http://www.misalpav.com/node/12428
http://www.misalpav.com/node/12361
http://www.misalpav.com/node/12278
http://www.misalpav.com/node/12189
http://www.misalpav.com/node/12151
http://www.misalpav.com/node/12096
http://www.misalpav.com/node/12057
http://www.misalpav.com/node/12037
आता इथपर्यंत म्युच्युअल फंड बद्दल माहिती दिल्यानंतर म्युच्युअल फंड मधे गुंतवणूक कशी करावी?
अर्थात एकदम पैसे गुंतवण्याच्या धोक्यापासून वाचण्यासाठी एस आय पी करा. एस आय पी म्हणजे नक्की काय? तर एस आय पी म्हणजे सिस्टेमॅटिक इन्वेस्ट्मेंट प्लॅन.
म्हणजेच गुंतवणूकीचा अभिषेक किंवा सतत धार. आपल्याला जेवढे पैसे म्युच्युअल फंडमधे गुंतवायचे असतील तेवढे एकदम न गुंतवता त्याचे छोटे भाग करून समजा दहा भाग करून वेगवेगळ्या दिवशी पैसे गुंतवणे.
सर्व गुंतवणूकीचे मान्यवर सल्लागार, असाच सल्ला देतील की इवीटी म्युच्युअल फंड पासून चांगला नफा मिळवायचा असेल तर सर्व वेळी खरा उतरलेला व हमखास उपाय म्हणजे एस आय पी.
ज्यावेळी शेअर मार्केटचा चढ वरचा असेल त्यावेळी तर हे अक्षरशः खरे आहे कारण नुकसानीच्या सौद्यात कोणीही पैसे घालणार नाही.
सध्या चालू असलेले युरोपियन आर्थिक संकटाने भिती वाटेल व तुमची चालू असलेली एस आय पी बंद करावी असेही वाटेल!
पण माझे म्हणणे आहे तसे करू नका!
या वर्षीच्या सुरवातीपासून ५० शेअर्स असलेला निफ्टी ५०० अंकानी खाली पहिल्या ५ आठवड्यात गेला. (म्हणजे ५२०० ते ४७००) पण परत पुढच्या दोन महिन्यात ६५० अंकानी वाढला तर मागच्या ४ आठवड्यात परत ३५० अंकानी घसरला. या सर्व चढ उतारावर मात करण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे एस आय पी.
एस आय पी चा वापर कुठल्याही गुंतवणूकीसाठी करता येइल. विशेषतः शेअर्स खरेदी करण्यासाठी!
उदा. केर्न इंडिया ३०० रुपयाला २० शेअर्स घेतले व शेअर्सचा भाव खाली गेला तर २० शेअर्स कमी भावात घ्या. वगैरे.
ज्या काळाचा आपण विचार केला त्या काळात चेक लिहून पैसे गुंतवायचे असते तर एखादे वेळेस भिती वाटली असती व पैसे गुंतवलेच गेले नसते. पण एस आय पी मधे आपोआप गुंतवणूक होते. कारण पहिल्या हप्त्याचा चेक देऊन पुढे बँकेतून आपोआप वजा होत जातात किंवा पुढच्या तारखेचे चेक अगोदरच दिले गेलेले असतात.
म्हणून कधीही एस आय पी पध्दतीने पैसे गुंतवणे हा एक उत्तम मार्ग असून त्यायोगे पैसे गुंतवल्यास आपण शेअर बाजारापासून (ज्यात चांगला नफा होउ शकतो) दूर राहणार नाही.
जाणकार असे सांगतात की भारतीय शेअर बाजाराला खूप चांगले दिवस येणार आहेत व त्या चढावात भाग घ्यायचा असेल तर एस आय पी एक उत्तम मार्ग आहे.
एक शेवटची सुचना: आपण केलेल्या गुंतवणूकीवर सतत लक्ष ठेवा व वेळोवेळी नफा पदरात घ्या.
एक लक्षात घ्या गुंतवणूक म्हणजे मुद्दलावरील मिळकत! व मिळकतीवर मिळकत!
तेव्हा आपल्या मिळकतीवर सतत लक्ष ठेवायला हवे नाही का!
म्युच्युअल फंड - एस आय पी
गाभा:
प्रतिक्रिया
27 May 2010 - 11:30 am | दीपक साकुरे
खुपच छान माहिती आहे.
एक विनन्ती आहे कि जर तुम्हाला technical charts बद्दल माहिती असेल तर मला ती लिन्क द्या. थोडा अभ्यास करायची इछ्छा आहे.
27 May 2010 - 3:17 pm | हवालदार
http://stockcharts.com/school/doku.php?id=chart_school
आणि हे ही ल़क्शात ठेवा. :-)
trend is your friend
27 May 2010 - 1:54 pm | प्रकाश घाटपांडे
नॉन सिस्टिमॅटिक इन्व्हेसमेंट प्लॅन असतात का? म्हणजे ज्यांचा इनकम रेग्युलर नाही त्यांना त्यांच्या आवका प्रमाणे करता येतील. इंदिरा विकास पत्र हा चांगले गुंतवणीकीचे साधन होते. आता ते बंद झाले. त्याल पर्याय काय?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
28 May 2010 - 9:22 am | सुखदा राव
मला वाटत, ज्यान्चे इन्कम रेग्युलर नाही, त्यानी डायरेक्ट मार्केट मध्ये पैसे टाकलेले बरे. आर.बी.आय. चे बॉन्ड्स हा १ चान्गला ऑप्शन आहे. शेअर मार्केट प्रमाणे कमॉडीटी मार्केटही चान्गलेच. ज्यान्चा व्यवसाय असतो त्यान्च्यासाठी तर नक्किच कारण इथे पैसाही जरा जास्त लागतो. फक्त अभ्यास हवा, नाही तर पैसा जातोही पटकन.