नमस्कार मंडळी,
आपल्या सर्वांना भुलेश्वरचं दर्शन घडवण्याचा मानस आहे. सासवड पासून साधारण २६ (?) कि.मी. वर आहे हे मंदिर.पुणे - सोलापूर रस्त्यावरून यवतच्या अलीकडे एक फाटा फुटतो. तिकडूनही एक रस्ता आहे. हे मंदिर आहे यादव काळातलं. अतिशय देखणी शिल्पं असलेलं. जगरहाटीपासून दूर घेऊन जाणारं, गूढरम्य...
इथे गेल्यावर कसलीतरी अनामिक धुंदी चढते...स्वत:ला विसरून जातो आपण अगदी.
असं वाटतं की तिथल्या मूर्तींकडे आपण पाहण्यापेक्षा भूतकाळाचा पडदा दूर करून त्याच आपल्याशी बोलायला उत्सुक असाव्यात. भारून जाणे, मंत्रमुग्ध होणे...छे..शब्दच सापडत नाहीत. यात मुळीच अतिशयोक्ती नाही.
हे आहे मंदिराचं बाह्य रूप...
या प्रवेशद्वारामधून आपण आत जातो...
दोन्ही बाजूला चढून जायला जिने आहेत...अंधारातून चाचपडत पुढे गेलं कि मात्र आपण वेगळ्याच विश्वात असतो.
इथून पुढे बोलायला फारसं काही राहत नाही...
छाया प्रकाशाचा हा खेळ...
इथे रामायणा मधले देखील काही प्रसंग आहेत. पण गाईड असल्यासच जाणून घेता येतं.
काही सुंदर मूर्ती..
अजून एक विशेष असा की इथे स्त्री रूपातील गणपती पहावयास मिळतो.
शिल्पकलेचे काही अद्भूत नमुने इथे आहेत..
अतीशय प्रमाणबद्ध आणि रेखीव शिल्पं...
आणि काही उदासवाणी? जणू काही हा पराभूत योद्धा आहे...
अप्रतीम काम आहे हे...
फोटोच द्यायचे झाले तर खूप खूप देता येतील...पण स्वत: तिथे जाऊन हे सगळं अनुभवणं म्हणजे शब्दांच्या पलीकडचं आहे...
डोळ्यांना जे काही दिसतं ते कॅमेरा कैद करू शकतो..मनाचे तरंग तर नाही...
दर वेळी एक नवा अनुभव...श्री क्षेत्र भुलेश्वर...
प्रतिक्रिया
2 Jun 2010 - 2:22 am | शिल्पा ब
खूप छान आहेत चित्र....पण नेहमीप्रमाणेच कोणत्याही जुन्या मंदिरात गेल्यावर ज्या तुटलेल्या किंवा तोडलेल्या (मुसलमानी काम ) मूर्ती दिसतात त्या इथेही आहेत...इतक्या अप्रतिम शिल्पांना विद्रूप करण्याचे कसे वाटले देव जाणे... :-(
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
2 Jun 2010 - 8:35 am | छोटा डॉन
एकदम छान फोटो आहेत मालक.
खुप आवडले, बाकी शिल्पाशी सहमत ...
------
(नादखुळा ) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
2 Jun 2010 - 2:23 am | मदनबाण
वा... फार सुरेख. या ठिकाणीची ओळख करुन दिल्याबद्धल धन्यवाद... :)
देवळाच्या गाभार्याचे फोटो काढले नाहीत ? हे मंदीर कोणत्या देवतेचे आहे ?
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
2 Jun 2010 - 2:35 am | येडाखुळा
हे शंकराचे मंदिर आहे. गाभारा थोडा लहान आहे आणि ट्रायपॉड शिवाय फोटो नीट घेता येणार नव्ह्ता म्हणून राहिला. इथे शंकराच्या मुखवट्याखाली ठेवलेले पेढे काही वेळाने (२/४ मिनीटां मध्ये) गायब होतात. जिथे पेढे ठेवले होते तिथे कोणताही प्राणी (उंदीर इ.) येउन ते घेउन जाऊ शकेल असं वाटत नाही आणि कसलाही आवाज पण होत नाही. हे मी स्वत: पाहिलंय.
