म्युच्युअल फंड भाग ५

शेखर जोग's picture
शेखर जोग in काथ्याकूट
11 May 2010 - 1:00 pm
गाभा: 

http://www.misalpav.com/node/12189

http://www.misalpav.com/node/12151

http://www.misalpav.com/node/12096

http://www.misalpav.com/node/12057

http://www.misalpav.com/node/12037

आता इथपर्यंत सर्वप्रकारच्या म्युच्युअल फंड्सची तोंड ओळख झाल्यानंतर मी म्युच्युअल फंड हाऊसेस बद्दल सांगतो. तसे जवळजवळ ३६ म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत. पण सर्वच्या सर्व म्युच्युअल फंड हाऊसेसबद्दल सांगणे शक्य नसल्याने काही महत्वाच्या हाऊसेसबद्दल सांगतो. हे म्युच्युअल फंड हाऊसेस किंवा अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्या काही चांगले म्युच्युअल फंड्स चालवतात. अर्थात यांची नावे देताना हे लक्षात घ्यावे की मी यातील कुठ्ल्याही हाऊसेसच्या फंडमधे पैसे गुंतवण्यासाठी सल्ला देत नाही तर या फंड हाऊसेसमधील काही फंडहाऊसेसच्या काही म्युच्युअल फंडात मी वैयक्तिकरित्या पैसे गुंतवतो.(ज्याने त्याने स्वतः अभ्यास करून व विचार करून पैसे गुंतवावेत)
१. बिर्ला सनलाइफ अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड: बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडाचे हे फंड मॅनेजर्स असून आदित्य बिर्ला ग्रुप व सन लाईफ फिनाशियल सर्विसेस कॅनडा यांचा सुंयुक्त प्रकल्प आहे. साधारण ६४ एक्विटी स्किम्स, ११६ डेट स्किम्स, १८ छोट्या अवधिच्या डेट स्किम व १० डेट्/इक्वीटी स्किमस चालवतात. सर्व फंड्सची मिळून एकूण गुंतवणूक किंवा ज्याला आपण कॉरपस म्हणू तो आहे साधारणतः रु. ४९९८३ कोटी.
२.डी एस पी ब्लॅकरॉक इन्वेस्टमेंट मॅनेजर्स प्राइव्हेट लिमिटेड. : हे .डी एस पी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडचे मॅनेजर असून २६ इक्वीटी, ४४ डेट स्किम्स व ६ छोट्या अवधिच्या डेट स्किम्स चालवतात. व साधारणतः १८८७२ कोटी रुपयांचे अ‍ॅसेट्स सांभाळतात.
३.फिडेलिटी फंड मॅनेजमेंट प्राइव्हेट लिमिटेड: हे सुमारे ४० वर्षे अमेरिकासोडून जगातल्या इतर मार्केटमधे काम करतात. पीटर लिंच हा त्यांचा एक प्रसिध्द फंड मॅनेजर होता. १२ एक्वीटी स्किम्स, १५ डेट स्किम्स व १२ छोट्या अवधिच्या डेट स्किम्स हे चालवतात व सुमारे ७५५० कोटी रुपयांचे अ‍ॅसेट्स सांभाळतात.
४. फ्रॅन्कलिन टेंम्प्लेट्न अ‍ॅसेट मॅनेजमेंट(इंडिया) प्राइव्हेट लिमिटेड : ही टेम्प्लेटन ग्रुपची कंपनी असून ही जगातली सर्वात मोठ्या अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यापैकी एक आहे. त्याना या क्षेत्रात ५० वर्षाचा अनुभव असून २३ देशात एकूण ३४ ऑफीसेस आहेत. ३५ एक्वीटी, ९५ डेट व १५ छोट्या अवधिच्या स्किम्स हे सांभाळतात.
५.एच डी एफ सी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड :ही एच डी एफ सी या प्रसिध्द अशा घरासाठी लोन देणार्‍या कंपनीच्या ग्रुपमधली कंपनी आहे. ३१ एक्वीटी स्किम्स, १३७ डेट स्किमस, १४ छोट्या अवधिच्या डेट स्किम्स तसेच ६ डेट/एक्वीटी स्किम्स चालवतात. यांच्याकडे असलेल्या अ‍ॅसेटची किंगत साधारण ७२५१५ कोटी रुपये एवढी आहे.
