आजची स्त्रीची प्रतिमा - १

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
22 Apr 2010 - 3:06 pm

मे महिन्यातला दुसरा रविवार मातृदिन. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते असं आपण म्हणतो. भारतीय संस्कृतीत स्त्री ही देवीसमान आहे असंही म्हणण्याची पद्धत आहे. पण प्रत्यक्षात दिसायला काय दिसतं? जाहिरातींतून, सिनेमांतल्या आयटम गाण्यांतून, टीव्हीवरच्या सीरियल्समधून, आंतर्जालावर ठिकठिकाणी स्त्रीचं क्षणभंगूर रूप केवळ आपल्या डोळ्यांसमोर येतं. शिवाजीला संस्कार देणारी जिजाबाई अधूनमधून जयजयकार करण्यासाठी इतिहासाच्या पुस्तकात दडून राहाते. पण जिथे पाहावं तिथे मुखपृष्ठावर, बिलबोर्डांवर तारुण्याने मुसमुसलेल्या व अंगप्रदर्शन करणाऱ्या मोहिनी दिसत राहातात. ही विसंगती कमी करण्यासाठी या लेखमालेचं प्रयोजन. निदान पहिलं पुष्प तरी. फक्त पहिलं पुष्प अशासाठी म्हटलं की एका अर्थाने हा अभिनव प्रयोग आहे. कोणीतरी एकीने/एकाने आपले विचार मांडण्यापेक्षा, व एक काथ्याकूट करून सोडून देण्यापेक्षा मिपावर येणाऱ्या सुजाण वाचकांच्या व लेखकांच्या मनात स्त्रियांबद्दल काय भूमिका आहे हे या सदरातून समोर यावं अशी माझी इच्छा आहे. स्त्रियांचा केवळ शरीरापलिकडे विचार करणार बरेच लोकं असतील, त्यांनी पुढची पुष्पं गोवावीत असं आवाहन. त्यातला समान धागा जिवंत राहील ही आशा आहे.

लहानपणी आईकडून गोष्टी ऐकताना एक गोष्ट सांगताना आईच्या डोळ्यात चमक दिसायची. ती गोष्ट आता आठवत नाही पण आईच्या डोळ्यांत दिसलेला अभिमान आणि ती चमक विसरणं शक्य नाही. ती गोष्ट होती चन्नमेची, कित्तूरची राणी चन्नमा! १७७८ साली जन्मलेली चन्नमा, भारतातली सगळ्यात पहिली स्त्री स्वातंत्र्यसैनिक. जेव्हा पुण्यात पेशवे राज्य करत होते, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हा चन्नमा ब्रिटीशांशी लढा देत होती.

काकती नावाच्या एका छोट्या गावात जन्मलेल्या चन्नमेला लहानपणीच लोकं तिच्या बहादुरीमुळे ओळखायचे. लहानपणीच घोड्यावर बसणे, तलवार चालवणे, तिरंदाजी अशा त्याकाळच्या युद्धकलेतच्या महत्त्वाच्या अंगांचे शिक्षण तिने घेतले. वयात आल्यावर कित्तूरचे राजा मल्लसर्जा यांच्याशी तिचा विवाह झाला. राज्यात सर्वकाही सुरळीत सुरू असताना इंग्रजांचा, आपला देश घशात घालण्याचा उद्योग सुरूच होता. याच नीतीचा भाग म्हणून कित्तूरच्या राजांकडेही इंग्रजांचे तैनाती सैन्य होतं; (... दोन शतकांनंतर हिटलरने ऑस्ट्रीया, झेकोस्लोवाकियाच्या बाबतीत जे केलं साधारण तसंच! आजच्या काळात परराष्ट्रखातं दुसर्‍या देशाच्या हातात जाण्यासारखंच ). राजा मल्लसर्जा यांचं १८१६ मधे निधन झाल्यावर परिस्थिती थोडी बदलली. चन्नमेने आपल्या एकुलत्या एका मुलाचा राज्याभिषेक करून दिला. पण दुर्दैवाने दिवस फिरणार होती. तिच्या मुलाचाही १८२४ साली मृत्यु झाला आणि इंग्रजांना कित्तूरचं राज्य घशात घालण्याची कधीपासून हवी असलेली संधी मिळाली.

पण चन्नमा इंग्रजांना बधली नाही. तिने शिवलिंगप्पा याला दत्तक घेऊन त्याच्या राज्याभिषेक केला. ब्रिटीशांनी (झाशीच्या संस्थानाच्या बाबतीत केलं तेच) दत्तकपत्र नामंजूर करून कित्तूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. चन्नमाला बाहेरच्या लोकांचा हा प्रयत्न मान्य नसल्यामुळे तिने लढण्याची पूर्ण तयारी केली. ब्रिटीशांच्या प्रचंड फौजफाट्याला न घाबरता तिने बंडाळी करून स्वत:चं सैन्य उभं केलं. २३ ऑक्टोबर १८२४ च्या लढाईत संस्थान खालसा करणारा, धारवाडचा तेव्हाचा कलेक्टर थॅकरे, चन्नमेच्या सैन्याने मारला. चन्नमेची ही लढाई मात्र फार काळ चालली नाही. दीड महिन्यांच्या आतच, ३ डिसेंबरला चन्नमा पकडली गेली. कित्तूरचे राज्य बेळगाव जिल्ह्याला जोडले गेले. आणि युद्धबंदी बनवून चन्नमेला बैलहोनंगळच्या किल्ल्यात पाठवलं आणि तिथेच तिचा २१ फेब्रुवारी १८२९ साली मृत्यु झाला.

बेळगावपासून ५० किमीवर कित्तूरचा किल्ला आजही चन्नम्मांची कहाणी सांगत उभा आहे. आपल्या हक्कासाठी, आपल्या जनतेसाठी लढणारी चन्नमा ही आज फक्त कर्नाटकातच नाही तर सगळ्यांसाठीच वीरश्रीचा एक मापदंड ठरली आहे. चन्नम्मेचा वारसा चालवू पहाणार्‍यांपैकी मी एक, आज तिला मानाचा मुजरा करते.

(सर्व माहिती आंतरजालावरून घेतली आहे.)

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

अक्षय पुर्णपात्रे's picture

22 Apr 2010 - 11:40 pm | अक्षय पुर्णपात्रे

उद्या काही शब्दांवर आक्षेप येईल. उद्या काही प्रतिसाद दिसायला नको म्हटल्या जाईल. उद्या असे लेख आक्षेपार्ह वाटतील. उद्या असेच...उद्या असेच...

