.. भाग २ ..
" यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत|"
-- गीता ४.७..
जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली अथवा धर्माला र्हास झाला त्या त्या वेळी भगवान विष्णूने वेगवेगळी रुपे धारण करुन ॠषी मुनी, पृथ्वीवर आणि लोंकाचे आपल्या दैवी सामर्थ्याने रक्षण केले. पृथ्वीवर अनाचार माजला की सर्व ॠषी मुनी आणि इतर देवादिक मंडळी क्षीरसागराच्या ठिकाणी जाऊन भगवान विष्णुची प्रार्थना करीत आणि नतमस्तक होवून विनवणी करत असत की देवा पृथ्वीवर माजलेला हा अनाचार, दुष्ट प्रवृत्ती या सर्व गोष्टीचा नाश कर आणि आम्हाला भयमुक्त कर. त्या प्रमाणे भगवान विष्णूनी प्रत्येक अवतारामध्ये दुष्ट प्रवृत्तीचा, आसुरी शक्तिचा नाश करुन सर्वाना प्रत्येक वेळी सदाचाराकडे नेण्याचे आर्दश दाखवून दिलेत. आपण ग्रंथातून, कीर्तनातून, दूरदर्शन माध्यमाव्दारे रामायण, महाभारत, कृष्ण या मालिकेतून पहातो, ऐकतो, तरीपण आजच्या या कलियुगामध्ये आम्हा मानवात काही बदल होतो आहे का? विज्ञानवादी आणि देवचे अस्तिव नाहीच म्हणणारी काही मंडळी भगवान अवतार धारण करतात का? आणि खरोखरच भगवान अवतार धारण करणार असतील तर ते आपले अवतार कार्य कधी सुरु करणार असे विचारणारे लोक आहेत. आम्हा मानवांचे आयुष्य शंभर वर्ष विधात्याने नक्की केलेले जवळजवळ आहे. वय वर्ष शंभर पुढील काळ हा हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच मंडळीना मिळतो. मग या मिळालेल्या आयुष्यात नराचे नारायण होणे श्क्य आहे काय? याचे उत्तर खरोखरच मानवाने दैवी शक्तिचे चिंतन, मनन आणि सत्संगाची कास धरल्यास निश्र्चितच मिळेल. सध्या मानव बहुतांशी भैतिक गोष्टीत रत झालेला आहे. तरीपण मानव संकट्ग्रस्त झाला की मात्र तो कोणात्याही भैतिक सुखाचा विचार न करता सत्संगाचा, दैवी शक्तिच्या नामस्मरणाचा, जपानुष्ठानाचा व इतर धार्मिक कार्याचा विचार करु लागतो. आपल्या वाट्याला आलेली संकटे, दु:खे दूर कशी होतील, आपल्याला मानसिक समाधान कसे मिळेल हे विचार सातत्याने मनामध्ये येत राहातात आणि मग गीतेमधील भगवंतानी सांगितलेला श्र्लोक --
"परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम,|
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||"
-- गीता ४.८
सदरचा श्र्लोक केव्हातरी ऐकलेला, वाचलेला स्मरु लागतो. यातून काहीतरी आयुष्यात देवाचे, सध्द्गरुचे एखाध्या संप्रदायाचे पाईकपणा स्वीकारणे हे अत्यंत जरुरीचे आहे असे वाटते. संत श्रेष्ठ कबीर सांगतात-
" दु:खमें सुमरन सब करे सुखमे करे न कोय |
जो सुखमें सुमरन करे, तो दु:ख कहॅ|से होय ||"
संजिव
क्रमष भाग ३ पुढे..
