आणा मला येवला पैठणी
सांगून सांगून थकले हट्ट माझा पुरवा झणी
आजच आणा मला येवला पैठणी ||धृ||
जरतारी आसलं काठ तिचा बारीकसर
नक्षी आसलं तिच्यावर बुट्टेदार
लई दिसांची ईच्छा आहे मनी
आजच आणा मला येवला पैठणी ||१||
आमसूली नाहीतर रंग आणा निळा जांभळा
कसा दिसलं कुणा ठावं चालंल हिरवा पिवळा
आत्ताच घाई करा अन लगेच जावा धनी
आजच आणा मला येवला पैठणी ||२||
नितळ काया माझी वर तुमची माया
जीव लावायचं शिकावं तुमच्याकडून राया
आहे गरज झाकायची ज्वानी आरसपानी
आजच आणा मला येवला पैठणी ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१६/०४/२०१०
प्रतिक्रिया
16 Apr 2010 - 4:40 pm | चित्रगुप्त
व्व्व्व्व्व्व्व्वा....... झक्क्क्क्क्क्क्क्क्कास......
काही चित्रे, फोटो टाका की राव याला साजेसे...
16 Apr 2010 - 7:38 pm | पाषाणभेद
चित्रे अन फोटो यांचा अधिकार तुमचा आहे. आमचा नाही.

डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
16 Apr 2010 - 5:01 pm | उग्रसेन
लावणी लय जोरदार.
बाबुराव :)
16 Apr 2010 - 9:31 pm | alibaba27
लाव् नि लय सुन्द् र झालिया
17 Apr 2010 - 1:43 am | शुचि
>> जीव लावायचं शिकावं तुमच्याकडून राया >>
आहा!! क्या बात है! मजा आली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला
काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का
17 Apr 2010 - 5:07 am | पिंगू
चला आता दफोराव हेच मिपाचे होनाजी बाळा!!!!!
17 Apr 2010 - 6:04 am | नंदू
लावणी छान जमली आहे. तुमच्या अलिकड्च्या द्वैर्थी लावण्यांपेक्षा वेगळी.
नंदू
17 Apr 2010 - 7:35 am | पाषाणभेद
आमी कवा दोन अरथी लिवलं. तुमच्याच मनात आसलं तसलं कायबाय! आमी तर सरळसोट लिवतो. उगा शेनसार ची कातरी नगं. नाय का?