श्री बिरुटे, हे सगळे आजही सुरू आहे. या कामाकरताच तुम्हाला संपादक म्हणून नेमले आहे. चालू द्या. पण स्वत: काय करता ते एकदा पहा म्हणजे झाले.

II विकास II's picture

23 Apr 2010 - 8:03 am | II विकास II

श्री बिरुटे यांच्या प्रतिसादात मला काही वावगे दिसत नाही. आणि हा धागा का टाकला गेला हे त्यातील करड्या रंगावरुन लगेच समजते. राहुन राहुन असे वाटते की राणी चन्नमाला ह्याच धाग्यात टाकायला नको होते. कुठे ती थोर राणी आणि कुठे आजकालच्या रेडवाईन पिऊन शिव्या देत माज दाखवणार्‍या मुली !!!. अशा मुली अजुनतरी जास्त नाहीत, पण एक सहज वाक्य निघुन गेले. असो.

बाकी राणी चन्नमाची माहीती आवडली, पुढील लेखमालेस शुभेच्छा. आम्ही नक्की वाचु.

---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

अक्षय पुर्णपात्रे's picture

23 Apr 2010 - 8:19 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री बिरुटे यांचा प्रतिसाद अत्यंत आक्षेपार्ह आहे असे माझे मत आहे. त्यांच्या मतानुसार संपादन वेळोवेळी होऊन कुठलेही नवीन लिखाण होऊ शकणार नाही. आणि हे सर्व ते खुद्द संपादक असतांना आणि 'कात्रीने कापणे' वगैरेंसारखे शब्दप्रयोग वारंवार करत असतांना. मुख्यत: संपादक म्हणून त्यांनी त्यांची भुमिका जराही प्रगल्भपणे न दाखवल्याने आणि रास्त आक्षेपांचा असा विपर्यास केल्याने अतिशय दु:ख झाले. सद्सद्विविवेकबुद्धी वापरुन त्यांनी स्वत:च तो प्रतिसाद संपादीत केल्यास आनंद होईल.

राहुन राहुन असे वाटते की राणी चन्नमाला ह्याच धाग्यात टाकायला नको होते. कुठे ती थोर राणी आणि कुठे आजकालच्या रेडवाईन पिऊन शिव्या देत माज दाखवणार्‍या मुली !!!.

हा काय प्रकार आहे? रेड वाइनचा संबंध कळला नाही. राणी चेन्नम्मांच्या माहितीवरून त्यांचे मद्यप्राशनाविषयीचे विचार स्पष्ट होत नाही. कैच्या कै संबंध जोडू नये. शक्य असल्यास मुद्द्याला धरून उपप्रतिसाद लिहावा.

II विकास II's picture

23 Apr 2010 - 8:58 am | II विकास II

तुमचा वाद दिलीपरावाच्या प्रतिसादाबद्दल आहे.
दिलीपराव हे संपादक आहेत आणि सदस्यही आहेत. संपादक असले म्हणजे सदस्य म्हणुन प्रतिसाद देता येत नाहीत का? त्यांनी त्यांची व्यक्तीगत मते ठेउ नयेत का?
जो पर्यंत चर्चा ही अगदी व्यक्तीगत होत नाही, तो पर्यंत कोणतीही चर्चा ठिक असते.
आणि सगळे संपादक हे स्वतःचे काम संभाळुन, मिपावर संपादनाचे काम कोणत्याही मानधनशिवाय करत असतात. हाही मुद्दा लक्षात घ्यायला हवा.

आणि दिलीपरावांनी प्रतिकिया ही सदस्य म्हणुन आणि लेखाचा असलेला (बुरख्याआडचा)मुळ उद्देश लक्षात घेउन दिली असेल.
आणिबाणी उठवल्याचा धागा नुकताच नीलकांतने टाकला, त्यात त्याने म्हटले आहे. सदस्यांची समिती नेमली जाईल. कोणतीही गोष्ट करण्याचा सनदशीर मार्ग उपलब्ध होत असताना, हा धागा टाकुन लोकांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न आहे. आणि हा धागा काही मौजमजा म्हणुन ही टाकला नाही.
नीलकांत माझ्या प्रश्नांना उत्तरे देणार आहे, तेव्हा बर्‍याचश्या गोष्टी(संपादकांची जबाबदारी वैगरे.) स्पष्ट होतीलच. तो पर्यंत वादग्रस्त गोष्टींना हात घालुन उगाच त्याचा त्रास वाढवु नये.
तुम्हाला जसे मत आहे, आदितीला जसे मत आहे, तसेच मला, बिरुटेसरांना ही मत आहे. कदाचित ती मते नेहमीच एक येतील असे नाही. त्यावेळी होणारे मतभेद सनदशीर मार्गाने व्यक्तीगत टिका न होता मांडता आले म्हणजे झाले.

दिलीपरावांनी प्रतिक्रिया देताना,मिपावर कसे आपलीच धोरणे जोर जबरदस्तीने पुढे नेण्याचा प्रयत्न झाला होता हा इतिहाससुध्दा लक्षात ठेवला असेल.

उदा. तुम्हाला एक उदाहरण देतो, पुर्वी सांमतकाका मिपावर लिहायचे. ते ओबामाचे चाहते होते, काही लोकांना ते पटले नाही. मग एकाने त्यांना उत्तर म्हणुन मुद्दाम धागा लिहीला. बहुतेक तो लेखक कर्क असावा. मी तो धागा शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो सापडला नाही. त्यानंतर सांमतकाका मिपावर लिहीत नाहीत.
असे प्रकार मिपावर पुन्हा होउ नयेत असे वाटते. तुमचे लिखाण पहाता, तुम्हीही सहमत असलाच.

--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Apr 2010 - 9:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

काड्याघालू विकास, आत्तापर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करण्याचा विचार होता. पण आपल्याला न झेपणार्‍या गोष्टींबद्दल आणि इतर सभासदांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बरळ बंद करा!
रेड वाईन पिणार्‍यांनी चन्नम्मेबद्दल लिहू नये असे जर तुमचे विचार असतील तर आता व्यवस्थापक नीलकांत यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे, की माझे धागे काड्यामुक्त करता येतील का? अर्थात तुम्हाला (आणि इतर काही लोकांनाही) माझे विचार झेपत नाहीत तेव्हा माझ्या धाग्यांवर तुम्ही प्रतिसाद लिहू नयेत याची काळजी घेता येईल का?

अदिती

shweta's picture

22 Apr 2010 - 9:14 pm | shweta

मस्त... :)

भोचक's picture

22 Apr 2010 - 9:45 pm | भोचक

श्रामोंशी बाडिस.