प्रतिक्रिया
24 Mar 2008 - 11:03 am | विसोबा खेचर
पृथ्वीवर अनाचार माजला की सर्व ॠषी मुनी आणि इतर देवादिक मंडळी क्षीरसागराच्या ठिकाणी जाऊन भगवान विष्णुची प्रार्थना करीत आणि नतमस्तक होवून विनवणी करत असत की देवा पृथ्वीवर माजलेला हा अनाचार, दुष्ट प्रवृत्ती या सर्व गोष्टीचा नाश कर आणि आम्हाला भयमुक्त कर. त्या प्रमाणे भगवान विष्णूनी प्रत्येक अवतारामध्ये दुष्ट प्रवृत्तीचा, आसुरी शक्तिचा नाश करुन सर्वाना प्रत्येक वेळी सदाचाराकडे नेण्याचे आर्दश दाखवून दिलेत.
सध्याची परिस्थिती पाहता पृथ्वीवर अनाचार माजला आहे असं मानायला हरकत नाही. सबब, आता विष्णूने पुन्हा एकदा अवतार घ्यायची वेळ झाली आहे असंही मानायला हरकत नाही. नाऊ इट इज हाय टाईम, की विष्णूने अवतार घेऊन पृथ्वीवरील सर्व दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सर्व प्राणिमात्रांना सुखी केले पाहिजे!
"परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम,|
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||"
तरच एका ग्रंथात परमेश्वराच्या तोंडी घातलेले वरील वचन खरे ठरेल. खुद्द परमेश्वर असं कधी कुणला म्हणाल्याचं ऐकिवात नाही आणि एक संजय सोडला तर अद्याप असा पुरावाही दुसर्या कुणी दिल्याचं आठवत नाही!
असो, तूर्तास विष्णूच्या नव्या अवताराची अगदी काकुळतीने वाट पाहतो आहे. कारण आज दुष्टप्रवृत्तींकडून पृथ्वीवरील अनेक निरागस, निरपराध लोकांचं शोषण सुरू आहे तेव्हा आता विष्णूने अधिक वाट पाहायला न लावता त्याचे, किंवा त्याच्या तोंडी घातलेले वरील वचन सत्य करून दाखवावे! नाहीतर ही केवळ त्याची मिथ्थ्या बडबड ठरेल असे वाटते!
असो,
संजिवराव, पुढील लेखनाकरता शुभेच्छा!
आपला,
(विष्णूची वाट पाहणारा!) तात्या.
अवांतर - काही संकेतस्थळांवर बराच अनाचार माजला होता ते पाहून आम्हाला अवतार घेऊन मिसळपाव डॉट कॉम सुरू करावे लागले! आता पृथ्वीवरील बरीचशी आंतरजालीय मराठी प्रजा सुखासमाधानाने नांदत आहे! :)
24 Mar 2008 - 2:42 pm | अवलिया
*
24 Mar 2008 - 9:13 pm | ठणठणपाळ
>नाऊ इट इज हाय टाईम, की विष्णूने अवतार घेऊन पृथ्वीवरील सर्व दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सर्व प्राणिमात्रांना सुखी केले पाहिजे!
तात्या, कशाला उगीच स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेताय!
24 Mar 2008 - 11:17 am | प्रमोद देव
अवांतर - काही संकेतस्थळांवर बराच अनाचार माजला होता ते पाहून आम्हाला अवतार घेऊन मिसळपाव डॉट कॉम सुरू करावे लागले! आता पृथ्वीवरील बरीचशी आंतरजालीय मराठी प्रजा सुखासमाधानाने नांदत आहे! :)
:))))))))))))))))))))))))))
24 Mar 2008 - 1:01 pm | चतुरंग
परित्राणाय जालानाम विनाशायच दुष्कृतां!
मराठी संकेतस्थलार्थाय 'मिसळपाव' युगेयुगे!!:))
चतुरंग
24 Mar 2008 - 7:06 pm | विसोबा खेचर
मला तसंच म्हणायचंय रे रंगा! :)
पण मला तुझ्याइतकं संस्कृत येत नाही रे!
साला आपण पडलो एक नंबरचे भिकारचोट, अडाणी आणि गावंढळ! त्यामुळे सभ्य, सुशिक्षित, आणि सुसंस्कृत का कायसं म्हणतात त्या संस्थळावर आमचं पटेना, तिथे आम्हाला जाच वाटू लागला म्हणून मग आम्ही बंड करून, अवतार घेऊन मिपा स्थापन केलं, जे तुमच्यासारख्या दिलखुलास मंडळींच्या जोरावर आणि प्रेमामुळे आजवर सुरू आहे!
