याला आकाशी
जरा न करता गाजावाजा

म्हणलो "भई वा! काले कौए"
खुद के साथ करता बाता
आजच्या पुण्यकामाचा तू
नक्की केलास पुरा कोटा

पुन्हा बाई उदास एकाकी
म्हणुन पुसाया गेलो खुशालि
शेजार्‍याने शेजार्‍याची
करावीच ना देखभाली

पेपर वाचीत बसल्या बाई
मीही बसलो खुर्चीवर
वाचनात त्या इतक्या दंग कि
घेईतच ना माझी खबर

"सुप्रभात" मी वदलो हासत
"मस्त दिवस आहे नै आज"
पेपर मजवर भिरकावून त्या
देऊ लागल्या पुन्हा हाकुन!

स्थितप्रज्ञाच्या मख्खपणाने
जागुन कोडगेपणाला
शांतपणे मी पेपर उचलून
टेबलावरी ठेवुन दिधला

"हलकट कावळ्या" जरी म्हणाली
दिला हसुन पण पाव नि मस्का
रागासोबत मीही गिळला
मनात बिल्कुल इच्छा नसता

असाच जातो तिच्याकडे मी
शिष्टाचारा, अधुन मधुन
सभ्यपणाने तीही बोलते
खट्याळ थोडे कधी हसून

ऐकुन अमुच्या मैत्रीची या
'बायकांचि या तर्‍हा निराळी'
असेल तुमची खात्री पटली
गोष्ट कशाला सांगु वेगळी.

माझ्यावाणी क्षुद्र कावळ्या
असा भयंकर अनुभव येतो
काय जाहले असते जर मी
मानव पुरुष खरोखर असतो?

मुक्तसुनीत's picture

28 Jun 2010 - 9:14 am | मुक्तसुनीत

मूळ कविता आवडली. ती केवळ मुलांकरताच आहे असे वाटले नाही. मोठ्यांकरता सुद्धा त्यात थोडेसे , लाईट-हार्टेड फ्लर्टींग आहे की.

एकंदर हा प्रकार आवडला. या निमित्ताने इंग्रजी लिखाणातल्या आवडत्या गोष्टी - मग त्या छोट्या छोट्या का असेनात - लोकांनी लिहाव्यात.

सहजराव, प्रकार आवडला. तुमचे भाषांतरसुद्धा मी एंजॉय केले. पदार्थ जमला आहे :-)

रामदास's picture

28 Jun 2010 - 9:30 am | रामदास

छान जमलंय.
ठेक्यात म्हणायचं झालं तर कडव्याला एक पालुपद जोडावं.
उदा:
हट,चावट मेला .!!
उड हलकट काळ्या !!
आता एव्हढी लिबर्टी घ्यायची की नाही ते तुम्ही ठरवा .

सुधारणा आम्ही काय सुचवणार ? तरीपण थोडं ट्रिमींग करा .
फ्लर्टींग सूचक असावं म्हणून.
ताजा चविष्ट उंदीर दिला
रविवार रात्री डिनरला
चक्कर येउन पडली पहा
चेहरा पांढरा पडलेला. ॥पालुपद॥

धनंजय's picture

29 Jun 2010 - 5:59 pm | धनंजय

+१
(ठेका महत्त्वाचा, ओळी लहान... सहमत)
मस्त कविता आणि भाषांतर

राजेश घासकडवी's picture

28 Jun 2010 - 9:58 am | राजेश घासकडवी

दोन्ही आवडली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jun 2010 - 11:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मूळ कविता मस्तच आहे, आणि भाषांतरही जमलं आहे. सहजराव, कीबोर्डाला थोडी तकलीफ देत जा अधूनमधून!

( पहिल्या कडव्यानंतर मला आमची पांढरू मांजर आठवली. आमची जेवायची वेळ बदलली तरी हिला बरोब्बर समजायचं, जिथे असेल तिथून लगबगीनं यायची. एक दिवस, खरंतर रात्री, दीड-दोनला मी अभ्यास करत बसले होते; कारण अर्थातच दुसर्‍या दिवशी माझी परीक्षा होती. ही बया आली आणि तोंडातून काहीतरी चित्रविचित्र आवाज काढत होती. पाहिलं तर तोंडात काहीतरी होतं ... एक भलामोठा उंदीर! बराच वेळ उंदीर आणि मी या दोन टोकांमधे फेर्‍या मारल्या आणि तोंडातून आणखी चित्रविचित्र आवाज काढले. बराच वेळ ही सर्कस झाल्यावर माझ्या लक्षात आलं, ही बया मला उंदीर शेयर करण्यासाठी बोलावत होती. ज्जाम क्यूट वाटली ती मला तेव्हा! )

अदिती

चित्रा's picture

30 Jun 2010 - 12:24 am | चित्रा

सहजराव, कीबोर्डाला थोडी तकलीफ देत जा अधूनमधून!