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

रेवती's picture

22 Apr 2010 - 9:23 pm | रेवती

हा उपक्रम आवडला. राणी चन्नमेची कहाणी 'गोष्ट' स्वरूपात बर्‍याच वर्षांपूर्वी ऐकली होती त्याची आठवण झाली.
आता मुखपृष्ठाबद्दल बोलायचे झाल्यास्........मला ते फोटो आवडत नाहीत, कुठल्या नट्यांनी त्यांचे अंग किती दाखवावे हा त्यांचा प्रश्न आहे पण आपण काय नी किती बघावे किंवा बघायला लावावे हा आपला प्रश्न आहे. कर्त्रूत्ववान स्रियांचे फोटो (जुन्या वा नव्या काळातल्या) लावायला काय हरकत आहे?

रेवती

प्रकाश घाटपांडे's picture

22 Apr 2010 - 9:36 pm | प्रकाश घाटपांडे

कर्त्रूत्ववान स्रियांचे फोटो (जुन्या वा नव्या काळातल्या) लावायला काय हरकत आहे?

नक्की आवडेल. किरण बेदी, इंदिरा गांधी यांचेही फोटो अधुनमधुन असावेत. मला व्यक्तिशः भडक मुखपृष्ठ आवडत नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

II विकास II's picture

23 Apr 2010 - 8:07 am | II विकास II

>>कर्त्रूत्ववान स्रियांचे फोटो (जुन्या वा नव्या काळातल्या) लावायला काय हरकत आहे?
एक सुधारणा.

कर्त्रूत्ववान स्त्री आणि पुरुष ह्या दोघांचेही फोटो असावेत. तेवढीच नवीन माहीती मिळेल.

----
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

अक्षय पुर्णपात्रे's picture

22 Apr 2010 - 9:42 pm | अक्षय पुर्णपात्रे

कशाला पाहीजेत? कर्तृत्त्ववान असोत वा नसोत. प्रसंगानुरुप काहीतरी असावे. स्त्री-पुरुष-कुत्रा-मांजर काहीही असू द्या. काही नसले तरी चालेल.

भाग्यश्री's picture

22 Apr 2010 - 10:44 pm | भाग्यश्री

सहमत ! काहीच नसले तर फारच बरे! दिसायला सोबर व नीटनीटके तरी दिसेल मुखपृष्ठ.

अदिती लेख आवडला. चन्नम्माची गोष्ट आठवत नव्हती, नव्याने वाचायला मिळाली. त्याबद्दल धन्यवाद. ही लेखमाला समविचारी मंडळी चालू ठेवतील ही आशा!

सुवर्णमयी's picture

22 Apr 2010 - 10:04 pm | सुवर्णमयी

रंजिताबाई अवखळ, नित्यानंद बाबा महान आणि खिचडी किती चविष्ट!
अशाप्रकारे गुरुवारचा उपवास करणारा खिचडीचा घास घशात अडकून मेला तरी चालेल.

असो संपादकीय धोरणात अशी चित्र, त्याचे सविस्तर वर्णन आणि त्यामुळे स्थळाला मिळणार्‍या मोठया टिचक्या जास्त महत्त्वाच्या वाटत असतील तर प्रश्नच नाही. काय धोरण आहे ते ठरवून एकदाचे जाहीर करून टाका म्हणजे जिथे फक्त दारू मिळेल तिथे दुधाची अपेक्षा करायचा प्रश्नच नाही.
ललित लि़खाणात काय लिहायच आहे त्याची मुभा असतांना अशी चित्र आणि कॉमेंट्स ची गरज काय?

क्लिंटन's picture

22 Apr 2010 - 10:32 pm | क्लिंटन

फारशी माहिती नसलेल्या कर्तबगार राणी चन्नमाची माहिती करून देणारा छान लेख. अजून थोडी सविस्तर माहिती असती तर चांगले झाले असते.

चर्चा राणी चन्नमापेक्षा इतर विषयावरच जास्त होत आहे म्हणून माझेही त्यावर दोन टक्के

आपल्या अंगप्रत्यांगाचे प्रदर्शन करणाऱ्या स्त्रियांची चित्रे देऊन विविध मासिके, वर्तमानपत्रे, संकेतस्थळे स्त्रित्वाचा अपमान करतात असे नेहमी म्हटले जाते. तसे केल्याने असा अपमान होतो की नाही याची मला कल्पना नाही पण पुढील मुद्द्यांचा जरूर विचार व्हावा.

१. ही चित्रे देणाऱ्या नक्की कोण असतात? स्त्रियाच ना?त्यांच्यावर तशी चित्रे देण्याबद्दल सक्ती होते का?तशी सक्ती केल्यानंतरची छायाचित्रे मासिकांमध्ये नक्कीच छापली जात नसावीत असे वाटते. परिस्थितीमुळे चार पैसे मिळवायला या स्त्रिया अशी छायाचित्रे देतात असे आहे का? कत्रीना कैफ, मल्लिका, ऐश्वर्या (२००४ च्या कान्स फिल्म महोत्सवातील छायाचित्रे) या तरी चार पैसे मिळवायला तशी छायाचित्रे देतात यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.

मग जर का अशी छायाचित्रे देऊन असा अपमान होत असेल तर त्याबद्दल अशी छायाचित्रे देणाऱ्या त्या स्त्रिया पण तितक्याच दोषी नाहीत का?

२. फेमिना सारख्या मासिकांमध्ये नऊवारी साड्या नेसलेल्या स्त्रियांची छायाचित्रे असतात का? नाही ना? मग अशा मासिकांमध्येही थोड्याफार फरकाने तशीच छायाचित्रे दिल्याने असा अपमान होत नाही का?

३. बहुतांश मुलींना सलमान खान आवडतो. आणि तो त्याचा अभिनय, रूप (?) याबरोबरच नक्की कोणत्या कारणासाठी आवडतो ते लिहायलाच हवे का?अर्थात त्याबद्दल त्यांना मी दोष देत आहे असे अजिबात मानायचे कारण नाही. विरूध्द गोष्टीचे आकर्षण सगळ्यांना असते आणि ते पूर्णपणे नैसर्गिक आहे. पण माझा प्रश्न आहे की अशावेळी त्याच न्यायाने ’पुरूषत्वाचा’ अपमान होत नाही का? अमेरिकेत ’प्लेबॉय’ प्रमाणेच ’प्लेगर्ल’ ही असते. मग अशावेळी ’पुरूषत्वाचा’ अपमान का होत नाही?

