सद्धगुरु च्या शोधात भाग ३ सन १९२० सालची दुर्लभ पदे.

संजीव नाईक's picture
संजीव नाईक in काथ्याकूट
24 Mar 2008 - 12:56 pm
गाभा: 

भाग ३ ...

माझ्या सारख्या पारमार्थिक सेवकाला असे वाटते ही भगवान विष्णू यांनी प्रत्येक युगात सत्प्रवृत्तीचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळे रुपाने अवतार घेतले. आजच्या घडीला जर विचार केला तर मनःचक्षुसमोर उभे राहातात ते भगवान " दत्तात्रेय " ( ब्रह्मा निष्णू महेश ) उत्पत्ती, स्थिती, लय, या तिन्ही दैवी शक्तींनी अनसूया माता व अत्री पिता यांच्या ठिकाणी दत्तात्रेय या नावाने अविनाशी अवतार धारण करुन " जे का रंजले गाजलें, त्यासी म्हणे जो आपुले" अशा प्रकारे लोकाचे कल्याण करुन आपल्या अवताराची समाप्ती न करता अमाजापादून काही काळ दूर राहाण्याच्या दृष्टीने ते गिरनार पर्वतावर गुप्त झाले. पुन्हा काही कालावधीनंतर " श्रीपाद श्रीवल्लभ" नावाने अवतार धारण करुन स्वतःमात्यापित्याना मी दत्तात्रेय अविनाश चैतन्यरुप आहे हे दाखवून जनकल्याणार्थ तीर्थयातत्रेस गेले. काही काळानंतर भगवान दत्तात्रेयांनी "श्री नृसिंह सरस्वती" या नावाने अवतार घेऊन जनकल्याण करुन श्री क्षेत्र गाणगापूर येथे निगुन पादुकांची आपली खूण सर्वाना साक्षीस ठेऊन शैल्य पर्वताकडे तपश्चर्येसाठी गेले.

यानंतर मात्र बर्‍याच कालावधीनंतर श्री समर्थाचे आगमन कर्दळी वनातून झाले. अजानबाहू सगुन मुर्ती अनेक ठिकाणी भ्रमण करीत अक्कलकोटास स्थिरावली व श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज म्हणून लोकांत प्रसिध्दी झाली. श्री स्वामी समर्थ कोठेही असले तरीही ते मनोवेगाने जात येत असत. यांचे अनेक चमत्कार, अनेक लीला. एक ठिकाणी गुप्त होणे, दुसर्‍या ठिकाणी प्रगट होणे, दर्शनाला येणार्‍या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होणे अशाप्रकारे समाजामध्ये सत्प्रवृत्ती निर्माण होण्याच्या दृष्टीने कार्य केले. आणि याचमुळे श्री स्वामी समर्थ भगवान दत्तात्रेयांचेच अवतार आहेत हे त्या काळच्या मंडळींना भावले. श्री स्वामी समर्थंकडे अनेक प्रकारची मंडळी त्यामध्ये राव रंक सुध्दा त्यांच्या दर्शनाला येत असत. त्याही सर्वांना योग ते मार्गदर्शन श्री स्वामी समर्थ करत असत.

श्री स्वामी समर्थाच्या पूर्वीचे भगवान दत्तात्रेयांचे अवतार म्हणजे श्री. श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री. नृसिंह सरस्वती. यांनाही त्या त्या काळात सर्वाचे भले केले. अविवेकी मंडळींना आपल्या तपोबलाने सन्मार्गाकडे वळविले. आज मात्र विशेषतः गुरुशिष्य परंपरा पाहायला अनुभवायला मिळेल ती समर्थ अक्कलकोट स्वामी महाराजांचीच.

श्री स्वामींचे बरेच शिष्य होते. त्यांनी स्वामींच्या सान्निध्यात राहून स्वामी संप्रदाय निर्माण केला. इतर अवतारापेक्षाही भगवान दत्तात्रेयाचा अवतार हा चिंरजीव असून ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिगुणात्मक दैवी शक्ती पुर्णत्वाने शाश्र्वत रुपाने अविनाशी आहेत. आणि म्हणून भगवान दत्तात्रेयांच्यापासून सुरु झालेली ही गुरुशिष्य पंरपरा स्वामी समर्थाच्या काळात मोठ्या प्रमाणात वृध्दिंगत झाली आणि ती आजही कार्यरत आहे. आणि ती पुढेही कार्यरत असणार..

माझ्या प्रस्तावनाचे वाचन करताना कटांळा येऊने म्हणून मध्ये मध्ये काही दुर्लभ गोष्टी माहीती देत आहे......

त्यातील एक पद. ( सध्द्गरुना स्नान घालताना किंवा सध्द्गरु च्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद )

चला न्हाणुं त्या गुरुराया || वेदादिक ही स्तविति ब्रम्ह तें सगुण होइ जग ताराया ||धृ||

रत्नखचित चौरंगि बसूवुं या || तैल सुवासिक शिरिं घालूं या | उटणिं अत्तरें अंगिं मर्दूया ||

करुं सेवा प्रभु सुखवाया ||१|| उष्ण सुगंधित जल गंगेचें || घालुनि चोळू अंग प्रभुचें ||

निर्मळ करुनी पुसुं या साचें || चरणिं पादुका लेववुं या ||२|| सुवर्णसूत्रहि कटिला विलसें ||

कौपिन छाटी भगवी नेसे || भरजरि शेला पांघरलासे || ध्यान ठ्सो दिनदासीं या ||३||

( सध्द्गरु सिंहासनारोह अथवा पादुका आसनारोहण, भस्मधारण इ...)

रत्नजडित सिंहासन || मृदु सुंदर वरि आसन || त्यावरि देदीप्यमान || स्वामी शोभला ||१||

षडरींतें करुनि भस्म || चर्चियलें अंगिं भस्म || निर्विकार पूर्ण ब्रम्ह || स्वामि शोभला ||२||

संध्या संदेह-हारि || यज्ञोपवितासि धरि || भक्त्-जनांस्तव आचरि || कर्ममार्गहा ||३||

वरिल सर्व पदे आमच्या कडे सन १९२० साला पासून आहेत.
संजिव ( स्वामी भक्त )

क्रमष भाग ४ था पुढल्या भागात

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Mar 2008 - 7:49 pm | llपुण्याचे पेशवेll

'भिऊ नकोस मी तुस्या पाठीशी आहे' असे सांगणारे आणि भक्तरक्षणार्थ धाऊन जाणारे स्वामी समर्थ मनोवेगाने भक्तरक्षणार्थ धाव घेतात. यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

समर्थ रामदास स्वामी म्हणतात
'सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा |
उडी घालितो संकटी स्वामी तैसा|
अनन्यास रक्षितसे चापपाणी|
नुपेक्षि कदा राम भक्ताभिमानी||'

जय जय रघुवीर समर्थ||

पुण्याचे पेशवे

संजीव नाईक's picture

24 Mar 2008 - 9:32 pm | संजीव नाईक

पुण्याचे पेशवे..
श्रीमान राजाधिराज
आपणास स्वामी ची पदे कसी वाटली ते कळवले नाहीत कृपया उत्तर अपेक्षित.

आपला स्वामी भक्त संजिव