पल पल है भारी..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
23 Jun 2010 - 10:17 pm

पल पल है भारी.. (येथे ऐका)

स्वदेस चित्रपटातल्या रामलिलेतलं एक अतिशय सुंदर गाणं..

पल पल है भारी वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई..

स्वराच्या तबल्याचा छान भजनी ठेका. जौनपुरी रागातला सुंदर मुखडा. राग जौनपुरी. आपल्या रागसंगीतातला एक अतिशय गोड, कारुण्याने भरलेला राग!

आओ रघुवीर आओ, रघुपति राम आओ
मोरे मन के स्वामी, मोरे श्रीराम आओ

या पुढल्याच ओळीत जौनपुरी बदलला आहे.. जौनपुरीत वर्ज्य असलेले शुद्ध गंधार, शुद्ध निषाद अचानक ताबा घेतात आणि जौनपुरीच्या सुरावटीत हा अचानक झालेला बदल कानाला सुखावून जातो.

राम-राम जपती हूँ, सुन लो मेरे राम आओ
राम-राम जपती हूँ, सुन लो मेरे राम जी

पुन्हा एकदा कोमल गंधाराचं राज्य!

बजे सत्य का डंका, जले पाप की लंका
इसी क्षण तुम आओ, मुक्त कराओ,
सुन भी लो अब मेरी दुहाई

गाडीनं पुन्हा रुळ बदलले..'सुन भी लो अब मेरी दुहाई' हे शब्द खूप छान पडले आहेत, लयीत पडले आहेत..

राम को भूलो, ये देखो रावन आया है
फैली सारी सृषटी पर जिसकी छाया है
क्यों जपती हो राम\-राम तुम?
क्यों लेती हो राम नाम तुम?
राम\-राम का रटन जो ये तुमने है लगाया
सीता, सीता तुमने राम में ऐसा क्या गुन पाया?

ही रावणाची कोरस एन्ट्री ठीक आहे! :)

गिन पायेगा उनके गुण कोई क्या,
इतने शब्द ही कहाँ हैं
पहुंचेगा उस शिखर पे कौन भला,
मेरे राम जी जहाँ हैं

क्या बात है.. गाण्याच्या सुरावटीत आता जयजयवंतीचा सुंदर प्रवेश..राग जयजयवंती.. आपल्या रागसंगीताच्या खजिन्यातला अजून एक सुरेख, शांत राग.. जयजयवंतीने रावणाच्या तणतणाटाला अगदी शांतपणे दिलेलं उत्तर! :)

जग में सबसे उत्तम हैं, मर्यादा पुरुषोत्तम हैं
सबसे शक्तिशाली हैं, फिर भी रखते संयम है

क्या बात है..! 'सबसे उत्तम हैं' आणि 'मर्यादा पुरुषोत्तम हैं' तलं बॅलन्सिंग खूप छान आहे, प्रसन्न आहे..

राम में शक्ति अगर है, राम में साहस है तो
क्यों नहीं आ‍ए अभी तक वो तुम्हारी रक्षा को
जिनका वर्णन करने में थकती नहीं हो तुम यहाँ
ये बता‍ओ वो तुम्हारे राम है इस पल कहाँ

पुन्हा एकदा अहंकारी रावण..

यानंतर मल्हाराशी मिळताजुळते संगीताचे सुंदर तुकडे टाकले आहेत..सारा आसमंत भारून टाकणारा मल्हार..! काय सांगावी आपल्या रागसंगीताची थोरवी? किती वर्णावी आपल्या रागसंगीताची श्रीमंती?

आणि त्यानंतर...?

राम हृदय में है मेरे, राम ही धडकन में है
राम मेरे आत्मा में, राम ही जीवन में है
राम हर पल में है मेरे, राम है हर स्वास में
राम हर आशा में मेरी, राम ही हर आस में

इथे विषय संपतो, या गाण्याचं रसग्रहण संपतं.. कारण? कारण..

'राम हृदय में है मेरे, राम ही धडकन में है' या ओ़ळीमध्ये साक्षात यमन प्रवेशतो आणि सारं गाणं एका क्षणात अत्त्युत्तम उच्चीला पोहोचतं...! यमनबद्दल माझं अनेकदा बोलून झालंय त्यामुळे अधिक काही बोलत नाही..

पल पल है भारी..

मधुश्रीने गायलेलं एक छान गाणं, सुंदर चित्रिकरण. गायत्री जोशी नावाची नटी सीतेच्या भूमिकेत छान दिसली आहे..

अलिकडच्या काळातलं आपल्या रागसंगीतानं समृद्ध असं गाणं.. कालचा, आजचा, उद्याचा - काळ कोणताही असो, आपलं रागसंगीत चिरतरूण आहे.. अजरामर आहे, अमर आहे..नेहमी आपल्या रागसंगीताची भक्ति करावी, पूजा करावी.. त्यातच समाधान आहे, सुख आहे!

या गाण्याकरता रेहमानचं मात्र कौतुक वाटतं! हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचं असं खास स्थान निर्माण करणार्‍या मराठमोळ्या आशुतोष गोवारीकराचंही कौतुक वाटतं!