याउलट स्त्रित्वाचा अपमान अधिक कधी होतो याविषयी आय.आय.एम मध्ये अगदी जवळून बघितलेल्या प्रकारांवरून सांगतो--

गोल्डमन सॅक्स आणि इतर इन्व्हेस्टमेन्ट बॅंकांमध्ये ट्रेडींग आणि विश्लेषण करायचे जॉब प्रोफाईल असतात तसेच सेल्सचेही जॉब प्रोफाईल असतात. सामान्यत: इतर सेल्सच्या जॉबमध्ये (विमा कंपन्या वगैरे) पुरूष जास्त प्रमाणावर आढळतात कारण ते उन्हापावसात बाहेर जाऊन पायपीटीचे काम असते. पण इन्व्हेस्टमेन्ट बॅंकांमध्ये सेल्सचा जॉब म्हणजे क्लाएंटबरोबर पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी करणे आणि गोड बोलून आपल्या कंपनीचे प्रॉडक्ट विकून आपला कार्यभाग साधणे असा असतो. अशा ठिकाणी सुंदर आणि तरूण मुली अशा बॅंकांना हव्या असतात. याचे कारण अशा मुली आपल्या रूप आणि आवाजाच्या बळावर क्लाएंटच्या गळ्यात आपल्या कंपनीचे प्रॉडक्ट मारू शकतात. आणि अशा मुली क्लाएंटबरोबर जाऊन दारू प्यायला आणि इतर अनेक गोष्टी करायला तयार असतील तर त्यांची प्रगती विलक्षण वेगाने होऊ शकते. आज गोल्डमन सॅक्सच्या सेल्समध्ये सुंदर चेहरा आणि लूज कॅरॅक्टर या बळावर गलेलठ्ठ पगार कमावणाऱ्या आय.आय.एम च्या माजी विद्यार्थीनी आहेत. इन्व्हेस्टमेन्ट बॅंकांच्या सेल्समध्ये बुध्दीमत्ता आणि कष्टाच्या जोरावर पुढे जाता येईल त्यापेक्षा बरेच जास्त चेहरा आणि लूज कॅरॅक्टरच्या जोरावर जाता येऊ शकते.आणि केवळ त्या कारणांसाठी मुद्दामून मुलींना अशा जॉब्ससाठी निवडण्यामुळे स्त्रित्वाचा अधिक अपमान होत नाही का? आपले मत ऐकून घ्यायला आवडेल.

अनामिक's picture

22 Apr 2010 - 10:52 pm | अनामिक

इथे प्रश्न स्त्रीत्वाचा अपमान होतो की नही हा नसून, अश्या प्रकारच्या चित्रांची मिपाला खरंच गरज आहे का? असा आहे असे वाटते. तसेच तुम्ही नमुद केलेल्या मसीकांचा एक वाचकवर्ग आहे, तो-तो वाचकवर्ग त्या-त्या मासीकांमधे त्याला जे हवे ते बघतो. प्लेबॉय किंवा प्लेगर्ल मासीके कुणाचा अपमान करत नसली तरी आपण ती मासीके चार चौघात बघत नाही की घरी इतर साहित्यीक पुस्तकांच्या बरोबर ठेवत नाही. भारतात सोडा पण अमेरिकेतही ह्या मासिकांचे वाचक (की बघे) राजरोसपणे हातात ही मासिकं घेऊन फिरताना दिसत नाहीत.

मिपाचाही एक वाचकवर्ग आहे, आणि त्यातल्या बहुतांशी वाचकास एकच बाब खटकत असेल तर त्याकडे लक्ष देऊन चूक सुधारणे योग्य नाही का? आक्षेप आहे तो दररोज येणार्‍या त्याच त्याच प्रकारच्या चित्रांना. अर्थात त्याकडे दुर्लक्ष करून, मी हव्या त्या सदराचा नक्कीच अस्वाद घेऊ शकतो.

-अनामिक

यशोधरा's picture

22 Apr 2010 - 10:59 pm | यशोधरा

अनामिक, उत्तम.

क्लिंटन's picture

22 Apr 2010 - 11:20 pm | क्लिंटन

>>अश्या प्रकारच्या चित्रांची मिपाला खरंच गरज आहे का?

मला वाटते या प्रश्नाचे उत्तर संपादक मंडळीच देऊ शकतील.मी स्वत:तरी मिपावर मायबोली मराठीत इतरांबरोबर चर्चा करायला आणि जमेल तितका विरंगुळा करून घ्यायला येतो. मिपावर एखाद्या विषयावर लेख आला नसेल आणि मला तो लिहिता येत असेल तर तो मी वेळ मिळेल तसा आणि तेव्हा लिहितो. प्रत्येक सदस्याची मते याविषयी वेगळी असायची शक्यता आहे किंबहुना असतीलच. पण मी तरी मिपाला कशाची गरज आहे आणि कशाची नाही याचा विचार करण्यापेक्षा मिपावरील माझ्या आवडीचे काय ती गोष्ट मी घेतो आणि बाकीच्या गोष्टी सोडून देतो.

गेल्या वर्षभरात मी मिपावर पूर्वीइतका सक्रिय राहिलेलो नाही.पण मी मिपा जेवढे बघितले आहे त्यावरून एक गोष्ट मात्र नक्की सांगतो की खादाडीबरोबरची चित्रे अगदी सात्विक आणि सोज्वळ नसली तरी चारचौघांमध्ये बघायला लज्जास्पद वाटेल तरी नक्कीच नसतात. त्यापेक्षा कितीतरी भयंकर गोष्टींचा भडीमार विविध चॅनेल्स आणि चित्रपटांमधून चालू असतो. असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Apr 2010 - 11:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगोदरचा प्रतिसाद आवडलाच होता. या प्रतिसादातील मुद्देही पटणारे.

>>>>>मी मिपा जेवढे बघितले आहे त्यावरून एक गोष्ट मात्र नक्की सांगतो की खादाडीबरोबरची चित्रे अगदी सात्विक आणि सोज्वळ नसली तरी चारचौघांमध्ये बघायला लज्जास्पद वाटेल तरी नक्कीच नसतात. त्यापेक्षा कितीतरी भयंकर गोष्टींचा भडीमार विविध चॅनेल्स आणि चित्रपटांमधून चालू असतो.