2 Jun 2010 - 3:01 am | चित्रा
सुंदर फोटो.
नंतर विस्तृत प्रतिसाद लिहीते..
2 Jun 2010 - 8:18 am | jaypal
खरोखरीच भुरळ पाडणार ठिकाण आणि फोटो.
स्त्रीरुपातील गणपती मी आयुष्यात प्रथमच पाहतो आहे. थक्क झालो. =D> =D> =D>
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
2 Jun 2010 - 8:24 am | सहज
भर उन्हाळ्यात अश्या मंदीराच्या आत पंखे, एसी नसुनही तापमान कमी असते ना?
फोटो आवडले.
2 Jun 2010 - 9:16 am | आनंदयात्री
भुलेश्वराबद्दल प्रथम मिपा/उपक्रमावरच वाचले होते. वाचुन लगेचच्या विकेण्डला भुलेश्वर पाहुन आलो, आणी मग नेहमी जातच राहिलो.
आधीच्या चर्चांनुसार हे मंदिर शाक्तपंथिंयांचे (अघोर ?) असावे. जसे तिथे स्त्री रुपातील गणेश नसुन ती गणेशी आहे.
पेढे गायब होतांना पाहुन मीही अंमळ चक्रावलो होतो. नंतर कळाले की शिवलिंगाच्या खाली जाण्यास कुठे तरी बारिक दरवाजा आहे, तिथे पुजार्याचा माणुस आधी जाउन बसतो आणी हात घालुन पेढे काढतो. आणि म्हणुनच पेढे फक्त ठराविक वेळेलाच गायब होतात :)
3 Jun 2010 - 9:06 am | पांथस्थ
मला कारण ठावुक नव्हते पण असे काहि होत असेल यावर अजिबात विश्वास नव्हता. भक्त कॅटेगरीतील मंडळींना सांगुन पाहिले की काहि तरी लोचा असणार, त्यांनी मला अतिसंशयी म्हणुन हिणवले. असो आता बघतो त्यांच्याकडे.
जाता जाता: आजकाल भगवंताचे खरे खुरे भक्त व्हायला बुद्धि गहाण टाकायची कला यायला हवी असे दिसते! च्यामारी आपला तर सहजासहजी कशावर विश्वास बसत नाहि (बाप दाखव नाहि तर श्राद्ध घाल ह्या म्हणीवर आमचा फार जीव) त्यामुळे याजन्मी मुक्ती नाहि :(
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
2 Jun 2010 - 9:20 am | प्रचेतस
भुलेश्वरचे शिवमंदिर अप्रतिम शिल्पकलेचा अजोड नमुना आहे. येथे अनेक शिल्पांवर रामायण, महाभारतातील अनेक पप्रसंग कोरलेले आहेत. युद्धशिल्पे विशेष उल्लेखनीय आहेत. रथ, सारथी, रथांची चाके, त्यावरील आरे, रथांतील धनुर्धर, ताणलेले आणी सुटलेले बाण निव्वळ अप्रतीम. काही अतिशय नाजूकतेने कोरलेली शिल्पे पण येथे आहेत.
2 Jun 2010 - 9:21 am | पांथस्थ
हे माझेही आवडते स्थळ आहे. शांत परीसर आणि वेगळ्या रचनेचे मंदिर. इथे यायचा प्रवासमार्गहि डोंगरांमधुन आहे. पावसाळ्यात मस्त मजा येते.
येतांना पुणे-सोलापुर रस्त्याने आलात तर परत जातांना सासवडकडचा रस्ता घ्यावा, बदलही होतो आणि हा मार्ग छान गावागावांतुन जातो.
पुणे-सोलापुर रोडवरच लोणी गावाच्या जरा पुढे रामदरा म्हणुन एक ठिकाण आहे. तिथलेही मंदिर मस्त आहे. डोंगराच्या पायथ्याला आहे आणि मंदिराला तीन बाजुंनी एका छोट्या तळ्याने वेढले आहे. तळ्यात अनेक बदके आहेत आणि खायला टाकले तर मस्त जवळ येतात.
