xxवी झाली तेंव्हा

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in जे न देखे रवी...
25 Apr 2010 - 8:42 am

तात्विक युद्धांचा इतिहास कितीही रंजक असला तरी शेवटी शरीरधर्म कुणाला चुकला आहे? पायाचा तिढा करुन केविलवाण्या चेहर्‍याने बंद दाराकडे बघणारे चाळकरी आणि फ्लोरा फाउंटनच्या चौकात टायची गाठ सैल करताकरता विषण्ण मुद्रेने इकडेतिकडे बघत 'ते शहाळे तेवढे प्यायला नको होते..' असा विचार करणारे अधिकारी - शेवटी या सगळ्यांची व्यथा एकच, सगळ्यांचे रिंगटोन सारखेच, सगळ्यांचे पासवर्ड सेम...
त्यामुळे राजेश घासकडवींना वंदन करुन

xxवी झाली तेंव्हा

ती झाली तेंव्हा घळघळ, निश्वास निनादत होता
अवघडल्या ओटीपोटी , उद्गार सैलावत होता

ती घाई कसली म्हणुनि, सांगावे तरी मी कैसे
बुद्धाच्या चेहर्‍यामागे, कल्लोळ माजला होता

ती झाली आता म्हणुनि, आनंदे मीही रडलो
कल्पनेत माझ्या अंगी, कपडाही भिजला होता

अंतरात गमले मजला, या जन्मी सार्थक झाले
अब्रूचा शेला माझा, लोकांत वाचला होता

ही भिंतीवरची चित्रे, पहाताना गहिवर नाही
दुर्गंध साहता माझा, उद्देश नागडा होता

हास्यविडंबन

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

25 Apr 2010 - 8:46 am | प्रमोद देव

रावसाहेब...तुम्ही यॉर्करवर एकदम षटकारच चढवलात की.

नितिन थत्ते's picture

25 Apr 2010 - 11:34 am | नितिन थत्ते

हा हा हा. मस्त. जबरी

नितिन थत्ते

II विकास II's picture

25 Apr 2010 - 8:56 am | II विकास II

अगदी जबरा, कविता

रावसाहेब असेच लिहीत रहा.
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

अगोचर's picture

25 Apr 2010 - 8:59 am | अगोचर

---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान

तिमा's picture

25 Apr 2010 - 11:16 am | तिमा

शरीरधर्माचे शब्दचित्रच!!!
आमचे ठिगळ बघा जुळताय का
पण घात जाहला अंती
लोटा तो फुटका होता||

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

ज्ञानेश...'s picture

25 Apr 2010 - 11:27 am | ज्ञानेश...

एकदम 'पी'वर विडंबन ! ;)

नंदन's picture

25 Apr 2010 - 1:49 pm | नंदन

ओघवत्या शैलीतलं विडंबन ;)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Apr 2010 - 2:17 pm | llपुण्याचे पेशवेll

फारच लाघवी विडंबन आहे ते.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

टारझन's picture

25 Apr 2010 - 4:50 pm | टारझन

लोल लोल लोल .. पुप्या सारखेच म्हंटलं =)) =)) =))

बाकी काव्य विडंबणावरून मला एक सहि विडंबण सुचलं पण तो बेत आम्ही डिस्कार्ड केला :)

सन्जोपराव ... :)

- *** *****

आण्णा चिंबोरी's picture

25 Apr 2010 - 2:49 pm | आण्णा चिंबोरी

विडंबनाची भाषा प्रवाही आहे.

-आण्णा

तिमा's picture

25 Apr 2010 - 3:47 pm | तिमा

विडंबनाची भाषा प्रवाही आहे

कारण.. आशयच प्रवाही आहे!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

शुचि's picture

25 Apr 2010 - 5:33 pm | शुचि

सकाळची सुरुवात "शू"चीर्भूत झाली अगदी या कवितेने.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

विसोबा खेचर's picture

25 Apr 2010 - 5:29 pm | विसोबा खेचर

सुरेख नाही म्हणता येणार, परंतु एक वेगळीच गझल!

ती घाई कसली म्हणुनि, सांगावे तरी मी कैसे
बुद्धाच्या चेहर्‍यामागे, कल्लोळ माजला होता

क्या बात है! :)

तात्या.

चित्रगुप्त's picture

25 Apr 2010 - 6:44 pm | चित्रगुप्त

अत्यंत 'प्रवाही' आणि 'तरल'..... अविष्कार....

आंबोळी's picture

28 Apr 2010 - 10:02 am | आंबोळी

वा...
फारच सुंदर..... या गाण्याचे चांगले विडंबन होउ शकणार नाही हा माझा विश्वास फोल ठरला आज.
बाकी घास्कडव्यांना वंदन करायला मुभा राहीलेली नाही अस दिसतय.
कुणी 'तिकडे' टाकलीय का रे ?

आंबोळी

कपिलमुनी's picture

11 Nov 2014 - 3:18 pm | कपिलमुनी

हा हा हा.

प्रवाही भाषेतील विडंबन
नेमाडेंच्या एका कादंबरीतील एक वाक्य आठवल.
आमचे ते शिक्षक लघ्वी केल्यासारखं शिकवायचे.

vikramaditya's picture

11 Nov 2014 - 4:36 pm | vikramaditya

आता १८० अंश फिरवुन पलिकडच्या बाजुचे अवघडलेपण पण येवु द्या. कदाचित "कळा ज्या लागल्या जीवा" या धर्तीवर जमुन जाईल.