मे महिन्यातला दुसरा रविवार मातृदिन. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते असं आपण म्हणतो. भारतीय संस्कृतीत स्त्री ही देवीसमान आहे असंही म्हणण्याची पद्धत आहे. पण प्रत्यक्षात दिसायला काय दिसतं? जाहिरातींतून, सिनेमांतल्या आयटम गाण्यांतून, टीव्हीवरच्या सीरियल्समधून, आंतर्जालावर ठिकठिकाणी स्त्रीचं क्षणभंगूर रूप केवळ आपल्या डोळ्यांसमोर येतं. शिवाजीला संस्कार देणारी जिजाबाई अधूनमधून जयजयकार करण्यासाठी इतिहासाच्या पुस्तकात दडून राहाते. पण जिथे पाहावं तिथे मुखपृष्ठावर, बिलबोर्डांवर तारुण्याने मुसमुसलेल्या व अंगप्रदर्शन करणाऱ्या मोहिनी दिसत राहातात. ही विसंगती कमी करण्यासाठी या लेखमालेचं प्रयोजन. निदान पहिलं पुष्प तरी. फक्त पहिलं पुष्प अशासाठी म्हटलं की एका अर्थाने हा अभिनव प्रयोग आहे. कोणीतरी एकीने/एकाने आपले विचार मांडण्यापेक्षा, व एक काथ्याकूट करून सोडून देण्यापेक्षा मिपावर येणाऱ्या सुजाण वाचकांच्या व लेखकांच्या मनात स्त्रियांबद्दल काय भूमिका आहे हे या सदरातून समोर यावं अशी माझी इच्छा आहे. स्त्रियांचा केवळ शरीरापलिकडे विचार करणार बरेच लोकं असतील, त्यांनी पुढची पुष्पं गोवावीत असं आवाहन. त्यातला समान धागा जिवंत राहील ही आशा आहे.
लहानपणी आईकडून गोष्टी ऐकताना एक गोष्ट सांगताना आईच्या डोळ्यात चमक दिसायची. ती गोष्ट आता आठवत नाही पण आईच्या डोळ्यांत दिसलेला अभिमान आणि ती चमक विसरणं शक्य नाही. ती गोष्ट होती चन्नमेची, कित्तूरची राणी चन्नमा! १७७८ साली जन्मलेली चन्नमा, भारतातली सगळ्यात पहिली स्त्री स्वातंत्र्यसैनिक. जेव्हा पुण्यात पेशवे राज्य करत होते, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हा चन्नमा ब्रिटीशांशी लढा देत होती.
काकती नावाच्या एका छोट्या गावात जन्मलेल्या चन्नमेला लहानपणीच लोकं तिच्या बहादुरीमुळे ओळखायचे. लहानपणीच घोड्यावर बसणे, तलवार चालवणे, तिरंदाजी अशा त्याकाळच्या युद्धकलेतच्या महत्त्वाच्या अंगांचे शिक्षण तिने घेतले. वयात आल्यावर कित्तूरचे राजा मल्लसर्जा यांच्याशी तिचा विवाह झाला. राज्यात सर्वकाही सुरळीत सुरू असताना इंग्रजांचा, आपला देश घशात घालण्याचा उद्योग सुरूच होता. याच नीतीचा भाग म्हणून कित्तूरच्या राजांकडेही इंग्रजांचे तैनाती सैन्य होतं; (... दोन शतकांनंतर हिटलरने ऑस्ट्रीया, झेकोस्लोवाकियाच्या बाबतीत जे केलं साधारण तसंच! आजच्या काळात परराष्ट्रखातं दुसर्या देशाच्या हातात जाण्यासारखंच ). राजा मल्लसर्जा यांचं १८१६ मधे निधन झाल्यावर परिस्थिती थोडी बदलली. चन्नमेने आपल्या एकुलत्या एका मुलाचा राज्याभिषेक करून दिला. पण दुर्दैवाने दिवस फिरणार होती. तिच्या मुलाचाही १८२४ साली मृत्यु झाला आणि इंग्रजांना कित्तूरचं राज्य घशात घालण्याची कधीपासून हवी असलेली संधी मिळाली.
पण चन्नमा इंग्रजांना बधली नाही. तिने शिवलिंगप्पा याला दत्तक घेऊन त्याच्या राज्याभिषेक केला. ब्रिटीशांनी (झाशीच्या संस्थानाच्या बाबतीत केलं तेच) दत्तकपत्र नामंजूर करून कित्तूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. चन्नमाला बाहेरच्या लोकांचा हा प्रयत्न मान्य नसल्यामुळे तिने लढण्याची पूर्ण तयारी केली. ब्रिटीशांच्या प्रचंड फौजफाट्याला न घाबरता तिने बंडाळी करून स्वत:चं सैन्य उभं केलं. २३ ऑक्टोबर १८२४ च्या लढाईत संस्थान खालसा करणारा, धारवाडचा तेव्हाचा कलेक्टर थॅकरे, चन्नमेच्या सैन्याने मारला. चन्नमेची ही लढाई मात्र फार काळ चालली नाही. दीड महिन्यांच्या आतच, ३ डिसेंबरला चन्नमा पकडली गेली. कित्तूरचे राज्य बेळगाव जिल्ह्याला जोडले गेले. आणि युद्धबंदी बनवून चन्नमेला बैलहोनंगळच्या किल्ल्यात पाठवलं आणि तिथेच तिचा २१ फेब्रुवारी १८२९ साली मृत्यु झाला.
बेळगावपासून ५० किमीवर कित्तूरचा किल्ला आजही चन्नम्मांची कहाणी सांगत उभा आहे. आपल्या हक्कासाठी, आपल्या जनतेसाठी लढणारी चन्नमा ही आज फक्त कर्नाटकातच नाही तर सगळ्यांसाठीच वीरश्रीचा एक मापदंड ठरली आहे. चन्नम्मेचा वारसा चालवू पहाणार्यांपैकी मी एक, आज तिला मानाचा मुजरा करते.
(सर्व माहिती आंतरजालावरून घेतली आहे.)
प्रतिक्रिया
22 Apr 2010 - 3:16 pm | विसोबा खेचर
असे मुळीच नाही...
आणि तेवढ्यापुरतीच राहील असे वाटते! मिपाच्या खादाडी सदरात रोजच्या खाद्यपदार्थासोबत आपल्या भाषेत सांगायचे तर 'फिगर दाखवणार्या' एखाद्या बाईचेच चित्र असेल असे तूर्तास तरी धोरण आहे..
छोटेखानी लेख छान.. चन्नम्मांना दंडवत..!
हेच म्हणतो.. उत्तम सदर..शुभेच्छा!
तात्या.
22 Apr 2010 - 3:45 pm | जयंत कुलकर्णी
त्यात्या,
सध्या तुमचे धोरण अशी चित्रे टाकणे हे आहे हे समजू शकते. एक गोष्ट समाधानाची आहे की "सध्यातरी" हा शब्द आशादायी आहे. मला वाटते की ज्या प्रमाणे एखाद्याने आपल्या धुम्रपानाविषयी आक्षेप घेतल्यावर आपण सुसंस्कृत माणसे धुम्रपान थांबवतो तोच विचार करून मला वाटते आपण धोरण ठरवावे. आणि या सर्व स्त्रिया मिपासाठी लिहीताएत, धडपडताएत, हे बघता मला वाटते....त्यांचीही बाजू समजून घेतली पाहिजे. आणि मला वाटते कुठ्ल्याही गोष्टीकडे स्त्रियांचा दॄष्टीकोन हा ही महत्वाचा आहे कारण आज त्या या समाजाचा महत्वाचा घटक आहेत.
बघा पटते का.....
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
22 Apr 2010 - 4:04 pm | विसोबा खेचर
जयंतराव, आपल्या प्रतिसादावर विचार करेन..
धन्यवाद,
तात्या.
22 Apr 2010 - 3:31 pm | यशोधरा
अदिती, खरं आहे, मिपाच्या मुखपृष्ठावरचे हे प्रकार मला सुरुवातीपासूनच खटकले आहेत, पण सांगून उपयोग होईल असे वाटले नव्हते, सबब, काही बोलले नव्हते.
आई, देवता असे मोठे शब्द वापरले नाहीत तरी चालेल, पण निदान प्रदर्शनीय वस्तू असल्यासारखी वागणूक मिळाली नाही, तरी खूप झाले!
22 Apr 2010 - 11:55 pm | Nile
सहमत. मला तरी सुरुवातीपासुन हे अत्यंत बालीश वाटत आलेलं आहे. मुखपृष्ठावर तर मी कधीही जात नाही, ज्या लोकांनी आपल्या खरडवहीत 'हीच्यावर आमचा जीव' अशी चित्रं लावली आहेत ती मी ब्लॉक केली आहेत. असो.
संपुर्ण चर्चा वाचली. मला वाटतं मुद्दा सरळ-साधा-सोपा आहे. मिपाच्या वृद्धीत अनेकांचा हातभार आहे हे कुणीही अमान्य करु शकत नाही. त्यामुळे या अनेकांचे मिपाशी नाते आहे. त्यांना जर मिपाचे मुखपृष्ठ हे एखाद्या आंबटशौकिन साईटच्या मुखपृष्ठासारखे भासत असेल आणि त्याबद्दल त्यांनी खंत्/आक्षेप्/विरोध व्यक्त केला तर तो योग्यच.
अर्थात, जर मालकांना 'मिपा चा मालक मी,मला काय वाट्टेल ते करेन' अशी भुमिका घ्यायची असेल तर काय बोलणार?
ज्यांना तसली चित्रं पहावयाची आहेत त्यांनी त्या प्रकारच्या साईटवर जावे. मिपा ही त्या प्रकारची साइट नाही (असल्यास कृपया तसा खुलासा करावा) म्हणुन हा विरोध आहे हे कळणे इतके का अवघड आहे?