६. आय सी आय सी आय प्रुडेंशियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड : ही एक मोठी बँक आय सीआय सी आय व इंग्लंडच्या सर्वात मोठ्या फिनानशियल कंपनी प्रुडेंटशियल यांचा संयुक्त प्रकल्पाची कंपनी आहे. ही भारतातली सर्वात मोठ्या कंपन्यापैकी एक अशी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे व ते ५४३२१ कोटी रुपयांचे अ‍ॅसेट्स सांभाळतात. भारतात एकूण २६५ शहरात त्यांचे अस्तित्व आहे. ५७ एक्वीटी स्किम्स, २१९ डेट स्किम्स, २३ छोट्या अवधिच्या स्किम्स तर ४ डेट/एक्विटी स्किम्स ही कंपनी सांभाळते.
७.रिलायंन्स कॅपिटल अ‍ॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड :रिलांयन्स कॅपिटल लिमिटेड ही कंपनी या कंपनीची सर्वात मोठी भागीदार असून फार थोड्या काळात चांगलीच नावारूपाला आलेली आहे. ७७ एक्वीटी स्किम्स, १२० डेट स्किम्स, १९ छोट्या अवधिच्या स्किम्स, २ डेट/एक्विटी स्किम्स यांच्याकडे आहेत. यांच्याकडे असणार्‍या अ‍ॅसेटची किंमत सुमारे ९७७४६ कोटी रुपये एवढी होईल.
८.एस बी आय फंड्स मॅनेजमेंट प्राइव्हेट लिमिटेड :भारतीय स्टेट बँक या भारतातील सर्वात मोठ्या बँकेने या कंपनीची सुरवात केली व आता चांगलीच नावारूपाला आली आहे. एकंदरीत ३४ एक्वीटी स्किम्स, ६१ डेट स्किम्स, ९ छोट्या अवधिच्या डेट स्किम्स तर ५ डेट/इक्वीटी स्किम्स ही कंपनी चालवते. यांच्याकडे असलेल्या अ‍ॅसेटची किंमत साधारण ३५७५७ कोटी रुपये आहे.
९. सुंदरम बीएनपी पारीबा अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड :ही सुंदरम फिनान्स लिमिटेड या कंपनीची स्बसिडिअरी आहे. ३३ एक्वीटी स्किम्स, ९८ डेट स्किम्स, १३ छोट्या अवधिच्या डेट स्किम यांच्याकडे आहेत. अ‍ॅसेटची किंमत साधारण १६६४७ कोटी रुपये.
१०.युटीआय अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड : युटीआय म्युच्युअल फंडचे बहुतेक सर्व फंडस यांच्याकडे सुपुर्त करण्या आले असून तेव्हापासून बरीच नावारुपाला आलेली आहे.५७ एक्वीटी स्किम्सस, ११४ डेट स्किम्स, १३ छोट्या अवधिच्या डेट स्किम्स व ८ डेट/एक्वीटी स्किम्स चालवतात.

यात दिलेल्या आकडेवारीत एखादवेळेस फेरबदल असू शकतो(चूक भूल द्यावी घ्यावी) पण महत्वाचा मुद्दा हा की या सर्व अ‍ॅसेट मॅनेजमँट कंपन्या काही नावाजलेले म्युच्युअल फंड्स चालवतात. व त्यात पैसे गुंतवून आपण फायदा करून घेऊ शकतो.

क्रमश:

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

11 May 2010 - 7:18 pm | मदनबाण

वाचतोय जोग साहेब,,, गोल्ड फंड बद्धल काही माहिती मिळाली तर नक्कीच आवडेल.

मदनबाण.....

देशात जातीनिहाय जनगणना व्हावी -रामदास आठवले
http://bit.ly/aP8kZG
मला पडलेला प्रश्नः--- मुंबईत जर भय्या लोकांची संख्या जास्त आढळली तर मराठी लोकांना आरक्षण मिळणार का ?