=D> =D> =D>

-दिलीप बिरुटे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Apr 2010 - 11:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

क्लिंटन, ही चित्रं "तसली" नाहीत हे मलाही माहित आहे; पण अभिरूचीहीन आहेत. अलिकडे माझ्या घरातल्या अनेक मोठ्या माणसांना, माझ्या बर्‍याच मैत्रिणींना मी मिपाबद्दल सांगत नाही, माझे लेख ब्लॉगवर टाकून त्यांना वाचायला देते, त्याचं हे सगळ्यात मुख्य कारण आहे.

मिपावर लेकी-सुनांनी वावरावं असं खरोखर, मनापासून वाटत असतं तर हे झालं नसतं.

आज ना उद्या खादाडी सदर बदलेल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि त्याच खात्रीपोटी मी इथे लिहीलेलं आहे.

अदिती

भाग्यश्री's picture

22 Apr 2010 - 11:48 pm | भाग्यश्री

याबद्दल अतिशयच सहमत. सुरवातीला उत्साहाने मिपाबद्दल सांगितले गेले. पण नंतर मीच स्वत:हून सर्वांना सांगितले की मी काही आवडले तर पाठवीन तुम्हाला! (थोडक्यात तुम्ही नका जाऊ तिथे!)
कोणालाही, घरातील मोठ्या माणसांना सुचवण्यासारखे हे स्थळ राहीले नाही, केवळ अन केवळ मुखपृष्ठामुळे!

पक्या's picture

23 Apr 2010 - 12:39 pm | पक्या

घरातिल मोठी माणसे , मैत्रिणी हिंदी , इंग्रजी सिनेमे पहात नाहीत काय? इंटरनेट वर त्यांचा वावर नाही काय? अहो कितीतरी चांगल्या साईट्सवर जिथे जाहिराती असतात तिथे त्या जाहीरातीतील बायका कशाप्रकारच्या पोझेस मध्ये असतात हे न बघितलेला माणूस विरळाच.
मला तरी नाही वाटत की तात्यांनी मर्यादा ओलांडून चित्रे लावली आहेत.
कायतरीच मुद्दा काढता राव .
एनीवेज माझं तरी असंच मत आहे की खादाडि साठी खादाडी व्यतिरिक्त चित्रच नको. खादाडीचेच चित्र मोठे टाकावे.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

अनामिक's picture

22 Apr 2010 - 11:50 pm | अनामिक

वैयक्तिक तुमच्यासाठी तो प्रश्न नव्हताच. आणि माझी चारचौघां बद्दलची कॉमेंटही तुम्ही नमुद केलेल्या मासिकांबद्दल होती. मिपावरचे चित्र चारचौघात लाज आणणारे नसले तरी बहुतांशी वाचकांना खटकते आहे तेव्हा विचार करायला हरकत नसावी असे माझे म्हणणे होते.

>>>त्यापेक्षा कितीतरी भयंकर गोष्टींचा भडीमार विविध चॅनेल्स आणि चित्रपटांमधून चालू असतो.

मान्य, पण म्हणून एखाद्या पाकीटमाराने दरोडेखोराचं उदाहरण देऊन मी काही चूक केलीच नाही म्हणणे तुम्हाला पटेल का?

मी आधीही म्हंटलंच आहे की मी या प्रकाराकडे दुर्लक्ष करतो, कारण (तुमच्या प्रमाणेच) मिपावरील माझ्या आवडीचे काय ती गोष्ट मी घेतो आणि बाकीच्या गोष्टी सोडून देतो.

-अनामिक

Nile's picture

23 Apr 2010 - 12:23 am | Nile

अहो क्लिंटनसाहेब,

सोज्वळ नसली तरी चारचौघांमध्ये बघायला लज्जास्पद वाटेल तरी नक्कीच नसतात.

चार चौघांना लाज वाटली म्हणुनच तर इतके प्रतिसाद (विरोधाचे)आलेत ना?

त्यापेक्षा कितीतरी भयंकर गोष्टींचा भडीमार विविध चॅनेल्स आणि चित्रपटांमधून चालू असतो.

त्याला विरोध होत नाही?? त्यावर निर्बंध घालायला काही व्यवस्था नाही? हे म्हणजे रस्त्यावर येता-जाता उकिरडा दिसतोच मग आपल्या अंगणात कचरा असला तर काय बिघडलं असं आहे!

प्रकाश घाटपांडे's picture

23 Apr 2010 - 12:25 pm | प्रकाश घाटपांडे

पण मी तरी मिपाला कशाची गरज आहे आणि कशाची नाही याचा विचार करण्यापेक्षा मिपावरील माझ्या आवडीचे काय ती गोष्ट मी घेतो आणि बाकीच्या गोष्टी सोडून देतो

बरेच लोक असेच करतात. मिपा हे सात्विक विचारांना वाहिलेले संकेत स्थळ नाही. हे मिपाचा जन्म ज्यांना ठाउक आहे त्यांना सांगावे लागणार नाही पण नवीन लोकांना ते माहित नाही. तमाशाला येणारा वर्ग हा कधी किर्तनाला ही जातो किंवा उलट. तरी देखील किर्तन व तमाशा याचा एक सामान्य पणे वर्ग ठरलेला असतो. तमाशाला गेल्यावर मी सात्विक प्रसंग तेथे दाखवावेत असा आग्रह धरु शकत नाही,
मी मिपाला बदलण्याचा आग्रह करीत नाही त्या ऐवजी मी स्वतःत बदल करतो. अशा वेळी मी उपक्रमावर जातो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

वेताळ's picture

23 Apr 2010 - 9:39 am | वेताळ

अत्यंत योग्य प्रतिसाद व योग्य प्रश्न.
मिपावर यायला सांगायला योग्य वाटत नाही..
=))
एकदम विनोदी प्रतिसाद.

वेताळ

टुकुल's picture

23 Apr 2010 - 12:31 pm | टुकुल

एकदम बरोबर..
"अलिकडे माझ्या घरातल्या अनेक मोठ्या माणसांना, माझ्या बर्‍याच मैत्रिणींना मी मिपाबद्दल सांगत नाही, माझे लेख ब्लॉगवर टाकून त्यांना वाचायला देते, त्याचं हे सगळ्यात मुख्य कारण आहे. "

खुप हसलो.

--टुकुल

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Apr 2010 - 10:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

श्रावण, उत्तम प्रतिसाद. (काही प्रतिसाद आणि प्रतिसादक यांच्याकडे श्रावण दुर्लक्ष करतात, त्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे असे समजावे.)

आपल्यासारखाच विचार करणारे बरेच लोकं आहेत आणि ते आपल्याला जवळचे वाटतात हा विचार खरोखर सुखावह आहे.

