वर्षभरातल्या विविध ऋतुंचा आनंद सिंगापुरात राहून लुटता येत नाही. वर्षभर एकच ऋतु! उष्ण आणि दमट. अशा वातावरणात राहून ऋतुगंध कल्पनेतच शोधावा लागणार. पण हे काही कठीण नाही! मराठी मातीशी जोडलेल्या कल्पना, लेखन, नाट्य, संगीत आदी कलांची उणीव मराठी प्रेमींना जगाच्या पाठीवर कुठेही भासत नाही.
महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर)ने ईथल्या मराठी बांधवांना साहित्याशी जवळीक साधायला, मराठीशी आपले नाते घट्ट करायला, ऋतुगंध हे द्वैमासिक काढून एक चांगला अवसर दिला आहे. गेली चार वर्षे हे मासिक नियमित प्रसिद्ध केल्या जाते. ह्यात विविध विषयांवरील लेख, कथा, कविता, प्रवासवर्णने, माहितीपर ईत्यादी लिखाण असते. लहानांसाठी खास विभाग देखील आहे. बाहेर देशात रहाणाऱ्या काही लहान मुलांना मराठीत लिहीण्याची सवय नसते. अशा मुलांमधे देखील मराठी लेखनकला वाढीस लागावी म्हणून त्यांनी लिहीलेल्या ईंग्लीश लेखनाचे सोप्या मराठीत भाषांतर करून मूळ ईंग्लीश लेखनाबरोबर प्रसिद्ध केल्या जाते. आपल्या कल्पना आपल्या भाषेत आलेल्या पाहून मुलांची भीड हळुहळु नाहीशी होते आणि ते मराठीत लिहायला प्रवृत्त होतात. असे झालेले पाहिले, तेव्हा हा प्रयोग योग्य मार्गाने जात आहे असे वाटले.
मिपावरच्या मराठी प्रेमी परिवाराला सिंगापुरातल्या मराठी नियतकालीकाची ओळख करून देणे हाच केवळ ह्या लेखाचा उद्देश नाही. येथील रसिकांनी नेहमी भेट देऊन मराठी साहित्याचा आस्वाद जरूर घ्यावा असे आग्रहाचे निमंत्रण देत आहे.
आणि भेट दिल्यावर feedback@mmssingapore.org ह्या पत्यावर तुमच्या प्रतिक्रिया विरोपाने नक्की कळवा. अर्थात आपल्या नेहमीच्या प्रथेनुसार ईथेही जरूर सांगा.
अंक वाचण्याचा दुवा महाराष्ट्र मंडळाच्या खालील संस्थळावर आहे.
http://maharashtra-mandal-singapore.org/joomla/
प्रतिक्रिया
11 Jun 2010 - 12:54 pm | अवलिया
छान ! सिंगापुरातली मंडळी फारच उत्साही ब्वा...
आमचा एक थेरडा मित्र आहे त्याला कळवतो.
--अवलिया
11 Jun 2010 - 1:00 pm | बिपिन कार्यकर्ते
संकेतस्थळ नक्की बघतो. :) शुभेच्छा...
@नाना: आमचाही एक मित्र आहे तिथे. हिरवा आहे पण तो, थेरडा नाही. :D
बिपिन कार्यकर्ते
11 Jun 2010 - 1:02 pm | अवलिया
अरे तो माझ्या वयाच्या दृष्टीने थेरडा ! :D
तुझ्याच वयाचा आहे बघ ! ;)
(बालक) अवलिया
11 Jun 2010 - 1:09 pm | वेताळ
वाचावे ते नवलच. :S
असो सिंगापुरला इतक्यात जाणे होईल असे वाटत नाही.
वेताळ
11 Jun 2010 - 1:11 pm | नाना बेरके
संकेतस्थळ बघितले. चांगले वाटले.
@माझा एक पुतण्या आहे - बंडू बेरके - परदेशात असल्याने त्याला मराठी भाषेची खूप आवड आहे. त्याला आवडेल तुमचे सं.स्थ.
चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके
11 Jun 2010 - 1:21 pm | अरुण मनोहर
>>परदेशात असल्याने त्याला मराठी भाषेची खूप आवड आहे<<
हे वाक्य खूप भावले.
12 Jun 2010 - 10:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>माझा एक पुतण्या आहे - बंडू बेरके - परदेशात असल्याने त्याला मराठी भाषेची खूप आवड आहे.
माझेही डोळे भरुन आले. :)
बाकी, सिंगापूरच्या मराठी मंडळाचा उपक्रम चांगलाच..!
अवांतर : >>> वर्षभरातल्या विविध ऋतुंचा आनंद सिंगापुरात राहून लुटता येत नाही.
काय म्हणता ? मित्राला व्य. नि. करावा लागतो ? :)
-दिलीप बिरुटे