-- तात्या अभ्यंकर.

संगीतआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

23 Jun 2010 - 10:44 pm | छोटा डॉन

तात्या, हे गाणे आम्हाला खुप आवडते.
काय माहित पण त्यातले शब्द, लय आणि एक सुरेख नादमयता आम्हाला खुप भाऊन जायची.

पण आज तेच गाणे तुम्ही रागदारीत उलगडुन सांगितले व त्याचे वर्णन ऐकुन हे गाणे आता जरा जास्तच आवडायला लागले आहे.
मजा आली.
धन्यवाद !

------
छोटा डॉन

निखिल देशपांडे's picture

23 Jun 2010 - 10:45 pm | निखिल देशपांडे

रावणालाच त्याचा मनात राम आहे सांगणार्‍या या गाण्यातल्या ओळी आवडतात...
मस्त तात्या..

या गाण्याकरता रेहमानचं मात्र कौतुक वाटतं!
+१
असेच अजुन एक लाडके गाणे म्हणजे लगान मधले "ओ पालन हारे"
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

सहमत!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

भाग्यश्री कुलकर्णी's picture

23 Jun 2010 - 11:54 pm | भाग्यश्री कुलकर्णी

माझेही आवडते गाणे आहे हे.

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Jun 2010 - 12:25 am | बिपिन कार्यकर्ते

तात्या, आवडलं रे. गाणं तर आवडतंच.

बिपिन कार्यकर्ते

वेताळ's picture

24 Jun 2010 - 10:01 am | वेताळ

तसेच ह्या सिनेमातले दुसरे गाणे "ये जो देस है तेरा,स्वदेश है तेरा"हे गाणे देखिल खुप मस्त झाले आहे.

वेताळ

अस्मी's picture

24 Jun 2010 - 10:07 am | अस्मी

माझंही खूप खूप आवडतं गाण आहे...एकदम मस्त लिहिलयंत.

या गाण्याकरता रेहमानचं मात्र कौतुक वाटतं!

रेहमान रॉक्स :)

आणि आशुतोष गोवारीकरच्या प्रत्येक चित्रपटात असं गाणं असतच...मला स्वदेस्मधलंच ये तारा वो तारा आणि लगान मधील ओ पालनहारे पण आवडतं :)

- अस्मिता

सहज's picture

24 Jun 2010 - 10:13 am | सहज

हे गाणे छान आहे.

रेहमान बराच रागावला की ह्या गाण्यात :P

(चमन) सहज

वेडा कुंभार's picture

24 Jun 2010 - 10:16 am | वेडा कुंभार

मला सुद्धा हे गाणे खूप आवडते. मला राग वगैरे काही जास्त कळत नाही पण गाणे ऐकायला छान वाटते.
तसेच मला जगजीत सिंघ यांचे गाणे हे गाणे पण खूप आवडते.

***************************************************************************************************
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jun 2010 - 10:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

या गाण्यातल्या शेवटच्या ओळींमुळे हे गाणं खूपच जास्त आवडतं. रागदारीतलं अजूनही काही कळतं असं नाही, पण अनेक ठिकाणी ऐकून मल्हारमात्र ओळखला होता. अर्थात मला त्यामुळे गाण्याचं सौंदर्य जास्त समजलं असं नाही.
सुंदर गाण्याची आठवण आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद तात्या!

अदिती

जे.पी.मॉर्गन's picture

24 Jun 2010 - 2:50 pm | जे.पी.मॉर्गन

>>या गाण्यातल्या शेवटच्या ओळींमुळे हे गाणं खूपच जास्त आवडतं<<

सहमत. "मन से रावण जो निकाले राम उसके मन में है |" निश्चितच गाण्याचा "हायलाइट". अख्तरसाहेबांची कमाल!

तात्यांचं विवेचनदेखील खूप छान. थोडं जरी गाणं "समजलं" तरी छान वाटतं :)

जे पी

अमोल केळकर's picture

24 Jun 2010 - 12:09 pm | अमोल केळकर

वा सुंदर रसग्रहण !

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

नंदन's picture

24 Jun 2010 - 12:31 pm | नंदन

हे गाणं आवडायचंच, पण त्यातला हा रागदारीचा खेळ ठाऊक नव्हता. उत्तम रसग्रहण!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मी-सौरभ's picture

24 Jun 2010 - 3:02 pm | मी-सौरभ

-----
सौरभ :)

अवलिया's picture

24 Jun 2010 - 1:10 pm | अवलिया

सुरेख लेखन

--अवलिया

जागु's picture

24 Jun 2010 - 3:05 pm | जागु

सुंदर रसग्रहण आहे.

ऋषिकेश's picture

24 Jun 2010 - 6:58 pm | ऋषिकेश

एका आवडत्या गाण्याचं सुरेख रसग्रहण आवडलं

ऋषिकेश
------------------
कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे.
या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

विसोबा खेचर's picture

25 Jun 2010 - 1:23 pm | विसोबा खेचर

सर्व प्रतिसादकर्त्या रसिकांचे आभार..