याच मालिकेतलं (माझ्याकडून) दुसरं पुष्प मी 'लिझ माईट्नर' बद्दल लिहीणार होते. पण आता मेघना म्हणते तशी 'डायव्हर्सिटी' निर्माण करण्याची गरज पहिल्याच पुष्पातून दिसत आहे.

आत्ता, इथे कमी वेळात, नीट विचार न करता "असल्या चित्रांनी बायकांचा अपमान कसा होतो' हे लिहीत नाही. वेगळा धागाच काढता येईल. माझ्या आधी जमल्यास श्रावण, बिपिन, मुक्तसुनीत, चतुरंग, रेवतीताई ... किती नावं लिहू ... तुम्हीही लिहू शकता.

अदिती

जाता जाता: माधुरी दिक्षितने 'हम आप के ..' मधे बॅकलेस चोळी घालणे आणि राखी सावंतनेही कमी कपडे घालणे यात फरक असावा, असतो. तो जाणवत, कळत नसेल तर शब्द बापुडे केवळ वारा.

पक्या's picture

22 Apr 2010 - 10:59 pm | पक्या

आजची खादाडी समवेत इतर चित्रे हवीतच कशाला ? हे मला अजून पर्यत समजले नाही. म्हणजे बायकांऐवजी इतर चित्रे जरी लावली गेली तरी त्यांची गरज नाही असे मला वाटते. त्यापेक्षा खादाडीचा फोटोच जरा मोठा टाकला तर खादाडी छान एन्जॉय करता येईल. कधीतरी विरंगुळा म्हणून, विनोद म्हणून 'आजची खादाडी अमकी बरोबर; असे टाकले तर ठीक आहे. पण रोजच तेच नको वाटते.

>> पण जिथे पाहावं तिथे मुखपृष्ठावर, बिलबोर्डांवर तारुण्याने मुसमुसलेल्या व अंगप्रदर्शन करणाऱ्या मोहिनी दिसत राहातात. ही विसंगती कमी करण्यासाठी या लेखमालेचं प्रयोजन.
अरेरे चांगल्या लेखमालेच प्रयोजन करण्यासाठी इतक्या फुटकळ कारणाचा आधार घ्यावा लागला. त्यापेक्षा मुखपृष्ठावरिल चित्रांना विरोध दर्शवणारा वेगळा धागा काढायचा ना.
त्यामुळे झालय काय की चिनम्मा राहिली बाजूला आणी चर्चा वेगळीकडेच भरकटत चालली आहे. या पहिल्या लेखात तरी हेतू (कर्तबगार स्त्रियांच कर्तृत्व वाचकांसमोर आणणे) सफल झाला नाही.
आणि 'जिथे पाहाव तिथे' म्हणजे - आणखी कुठे अशी चित्रे लावली गेली. मला तर फक्त मुखपृष्ठावरच दिसतात अशी चित्रे. तात्यांच्या कालच्या एका लेखात आहे असे चित्र पण तात्या असा लेख रोज रोज नाही लिहीत.
जिथे पाहाव तिथे हा शब्दप्रयोग अतिशयोक्तीपूर्ण वाटतोय.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Apr 2010 - 11:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुन्हा एकदा: आधीचे करडे शब्द काढले असताना, आणि त्याबद्दल सुस्पष्ट खुलासा दिलेला असतानाही (मला) त्यावरून पुन्हा एकदा बोलल्याबद्दल आभार.

कोणत्याही गोष्टीसाठी काही तत्कालिक कारण असू शकतं. "फ्रान्झ फर्डीनांडची हत्या" या एकमेव कारणासाठी पहिलं महायुद्ध झालं नाही.

'जिथे पहावं तिथे' यावरून तुम्हाला मिपाबाहेरचं जग आठवलंच नाही? कमाल आहे.

अवांतरः चन्नम्मांविषयी एका साईटवरून माहिती वाचत होते तेव्हा 'अ‍ॅडब्लॉक'च्या फिल्टरमधे एक ओळ वाढवावी लागली! :-(

अदिती

पक्या's picture

22 Apr 2010 - 11:26 pm | पक्या

'पण जिथे पाहावं तिथे मुखपृष्ठावर, बिलबोर्डांवर तारुण्याने मुसमुसलेल्या व अंगप्रदर्शन करणाऱ्या मोहिनी दिसत राहातात. ही विसंगती कमी करण्यासाठी या लेखमालेचं प्रयोजन.'
हे करड वाक्य मला अजूनही माझ्या स्क्रिन वर दिसतय. आणि मी त्या वाक्याबद्दलच बोलत आहे. त्याआधी काय संपादन केले काय नाही मला माहित नाही. पुर्वग्रह दुषित प्रतिसादाबद्द्ल आपलेही आभार.

तात्कालिक कारण असू /नसू शकतं हा मुद्दा नाहीच. वेगळा धागा न काढल्याने मूळ हेतू बाजूस पडून चर्चा वेगळ्या वळणावर जात आहे हा मुद्दा. हे न समजल्याबद्द्ल आपली पण कमाल वाटतीये.

मिपाबाहेरचं जगात चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी आहेतच. तरीही त्याचा अर्थ जिथे पाहाव तिथे असा होतच नाही. शब्दप्रयोग अतिशयोक्तीपूर्ण आहेच.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Apr 2010 - 12:14 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पहिलाच प्रतिसाद अवांतर आल्यावर अवांतराचंही पीक आलं. सुरूवात मी केली नव्हती ... "बदल करा" असं सुचवूनही बदल केला गेला नाही. मला त्याच जाब विचारून काही फायदा नाही!

पक्याभाऊ, तोच धागा पण चर्चा कशावर होते आहे हे पहा, आणि मग पुन्हा एकदा विचार करा.

अदिती

पक्या's picture

23 Apr 2010 - 5:15 am | पक्या

>>पहिलाच प्रतिसाद अवांतर आल्यावर अवांतराचंही पीक आलं. सुरूवात मी केली नव्हती ... "बदल करा" असं सुचवूनही बदल केला गेला नाही. मला त्याच जाब विचारून काही फायदा नाही!
असं कसं म्हणू शकता? लेख लिहील्यावरच प्रतिक्रिया येणार ना?
एकदा लेख लिहिल्यावर सर्व तर्‍हेच्या प्रतिक्रिया स्विकारण्याची तयारी असायलाच हवी. मी सुरवात केली नव्हती हे म्हणणे बरोबर नव्हे. आणि पहिला प्रतिसाद अवांतर अजिबात वाटत नाहीये. जे तुमच्या लेखात आहे त्याच अनुषंगाने प्रतिक्रिया आली आहे. दोन वेगळे धागे असते तर चन्नमाची माहिती ठकळ्पणे नजरेत भरली असती.

