जावा तिकडे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
17 May 2010 - 11:58 pm

जावा तिकडे

उं.. जावा तिकडे
मी नाही येत, तुम्ही ना गडे
सोडा मला आता, जवळ कशाला ओढता
तुम्ही गडे ||धृ||

शौकिन तुम्ही हे आसलं,
नाही म्हणत नाही कधी
हौस जीवाची करता,
सोडत नाही एकही संधी
अंहं... हात नका धरू,
होवू नका सुरू,
जावा तिकडे ||

सोडा मला आता, जवळ कशाला ओढता
तुम्ही गडे ||१||

परवा तुम्ही आणली साडी,
त्यासाठी करावी लागली लाडीगोडी
आजच नेसूनी दाखवते तुम्हां,
कोर्‍या साडीची मोडूनी घडी
दिसते कशी सांगा तुम्ही
येते मी तुमच्या पुढे ||

आतातरी सोडा मला,
जवळ कशाला ओढता
तुम्ही गडे ||२||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१६/०५/२०१०

शृंगारप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

18 May 2010 - 12:13 am | मदनबाण

दफोराव अंमळ पेटलेले दिसतायतं... ;)
कविता आवडली...

मदनबाण.....

“control oil and you control nations; control food and you control the people”.
Henry Kissinger

टारझन's picture

18 May 2010 - 12:48 am | टारझन

कांद्याची चटणी होती काय आज आहारात ? अंमळ त्यातही वरुन कांदा घातलेला दिसतोय ;)

- (डॉटनेट इकडे) कांदाराम लसणे

पाषाणभेद's picture

18 May 2010 - 1:00 am | पाषाणभेद

'कांदे नवमी' होती की आज. तुम्ही नाही का साजरी केली?

:-)
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

विकास's picture

18 May 2010 - 12:50 am | विकास

अशा काव्याने, "पत्थर के सनम" असलेल्याचा देखील "पाषाणभेद" होऊ शकेल ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

शुचि's picture

18 May 2010 - 12:59 am | शुचि

लई भारी :)
एक भयानक कोटी करण्याचा मोह होतोय .... जाऊ दे .

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पाषाणभेद's picture

18 May 2010 - 1:25 am | पाषाणभेद

शु..शु.. जावा तिकडे
नका कोटी सांगू
इथे तुम्ही गडे
दुसर्‍यांच्याही कल्पनाशक्तीला वाव
त्यामुळे मिळेल गडे

----------------------------------
अय्या गडे, ईश्श गडे
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

अरुण मनोहर's picture

18 May 2010 - 1:41 am | अरुण मनोहर

झकास लावणी. पण म्युजीक कुठे आहे राव? म्युट् का बरं केलेय ?