हेच म्हणते.
कविता आणि भाषांतर दोन्ही आवडले!

विसोबा खेचर's picture

28 Jun 2010 - 11:54 am | विसोबा खेचर

छान रे.. :)

सहज's picture

28 Jun 2010 - 1:02 pm | सहज

यांचे अजुन एक छान बालगीत आहे.

Every Boy's Prayer

Dear God,
There is a small suggestion
That I would like to make.
It concerns the nature
Of chocolate-walnut cake.

This cake has a habit
Of disappearing fast.
It gets eaten much too quickly
It really doesn't last!

The same sad thing is true
Of ice cream
And cola too!

People pray
That you may
Make them live
On and on and on.

I only wish
A tasty dish
Would not so quick be gone!
I think there is
No sadder fate
Than sitting before
An empty plate!

I don't want to bother you
I know you must be busy.
But if...you can...do something
I'll thank you till I'm dizzy!

Thankyouthankyouthankyouthankyou........

गणपा's picture

29 Jun 2010 - 1:53 pm | गणपा

धन्स सहजराव.
लेकीला आवडेल ही :)

सहज's picture

29 Jun 2010 - 1:57 pm | सहज

तु केलेल्या कुठल्याही डीश फटक्यात मोकळ्या होतातच ना!

वेताळ's picture

28 Jun 2010 - 1:24 pm | वेताळ

काळ्या कावळ्याचे मनोगत आवडले. किती छान निरिक्षण आहे कावळ्याचे. :D
वेताळ

गणपा's picture

28 Jun 2010 - 2:34 pm | गणपा

मस्त आहे कविता.
आता अनुवादही मस्त जमलाय :)
और भी आंदो.

शुचि's picture

28 Jun 2010 - 3:06 pm | शुचि

मूळ कविता आणि अनुवाद दोन्ही आवडले.
कावळा फार चौकस पक्षी असतो.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

नंदन's picture

28 Jun 2010 - 4:44 pm | नंदन

मूळ कविता आणि अनुवाद मस्तच.

>>> बबन हजामची कथा कधीतरी नंतर
--- येऊ द्या लवकर :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

शानबा५१२'s picture

28 Jun 2010 - 4:55 pm | शानबा५१२

इंग्रजी कावळ्याला फक्त ब्रेड भेटला आणि मराठी कावळ्याला 'पाव व मस्का'!! =)) =)) =)) =))

का हा पक्षपातीपणा??

___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे

सुनील's picture

28 Jun 2010 - 4:57 pm | सुनील

कविता मजेशीर. अनुवादही चांगला जमलाय. रामदासांची सुधारणा अधिक पालुपद आवडले.

एव्हरी बॉय्ज प्लेयरचाही अनुवाद येउद्यात!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2010 - 6:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनुवाद आवडला....!
अजून येऊ दे.

-दिलीप बिरुटे

निखिल देशपांडे's picture

28 Jun 2010 - 6:55 pm | निखिल देशपांडे

कविता व अनुवाद दोनी आवडला...

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

प्रियाली's picture

28 Jun 2010 - 6:55 pm | प्रियाली

मूळ कविता आणि अनुवाद दोन्ही मस्त! सकाळ चांगली गेली. :)

प्रभो's picture

28 Jun 2010 - 6:56 pm | प्रभो

कविता आणी अनुवाद दोन्ही भारी!!!!!!!

वाहीदा's picture

29 Jun 2010 - 1:20 am | वाहीदा

सहजरावांचा सहजच सुचलेला अनुवाद अन मुळ कविता अप्रतिम !!
पण कावळे इतके सरळ मार्गी असतात का ? डोमकावळ्याला विचारायला हवे ;-)
~ वाहीदा

ऋषिकेश's picture

29 Jun 2010 - 1:27 am | ऋषिकेश

कविता भाषांतर दोन्ही मस्त
येऊद्या अजून

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

विकास's picture

29 Jun 2010 - 1:43 am | विकास

मूळ कविता आणि तितकाच छान अनुवाद!

वरील Every Boy's Prayer पण एकदम आवडली.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सहज's picture

29 Jun 2010 - 7:12 am | सहज

सर्व वाचक व दिलदार प्रतिसादकांचे आभार.