आणि मी मराठी वर आजची खादाडी आणि आजची बायडी ही सदरे आहेतच कुठे? इथे आहेत म्हणूनच चर्चा वेगळ्या वळणावर गेली ना? त्यामुळे तुमचा वरील मुद्दा निकालात निघतो.
उगाच प्रतिसादाला प्रतिसाद म्हणुन नका लिहू ब्वा..मुद्दा खरोखर खोडता येण्यासारखा असेल तर खोडावा.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

विसोबा खेचर's picture

23 Apr 2010 - 8:10 am | विसोबा खेचर

दोन वेगळे धागे असते तर चन्नमाची माहिती ठकळ्पणे नजरेत भरली असती.

हा हा हा! चन्नम्मा हे केवळ निमित्त होतं, वाभाडे काढायचे होते ते मिपाच्या खादाडी सदराचेच! ;)

अर्थात, माझी आपली ही शंका बर्र का! :)

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

23 Apr 2010 - 12:38 pm | प्रकाश घाटपांडे

दोन वेगळे धागे असते तर चन्नमाची माहिती ठकळ्पणे नजरेत भरली असती.

सहमत आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

विसोबा खेचर's picture

22 Apr 2010 - 11:15 pm | विसोबा खेचर

एकंदरीत चर्चा वाचून करमणूक झाली..

चन्नम्मांच्या संदर्भात अधिक प्रतिसाद आले असते तर ते वाचायला अधिक आवडले असते..

परंतु अधिकाधिक प्रतिसाद हे मिपाच्या खादाडी सदराबद्दलच आहेत ज्यांचा ते सदर बदलण्यास तूर्तास तरी काहीही उपयोग होणार नाही!

असो,

तात्या.

स्वाती२'s picture

22 Apr 2010 - 11:24 pm | स्वाती२

आदिती, लेख आवडला. बाकी मिपा वरची चित्रे खटकली तरी शेवटी तो मालकांचा चॉईस असे म्हणून दुर्लक्ष करते झाले.

विसोबा खेचर's picture

22 Apr 2010 - 11:43 pm | विसोबा खेचर

बाकी मिपा वरची चित्रे खटकली तरी शेवटी तो मालकांचा चॉईस असे म्हणून दुर्लक्ष करते झाले.

सर्व प्रतिसादांमध्ये अत्यंत सेन्सिबल आणि वास्तववादी प्रतिसाद!

धन्यवाद स्वातीजी,

तात्या.

वाचक's picture

23 Apr 2010 - 1:14 am | वाचक

ह्या शब्दाला जे अनुल्लेखाने मारलय :) वा, क्या कहेने :)

अनामिक's picture

22 Apr 2010 - 11:51 pm | अनामिक

प्रकाटाआ

-अनामिक

सुरेखा पुणेकर's picture

23 Apr 2010 - 12:35 am | सुरेखा पुणेकर

माझाच प्रतिसाद का म्हनून उडीवला म्हने?? आनिबानी संपली नव्हं?

-- सुरेखा
कारभारी दमानं.....

Pain's picture

23 Apr 2010 - 1:21 am | Pain

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते असं आपण म्हणतो. भारतीय संस्कृतीत स्त्री ही देवीसमान आहे असंही म्हणण्याची पद्धत आहे. पण प्रत्यक्षात दिसायला काय दिसतं? जाहिरातींतून, सिनेमांतल्या आयटम गाण्यांतून, टीव्हीवरच्या सीरियल्समधून, आंतर्जालावर ठिकठिकाणी स्त्रीचं क्षणभंगूर रूप केवळ आपल्या डोळ्यांसमोर येतं. शिवाजीला संस्कार देणारी जिजाबाई अधूनमधून जयजयकार करण्यासाठी इतिहासाच्या पुस्तकात दडून राहाते. पण जिथे पाहावं तिथे मुखपृष्ठावर, बिलबोर्डांवर तारुण्याने मुसमुसलेल्या व अंगप्रदर्शन करणाऱ्या मोहिनी दिसत राहातात

नॉर्मल स्त्रिया आणि या १०% स्पेशल ( हल्ली abnormal ला special म्हणतात )या दोन वेगळ्या आहेत आणि दोन्हीचे महत्व/ उपयोग वेगळे. घरात/ कामकाजाच्या ठिकाणी नॉर्मल आणि चित्रपट, मुखपृष्ठ वगैरे ठिकाणी या १०%.

Pain's picture

23 Apr 2010 - 1:32 am | Pain

अवांतर. . :

इतर स्त्रियांचे सौंदर्य आणि त्याचा उदो उदो एवढा का खटकतो ? कोलहयाला द्राक्षे आंबट अस तर नाही ना ?
शालेय शिक्षणात अयशस्वी ठरलेले शिक्षण पद्धतीला दोष देतात आणि दिसायला यथा तथा असलेले लोक मनाच्या सौंदर्याचे गुणगान गातात !

Pain's picture

23 Apr 2010 - 1:34 am | Pain

चन्नम्मेचा वारसा चालवू पहाणार्‍यांपैकी मी एक,

म्हणजे नक्की काय करता ?

Pain's picture

23 Apr 2010 - 1:40 am | Pain

अशा प्रकाराच्या फोटोंना सरसकट विरोध नसून नेहमी नेहमी असेच फोटो बघावे लागणे याला विरोध आहे. स्त्री कडे केवळ याच प्रकारे बघणे हे नामंजूर आहे असे काहीसे वाटले लेख वाचून

पुन्हा गल्लत. नट्यान्साठि एक दृष्टिकोन आणि सभ्य स्त्रियांसाठी वेगळा !

सुरेखा पुणेकर's picture

23 Apr 2010 - 1:53 am | सुरेखा पुणेकर

येका दमात लिवं की रं...सगळं!!
असल्या फटाकड्या पोरी लावायल आमाला तरी काय आबजेक्स्नान नाय!
तात्या लै वर्सांपासून लावतोया..
तात्या वैनी छान आहे म्हना आनि सोडून द्या की... पुर्वी करायचा तसं

-- सुरेखा
कारभारी दमानं.....

Pain's picture

23 Apr 2010 - 11:19 am | Pain

विसोबा खेचर, क्लिंटन, टारझन आणि वेताळशी सहमत.

Pain's picture

23 Apr 2010 - 2:10 am | Pain

प्रकाश घाटपांडे: ज्या उत्त्तान स्त्रियांचे फोटो मुखपृष्ठावर असतात त्यांना स्वतःला या विषयी काय वाटत?