23 Apr 2010 - 8:31 pm | दिपाली पाटिल
यशोधराशी अगदी सहमत...खादाडीचे फोटो ठीक आहेत...खरंतर जेव्हढी स्पेस नट्यांच्या फोटोंसाठी वाया जाते आहे तिथेच जर मिपाकरांच्या खादाडीचे फोटो छान मोठे टाकले तर...आणि या नट्या काही स्पेशल नाहीयेत की त्यांची ओळख करून देण्याने मिपाला काही फायदा होइल...
दिपाली :)
22 Apr 2010 - 3:37 pm | विसोबा खेचर
लेखिकेने मूळ लेख संपादित केल्यामुळे हा माझा पुन्हा नवा प्रतिसाद -
सहमत आहे.. आणि गंमत म्हणजे जाहिरातींतून, सिनेमांतल्या आयटम गाण्यांतून, टीव्हीवरच्या सीरियल्समधून, आंतर्जालावर आपले असे क्षणभंगूर रूप दिसेल अशी छायाचित्र/पोझेस देणार्याही स्त्रियाच असतात..!
खरं आहे.. आज अश्या अनेक मोहिनी आपली छायाचित्रे निरनिराळ्या पोजेसमध्ये अगदी हौसेने किंवा व्यवसाय म्हणून किंवा संभाव्य व्यवसायाकरता स्वत:च्या खर्चिक पोर्टफोलियोमधून देत असतात..!
असतातही/नसतातही! मी व्यक्तिश: मुंबैच्या रेडलाईट विभागात अशी सर्व प्रकारची माणसं खूप जवळून पाहिली आहेत, तेथील स्रियाही पाहिल्या आहेत.. आणि त्यांच्या शरीरापलिकडच्या त्यांच्या आयुष्यात जवळून डोकावायचा प्रयत्न केला आहे..
हेच म्हणतो.. उत्तम सदर..शुभेच्छा!
छोटेखानी लेख छान.. चन्नम्मांना दंडवत..!
तात्या.
22 Apr 2010 - 3:59 pm | Dhananjay Borgaonkar
+१
तात्यांशी सहमत.
आजची खादाडी या सदराचा उगाचाच पराचा कावळा केला आहे.
बाकी उपक्रम उत्तम.
23 Apr 2010 - 12:21 pm | समंजस
तात्यांशी बराचसा सहमत!!!
मुखपृष्ठावर रोजच्या खादाडी सोबत असलेल्या नटींच्या छायाचित्राबांबत टोकाचा आक्षेप घेणे हे मला तरी तर्क संगत वाटत नाही. या नट्यांची सार्वजनीक असलेली आणि त्या नट्यांनी स्वतः हून दिलेली हि छायाचित्रे आहेत. त्यावर कोणी दुसर्यांनीच आक्षेप घेणे किंवा ह्या छायाचित्रांमुळे स्त्रीत्व धोक्यात येतं, स्त्रीची प्रतिमा डागाळते हे म्हणणे म्हणजे पुर्णपणे टोकाची भुमिका घेणे आहे.
तसं तर ह्या वादाला/विषयाला अंत नाही आणि ह्या विषयाची व्याप्ती सुद्धा मोठी आहे पण फक्त मिपा संबंधीत बोलायचं झाल्यास, ह्या खादाडी+नटींची चित्रे मुखपृष्ठावर टाकण्यात काही वावगं नाही असं माझं स्वतःच मत आहे. मिपा हे संकेतस्थळ एखाद्या गंभीर/शैक्षणीक/विशिष्ट वय-वर्ग यांच्याकरता काढलेलं आहे असं मला तरी वाटत नाही (चु.भु.घे.दे.). कित्येक सदस्यांच्या प्रतिसादातून हे बघण्यात आलंय की, मिपावर येण्याचा त्यांचा उद्देश हा मनोरंजन करणे, वेळ घालवणे, कामाचा ताण हलका करणे आहे आणि तशीच मिपा ची प्रतिमा आहे (काही वेळेस एखाद्या गंभीर विषयावर चर्चा होतात तो भाग वेगळा).
तात्यांनी सुरु ठेवलेलं हे सदर सुद्धा अश्याच प्रकारात मोडतं असं माझं तरी मत आहे. हे सदर सुरू करण्यामागे, स्त्रीत्त्वाचा अपमान करणे किंवा स्त्रियांची प्रतिमा डागाळणे हा उद्देश आहे असं मला तरी वाटलेलं नाही.
तात्यांना दक्षिणेतल्या नट्या आवडतात यात काय वाईट?? त्याबद्दल तात्या उघडपणे बोलतात यात काय वाईट?? आणि वर उल्लेख केल्या प्रमाणे मिपा चं मन मोकळं स्वरूप लक्षात घेता असं एखादं सदर मिपा वर असल्यास त्यामुळे स्त्रीत्त्वाचा अपमान किंवा स्त्रियांची प्रतिमा डागाळणे(शोभेच्या बाहूल्या समजणे) वगैरे कसं काय होउ शकतं???
मराठी/हिंदी/इंग्रजी आणि इतर भाषिक वर्तमानपत्रे आणि त्यांच्या त्या रविवार पुरवण्या. गृहशोभिका, सोसायटी, फेमिना आणि तत्सम खास स्त्रीयांकरीता काढलेली मासिके, दिवाळी अंक(जी कुटुंबात सगळ्यांकडनं आवडीने वाचली जातात) त्या बद्दल काय म्हणणे आहे ???
अवांतरः
(स्त्रिया फक्त शोभेच्या बाहुल्या नाहीत हे खरं आहे. हे सगळ्यांनाच मान्य आहे.
तसंच हे सुद्धा खरं आहे की एखादी स्त्री ही कुठल्या व्यवसायात आहे यावर तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन असतो जसं की, सिनेमा/फॅशन/वेश्या/मॉडेलींग/निर्देशक/अंतराळवीर/राज्यकर्ता/गुहिणी/साध्वी.
त्यामुळे कुठल्या स्त्री कडे कसं बघावं हा भेद नक्कीच राहणार....)
22 Apr 2010 - 3:37 pm | निखिल देशपांडे
लेखमालेमागचे विचार उत्तम..
पहिले पुष्प सुद्धा छान...
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
22 Apr 2010 - 3:49 pm | बिपिन कार्यकर्ते
उत्तम विचार... पटले.
लेखमाला यावी असेच वाटते. कोणी एका/कीनेच लिहावे असे नाही. ज्याला जमेल त्याने लिहावे.
बिपिन कार्यकर्ते
22 Apr 2010 - 4:35 pm | टारझन
स्त्रीची प्रतिमा केवळ खादाडी कॉलम पाहुन ठरते ? =)) =)) =))
किती घोर अपमान आहे स्त्री चा ?
22 Apr 2010 - 4:48 pm | बिपिन कार्यकर्ते
हाय कम्बख्त, तेरेकू समझ्याही नही.... असो.
मोठे व्हा!!!© श्रावण मोडक.
(ह. घेणे, आमचा विमा नाहिये.) ;)
बिपिन कार्यकर्ते
22 Apr 2010 - 3:50 pm | नितिन थत्ते
अतिशय उत्तम लेख. आणि उपक्रमही.
काय आहे!!! एकदा देवतेचा दर्जा दिला आहे असे म्हटले की कुणी सामाजिक दर्जाविषयी बोलू लागलं की त्याला ते देवता वगैरे सांगून गप्प करता येतं. प्रॉब्लेमच कुठे आहे? इथे तर देवतेशी तुलना केली आहे असे म्हणता येते.
अनेकदा 'त्या' ललनांचा स्वतंत्र म्हणून उदोउदो केला जातो. स्त्रीमुक्तीक्षेत्रात काम करणार्यांच्या दृष्टीने मात्र त्यांना मिळालेलं 'भोगवस्तू बनण्याचं स्वातंत्र्य' त्यांनी वापरलेलं असतं. ते स्वातंत्र्य तिला पूर्वीही होतंच. आणि ते काही माणूस म्हणून राहण्याचं स्वातंत्र्य नव्हे.
अजून येऊद्या.
नितिन थत्ते
23 Apr 2010 - 12:29 pm | प्रकाश घाटपांडे
यावर अधिक भाष्याची गरज आहे. बाकी सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
22 Apr 2010 - 4:09 pm | टारझन
आमच्या मनात (जनरलीसुद्धा) स्त्रीयांविषयी खुप आदर आहेच .. म्हणुनच की काय कुठल्या मुखपृष्ठावर जर मादक-वगैरे स्त्रीचं चित्र लावलं म्हणजे आदर कमी होतो किंवा स्त्री ची "सरसकट" विटंबणा होते इत्यादी विचार हस्यास्पद वाटतात (हसुन घेतो =)) )
फक्त करडी वाक्यच वाचुन पुढचा लेख वाचण्याची गरज नाही हे लक्षात आल्याने तेवढंच वाचुन प्रतिसाद दिला आहे :)
लेख केवळ पुर्वग्रहदुषीत वाटला आणि केवळ कोणाला दोष देणे आणि त्या दोषांचं उदात्तीकरण करणारा वाटला
आता काही प्रश्न :
१. राखी सावंत , कश्मिरा शाह , किंवा अजुन कोण स्वतःहुन एक्स्पोज करुन प्रसिद्धीची हाव असणार्या स्त्रींना बहिणीच्या किंवा अजुन कोणत्या आदरार्थी भावनेने पाहिलं आहे ? किंवा त्यांची तशी लायकी आहे असे आपणास वाटते का ?
२. मुखपृष्ठावर जी चित्र लावली जातात , ती लावणार्यांनी त्या स्त्री ला धमकावुन फोटो काढुन इथे लावली आहेत काय ? किंवा त्या स्त्रीला आपली पोस्टर्स अशी प्रसिद्ध होण्यापासुन कोणतं ऑब्जेक्शन आहे काय ?
३. एवढंच ऑबजेक्शन असणार्यांनी चित्रपटांवर बहिष्कार टाकला आहे काय ? तिकडे तर फुल्ल व्हिडिओ असतो :) नसेल तर मग उगाच वांझोटी चर्चा करण्यात काही पाईंट वाटत नाही.