बाय द वे रंगा, पण तुझ्याइतकं संस्कृत मला येत असतं तर मी 'तात्याक्नवी' असं काहीसं चमत्कारिक नांव नसतं का लावून घेतलं? तो उपक्रमाचा वाश्या जशी '~ नासतो विद्यते भावो..' अशी काहीशी जोरदार संस्कृत डायलॉग असलेली सही करतो तशी सही नसती का केली? :)
असो..
आपला,
तात्याक्नवी! :)
24 Mar 2008 - 3:34 pm | आर्य
जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली अथवा.............................तेव्हा भगवान विष्णूनी अवतार घेऊन दुष्ट प्रवृत्तीचा, आसुरी शक्तिचा नाश केला. अनेक साधू-संतांनी लोकांना सन्मार्ग दाखवण्याचे हे कार्य पुढे चालवले.हे ईथपर्यंत सगळ ठिक आहे हो. काय खरचं अद्यात्मात गुरुची गरज आहे ? थेट देवां पर्यंत जाणे शक्य नाही ?
या क्षेत्रातील प्रदूषण कसे ओळखयचे आणि कसे दूर ठेवयचे? या वाटेवर चालताना मायाजाल कोणते आणी खर्याची परीक्षा करणे जरा अवघडच आहे नाही का? पण कालांतराने तुमचे साधक, सधना सोडुन केवळ सिद्धींच्या मगे लागलेत............भोंदू साधू -बाबां विषयी आपण काय सांगू शाकाल? अनेक सद्दगुणी लोक या मुळेही भरडले जातायत.
अहो लोकांची स्तिती फार वाईट आहे...आता तर म्हणतात "गुरू वीणकोण लावील वाट?"
अनेक चमत्कार, अनेक लीला, एक ठिकाणी गुप्त होणे, दुसर्या ठिकाणी प्रगट होणे, दर्शनाला येणार्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होणे, रंकाचे राव होण अशाप्रकारे समाजामध्ये सत्प्रवृत्ती निर्माण होण्याच्या दृष्टीने कार्य केले आहे असं तुम्हाला वाटतं?
आपण कुठे चाललोय? बाजारात ? भक्ती करुन / नवस बोलून मनोकामना पूर्ण करायला ???
कली युग आहे कली युग......आता अवतार झालाच पाहीजे
पण हे प्रश्ण अनूत्तरीत आहेत .....
एखाध्या संप्रदायाचे पाईकपणा स्वीकारणे हे अत्यंत जरुरीचे आहे?
प्रत्येकाचे ध्येय व त्यास प्रत्येकाचा मार्ग वेगळा असु शकतो.
नराचा नारायण होणे शक्य आहे काय?
म्हणजे नक्की काय? विष्णू पदाला पोहचणं "व्यासाय विष्णूरुपाय व्यासरुपाय विष्णवे "
स्वर्ग प्राप्ती (कधीही न पाहीलेली गोष्ट), की समाजात देवे / अवतारी पुरुष म्हणून मान्यता ?, अथवा ३३ कोटी देवतांच्या पंक्तीत स्थान ? की फक्त मानसिक समाधान, नक्की काय ?
या अर्थातच शंका आहेत्........यातुन कुणालाही दुखःवायचा हेतु नाही.
कॄपया यातुन गैर अर्थाने होऊ नयेत ही दत्त चरणी प्रार्थना.
आर्य
24 Mar 2008 - 4:46 pm | विसोबा खेचर
म्हणजे नक्की काय? विष्णू पदाला पोहचणं "व्यासाय विष्णूरुपाय व्यासरुपाय विष्णवे "
व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे!
चूभूद्याघ्या...
बाकी चालू द्या..
तात्या.
24 Mar 2008 - 5:16 pm | संजीव नाईक
श्रीमान आर्य यास.
