पळ

सहज's picture
सहज in जे न देखे रवी...
25 Jun 2010 - 11:53 am

प्रेरणा अर्थातच मित्रवर्य नानाजी यांची रुळ व मराठी जालीय खूळ

खोडी काढून
आम्ही असेच बुंग्गाट सुटायचो
तो त्याच्या संस्थळावर अन
मी दुसर्‍याच्या संस्थळावर पहारा ठेवायचो

अश्याच खोड्या काढताना
निस्तारताना, कधी आय्डी शेयर करताना
अजुन एक ब्लॉग आपणच काढायचा
एकमेकांना सांगून खळाखळा हसायचो

लिव्हरेजच्या निसरड्या वाटेवरुन
कधीतरी त्याची हवा निघुन गेली
मी मात्र वसुलि करत आहे अजुन
सोनेरी द्र्व्याच्या अमलेत सोमवार टू रविवार

भयानकहास्यविडंबन

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

25 Jun 2010 - 12:00 pm | विसोबा खेचर

:)

केशवसुमार's picture

25 Jun 2010 - 3:23 pm | केशवसुमार

विडंबन आणि पहिला प्रतिसाद दोन्ही मस्त..
(प्रेक्षक) केशवसुमार

चतुरंग's picture

25 Jun 2010 - 4:51 pm | चतुरंग

एकदम चोक्कस!

चतुरंग

श्रावण मोडक's picture

25 Jun 2010 - 12:06 pm | श्रावण मोडक

एकच विषय - विडंबन दुसरे.

प्रमोद देव's picture

25 Jun 2010 - 12:32 pm | प्रमोद देव

सहजराव सुटऽऽलेत! :)

गणपा's picture

25 Jun 2010 - 12:44 pm | गणपा

हा हा हा, सहजराव जबराच
(_)ळ ज्वर उतरलेला दिसत नाही आजही.
आजवर एका कवीतेची इतकी (१४) विडंबन पाहिली नाहीत कधी
मिपाच्या जिंदादिल सदस्यांना साक्षात दंडवत :)

(_)हवा तो शब्द भारा

छोटा डॉन's picture

25 Jun 2010 - 1:37 pm | छोटा डॉन

>>आजवर एका कवीतेची इतकी (१४) विडंबन पाहिली नाहीत कधी
+१, असेच म्हणतो.

सहजराव एकदम फॉर्मात !
मस्त जमले आहे विडंबन ... :)

------
छोटा डॉन

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Jun 2010 - 1:49 pm | बिपिन कार्यकर्ते

असेच म्हणतो..

आता एखादे 'Know Your आंतरजाल' असे पुस्तक काढावे का असा विचार करतोय. ;)

बिपिन कार्यकर्ते

नंदन's picture

25 Jun 2010 - 1:53 pm | नंदन

>>> आता एखादे 'Know Your आंतरजाल' असे पुस्तक काढावे का असा विचार करतोय.
--- एकंदरीत आं.जा.चे स्वरूप पाहता त्याला 'या!!!' हे शीर्षक अधिक शोभून दिसेल ;)

झक्कास विडंबन हो सहजराव. 'वसुलि' हा शब्द कुठेतरी वाचल्यासारखा वाटला :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jun 2010 - 1:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहजराव पुन्हा एकदा मुख्य पानावर दिसले ... ही तर अवलियांची कृपा!!

>>> आता एखादे 'Know Your आंतरजाल' असे पुस्तक काढावे का असा विचार करतोय. <<
किंवा "आंतरजाल for dummies" ...

अदिती

प्रभो's picture

25 Jun 2010 - 6:29 pm | प्रभो

>>सहजराव पुन्हा एकदा मुख्य पानावर दिसले ... ही तर अवलियांची कृपा!!

१०० वेळा बाडिस.....

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jun 2010 - 9:30 pm | llपुण्याचे पेशवेll

+१ म्हणजे १०१
सहज सुटलेत हे कसे काय सुटले नजरेतून.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

आंबोळी's picture

25 Jun 2010 - 3:45 pm | आंबोळी

बाकी सहजरावांचे विडंबन सहज वाचता येत नाही...
कांद्यासारखे त्याचे कितीही पदर काढले तरी काहीतरी नविन अर्थ लागतच राहतो...

आंबोळी

भडकमकर मास्तर's picture

26 Jun 2010 - 5:36 pm | भडकमकर मास्तर

अगदी अगदी...
काही ओळींचा अर्थ लागत नाही आहे..
आता व्यनिमधून समजावून घेतो

अवलिया's picture

25 Jun 2010 - 5:17 pm | अवलिया

छान !

--अवलिया

प्रियाली's picture

26 Jun 2010 - 3:31 pm | प्रियाली

सहजरावही सुटले होते वाटते आणि हे विडंबन माझ्या नजरेतून सुटले होते. ;)

मुक्तसुनीत's picture

26 Jun 2010 - 5:28 pm | मुक्तसुनीत

:-)

रेवती's picture

26 Jun 2010 - 6:31 pm | रेवती

सहजकुमार हे खोडकर आहेतच!
त्यांनी असे विडंबन करणे अगदी स्वाभाविक आहे असे वाटले.

रेवती