दोन क्षण साईट वर येऊन आम्ही जे काय चाल्लय त्याची मजा घेतो. आणि खरंच सांगायचं झालं तर त्या सो कॉलड आयटम ऐवजी फक्त खादाडीकडे आमचं लक्ष जातं ... उगाच कोणत्याही संबंध नसलेल्या स्त्रीयांना आपुन ज्यास महत्व देत नाही. :)
असो .. वेळात वेळ काढुन प्रतिसाद दिल्याबद्दल मी स्वतःचे आभार मानतो आणि माझे वैयक्तिक भाषण "संपवतो" अर्थात शेवटचा प्रतिसाद. :)
-(आई वर मनापासुन प्रेम करणारा) टारझन
22 Apr 2010 - 4:15 pm | विसोबा खेचर
असो.. ;)
तात्या.
22 Apr 2010 - 4:15 pm | बिपिन कार्यकर्ते
काही तरी गल्लत होते आहे शेठ... मला वाटते अशा प्रकाराच्या फोटोंना सरसकट विरोध नसून नेहमी नेहमी असेच फोटो बघावे लागणे याला विरोध आहे. स्त्री कडे केवळ याच प्रकारे बघणे हे नामंजूर आहे असे काहीसे वाटले लेख वाचून. असो.
बिपिन कार्यकर्ते
22 Apr 2010 - 4:17 pm | नितिन थत्ते
असेच म्हणतो.
नितिन थत्ते
22 Apr 2010 - 4:24 pm | टारझन
बिपीन आणि नितिन काकांशी सहमत आहे.
-(असेच म्हणतो) बेचैनलाडू
( हा प्रतिसाद लिहीण्यामागचं प्रयोजन योग्य वेळ आली की स्पष्ट करु :) )
22 Apr 2010 - 4:27 pm | कुंदन
बिपिन भौंशी सहमत.
23 Apr 2010 - 9:22 pm | पर्नल नेने मराठे
कुन्द्या भौंशी सहमत.
चुचु
22 Apr 2010 - 4:30 pm | II विकास II
>> मला वाटते अशा प्रकाराच्या फोटोंना सरसकट विरोध नसून नेहमी नेहमी असेच फोटो बघावे लागणे याला विरोध आहे.
फायरफॉक्स मध्ये काही अॅडऑन आहेत, ज्याच्या सहाय्याने फोटो प्रतोबधित करता येतात. आम्ही मटा वाचताना तेच करतो.
सार्वजनिक संकेतस्थळ असल्याने कोणाला आवडणार, कोणाला नाही.
आपला मात्र तात्याला पाठींबा.
>>लेख केवळ पुर्वग्रहदुषीत वाटला आणि केवळ कोणाला दोष देणे आणि त्या दोषांचं उदात्तीकरण करणारा वाटला
मलाही असेच काही वाटते आहे, असो.
22 Apr 2010 - 4:40 pm | यशोधरा
मला वाटते अशा प्रकाराच्या फोटोंना सरसकट विरोध नसून नेहमी नेहमी असेच फोटो बघावे लागणे याला विरोध आहे.
+१. पतेकी बात!
22 Apr 2010 - 4:46 pm | स्वाती दिनेश
अशा प्रकाराच्या फोटोंना सरसकट विरोध नसून नेहमी नेहमी असेच फोटो बघावे लागणे याला विरोध आहे. स्त्री कडे केवळ याच प्रकारे बघणे हे नामंजूर आहे असे काहीसे वाटले लेख वाचून,
हेच म्हणायचे आहे.
स्वाती
22 Apr 2010 - 7:01 pm | वाहीदा
लिफाफा अगर इतना घटीया होगा, तो मजमून क्या होगा ??
अशी समजूत नाही का होत ??
माननिय तात्या,
आता असे म्हणू नका की अश्या लोकांना मी फाट्यावर मारतो :-(
एक समजत नाही असे फालतू फोटो लावायची मिपा व्यवस्थापनाला गरज च काय ? :/ कित्ती तरी छान सुबक सुसंकृत लेख मालिका मिपा वर येतात
गणपा सारखेच सुंदर खादाडी लिहणारे मिपावर कितीतरी आहेत खादाडी ला साजेशी अशी चित्रे ही नेट वर उपलब्ध नाहीत का ??
ती खादाडी ज्या प्रदेशातून आहेत त्या प्रदेशाची निसर्ग रम्य चित्रे ही व्यवस्थापन जर मनावर घेइल तर टाकू शकतो. :)
जर कोणी आपल्या आईवर जिवापाड प्रेम करतो याचा अर्थ तो प्रत्येक स्त्री ला आदरानेच वागवितो असे नाही होत. 8}
Is there any need to remind people you need to have respectable outlook towards woman ?? That is part of Cultural Upbringing Sir. It is Part of a Basic Ethics.
Tatya , That does not mean you are not Ethical But you need to show it in your action that you do understand our concern
We expect you to take take right action else wrong peole will follow your footstep which will lead to take un-due advantage of the Policy.
@ आदीती - सुंदर लेख
~ वाहीदा
22 Apr 2010 - 8:47 pm | shweta
हम्म्म...... :)
22 Apr 2010 - 4:21 pm | इंटरनेटस्नेही
सहमत...
24 Apr 2010 - 2:14 am | डावखुरा
टार्या....भारीच टोला हाण्लास रे....
आपुन तर टारुचे ,तात्याचे समर्थक हाये भॉ..."राजे!"
22 Apr 2010 - 4:18 pm | इंटरनेटस्नेही
तात्यांशी सहमत.
22 Apr 2010 - 4:18 pm | मेघना भुस्कुटे
उत्तम उपक्रम. भर घालण्याचा प्रयत्न करीन.
---
एक सुचवणी: कर्तृत्ववान स्त्रियांचा आणि त्यांच्या कामाचा परिचय करून देणे ही उत्तम कल्पना. पण हा उपक्रम तेवढ्यावरच थांबू नये. 'स्त्री' असण्यासोबत कोणकोणत्या गोष्टी आयुष्यात न मागता येतात - यांत सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टींचा समावेश आहे, त्याकडे आपण कसं पाहतो, त्यावर मात कशी करतो / त्यांच्याशी जमवून कसं घेतो या आणि अशा गोष्टींवरही लिहिलं जावं, असं वाटतं
22 Apr 2010 - 4:22 pm | बिपिन कार्यकर्ते
एक सुचवणी: कर्तृत्ववान स्त्रियांचा आणि त्यांच्या कामाचा परिचय करून देणे ही उत्तम कल्पना. पण हा उपक्रम तेवढ्यावरच थांबू नये. 'स्त्री' असण्यासोबत कोणकोणत्या गोष्टी आयुष्यात न मागता येतात - यांत सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टींचा समावेश आहे, त्याकडे आपण कसं पाहतो, त्यावर मात कशी करतो / त्यांच्याशी जमवून कसं घेतो या आणि अशा गोष्टींवरही लिहिलं जावं, असं वाटतं
हे कराच...
अदिती, मध्यंतरी एकदा आपलं या अनुषंगाने बोलणं झालं होतं...
बिपिन कार्यकर्ते
22 Apr 2010 - 4:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मेघना निश्चितच!
सध्या मला उपलब्ध असलेला वेळ पहाता मला कितपत शक्य होईल हे माहित नाही. पण माझ्या डोक्यात आधीपासून हेच आहे की समविचारी लोकांनी मिळून हा उपक्रम सुरू ठेवावा. त्यात तूही आहेसच. ज्याला/जिला जसा वेळ मिळतो त्यांनी लिहावं.
अदिती
(फक्त करडी अक्षरं वाचणारे चेन्नम्मांचे वारस नसावेत किंवा या वारशाची त्यांना जाणीव नसावी. असो, बदललेली करडी अक्षरंही एकदा नजरेखालून घालून पहावीत अशी विनंती, ज्यायोगे आपले प्रतिसाद विसंगत होणार नाहीत याची काळजी घेता येईल.)
22 Apr 2010 - 8:00 pm | धनंजय
राणी चन्नम्मा यांची ओळख आवडली. ("कोल्हापूर-बेंगळुरु - पूर्वी मिरज-बेंगळुरु - कित्तूर चन्नम्मा एक्स्प्रेस" मुळे नाव माहीत होते, पण कीर्ती माहीत नव्हती.)
22 Apr 2010 - 4:31 pm | प्रकाश घाटपांडे
आमचे लक्ष लेखाकडे गेले. त्या निमित्तानी राणी चेन्नमाची ओळख झाली.
निजलिंगाप्पा व शिवलिंगाप्पा यात आमचा नेहमी गोंधळ होतो. असो.
करड्या रंगातील मजकुरा विषयी. ज्या उत्त्तान स्त्रियांचे फोटो मुखपृष्ठावर असतात त्यांना स्वतःला या विषयी काय वाटत? हे जाणुन घ्यायला अधिक आवडेल एवढेच म्हणतो.
बाकी मिपावर स्त्रियांचा केवळ स्त्री म्हणून अनादर होतो असे वाटत नाही. एक जुनी चर्चा आठवली
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
22 Apr 2010 - 4:38 pm | विसोबा खेचर
मलाही ते जाणून घ्यायला आवडेल! ;)
धन्यवाद प्रकाशशेठ..
तात्या.
22 Apr 2010 - 4:51 pm | प्रकाश घाटपांडे
या निमित्तानी एक जुनी चर्चा आठवली. यात दुवा चुकला होता. नवीन दुवा केवळ स्त्रीत्वाचा अपमान असा वाचावा. हे केवळ अनावधानानी झाले आहे. यात अन्य कुणाचा बेजबाबदार पणा वा अपश्रेय नाही
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
22 Apr 2010 - 4:52 pm | टारझन
तुम्हाला इथे इन्डायरेक्टली तसं दाखवायचा प्रयत्न लेखातुन होतोय असं तर नाही म्हणायचं ना ?