आपला प्रश्न योग्य आहे. मला मराठी टाईप करणे. फार जमत नाही मी शिकत आहे. पण हळुहळु आपल्या प्रश्ननाची उत्तरे माझ्या पुढील भागा मध्ये आहे. सध्द्गरुच्या शोधात यांचा अर्थ आपनास नक्की कळेल.
स्वर्ग प्राप्ती म्हणजे "मिसळपाव वर ज्या शोधार्थ आपन येतात व मानाला आनंद / मानसिक सुख उपभोगता यालाच "स्वर्ग प्राप्ती " का म्हणूनये?
राग धरुनये क्षमस्व
आपला संजिव
24 Mar 2008 - 5:57 pm | आर्य
स्वर्ग प्राप्ती म्हणजे "मिसळपाव वर ज्या शोधार्थ आपन येतात व मानाला आनंद / मानसिक सुख उपभोगता यालाच "स्वर्ग प्राप्ती " का म्हणूनये?
ही जर स्वर्ग प्राप्ती आहे तर तुमचा सद्-गुरु का हवा.......मग उद्या पासुन पुजा -अर्चना बंद का करु नये.
का स्वर्ग ही व्याख्या सपेक्ष आहे. प्रत्येकाच्या विचारानूसार, वेळेनूसार, आवडीनुसार बदलते..........मग अस्तीत्वत काय आहे. मला तर वाटतं हे देव आणि पुराणातल्या विश्व निर्मितिच्या कल्पनांनी लोकांची विचार शक्ती कुंठीत केली आहे.
तात्या
व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे!
तसे वर वर पहता आपल्या मताशी मी सहमत आहे, पण त्यांची सृजनशिलता मानली पाहीजे.
व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे!
आर्य
24 Mar 2008 - 6:48 pm | विसोबा खेचर
तात्या
व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे!
तसे वर वर पहता आपल्या मताशी मी सहमत आहे, पण त्यांची सृजनशिलता मानली पाहीजे.
ओक्के बॉस! :)
आपला,
(व्यासप्रेमी!) तात्या.
24 Mar 2008 - 11:49 pm | संजीव नाईक
महाशय आपण दोघे का भाडतात उगाच आपण आपल्या मनाला लावून का घेतात
असअसेल तर आज पासुन माझ चुकते म्हणुन मी लेख बंद करु का?
आपला संजिव
25 Mar 2008 - 10:02 am | आर्य
प्रिय संजिव,
उपरोक्त लेखात मी माझे मत व्यक्त करताना व्यासांचा संदर्भ दिला होता, त्या वर तात्यांनी त्यांचे मत मांडले आहे. आम्ही ऐक मेकांच्या मताचा आदर करीत विचार सहमती दर्शवली आहे. यात कोणीही-काहीही वैयक्तीक रीत्या धेतले आहे असे मला तरी वाटत नाही. (तात्या माझ्या या मताशी सहमत असतील).
संजिव, (आपले वय आणि पोंच माहीत नसल्याने केवळ ऐकेरी ऊल्लेख आहे) आपण वाद न घालता संवाद करु.
कॄपया विषय पुढे चालुठेवावा...............चू .भू. दे. धे.
आपला
(ह. भ. प.) आर्य
सुचना - ह. भ. प. म्हणजे हरीभक्त भक्तपारायण असा संदर्भ न घेता "हळूच भजी पळवणारा" असे वाचावे.
25 Mar 2008 - 10:15 am | संजीव नाईक
श्रीमान श्रीयुक्त माननीय मिसळ्पाव परिवार सदस्य.....
मी लहान असून आता मिपा वर आताच लिहण्याचा सराव करित आहे.
वय वर्ष १००ला ५५ कमी धंदा नोकरी बी.एस्.एन्.एल्. मध्ये मंबई
आवडता विषय चास्तू ,ज्योतिष ,टेरो , या विषयी समुपदेश करणे शास्त्रीय द्रुष्टी कोनातून
आपला (केवळ एकेरी )
संजिव