हि दोन्हि ठिकाणे एका दिवसात आरामात पाहुन होतात.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
3 Jun 2010 - 5:21 pm | मड्डम
फोटो अतिशय झक्कासच....
एका नवीन ठिकाणाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद
मराठी आणि मायभूमीचा अभिमान असलेला मायभूमी
2 Jun 2010 - 9:53 am | भडकमकर मास्तर
मस्त फोटो...
पहिला फोटो अप्रतिम...
दगडाचा मूळ रंग शिल्लक ठेवल्याबद्दल देवस्थानाला धन्यवाद...
अवांतर : कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराला दगडी मंदिराला कळसाच्या बाजूला पिवळा की गुलाबी असा रंग देऊन सौन्दर्य वाढवायचे (!) काम केले आहे, माझा एक आर्किटेक्ट मित्र या सौन्दर्यदृष्टीला उद्वेगाने भयानक शिव्या घालतो...
2 Jun 2010 - 11:12 am | Manoj Katwe
http://maps.google.com/maps?f=q&source=s_q&hl=en&geocode=&q=bhuleshwar&s...
इथे आहे हे.
2 Jun 2010 - 2:19 pm | मेघवेडा
मस्तच आहेत फोटो!! :) काय थंडगार वातावरण असेल देवळाच्या आत!! व्वा!!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
2 Jun 2010 - 2:34 pm | डावखुरा
पुढ्च्या वेळी पुण्यास आलो की एक दिवस भुलेश्वर साठीच.. फोटोनी भुरळ पाडली...
(बाकी शिल्पा आणि भड्कम्कर मास्तराण्शी सहमत..) ----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
2 Jun 2010 - 2:36 pm | डावखुरा
पुढ्च्या वेळी पुण्यास आलो की एक दिवस भुलेश्वर साठीच.. फोटोनी भुरळ पाडली...
(बाकी शिल्पा आणि भड्कम्कर मास्तराण्शी सहमत..) ----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
3 Jun 2010 - 12:15 am | प्रियाली
भुलेश्वरचे फोटो अनेकदा पाहिलेले असले तरी प्रत्येकवेळेस सारखीच भूल पडते.
ध्रुवनेही मागे अतिशय सुंदर फोटो काढले होते. त्यातील एक फोटो उपक्रम दिवाळी अंक २००८च्या मुखपृष्ठावर होता.
वर या धाग्यातही तो फोटो आहेच. :)
3 Jun 2010 - 8:37 am | भाग्यश्री
सर्व फोटोज छान !! या ठिकाणाला भेट द्यायचीच असे ठरवून टाकले आहे आता..
भुलेश्वर म्हटल्यावर ध्रुवचेच फोटो आठवले !!
3 Jun 2010 - 12:35 am | फास्टरफेणे
या देवळातलं कोरीव काम केवळ "अशक्य" आहे.
देवळाचा बाहेरुन फोटो - हे बांधकाम अलीकडील काळातलं वाटतं.

आणि हा बोनस फोटो, टेकडी उतरुन निघालो आणि ही मंडळी समोर आली!

3 Jun 2010 - 1:09 am | शिल्पा ब
धनगरांचा फोटो तर मस्तच...मोठ्या आकाशाच्या background वर दोन धनगर आणि त्यांची मेंढरं ... :-)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
3 Jun 2010 - 12:38 am | टारझन
इकडे कुठे लज्जागौरी छाप चित्र पहायला भेटतील का ? ;)
- यंगुत्सु
3 Jun 2010 - 12:45 am | अरुंधती
सु रे ख फोटोज....
मनाने त्या मंदिरात जाऊन आले. :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
3 Jun 2010 - 1:00 am | मुक्तसुनीत
अतिशय सुरेख फोटो ! उत्तम धागा.
3 Jun 2010 - 5:17 pm | स्वाती२
सुरेख!
10 Jun 2010 - 11:06 pm | लॉरी टांगटूंगकर
फार मस्त आहेत फोटो.वेड!!!!!!!!!!!!!!!!!नक्की जायीन