-(वकिल) टारझन
22 Apr 2010 - 5:54 pm | टारझन
कोण कोणता उपक्रम करतो ? तो चांगला किंवा वाईट आहे ह्यावर मी कोणतेही भाष्य करायचं की नाही ते माणसं पाहुन ठरवतो. आमच्या सारख्यांकडे एवढं लक्ष देऊन करडी वाक्य बदलल्याचे पाहुन गंमतच वाटली. त्यातुन एक गोष्ट मात्र सिद्ध झाली , की लेख पाडला तेंव्हा कोणता उपक्रम चालु करण्यापेक्षा उगाचच संस्थळावर स्त्री-प्रतिमा डागाळलेली आहे हे कारण नसतांना हायलाईट करणे असा सुर होता. आणि फक्त तेवढ्यावरंच आमची टिपण्णी होती. अर्थात हे समजण्यासाठी कशाची गरज असते ? ते सांगितलंच पाहिजे का ?
नुसताच विरोध करायला तसंही काही डोकं लागत नाही .. आता आमचंच बघा ना .. आज डोक्याचा वापर करायची गरजंच पडली नाही. योग्य तिथेच आम्ही त्याच्या उपेग करतो.
- अल्ताफ टार्या
कव्वालीसाठी काही बिणडोक टाळ्या वाजवणार्यांची गरज आहे. कारण नसताना टाळ्या वाजवने जमणार असल्यास व्यनि करा.
22 Apr 2010 - 5:02 pm | Dhananjay Borgaonkar
तात्या आपला फुल टु पाठींबा आहे तुम्हाला खादाडीसाठी..
यावर कोणी महिला आयोगाकडे तक्रार नोंदवलीतरी बेहत्तर...
च्यामारी खायच्या डीश कडेबघा की!!!
त्यवर कोणी नाही बोलत ते.....
22 Apr 2010 - 5:20 pm | विसोबा खेचर
तक्रार नोंदवायचा प्रश्नच येत नाही..
१) आजपर्यंत या सदरात मी ज्या नट्यांची चित्रे प्रसिद्ध केली ती अनेकविध संस्थळांवर सर्रास उपलब्ध आहेत/असतात,
२) ती नग्न/अश्लील इत्यादी पोर्नो सदरातही मोडत नाहीत..तश्या प्रकारची चित्रे टाकायची नाहीत याची काळजी मी मुद्दाम घेत असतो. आता प्रश्न उरला त्या नट्यांच्या उत्तानतेचा/मादकतेचा/मधाळतेचा! त्याला माझा इलाज नाही.. कोणतीही 'नटी' म्हटलं की तिच्यात या गोष्टी सहसा आढळतातच..
तात्या.
22 Apr 2010 - 5:24 pm | चित्रा
जमेल तशी भर घालीनच. प्रकल्प आवडला.
बाकी या विषयावरून मी मागे एक चर्चा सुरू केली होती त्याची यानिमित्ताने आठवण झाली-
http://www.misalpav.com/node/9855
आणि हा आमचा प्रतिसाद ..
http://www.misalpav.com/node/9855#comment-157496
22 Apr 2010 - 6:08 pm | मुक्तसुनीत
प्रश्नांची माझ्यापुरती उत्तरे :
१. आजची खादाडी मधल्या चित्रांबद्दलचे मत :
हा प्रकार बटबटीत वाटत आलेला आहे. खाद्यपदार्थ नि नटी यांच्यातल्या उपभोग्यतेचे असोसिएशन बालिश किंवा बुरसटलेले वाटते. त्याची मांडणीमधे कलात्मक सौंदर्य वाटत नाही. विनोद म्हणून हा प्रकार मौजेचा वाटू शकतो. पण मिपा केवळ विनोदी साईट नाही आणि तोच तो विनोद कंटाळवाणा होतो.
२. हा प्रकार ऑफेन्सिव्ह आहे काय ?
एरवी ऑफेन्सिव्ह वाटत नाही. पण आजचे चित्र अत्यंत अभिरुचिहीन वाटते. बाकी या प्रकाराबद्दलची मते वर आलेली आहेत.
३. याऐवजी काय करता येईल ?
अगणित गोष्टी करता येतील. आपल्यामधे चिंतातूर जंतूंसारखे दृष्यकलांबद्दल आस्था असणारे आणि आपल्याला चार गोष्टी शिकवण्याची इच्छा असणारे लोक आहेत. वैज्ञानिक आहेत. नंदन सारखे कुठून कुठून काय काय आणणारे लोक आहेत. संकल्पनांची कमतरता नाही.
४. शेवटचा मुद्दा : माझी मते वरीलप्रमाणे आहेत. आज धागा आला म्हणून माण्डली. याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार माझ्यापाशी कधी नव्हते. आजही नाहीत. आहे हीच स्थिती चालू राहिली तरी मुखपृष्ठ टाळून पुढे जाता येतेच.
22 Apr 2010 - 6:15 pm | इनोबा म्हणे
हा प्रकार बटबटीत वाटत आलेला आहे. खाद्यपदार्थ नि नटी यांच्यातल्या उपभोग्यतेचे असोसिएशन बालिश किंवा बुरसटलेले वाटते.
सहमत आहे.
22 Apr 2010 - 6:42 pm | नितिन थत्ते
>>मुखपृष्ठ टाळून पुढे जाता येतेच
हे खरेच. माझ्या आय ई च्या फेवरीटमध्ये /newtracker हेच आहे.
नितिन थत्ते
22 Apr 2010 - 6:46 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री सुनीत यांच्याशी सहमत. वारंवार नट्यांची चित्रे मुखपृष्ठावर लावण्याने कळत-नकळत स्त्रीचे वस्तुकरण केले जात आहे असे वाटते. अदितीतैंचा उपक्रम उत्तम आहे.
23 Apr 2010 - 1:04 pm | पक्या
>>कळत-नकळत स्त्रीचे वस्तुकरण केले जात आहे असे वाटते>>.
ह्या गोष्टीला जे जे जबाबदार आहेत त्यात स्त्रिया ही आल्या. कारण वेगवेगळे फॅशनेबल कपडे घालून , तर्हेतर्हेच्या पोझेस देऊन फोटो काढून घेणार्या स्त्रियाच आहेत ना. परिस्थितीमुळे असे करावे लागणार्या काही स्त्रिया असल्या तरी सिनेमात , जाहिरातीत काम करणार्या बहुतांश स्त्रिया पैशासाठी आणि प्रसिध्दि साठी च हे करत असतात. आपणच आपले वस्तुकरण करतोय हे त्यांना समजत नाहित तर इतरांना दोष देऊन काय फायदा?
जय महाराष्ट्र , जय मराठी !
23 Apr 2010 - 1:14 pm | प्रकाश घाटपांडे
कोण म्हणतो त्यांना हे समजत नाही? आपण आपल्या क्षमता काही सेवामुल्य घेउन वापरण्यास देतो. कौशल्य, कला ,बुद्धीमत्ता, शारिरिक ताकद रुपी क्षमता कुणी बाजारमुल्यात रुपांतरीत करतो तर कुणी त्यात सौंदर्य, कामुकता. शरीर याची भर घालून विक्रय करतो. अनेक विद्वान, पत्रकार, संपादक, लेखक आपल्या बुद्धीमत्तेचा विक्रय करतातच की!
मागणी व पुरवठा या निकषांवर ही मुल्ये ठरतात. योग्य अयोग्य हा भाग सापेक्ष व अलाहिदा!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
23 Apr 2010 - 3:20 pm | प्रदीप
बाकी ह्या चर्चेत खरे तर भाग घ्यायची इच्छा नाही, पण ही सबब अत्यंत दुर्दैवी आहे असे वाटते. स्त्रीच्या होलपटीबद्दल साहिर जे लिहून गेलाय, त्यापेक्षा अधिक भेदक, अचूक असे काही नाही, तेव्हा त्याची 'औरत' इथे लिहून काढतो:
औरत ने जनम दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाज़ार दिया
जब जी चाहा कुचला मसला, जब जी चाहा दुत्कार दिया
तुलती है कहीं दीनारों में, बिकती है कहीं बाज़ारों में
नंगी नचवाई जाती है, ऐय्याशों के दरबारों में
ये वो बेइज़्ज़त चीज़ है जो, बंट जाती है इज़्ज़तदारों में
मर्दों के लिये हर ज़ुल्म रवाँ, औरत के लिये रोना भी खता
मर्दों के लिये लाखों सेजें, औरत के लिये बस एक चिता
मर्दों के लिये हर ऐश का हक़, औरत के लिये जीना भी सज़ा
जिन होठों ने इनको प्यार किया, उन होठों का व्यापार किया
जिस कोख में इनका जिस्म ढला, उस कोख का कारोबार किया
जिस तन से उगे कोपल बन कर, उस तन को ज़लीलो खा़र किया
मर्दों ने बनायी जो रस्में, उनको हक़ का फ़रमान कहा
औरत के ज़िन्दा जल जाने को, कुर्बानी और बलिदान कहा
क़िस्मत के बदले रोटी दी, उसको भी एहसान कहा
संसार की हर एक बेशर्मी, गुर्बत की गोद में पलती है
चकलों में ही आ के रुकती है, फ़ाकों में जो राह निकलती है
मर्दों की हवस है जो अक्सर, औरत के पाप में ढलती है
औरत संसार की क़िस्मत है, फ़िर भी तक़दीर की होती है
अवतार पयम्बर जनती है, फिर भी शैतान की बेटी है
ये वो बदक़िस्मत माँ है जो, बेटों की सेज़ पे लेटी है
[लताच्या 'पी पी' सुरांत हे गीत येथे ऐकता येईल]
बाकी तुमचे चालू द्या.
23 Apr 2010 - 4:32 am | नंदन
मुक्तसुनीत आणि श्रावण मोडक यांच्या प्रतिक्रियांशी सहमत आहे. अर्थात वैयक्तिक मालकीचे संकेतस्थळ असल्याने, नितिन थत्त्यांप्रमाणे '\newtracker' ही वाचनखूण साठवून मिपावर येण्याचा मार्ग चोखाळत आलो आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
23 Apr 2010 - 7:15 pm | प्राजु
मुखपृष्ठ टाळून पुढे जाता येतेच. तसेच करावे.