स्त्रिया नव्हे, तर फोटो उत्तान असु शकतात. मिपावर मी सगळ्यात नविन सभासद असेन पण आजपर्यन्त एकहि उत्तान फोटो पहिलेला नाहिये.

प्रकाश घाटपांडे's picture

23 Apr 2010 - 10:45 am | प्रकाश घाटपांडे

स्त्रिया नव्हे, तर फोटो उत्तान असु शकतात.

हॅहॅहॅ! शाळेतली प्वॉर तमाशाला जायची तव्हा आमच्या देव गुरुजींणा ते आजिबात आवडायच नाई. ते म्हणायचे अरे सकाळी सकाळी मिश्री लावताना यांची तोंड बघा !वकायला येईन! पण प्वॉर तमाशा बघायची सोडताय होय?
सौंदर्य, बुद्धीमत्ता या बाबी माजाच्या आहेत. प्रमाणीत भाषेत उन्माद म्हणू या! मिपावर तो आहे
तुमची नजर च वाईट आमच्या मनात तसल काही नाही अस ही म्हण्ता येत. सेक्स इज बिटविन युअर आईज नॉट थाईज असा काहीसा सुविचार विंग्रजीत आहे अस म्हंतात ब्वॉ! बाई अंगभर वस्त्र घातलेली पण नजरा तिला विवस्त्र करणार्‍या असु शकतात ते कस मोजणार? ज्याच त्याला ठाउक! असो
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

Pain's picture

23 Apr 2010 - 11:39 am | Pain

सौंदर्य, बुद्धीमत्ता या बाबी माजाच्या आहेत. प्रमाणीत भाषेत उन्माद म्हणू या! मिपावर तो आहे

माज ? ते नसणार्यान्ची असुया नाही का ?
आणि चान्गल्या गोष्टिन्चा रास्त अभिमान असावाच.

बाई अंगभर वस्त्र घातलेली पण नजरा तिला विवस्त्र करणार्‍या असु शकतात ते कस मोजणार?

नजरा कशाला मोजायच्या ? तुम्ही योग्य वागले की जबाबदारी सम्पली.

सभ्य भाव आणि सभ्य कपडे असणार्या फोटोला उगाच विरोध नको.
विरोधका यापेक्शा "पोचलेल्या" गोष्टीन्ची तारिफ करताना दिसतात...ज्याने एकही पाप केलेले नाही त्यानेच दगड मारावा !

Pain's picture

23 Apr 2010 - 3:56 am | Pain

फोटोबद्दल आगपाखड करणार्‍यांपैकी किती स्त्रिया ब्यूटी पार्लर, accessories आणि सौंदर्यप्रसाधनांपासून लाम्ब राहतात ?

II विकास II's picture

23 Apr 2010 - 8:13 am | II विकास II

हॅ हॅ हॅ,
तुम्ही नवीन आहात, समजेल हळुहळु.
----

प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

Manoj Katwe's picture

23 Apr 2010 - 6:05 am | Manoj Katwe

कधीतरी ठीक आहे
कधीतरी असे फोटो लावणे ठीक आहे,
पण रोज रोज असे नसावे असेच म्हणतो.
आनी खरोखर लावन्यासरखे चांगले फोटो खुप आहे. ह्या खादाडी मध्ये फ़क्त स्त्रीयांचेच फोटो नसावेत.
बाकि सर्वांचा (लेकी - सुना) विचार करुनच योग्य निर्णय घेण्यात यावा ही विनंती.

विसोबा खेचर's picture

23 Apr 2010 - 7:05 am | विसोबा खेचर

पेनरावांनी एकच प्रतिसाद थोडा विस्तृत लिहिला असता तर बरे झाले असते..

असो,

लौकरच या धाग्यातील चन्नम्मांविषयी प्रतिसाद-मजकूर वगळता मिपाचे मुखपृष्ठ, खादाडी संदर्भातले प्रतिसाद/मजकूर कदाचित अप्रकाशित केले जातील..

तात्या.

श्रावण मोडक's picture

23 Apr 2010 - 10:21 am | श्रावण मोडक

अप्रकाशित करू नका. ते स्वतंत्रपणे बाजूला काढून एक धागा करून ठेवा, ही विनंती. आमची मते काय होती, हे आम्हालाही भविष्यात कळलं पाहिजे. रस्ता चुकलो तर त्यासाठीचा पुरावा इथंच असलेला उत्तम.
या लेखातील करड्या रंगातील मजकूर त्या धाग्यावर सुरवातीला घेऊन खादाडी विषयाशी संबंधित सर्व प्रतिसाद तेथे खाली घेता येतील अशी तांत्रीक करामत असेलच. किंवा धाग्याचे डुप्लिकेशन करून मग संपादन करता येत असेल. अर्थात, हे माझे अंदाज आहेत. तांत्रीक करामती नीलकांत वगैरे मंडळीच सांगू शकतील.

भय्या's picture

23 Apr 2010 - 9:19 am | भय्या

लेख अत्यंत विस्कळित आहे. माननिय आदितीना जे काही सांगायचे आहे ते एका मुद्याला धरून नाही. बाकी, माहिती चांगली जमली आहे. ही माहिती सांगत असताना एकदम मिपा मुखपृष्ठावर का घसरल्या? कदाचित प्रतिक्रिया देताना लोकांनी राणी चेन्नम्मावर कमी लक्ष दिले. असो,
ख्ररं म्हणजे अशी चित्रे असणे यात मला काहीही गॅर वाटत नाही.

अरुण मनोहर's picture

23 Apr 2010 - 11:46 am | अरुण मनोहर

हा सगळा उहापोह वाचून माहिती असलेलीच एक गोष्ट पुन्हा ठळकपणे समोर आली.
बायका अतिशय संवेदनशील असतात. म्हणून काचेचे भांडे समजून त्यांच्याशी वागावे.

उपसिद्धांत- बायका अतिशय संवेदनशील असतात, म्हणूनच त्या वेदनाशील देखील असतात. कोणाला कशातून वेदना होतील काही सांगता येत नाही.

अवांतर- पुरुष बरे, (निगरगट्ट असल्याने?) सुखी असतात.
भावनेने विचार न करता तर्काने विचार करणेच उत्तम, असे त्यांना वाटत असते.

प्रकाश घाटपांडे's picture

23 Apr 2010 - 12:45 pm | प्रकाश घाटपांडे

सर्वसाधारण मत म्हणुन सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.