अंगाई

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
18 May 2010 - 9:43 am

प्रेरणा
{जगातल्या सगळ्या आया आणि त्यांच्या लेकरांची माफी मागून}

अलिकडे निंबोणीचे झाड राहिलेच नाही
चंद्र वेडा मोबाइलच्या टॉवरमागे झोपी जाई!

गाय पदपथावर, चिमणीला घरटे नाही
परस ना वेली, कुठे झोपतील जाई-जुई?
शाकीरा, मॅडोना, जॅक्सन यांनी गिळली अंगाई!

देवकी, यशोदा नाही, आई हवी पैसेवाली
हट्ट पुरविता तिची झोळी रिकामीही झाली!
नको रडगाणे, हवी जाहिरातीमधली आई!

भयानकहास्यकरुणविडंबन

प्रतिक्रिया

दत्ता काळे's picture

18 May 2010 - 10:22 am | दत्ता काळे

शाकीरा, मॅडोना, जॅक्सन यांनी गिळली अंगाई!
- नुस्ती अंगाई नाही तर . . . यांनी गिळली तरुणाई.

देवकी, यशोदा नाही, आई हवी पैसेवाली
- हे बरीक खरं हो !

राजेश घासकडवी's picture

18 May 2010 - 12:34 pm | राजेश घासकडवी

तुमच्या लेखणीतून समर्थ काव्याची अपेक्षा असते. मूळ प्रस्थापित संदर्भांनाच उजाळा देणारी कविता पाहून निराशा झाली. लिंबोणीचं झाड ज्या क्रांतीतून उन्मळून पडलं तीतून नवनिर्माण काहीच झालं नाही का? नवीन अर्थ सापडले नाहीत तर विसर्जनासाठी गर्त का शोधू नये?

sur_nair's picture

18 May 2010 - 7:16 pm | sur_nair

राजेशजींच्या मताशी सहमत. हे compliment च समजा. राग नसावा. तुमच्याकडून आमच्या अपेक्षा मोठ्या आहेत एवढेच सुचवायचे आहे.