राहिला प्रश्न, बाकी मुखपृष्ठाचा, तर तात्यांनी त्यावर उत्तमोत्तम गाण्यांवर तैलचित्रांवर, उत्तमोत्तम रसग्रहण करणारे लेखन केले आहे.. समृद्ध करणारे काही.. या सदरातही अतिशय सुरेख लेखन आणि गाणी वाचायला-ऐकायला मिळाली आहेत.. त्याबद्दल कोणचे दुमत नसावे.
प्रश्न आहे फक्त खादाडीचा, तर त्यावर सुवर्णमध्य काढता येईल. चित्रच टाकायचे एखाद्या नटीचे, तर देवदास मधे जसे, सालंकृत तरीही मादक आणि तितकीच पारंपारिक वाटणारी ऐश्वर्या राय जशी आहे तशी, किंवा, तत्सम, चित्रेही मिळू शकतील.. अधून मधून एखादी उत्तान नटी, चालू शकेल. कुठेतरी सुवर्णमध्य काढायला हवा हे खरे आहे. म्हणून हा प्रतिसाद टंकायचा खटाटोप केला.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
22 Apr 2010 - 6:58 pm | युयुत्सु
त्तात्या
एक करा... नट्नट्यांच्या चित्रांबरोबर पुरुष मॉडेल्सची पण चित्रं टाकायला सुरुवात करा. ती निवडायची जबाब्दारी महिला वर्गावर टाका. ÿएका दगडात अनेक पक्षी मारले जातील.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.करात्तात्या
एक क
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
22 Apr 2010 - 7:02 pm | वेताळ
खादाडी वर दाखवण्यात येणार्या स्रिया पैशासाठी त्यांची मादक व अल्पवस्त्रात छायाचित्रे काढुन घेतात व तीच लावण्यात येतात. जर तशी छायाचित्रे त्यानी काढुन घेतली नाहीत तर कोण कशाला त्याची छायाचित्रे इथे वापरेल.
पैशासाठी आपले हिणकस प्रदर्शन करणार्या स्त्रिया व पुरुष ह्याची तुलना आपल्या जवळच्या लोकांशी करणे चुकीचे आहे.ते करताना आपण नकळत कर्तुत्ववान स्त्रियांचा अपमान करत असतो.
टारुभाऊशी सहमत आहे.
वेताळ
22 Apr 2010 - 7:28 pm | इन्द्र्राज पवार
अदितीची ही लेखमाला चालू करण्यामागील भूमिका अतिशय स्त्युत्य वाटली. सौम्य राखी रंगातील त्यांचे प्रकटन व त्यामागील एक स्त्री म्हणून त्यांना पुरुषप्रधान संस्कृतीची स्त्री कडे पाहण्याच्या दृष्टीबद्दल वाटणारी वेदना ही त्यांच्या या क्षेत्रातील अभ्यासाचे द्योतक आहे असे मी मानतो. कॅलेंडर आणि गुळगुळीत सिने साप्ताहिके, मासिके या वरील आकर्षक नव्हे तर मादक छबी हीच जणू काय भारतीय स्त्रीचे खरेखुरे चित्र वाटावे अशीच मिडीयाने प्रतिमा उभी केली आहे आणि ती आता इतकी रुजली रुळली आहे की जुलाबाच्या गोळ्यांची जाहिरात करतानाही ती गोळी क॓टरिना कैफने दिली असल्याचे दाखविले तरच "जुलाब" साफ होतील असे बजावण्यात येते. यात पुरुष संस्कृतीचा अहंपणा तर दिसून येतोच पण त्यावरील कडी म्हणजे रामायण महाभारत पासून चालत आलेली "स्त्री" ची प्रतिमा ही पुरुषाचे रंजन करण्याचे कार्य करण्यासाठीच आहे हे बेगुमानपणे मानण्यात येते. आज ६ आकडी वेतन घेणारे आय. टी. क्षेत्रातील उच्च विद्याविभूषित युवकदेखील स्त्रियांनी वारसा हक्क वापरू नये अशी अपेक्षा करतात; एवढेच नव्हे तर घसघशीत हुंड्याचीही अपेक्षा करतात ! हे देखील पुरुष प्रधान व्यवस्थेचे पीडादायक लक्षण होय. असो. अदितीने ज्या राणी चेन्नामाचा उल्लेख केला आहे त्या ठिकाणी मी सहलीच्या निमित्ताने खूप फिरलो आहे आणि त्यामुळे राणीचे कार्य जाणून घेतले होते.
यापुढील मालिकेत "पंडिता रमाबाईंचे" नाव असेल अशी अपेक्षा करू काय? एका सुंदर धाग्याबद्दल अदितीचे मन:पूर्वक आभार !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
22 Apr 2010 - 7:49 pm | वाहीदा
=D> खरेच आदीती अगदी स्त्युत्य उपक्रम ! =D>
~ वाहीदा
22 Apr 2010 - 7:34 pm | प्रियाली
मिपा मुखपृष्ठावर केवळ कुठल्याही प्रकारच्या बाया आणि पुरुषच पाहिजेत का? मुखपृष्ठे एवढ्याच कल्पनांवर सिमीत असतील तर त्याला कल्पनादारिद्र्य म्हणायला हवे.
बाकी, अदितीचा आक्षेप योग्य आहे आणि त्याहीपेक्षा
अशा प्रकाराच्या फोटोंना सरसकट विरोध नसून नेहमी नेहमी असेच फोटो बघावे लागणे याला विरोध आहे.
हे पटले.
अवांतरः
मिपावर काही नवी धोरणे येत असतील तर स्वसंपादनाची सोय काढून टाकायला हवी असे वाटते. लोक लेख टाकतात काय? काढतात काय? वाक्ये बदलतात काय? काय चालते काही कळेनासे झाले आहे. असो.
22 Apr 2010 - 7:52 pm | युयुत्सु
मानवी देहातील सौंदर्याचा शोध हा कालातीत आहे. ज्यांच्या सौंदर्यविषयक जाणिवा विकसित झालेल्या नाहीत त्यांना अशी चित्रे म्हणजे विटंबना वाटणे स्वाभाविक आहे. ÿ
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
22 Apr 2010 - 7:56 pm | प्रियाली
मिपा हे काही केवळ मानवी सौंदर्य आणि खादाडीला वाहिलेले स्थळ नाही. जर मुखपृष्ठ दाखवायचेच झाले तर चालू घडामोडी, राजकारण, खेळ अशा अनेक गोष्टी दाखवता येतील. मानवी देह हा देखील त्यातील एक हिस्सा होऊ शकेलच.
22 Apr 2010 - 9:03 pm | युयुत्सु
इतर फोटो टाकण्यात कॉपीराईट ची अड्चण येऊ शकते.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
22 Apr 2010 - 8:02 pm | चित्रा
सौंदर्य-विषयक जाणीवा आता मला कोणीतरी शिकवायलाच हव्या आहेत!
असो. प्रियाली यांच्याशी लेखकांचे स्वसंपादन रद्द करण्यावरून सहमती आहे.
22 Apr 2010 - 8:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वयंसंपादन, नसलेलं 'ग्रे मॅटर' लोकांनी वाचणे याला (माझ्या मते निष्कारण) महत्त्व या धाग्यात दिलेलं आहे, म्हणून पुन्हा माझे ३१४ शब्द:
आधी लिहीलेली प्रस्तावना त्याच आणि तशाच शब्दांत, तशीच असावी असा माझा आग्रह नव्हता. माझा मुद्दा माझ्यापेक्षा खूपच चांगल्या आणि समजूतदार शब्दांत राजेश घासकडवी यांनी लिहून दिला, तो मला पटला म्हणून स्वयंसंपादन केलं गेलं. लेख प्रसिद्ध केल्यावर काही मिनीटांतच, एक प्रतिसाद आल्याआल्याच प्रस्तावना संपादित झाली आणि त्यासंदर्भात खरडही मी पहिल्या प्रतिसादकाला, तात्यांना, टाकली होती. (काही लोकांचा आपल्यामुळे बदल झाल्याचा समज असेल तर त्यांच्यासाठी: हा बदल राजेशमुळे झालेला आहे.) तात्यांना मी प्रतिसाद विसंगत 'झाल्याची' आठवणही करून दिली होती, त्यांनी तो तसाच ठेवला हा त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे.
स्वसंपादनाबाबत धोरण काय असावं हे सांगण्यात मला आत्तातरी रस नाही. पण खोडलेली, नव्हे उडवलेली, वाक्य पुन्हा माझ्या तोंडात कोंबून काही लोकांनी अर्थाचा अनर्थही केलेला दिसत आहे.
यापुढे मला या संदर्भात आत्तातरी काहीही लिहायचं नाही आहे. ज्याच्या त्याच्या 'ग्रे मॅटर'चा प्रश्न!!
अदिती
23 Apr 2010 - 12:30 am | चित्रा
अदिती,
स्वसंपादन रद्द व्हावे हे मुद्दाम अशासाठी वाटले की लेखक लेख लिहीतात, कवी कविता करून जातात, आणि बर्याचदा धुरळा उडून जातो, आणि मग ते सहन न होऊन एखादा लेखक किंवा लेखिका लेखच काढून घेते - गेल्याच आठवड्यांत हे निदान दोन वेळा झाले असे माझ्या निदर्शनाला आले आहे. मग दुसर्या दिवशी सकाळी उठलेले संपादक अरेच्चा हे काय झाले म्हणतात, कारण धुरळा उडल्याची चिन्हे तर दिसत असतात पण कशाने ते कळत नाही.
असे होऊ नये असे बरेच दिवस वाटत होते, ते प्रियाली यांनी सुचवले म्हणून त्याला दुजोरा दिला, बाकी काही नाही. (यावर विश्वास ठेवायचा का नाही हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न).
अजून एक -माझ्या मागे झालेल्या चर्चेचाच हा विषय असल्याने अधिक सहमती काय दाखवायची म्हणून अजून वेगळे काही लिहीले नाही. पण त्याचा दुवा दिला.
23 Apr 2010 - 12:46 am | प्रियाली
प्रत्येकाकडे स्वसंपादनाची चांगली-वाईट कारणे असतीलच. मुळातच स्वसंपादन बंद केले तर अशी कारणे राहणार नाहीत. स्वसंपादनापेक्षा कोणतेही लेखन (केवळ अदितीच्या लेखावर रोख नाही) काळजीपूर्वक टाकले तर स्वसंपादनाचा हा व्यवहार बंद करता येईल.
माझा आक्षेप मी या लेखानिमित्ताने दिलेला नाही तर गेले काही दिवस मिपावर जे बघण्यात आले ते आश्चर्यकारक वाटले आणि तेच या चर्चेत दिसले म्हणून येथे दिले आहे.
या चर्चेतही काही प्रतिसाद असे आहेत ज्यांचा अर्थ लागत नाही.
माझ्यामते स्वसंपादनाची ही सुविधा बंद व्हायला हवी. त्यापेक्षा लोकांनी आपण काय लिहितो, काय प्रकाशित करतो याविषयी अधिक जागरूक राहायला हवे.
22 Apr 2010 - 7:37 pm | अश्फाक
मि.पा. वर इतक्या उच्च दर्जाचे लिखान होत असतांना , अस्सल मराठी साहित्यीक साइट असतांना
कुठलाही फोटो लावायची गरजच काय ?
22 Apr 2010 - 7:51 pm | चतुरंग
माझे मत - मूलतः फक्त खादाडीची माहिती देण्यासाठी हे सदर सुरु करण्यामागची कल्पना खरोखरंच छान आहे. त्याबद्दल तात्याला पूर्ण मार्क्स!
परंतु सध्याच्या ह्या सदराबद्दल बोलायचे तर असे म्हणावे लागेल की सरळ सरळ बोट ठेवता येईल असे काही नसले तरी अतिशय अभिरुचीपूर्ण असेही काही नाही!
दरवेळी एखादी उन्मादक स्त्री आणि 'रसाळ आंबे' वगैरे द्व्यर्थी वाटावीत अशी विशेषणे लावून त्यासोबतचा मजकूर हे काही फार आवडावे असे नक्कीच नाही.
कधीकधी गमतीने मी तात्याला खरड टाकलीही असेल की 'आजची बायडी' छान आहे पण रोज रोज हा प्रकार टॅब्लॉइड सारखा वाटतो.
अनेक प्रकारांनी हे सदर अधिक उत्तम बनवता येऊ शकेल आणि तेवढी गुणवत्ता मिपावर नक्कीच आहे!
(स्त्रियांचा अनादर होतो का? तर हे स्त्रीसापेक्ष मत असू शकते. परंतु एक स्त्री म्हणून उपभोग्य वस्तू सारखे प्रदर्शन सतत होणे हे खचितच मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण करणारे आहे. अदितीने हा धागा उघडून त्या विचारांना वाट करुन दिली त्याबद्दल तिथे अभिनंदन. संस्थळ प्रसिद्ध होताना अशा गोष्टीत योग्य ते बदल घडत गेले तर ते प्रसिद्ध बरोबरच प्रगल्भही होते!)
चतुरंग
22 Apr 2010 - 7:56 pm | इनोबा म्हणे
एखादी स्त्री पैशासाठी अंगप्रदर्शन करत असेल वा नसेल तो मुद्दा वेगळा. इथल्या स्त्री सदस्यांना (मालकांच्या भाषेत मिसळपावच्या लेकी-सुना) जर अशी छायाचित्रे अप्रस्तुत वाटत असतील तर त्यावर काही विचार करणार आहात की नाही?
@टारझन
२. मुखपृष्ठावर जी चित्र लावली जातात , ती लावणार्यांनी त्या स्त्री ला धमकावुन फोटो काढुन इथे लावली आहेत काय ?
तिने तरी तुम्हाला धमकावून फोटो इथे लावण्याबद्दल सक्ती केली काय?
अन्न ही आहे आणि शेण ही. काय खायचे हे जसे आपण ठरवतो. तसेच काय दाखवायचे हे सुद्धा आपणच ठरवायला हवे नाही का?
22 Apr 2010 - 8:04 pm | शुचि
चांगला मुद्दा मांडला आहे आदिती ताईंनी. व्हरायटी असावी मुखपृष्ठात. आता झालं ते झालं , ते उगाळण्यात अर्थ नाही. पुढे बदल आणू यात. लेट्स लुक फॉरवर्ड.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.
22 Apr 2010 - 9:02 pm | मेघवेडा
>> आता झालं ते झालं , ते उगाळण्यात अर्थ नाही.
सहमत! एका सुंदर उपक्रमावरील चर्चा भरकटून निराळ्याच दिशेने चाललेली पाहून वाईट वाटले.
>> पुढे बदल आणू यात. लेट्स लुक फॉरवर्ड.
+१
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
22 Apr 2010 - 8:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राणी चन्नमाची ओळख आवडली....!
मिपाच्या मुखपृष्ठावर इतकी का चर्चा होत आहे ? काही आक्षेपार्ह फोटो असतील, आवडत नसतील, हे मान्य. वर काही प्रतिसादात उल्लेख आले आहेत. त्याप्रमाणे 'नवे लेखनावर' क्लीक करावे. चर्चेत त्याला 'फ्रंट न्युज' बनवण्याचे कारण मला अजूनही समजत नाही. याचा अर्थ तसे चित्र टाकण्याचे, टाकणार्यांचे मी समर्थन करतोय असे मुळीच समजू नका. आता या क्षणी माझ्या हातात 'गृहशोभिका' चा अंक आहे. [पुरुषांनी तो कशाला वाचायचा असे कृपया कोणी म्हणू नका. या अंकासोबत कथासंग्रह मोफत होता म्हणून तो अंक घेतला. खुलासा संपला :) ] याची सुरुवात 'कटरीना' च्या कमळावर बसलेल्या खास अदेपासून होत आहे. त्याचबरोबर पृ.क्र. ६७, ६८, वर झगमग 'लावण्य' असलेल्या स्त्रियांच्या अदा आहेत. मग इथेच अशी का ओरड होत आहे, पाहावे आणि सोडून द्यावे असे वाटले....!
लेखमालिकेतील भागांमुळे स्त्रीयांकडे पाहण्याची दृष्टी बदलेल, विसंगती लक्षात येतील असे मला वाटत नाही. मात्र इतिहासातील थोर, कर्तबगार स्त्रियांची ओळख या निमित्ताने होणार असेल तर ती मला वाचायला आवडेल. लेखिकेस पुढील भाग लिहिण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
22 Apr 2010 - 8:26 pm | मस्त कलंदर
अदिती, सर्वप्रथम तू अगदी माझ्या मनातील भावना मांडल्याबद्दल धन्यवाद.. मलाही हे खादाडी प्रकरण खूप आधीपासून खटकत होते, पण बोलले नव्हते इतकेच..
इथे सगळ्यांनी आपापली मते मांडली आहेतच...तरीही..
@ बिका, अशा प्रकाराच्या फोटोंना सरसकट विरोध नसून नेहमी नेहमी असेच फोटो बघावे लागणे याला विरोध आहे ---- अगदी सहमत!!
@ टारझन... इनोबाने म्हटले आहेच की त्या स्त्रिया तुमच्याकडे आल्या नाहीत आमचे फोटो लावा म्हणून... तसेच, इथेच बहुधा मटावरच्या गॅलरीबद्दल लेख आला होता..इथले फोटो अगदीच तसले नसले तरी त्याच कॅटेगरीतले असतात... नि जरी आमची अस्मिता एवढ्याशा कारणांनी न दुखावण्याचा समंजसपणा आम्ही दाखवला... तशी तुम्हा लोकांनीही आपल्या विचारांची प्रगल्भता दाखवली तर हरकत नसावी, नाही का? (हा माझा प्रश्न एकट्या टारझनला नाही)
शेवटी हे एका चांगल्या साईटचे मुखपृष्ठ आहे.. पिक्चरमध्ये दाखवली जाणारी बॅचलर रूम नाही..
असो!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
22 Apr 2010 - 8:30 pm | shweta
हम्म्म........... :)
22 Apr 2010 - 8:31 pm | अरुंधती
राणी चेन्नम्माची कथा छान व प्रेरणादायी!
अशीच समाजात स्त्रीची अनेक प्रेरक, स्फूर्ती देणारी रूपे दिसत असतात.
कधी ती पोराला उन्हाच्या तावापासून वाचवण्यासाठी पदराआड करणारी आई असते, कधी ती यशस्वी व्यावसायिक/ क्रीडापटू/ राजकारणी/ वैज्ञानिक असते, कधी भावा-बहिणीला सांभाळणारी बहीण असते, कधी लढवय्यी - वीरांगना असते....
कधी ती मूकपणे प्रियतमाच्या आठवणीने अश्रू गाळणारी प्रेयसी असते, कधी अकाली संसाराची जबाबदारी अंगावर कोसळल्यावर हिंमतीने सारा डोलारा सांभाळणारी स्त्री असते..... कधी लेखिका, साहित्यिक, कवयित्री असते, कधी उत्कृष्ट चित्रकार/ नर्तकी/ गायिका असते. कधी कुशल तंत्रज्ञ असते तर कधी सार्या समाजाला आपलेसे करणारी समाजसेविका असते.
स्त्रीच्या अशा अनेक रूपांची या साईटच्या मुखपृष्ठावर दखल घेतली गेलेली बघायला मला नक्की आवडेल व त्या त्या स्त्रीरूपाविषयी वाचायलाही. [जमेल तसे मी देखील लिहीन!]
आदिती, स्तुत्य उपक्रम :-)!!!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
22 Apr 2010 - 8:57 pm | श्रावण मोडक
विसोबा खेचर: मिपाच्या खादाडी सदरात रोजच्या खाद्यपदार्थासोबत आपल्या भाषेत सांगायचे तर 'फिगर दाखवणार्या' एखाद्या बाईचेच चित्र असेल असे तूर्तास तरी धोरण आहे..
याला काय म्हणायचे? उद्दामपणा, फाट्यावर मारण्याची वृत्ती? ठरवा तुमचे तुम्हीच.
यशोधरा: मिपाच्या मुखपृष्ठावरचे हे प्रकार मला सुरुवातीपासूनच खटकले आहेत, पण सांगून उपयोग होईल असे वाटले नव्हते, सबब, काही बोलले नव्हते.
संस्थळचालकांची पत ही अशी आहे. या मताशी सहमत व्हावे लागू नये असे वाटणे हा केवळ आदर्शाचा भाग झाला. वास्तव सहमतीकडंच नेणारे आहे. आजचा नित्यानंदस्वामीविषयक धागा अशा सहमतीला मस्त पुष्टी देतो.
विसोबा खेचर: मी व्यक्तिश: मुंबैच्या रेडलाईट विभागात अशी सर्व प्रकारची माणसं खूप जवळून पाहिली आहेत, तेथील स्रियाही पाहिल्या आहेत.. आणि त्यांच्या शरीरापलिकडच्या त्यांच्या आयुष्यात जवळून डोकावायचा प्रयत्न केला आहे..
हे जर खरे असेल, तर तुमच्या त्या जाणिवा व्यक्त होणाऱ्या गोष्टी इथं तुमच्या वर्तनातून दिसल्या असत्या. दुर्दैवाने (कृपा करून मी दैव वगैरे मानतो का याकडे कोणी जाऊ नये) तसं होत नाही. हे तुमचं विसंगत वर्तन आहे. त्यावरून कोणी तुमच्या या खादाडीविषयक भूमिकेवर शंका घेतली तर त्यांना दोष देऊ नका. ती तुमचीच जबाबदारी आहे. अर्थातच, फाट्यावर मारण्याची चॉईस तुम्हाला आहे आणि तुम्ही तसेच वागता म्हणून आम्हालाही असेलच.
टारझन: स्त्रीची प्रतिमा केवळ खादाडी कॉलम पाहुन ठरते ?
असं थोडंच आहे. आणि एखाद्यानं खादाडी हा प्रतिमेसाठीचा एक मापदंड ठरवला असेल तर त्या मताची नोंद घेता येते. इतकं तरी आपण करू शकतोच. मग ते मत 'बालवाडी'तलं असलं तरी, त्यासाठी ते निकालात काढण्याची गरज नाहीच.
नितीन थत्ते: अनेकदा 'त्या' ललनांचा स्वतंत्र म्हणून उदोउदो केला जातो. स्त्रीमुक्तीक्षेत्रात काम करणार्यांच्या दृष्टीने मात्र त्यांना मिळालेलं 'भोगवस्तू बनण्याचं स्वातंत्र्य' त्यांनी वापरलेलं असतं. ते स्वातंत्र्य तिला पूर्वीही होतंच. आणि ते काही माणूस म्हणून राहण्याचं स्वातंत्र्य नव्हे.
नेमकं. सहमत. पुढे बोलण्याची गरज नाहीच.
वाहिदा: एक समजत नाही असे फालतू फोटो लावायची मिपा व्यवस्थापनाला गरज च काय ?
हाहाहाहा... अशा गोष्टींमुळंच साईट हॅपनिंग राहते असा गैरसमज असावा. त्याला इलाज नसतो. ज्याची-त्याची कुवत, बुद्धी वगैरे...
मेघना भुस्कुटे: 'स्त्री' असण्यासोबत कोणकोणत्या गोष्टी आयुष्यात न मागता येतात - यांत सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टींचा समावेश आहे, त्याकडे आपण कसं पाहतो, त्यावर मात कशी करतो / त्यांच्याशी जमवून कसं घेतो या आणि अशा गोष्टींवरही लिहिलं जावं, असं वाटतं.
+१. लिहाच.
असे धागे अधिकाधिक निघाले तरी आपली रेष मोठ्ठी होईल. आणि ती प्रगल्भता आली तर मग स्वामी, महाराज, साधू वगैरेचे मुखवटे धारण करण्याची भिक्कार वेळही येणार नाही इथल्या अभाग्यांवर.
प्रकाश घाटपांडे: ज्या उत्त्तान स्त्रियांचे फोटो मुखपृष्ठावर असतात त्यांना स्वतःला या विषयी काय वाटत? हे जाणुन घ्यायला अधिक आवडेल एवढेच म्हणतो.
त्यांना काय वाटतं यावर आपली अभिरुची, मूल्ये अवलंबून आहेत? नक्कीच नाहीत हे तुमच्या परिचयावरून सांगू शकतो. तरीही असं लिहिलंत कारण या विषयाकडं तुम्ही त्या गंभीरतेने पहात नाही. त्यांना काय वाटतं हे जाणून घेणं हे चक्क बायदवे प्रकारातलं असू शकेल. म्हणूनच ती तुमची मुख्य प्रतिक्रिया असू नये. ती तशी वाटते हे लगेचच खाली आलेल्या प्रतिक्रियेवरून दिसतं.
धनंजय बोरगावकर: च्यामारी खायच्या डीश कडेबघा की!!!
काय सांगता मित्रवर्य? खायची डिशच महत्त्वाची नक्की? तसं असेल तर ती छायाचित्रं टाकण्याची, त्याला जोडून द्वयर्थी टिपण्या करण्याची गरज रहातच नाही.
मुक्तसुनीत: खाद्यपदार्थ नि नटी यांच्यातल्या उपभोग्यतेचे असोसिएशन बालिश किंवा बुरसटलेले वाटते. त्याची मांडणीमधे कलात्मक सौंदर्य वाटत नाही. विनोद म्हणून हा प्रकार मौजेचा वाटू शकतो. पण मिपा केवळ विनोदी साईट नाही आणि तोच तो विनोद कंटाळवाणा होतो.
बालीशपणा आहेच. पण मिपा केवळ विनोदी साईट नाही हे भान कधी येणार इतकाच प्रश्न आहे. वैयक्तिक नाही, पण तुम्ही, चतुरंग, बिका, चित्रा, विकास यांच्यासारख्या मंडळींकडून हीच अपेक्षा आहे. करण्याजोग्या अगणीत गोष्टींची यादी तुम्हीच मांडली आहे. त्यात ही एक भर मी टाकतोय - या असल्या गोष्टींना चाप लावणं हे संपादकांचंच काम आहे. मालक काहीही सांगेल.
इंद्रराज पवार: रामायण महाभारत पासून चालत आलेली "स्त्री" ची प्रतिमा ही पुरुषाचे रंजन करण्याचे कार्य करण्यासाठीच आहे हे बेगुमानपणे मानण्यात येते.
हो. तेच तोडण्यासाठी जोर लावला पाहिजे.
प्रियाली: मिपा मुखपृष्ठावर केवळ कुठल्याही प्रकारच्या बाया आणि पुरुषच पाहिजेत का? मुखपृष्ठे एवढ्याच कल्पनांवर सिमीत असतील तर त्याला कल्पनादारिद्र्य म्हणायला हवे.
प्रश्नाचे उत्तर नाही हेच आहे. कल्पनादारिद्र्याविषयी शंभर टक्के सहमत.
युयुत्सु: मानवी देहातील सौंदर्याचा शोध हा कालातीत आहे. ज्यांच्या सौंदर्यविषयक जाणिवा विकसित झालेल्या नाहीत त्यांना अशी चित्रे म्हणजे विटंबना वाटणे स्वाभाविक आहे.
हाहाहाहा... इथं जे काही चालतं ते या उदात्त हेतूतूंनच चालतंय असं म्हणायचं आहे की काय तुम्हाला? सौंदर्याचा शोध? अनावृत्त किंवा अर्धअनावृत्त स्त्रीदेह म्हणजेच सौंदर्य ही कल्पना त्यामागे दिसते आणि त्याला तुम्ही विकसीत जाणीवा वगैरे म्हणत असाल तर बोलती बंद. तुमच्याकडून या स्तराची अपेक्षा खचितच नाही.
चतुरंग: संस्थळ प्रसिद्ध होताना अशा गोष्टीत योग्य ते बदल घडत गेले तर ते प्रसिद्ध बरोबरच प्रगल्भही होते!
ही बदलाची सुरवात करायला काय हरकत आहे?
इनोबा म्हणे: इथल्या स्त्री सदस्यांना (मालकांच्या भाषेत मिसळपावच्या लेकी-सुना) जर अशी छायाचित्रे अप्रस्तुत वाटत असतील तर त्यावर काही विचार करणार आहात की नाही?
या प्रश्नाचे उत्तर मलाही अपेक्षीत आहेच. पण फाट्यावर मारणं ही भूमिकाही असू शकते. लेकीसुना ही उक्ती आहे. कृती मात्र तशी दिसत नाही. आणि त्याचे स्वतःविषयीचे कौतुकही दिसते.
प्रा. डॉ. दिलीप बिरुटे: मिपाच्या मुखपृष्ठावर इतकी का चर्चा होत आहे?
मुखपृष्ठाचा हेतू तोच तर आहे ना? तो सफल झाला याचं समाधान मानता येईल की. 'गृहशोभिका'शी तुलना मिपाची? कैच्याकैच... मालक चाळणीत पाणी घालून जीव देतील राव.
मस्त कलंदर: मलाही हे खादाडी प्रकरण खूप आधीपासून खटकत होते, पण बोलले नव्हते इतकेच..
तेच, संस्थळचालकांची पत ही अशी.
अरुंधती: स्त्रीच्या अशा अनेक रूपांची या साईटच्या मुखपृष्ठावर दखल घेतली गेलेली बघायला मला नक्की आवडेल व त्या त्या स्त्रीरूपाविषयी वाचायलाही.
युयुत्सु, तुमच्या सौंदर्यशोधाच्या मुद्यावर हे एक उत्तर आहे.
22 Apr 2010 - 9:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>'गृहशोभिका'शी तुलना मिपाची?
अरारा......!
स्त्रीया वाचत असलेल्या काही मासिकांमधून सर्रास 'स्त्री सौदर्य' असलेली अनेक छायाचित्र असतात. तिथे मात्र कोणी भगिनी तक्रार करतांना दिसत नाही. असा तो मुद्दा. तिथे कसे पुढील पानावर गेले की, मागचे पान विसरले जाते. तसेच इथेही करायचे. जालावरही वावरतांना बर्याच गोष्टी आपल्याला दिसतात. आपण क्षणभर तिथे थबकतो आणि पुढे जातो..तोच मुद्दा इथे.
