xxवी झाली तेंव्हा
तात्विक युद्धांचा इतिहास कितीही रंजक असला तरी शेवटी शरीरधर्म कुणाला चुकला आहे? पायाचा तिढा करुन केविलवाण्या चेहर्याने बंद दाराकडे बघणारे चाळकरी आणि फ्लोरा फाउंटनच्या चौकात टायची गाठ सैल करताकरता विषण्ण मुद्रेने इकडेतिकडे बघत 'ते शहाळे तेवढे प्यायला नको होते..' असा विचार करणारे अधिकारी - शेवटी या सगळ्यांची व्यथा एकच, सगळ्यांचे रिंगटोन सारखेच, सगळ्यांचे पासवर्ड सेम...
त्यामुळे राजेश घासकडवींना वंदन करुन
xxवी झाली तेंव्हा
ती झाली तेंव्हा घळघळ, निश्वास निनादत होता
अवघडल्या ओटीपोटी , उद्गार सैलावत होता
ती घाई कसली म्हणुनि, सांगावे तरी मी कैसे
बुद्धाच्या चेहर्यामागे, कल्लोळ माजला होता
ती झाली आता म्हणुनि, आनंदे मीही रडलो
कल्पनेत माझ्या अंगी, कपडाही भिजला होता
अंतरात गमले मजला, या जन्मी सार्थक झाले
अब्रूचा शेला माझा, लोकांत वाचला होता
ही भिंतीवरची चित्रे, पहाताना गहिवर नाही
दुर्गंध साहता माझा, उद्देश नागडा होता
हाहाहा!
+१
अगदी जबरा,
वाह (लघ) वाह !!
छान
वा वा !
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
फारच लाघवी
+१
प्रवाही विडंबन
कारण
"शू"चीर्भूत
सुरेख नाही
अत्यंत 'प्रवाही' आणि 'तरल'.....
वा... फारच
जबरी
वा वा विडंबनात अवघी प्रतिभा ओसंडुन वाहतेय
छान व्यथा मांडलीत