प्राजूची स्पर्शून तारकांना.. वाचली आणि आता कवितासंग्रह वगैरे प्रसिद्ध होणार्या कवयित्रीला फक्त 'छान आहे', 'आवडली' एवढाच प्रतिसाद कसा द्यायचा बुवा, अशा भिडेखातर मग आमच्या नेहेमीच्या श्टाईलमधे हा प्रतिसाद ;)
निजवून बारक्यांना आवरु जरा पसारा
कंपीत जांभया अन जळ्ळा तुझा इशारा!!!
घामात नाहलेली, चिकटून जात बंडी
घेतो पुन्हा पुसूनी, हा गोलसा नगारा
उंडारलो असा की, काया विशाल झाली
व्यायाम सोडला अन, देहावरी फुलोरा
सॅलडमधून आली, भलतीच खाद्य वेला
अवरुद्ध श्वास माझे आणि तुझा गुबारा..
गाण्यात का तुझ्या रे, वर्षाव हा 'हिम्या'चा
हटकून रोज देई गर्दभ खडा पहारा
काव्यास या कधीचे, भलते उधाण आले
'रंगा' विडंबनाने, केलास घोळ सारा!!
चतुरंग
प्रतिक्रिया
27 Apr 2010 - 1:26 am | प्रभो
आयचा घो....जबराट....
___/\___
*तुमच्या विडंबनांचा एक संग्रह प्रकाशीत करावा म्हणतोय..., काय म्हणता रंगाशेठ?? :)
27 Apr 2010 - 1:49 am | राजेश घासकडवी
तुमच्या लेखणीला काही हाड?
वास्तवाच्या स्फोटाने स्वप्नमय जगाचं नाजूक बिलोरी विश्व उध्वस्त करायला लाज नाही वाटत? ही घ्या तुमच्यासाठी रागावलेली स्मायली...X(
(ओझेवाहू) राजेश
27 Apr 2010 - 1:51 am | प्राजु
गाण्यात का तुझ्या रे, वर्षाव हा 'हिम्या'चा
हटकून रोज देई गर्दभ खडा पहारा
अशक्य आहात!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
28 Apr 2010 - 4:32 pm | राघव
अस्सेच म्हणतो अगदी!
अशक्य आहात!! :)
_/\_
राघव
27 Apr 2010 - 2:15 am | बेसनलाडू
लई भारी!
(सशक्त)बेसनलाडू
27 Apr 2010 - 3:55 am | प्रियाली
लय भारी!!! :)
पुढील काही विडंबनांसाठी चारा
27 Apr 2010 - 5:35 am | राजेश घासकडवी
'वाटून तारकांना' नेही एक वेगळंच वळण येऊ शकेल...
27 Apr 2010 - 5:33 am | सुचेल तसं
१ नंबर!!!
27 Apr 2010 - 6:00 am | सन्जोप राव
घामात बुडालेले जबरी विडंबन.....
सन्जोप राव
किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है
जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है
27 Apr 2010 - 6:29 am | sur_nair
काय लिवलंय. लई भारी
27 Apr 2010 - 7:16 am | मस्त कलंदर
उंडारलो असा की, काया विशाल झाली
व्यायाम सोडला अन, देहावरी फुलोरा
व्वा व्वा!!! आत्मशोध माहित नाही.. पण देहशोध चांगलाच झालेला दिसतोय... :) थोडा आवरता घ्या हो.. नाहीतर सॅलड हेच कायमचे अन्न होऊन बसेल... बाकी, यावरून 'उदयोन्मुख' फुलोर्यांनी प्रेरणा घ्यायला हरकत नाही!!! :P
काव्यास या कधीचे, भलते उधाण आले
'रंगा' विडंबनाने, केलास घोळ सारा!!
कैच्या कैच!!! घोळ कसला यात???? मस्त उधाण आलेय...
(अवांतर : हा आज उघडलेला मिपावरचा पहिला नोड... मन कसं मस्त प्रसन्न झालं :) )
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
27 Apr 2010 - 7:47 am | विसोबा खेचर
मस्त! :)
27 Apr 2010 - 8:07 am | निरन्जन वहालेकर
जबाब नही ! भन्नाट ! !
27 Apr 2010 - 10:50 am | रानी १३
खल्लास !!!!!! :) :):)...काय लिवलै राव तुम्हि...............
27 Apr 2010 - 2:17 pm | आंबोळी
रंगाशेठ....
जबरदस्त!!!
( ™ )आंबोळी
27 Apr 2010 - 10:14 pm | सुधीर काळे
झकास. विडंबन खूप आवडले. आता मूळ कविता वाचेन.
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9
28 Apr 2010 - 12:20 am | डावखुरा
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
(गालावरुन काय फिरवावे बरं??????)
(आपल्या प्रतिभेचे वारु चोखुर उधळ्लेत चतुरंग राव......................हहपुवा)
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
28 Apr 2010 - 9:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निजवून बारक्यांना आवरु जरा पसारा
कंपीत जांभया अन जळ्ळा तुझा इशारा!!!
लै भारी......! :)
-दिलीप बिरुटे
28 Apr 2010 - 12:18 pm | तिमा
उत्तम विडंबन जमणे ही सुध्दा एक कला आहे.
येऊ द्या अजून!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
28 Apr 2010 - 7:19 pm | भोचक
रंगाशेठ जोरात आहेत. मूळ उत्तम कवितेचे तितकेच उत्तम विडंबन. चांगल्या विडंबनासाठी उत्तम कवितेचाच आधार व्हावा हे याने सिद्ध व्हावे.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव