म्युच्युअल फंड भाग ५

शेखर जोग's picture
शेखर जोग in काथ्याकूट
4 May 2010 - 3:05 pm
गाभा: 

http://www.misalpav.com/node/12151

http://www.misalpav.com/node/12096

http://www.misalpav.com/node/12057

http://www.misalpav.com/node/12037

आता इथपर्यंत बहुतेक महत्वाच्या म्युच्युअल फंडांची ओळख झाल्यानंतर मी जरा आता काही बारकाव्यात शिरण्याचा प्रयत्न करतो.
इवीटी फंडमधे असेही काही फंड आहेत की जे ठराविकच कंपन्याच्या शेअर्स मधे पैसे गुंतवतात.
उदा. बँकिंग फंड, जे मुख्यतः बँका व महत्वाच्या फायनान्स कंपन्यांच्या शेअर्समधे गुंतवणूक करतात. आय टी सेक्टर फंड, जे फंड्स तंत्रज्ञानातील कंपन्यांच्या शेअर्समधे पैसे गुंतवतात.
अशा प्रकारच्या फंड्सना सेक्टर फंडस म्हणतात. अशा प्रकारच्या सेक्टर फंडमधे गुंतवणूक अगदी काळजीपूर्वकच करावी.
कारण ज्यावेळी आपण सेक्टर फंडमधे गुंतवणूक करू त्यावेळी त्याच्याशी निगडीत असलेल्या सेक्टरमधील कंपन्या चांगल्या नफ्यात असायला हव्यात एवढच नव्हे तर त्यांचा नफा येत्या काही वर्षात चांगल्या रितीने वाढायला हवा. याचा अभ्यास करण्याची गरज आहे. नाहीतर या कंपन्याना सध्या नफा असेल पण पैसे गुंतवल्यानंतर जर काही सरकारी धोरणात बदल झाला व या कंपन्यांचा नफा काही कारणाने कमी झाला, तर गुंतवलेले पैसे जरा अधिक काळासाठी अडकण्याची शक्यता असते.(अर्थात नुकसान करून घेउन बाहेर पडू शकतो पण कशाला!)
तसेच इक्वीटी फंड्समधे आणखी एक वेगळा प्रकारही करता येइल,
तो म्हणजे लार्ज कॅप फंड्समिडकॅप/स्मॉलकॅप फंड.
आता हे जरी अगम्य वाटले तरी त्यात भिऊन जाण्याचे कारण नाही.
लार्ज कॅप फंड म्हणजे तो फंड जो फक्त मोठ्या कंपन्यात पैसे गुंतवतो. तसेच मिडकॅप/स्मॉलकॅप फंड म्हणजे तो फंड जो मध्यम व छोट्या कंपन्यात पैसे गुंतवतो. अर्थात ही वर्गवारी अगदीच जिकीरेने सांभाळलेली नसते.
बहुतेक फंड्स मोठ्या व छोट्या कंपन्याचे काही ठराविक प्रमाण ठरवून त्याप्रमाणे त्या कंपन्यांच्या शेअर्समधे पैसे गुंतवतात. उदा. काही फंड्स २०% मध्यम/छोट्या कंपन्यात व ८०% मोठ्या कंपन्यात तर काही फंड्स ८०% मध्यम/छोट्या कंपन्यात तर २०% मोठ्या कंपन्यात.
असे पाहण्यात आले आहे की जो फंड मोठ्या कंपन्याच्या शेअर्समधे पैसे गुंतवतो त्या फंडची एन ए व्ही जो फंड मध्यम/छोट्या कंपन्यात पैसे गुंतवतो त्यापेक्षा कमी प्रमाणात वर खाली होते व हे लार्ज कॅप फंड्स सुरवातीला चांगला नफा करून देतात.
याचे कारण असे की बाजाराच्या चढत्या काळात सुरवातीला मोठ्या कंपन्याचे भाव अगोदर वर जातात व नंतर मध्यम/छोट्या कंपन्याचे.
तसेच मोठ्या कंपन्याच्या शेअर्सच्या भावात मध्यम/छोट्या कंपन्याच्या शेअर्सच्या मानाने चढ उतार कमी असतो.
नफ्याचेही प्रमाण लार्ज कॅप फंडसच्यापेक्षा मिड/स्मॉल कॅप फंड्मधे जास्त असते.
मिड/स्मॉल कॅप फंड्मधे जर पैसे गुंतवायचे असतील तर गुंतवणूकीचा कालावधी अधिक लांब म्हणजे साधारण तीन ते पाच वर्षेपर्यंतचा हवा म्हणजे नफा बर्‍या प्रमाणात मिळू शकेल. पण तसे नसेल तर लार्ज कॅपमधे पैसे गुंतवणे अधिक सोयीस्कर.
अर्थात कुठे पैसे गुंतवायचे हे शेअर बाजार किती व कसा वर गेला आहे यावरून ठरवता येते. पण एवढी मगजमारी करण्यापेक्षा सरळ डायव्हर्सीफाइड फंडमधे(जो फंड सर्व प्रकारच्या कंपन्यात पैसे गुंतवतो) पैसे गुंतवणे चांगले नाही का!
येथपर्यंत आल्यानंतर पुढील भागात मी काही ठराविक फंड्स हाउसेसबद्दल, त्यांच्या काही स्कीम्स(म्युच्युअल फंड्स)बद्दल सांगेन. अर्थात हे सांगताना मला एवढच सांगायचे आहेत की हा सल्ला नाही तर मला आवडणारे काही फंडस् आहेत. पैसे गुंतवताना स्वत्:ची गरज व अभ्यास करून पैसे गुंतवावेत. (हो! दुसर्‍याच्या डोक्यावर खापर नको)

क्रमशः

प्रतिक्रिया

सुधीर१३७'s picture

4 May 2010 - 5:46 pm | सुधीर१३७

छान माहिती देताय.........................असेच चालू ठेवा........................ :)