-दिलीप बिरुटे
22 Apr 2010 - 9:20 pm | श्रावण मोडक
तिथे कसे पुढील पानावर गेले की, मागचे पान विसरले जाते. तसेच इथेही करायचे.
ऑं? चला, नवी मोहीम हाती घ्यावी, मिपाला गृहशोभिकासदृष्य क्षणैक पान पहात ते उलटून पुढं सरकणारं संस्थळ बनवूया!!! :)
नीलकांता, तुझे दोन शब्द वेगळेच सांगतात, इथं वेगळंच सुचवलं जातंय. नेमकं काय रे बाबा? :)
22 Apr 2010 - 9:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>नीलकांता, तुझे दोन शब्द वेगळेच सांगतात, इथं वेगळंच सुचवलं जातंय. नेमकं काय रे बाबा?
मुख्यपृष्ठाबाबत नीलकांत ठरवेल ते धोरण मान्यच असेल. मी मांडले ते माझे वयक्तीक मत होते. मुख्यपृष्ठाबाबत सुचवणी नव्हती. उन्हाळा आहे, कृपया आग लावू नये, जंगल पेट घेईल. धन्यवाद...! :)
-दिलीप बिरुटे
22 Apr 2010 - 9:33 pm | श्रावण मोडक
ओके.
उन्हाळा आहे, कृपया आग लावू नये, जंगल पेट घेईल. धन्यवाद...!
हेहेहेहेहे... चिंता नको. पाण्याचे बरेच बंब आहेत तयार. आणि अर्थातच आग लावण्यात रस नाही. चर्चा करण्यात आहे. त्यातून चार चांगल्या गोष्टी होऊ शकतातच.
22 Apr 2010 - 9:23 pm | यशोधरा
>>स्त्रीया वाचत असलेल्या काही मासिकांमधून सर्रास 'स्त्री सौदर्य' असलेली अनेक छायाचित्र असतात. >> स्त्री सौंदर्य आणि उत्तान चित्रं ह्यातला फरक प्रा. डॉ. तुम्हांला कळत असणारच. तेवढे सुज्ञ तुम्ही नक्कीच आहात. मिपावर केवळ भगिनीवर्ग किंवा बंधूवर्ग येत नाही, दोघेही येतात, सबब मासिके आणि मिपा ही तुलनाच चुकीची!
तुमच्या प्रतिसादातली विसंगती तुम्हांला खरच कळत नाही की तुम्ही डोळे मुद्दाम झाकून बोटचेपे धोरण स्वीकारले आहे?
22 Apr 2010 - 9:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>स्त्री सौंदर्य आणि उत्तान चित्रं ह्यातला फरक प्रा. डॉ. तुम्हांला कळत असणारच.
मुख्यपृष्ठावर लावलेले एखादं चित्र 'उत्तान' आहे की त्यात 'स्त्री सौंदर्य' आहे, मी त्याचं सुक्ष्म निरिक्षण करीत बसत नाही. मात्र मला 'उत्तान' आणि 'उत्तम सौंदर्य' असलेली छायाचित्रे पाहणे आवडते. स्त्रियांच्या मासिकांमधे स्त्रीयांची 'उत्तान' छायाचित्रे नसतात काय ? [शोध घेऊन प्रतिसाद टंकीन] काय चुकीचे आणि काय बरोबर याची सुजाण जाण आमच्याकडे आहे. मुख्यपृष्ठ काय असावे, काय नसावे, ठरविणारी मंडळी वेगळी आहेत. त्यात आमचे काहीच योगदान नसते. त्यामुळे बोटचेपे धोरण वगैरे मुद्दे गैरलागू आहेत.
-दिलीप बिरुटे
22 Apr 2010 - 10:34 pm | यशोधरा
वैयक्तिक तुम्हाला काय आवडते ह्याच्याशी कसलेही देणेघेणे नाही. 'सुजाण' फार मोठा शब्द आहे प्रा डॉ! इतक्या सवंगपणे वापरु नये. असो.
22 Apr 2010 - 10:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>वैयक्तिक तुम्हाला काय आवडते ह्याच्याशी कसलेही देणेघेणे नाही.
बरं बरं...! तुम्हाला काय आवडत नाही, त्याच्याशीही आम्हाला काही देणे घेणे नाही.
>>'सुजाण' फार मोठा शब्द आहे प्रा डॉ! इतक्या सवंगपणे वापरु नये.
बरं हं...! मार्गदर्शनाबद्दल आभारी.
-दिलीप बिरुटे
22 Apr 2010 - 10:58 pm | श्रावण मोडक
तुम्हाला काय आवडत नाही, त्याच्याशीही आम्हाला काही देणे घेणे नाही.
हाहाहाहा... त्यांनी थोडंच त्यांचं वैयक्तिक मत वगैरे मांडलंय की त्याच्याशी तुम्हाला देणे-घेणे असावे. सरजी, ट्रॅक सोडू नका इतकंच सांगायचं होतं. कारण तुमच्या बाकी भूमिकांवरून चर्चा - वाद चांगला होतोय. :)
असो. बाकी चालू द्या...
22 Apr 2010 - 11:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>यशोधरा: मिपाच्या मुखपृष्ठावरचे हे प्रकार मला सुरुवातीपासूनच खटकले आहेत, पण सांगून उपयोग होईल असे वाटले नव्हते, सबब, काही बोलले नव्हते.
हे काय आहे ? याला मत नाही तर काय सुविचार म्हणायचा का ?
>>कारण तुमच्या बाकी भूमिकांवरून चर्चा - वाद चांगला होतोय. असो. बाकी चालू द्या...:)
आता कंटाळा आलाय. :)
-दिलीप बिरुटे
22 Apr 2010 - 11:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
'विसंगती'चा अभ्यास करायला चांगलं खाद्य दिलंत बिरूटेसेठ!
बाकी "आग लागणे", "व्यक्तीगत मतं स्वतःकडेच ठेवा" वगैरे भाषा संपादकांच्या आयडीतून झरते आहे याचं आश्चर्य वाटलं.
अदिती
22 Apr 2010 - 11:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
'विसंगती'चा अभ्यास करायला चांगलं खाद्य दिलंत बिरूटेसेठ!
बाकी "आग लागणे", "व्यक्तीगत मतं स्वतःकडेच ठेवा" वगैरे भाषा संपादकांच्या आयडीतून झरते आहे याचं आश्चर्य वाटलं.
अदिती
23 Apr 2010 - 12:12 am | श्रावण मोडक
ह्या... ते मत धरून बोलताय होय तुम्ही. मी आपला इथंच पाहतोय, इथं तर काही दिसलं नाही. मला वाटलं ते मागल्या पानावर गेलं म्हणजे पान उलटल्यानं पुढं सरकलं असेल सारं काही. पण... असो.
आणि ते वैयक्तिक मत तुम्ही संपादक म्हणून नाकारताहात की प्रा. डॉ. दिलीप बिरुटे म्हणून? हा फरक करावा लागेल. संपादक म्हणून नाकारत असाल तर अशी मते मांडण्याचे प्रयोजन राहणार नाही.
22 Apr 2010 - 10:20 pm | चतुरंग
मासिकातून उत्तान चित्रे असतात म्हणून मिपावरही असली तर कोठे बिघडले??
अहो हेच तर नकोय ना!!
मासिकाबद्दल तक्रारी करणार्या भगिनीसुद्धा असतील त्या इथे आपल्याला दिसणार नाहीत. इथे जे चालायला नको असे वाटते त्याचीच तक्रार इथे दिसणे अपेक्षित नाही का?
का उगाच आपलं विरोधाला विरोध असं चालू आहे?
चतुरंग
22 Apr 2010 - 10:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>अहो हेच तर नकोय ना !!
च्यायला, चतुरंग म्हणताय ना. मिपावर उत्तान चित्र नको तर नको..!
विषय संपला.
>>आपलं विरोधाला विरोध असं चालू आहे ?
रंगासेठ विरोधाला विरोध नाही. आज अशी चित्र नको म्हणतील. उद्या काही शब्दांवर आक्षेप येईल. उद्या काही प्रतिसाद दिसायला नको म्हटल्या जाईल. उद्या असे लेख आक्षेपार्ह वाटतील. उद्या असेच...उद्या असेच...
असो, आमच्यासाठी विषय संपला.
-दिलीप बिरुटे
[रंगाशेठच्या विचाराला मान देणारा]
22 Apr 2010 - 10:51 pm | चतुरंग
तुम्ही वादातली हवाच काढून घेतलीत की राव?
बोलती बंद झाली बुवा आपली!! ;)
(मानभावी)चतुरंग
22 Apr 2010 - 11:53 pm | टारझन
=)) =)) =)) =)) गंभीर चर्चा चावता चावता मधेच बहिसटल्या सारखा वाचत सुटलो ... =)) =)) =))
या धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड
एका वाक्यात सगळ्यांची मुंडकी कापली .. व्वा प्रा.डॉ.... जियो .. आज पासनं ताजमहाल तुमच्या नावाव केला...
मला एकंच कळत नाय च्यायला ... आम्हाला कधी ती चित्र नजरेत यावं एवढं त्यांच्याकडे लक्षंच गेलं नाही .. ह्याचाच अर्थ ती काही एवढी एक्स्लोझिव नव्हती .. आणि हॅहॅहॅ .. भडक चित्र पहायला मिपावर कशाला यायला पायचे ? एक से एक डेडिकेटेड साईट्स आहेत की राव ... =))
सांगण्याचा मुद्दा पुण्हा फक्त इतकाच की ही चित्रंच मुळी गौण होती.... आणि जर खरोखर कोणाला एखादा चांगला उपक्रम सुरू करायचा असेल तर गुपचाप केला असता .. हे असले धागे लाईमलाईट साठी काढले जातात. धाग्यावर "वा छाण उपक्रम चालु केला आहेत " असे प्रतिसाद कमी ... आणि "मिपावर बायांच्या प्रतिमेची धिंड काढली जाते .. यावर टिपण्णी करणारे प्रतिसाद अधिक !!
(प्रा.डाँचा फॅन) टार्या भयंकर