डायवर दादा
डायवर दादा चला की आता
कशाला पब्लिक जादा घेता
डब्बल वाजली आता तरी
तुम्ही उगाच पब्लिक वर चढवता ||धृ||
रेटारेटी करतात सारी
गर्दीत बाईमाणूस एकटी तरी
बसायला जागा कुठं शोधू आता
तुम्ही उगाच पब्लिक वर चढवता ||१||
कोरस: "ह्यो डायवर गाडी काय पुढं नेत न्हाई, उगा वेळ होई, मुडदा बशीवला त्याचा
म्होरल्या कामाचा इस्कोट झाला, गर्दीचा महापुर आला, लवकर हाण म्हणावं गाडी त्याला"
कंडक्टर भाऊ लांब उभा मागं
"सरका पुढं, सरका पुढं ", वरडू लागं
गर्दीत पाकीट कशी काढू आता
तुम्ही उगाच पब्लिक वर चढवता ||२||
सामान माझं न्हाई लई जड
हात कोनी लावंना उचलाया थोड
उगा सामानाचंबी तिकीट का मागता?
तुम्ही उगाच पब्लिक वर चढवता ||२||
तिकडं तालूक्याचा बाजार भरलाय सारा
जाऊद्याना गाडी आता वाजले की बारा
नुसतं एक्शिलेटर दाबूनी गाडी उभी का करता
तुम्ही उगाच पब्लिक वर चढवता ||३||
कोरस: "ह्यो डायवर गाडी काय पुढं नेत न्हाई, उगा वेळ होई, मुडदा बशीवला त्याचा
म्होरल्या कामाचा इस्कोट झाला, गर्दीचा महापुर आला, लवकर हाण म्हणावं गाडी त्याला"
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१६/०६/२०१०
प्रतिक्रिया
16 Jun 2010 - 10:01 am | आनंदयात्री
हाण तिचायला !!
लै भारी !!
16 Jun 2010 - 10:33 am | टारझन
=))
मस्त रे पाभ्या !!! मुडदा बशिवला त्या डायवरचा !!
- (एक बनपाव गाडीबाहेर काढुन ड्रायव्हिंग करनारा) स्मषाणप्रेत
16 Jun 2010 - 10:38 am | स्मिता_१३
मस्त !!!
टीपीकल पाषाणभेद स्टाईल. :-)
स्मिता
16 Jun 2010 - 3:56 pm | धमाल मुलगा
@
^
^
^
^
च्यामारी धरुन फट्याक!
काय कऽऽडक जमलीय!
लै भारी हो शाहीर... :)
बाकी, ह्या गान्यावर चैत्राली नारायनगावकरनीचा परफार्मण्स कसा आसंल ह्याच्यावर इच्चार करुनच येडा झालो ;)
16 Jun 2010 - 5:50 pm | शुचि
छान.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
16 Jun 2010 - 5:57 pm | jaypal
माल ;)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
16 Jun 2010 - 11:56 pm | पिंगू
पाभोराव अगदी षटकार मारला की वो...........
- (सामान्य यष्टीप्रवासी) पिंगू