वीकान्त ( भाग २ )

स्पंदना's picture
स्पंदना in जनातलं, मनातलं
5 Apr 2010 - 8:29 pm

बहुतेकदा शनिवार संध्याकाळ ही; आईदर मुलांच्या बर्थडे पार्ट्या किंवा याच्या ऑफिस मधल्या मित्रांच्या गेट टुगेदर मध्ये जातात. आता मला सांगा हे दोन्ही इवेन्ट यांचेच ना? पण ही लोक बिनधास्त दुपारभर लोळत पडलेली आणि मी मात्र काही गिफ्ट न्यायची का? मित्र असेल तर कशासाठी बोलावलं आहे? निदान एखादा बुके तरी अरेंज करायचा का या उचापतीत! काही विचारायला गेल की एकंच उत्तर " काही नेल नाही तर तो काय घालवून देणार आहे? कशाला डोक खातेस?चल तशीच." तस्सच जायचं तर तुम्ही जा, मला नाही यायचं म्हंटल तर मी मूड घालवते.
हे आमंत्रण जर भारतीयेत्र असेल तर मला रात्रीच्या जेवणाची तयारी करून जाव लागत,कारण बहुतेकदा ते पदार्थ बघूनच भूक मरते. काही काही पार्ट्या तर मी हातात ग्लास घेऊन त्या आभासा खाली नुसत्या चकणा खाऊन साजऱ्या केलेत.
दुसरा दिवस रविवार! आज मी डोळे उघडायच्या आधीच कामांची यादी वाचायला सुरु करते. उघडलेले डोळे पुन्हा मिटत तो शरणागत पत्करतो. आज मला वेट मार्केट मध्ये जावून आठवड्याच्या भाज्या खरेदी करायच्या असतात. सकाळ च्या चहा पासून स्वारीचा मूड विरजण न लागलेल्या दह्यासारखा असतो. ब्रेक फास्ट करताना आमची जुगलबंदी सुरु होते. आमची पिलं; टेबल टेनिस चा खेळ पाहायला बसल्यासारखी इकडून तिकडे माना फिरवत आमची जुगलबंदी पाहतात. आज सारी सूत्र जर मी हाती घेतली नाहीत तर पुऱ्या आठवड्याची सर्कस माझ्या एकटीवर पडणार ही खात्री!
एकदा अशीच, वैतागलेले पतीराज घेवून मी वेट मार्केट मध्ये बटाटे निवडत होते. आम्ही दोघे ही, खाली मान घालून बटाटे निवडताना खर्ज्यात भांडत होतो. वजन करण्यासाठी गेले तर मालकीण मला विचारते" talking to potatoes ?" एका स्त्रीन मला हे विचाराव ? माझा बांध फुटला! मी जमेल तस तिला माझ नवरा पुराण सांगायला सुरवात केली. माझा सूर ऐकून कॅश , घेण्याव्यतिरिक्त काहीही काम न करता मगदुला सारखा बसणारा तिचा नवरा चक्क खाली येवून माझ्या नवऱ्याला गळ्यात गळा घालून"women very tough!" अशी सांत्वना देऊन गेला. मालकीण अशी खवळली म्हणता! परत येताना रस्ताभर आम्ही खो खो हसत होतो. फुकटात दुसऱ्या जोडीला भांडायला लावून आम्ही नामा निराळे!
आज काहीतरी संडे स्पेशल बनवते मी. स्वयंपाकाचा वास येईल तशी आमची स्वारी हळू हळू खुलू लागते. मग अगदी मुलांचं होम वर्क घे म्हंटल, तर ते सुद्धा घेतलं जात. पिसारा फुलवत हा मोर मग माझ्या मागे मागे! जेवण खाणी होतात. अगदी जेवताना मुलांना" आईला त्रास नाही द्यायचा " अस ही दटावून होत.
या आमच्या गलबताची ही छोटी शीड भारी चलाख. वारा कोणत्या दिशेला वाहतोय हे ती झुळकी वरून जाणतात, लगेच फिरतात.आज एक दिवस थोडी दुपार माझी असते. माझ्या पाठोपाठ मोर साहेब बेडरूम मध्ये!! आता मी इतके दिवस राहिलेल्या कामांची यादी झळकावते. "चल आत्ता करतो" तो फुशारकी मारतो. हि वीकांताची घोडचूक! हे आमचे आरम्भशूर त्यांची वानरसेना घेवून मग एखाद्या कपाटावर वां पुस्तकांच्या अलमारीवर तुटून पडतात. धडाधड वस्तू फेकल्या जातात आणि मंडळी एखाद काहीतरी हातात घेवून त्यातच रमून जातात . मी बाहेर येई पर्यंत घराचा नकाशा बदललेला. माझा पारा चढतो. "तुला आम्ही काहीही केल तरी त्रास होतो. जातो मी." धनी मुक्ताफळ उधळतात. त्यान तस म्हणायचं अवकाश की बाळकृष्ण हातात येईल ते घेऊन त्याला झोडपत हिमालयात जायची आज्ञा करतो. ( रामायणाचा परिणाम; थोडा उलट ) दारात त्याचा मार चुकवत उभा राहून तो माझ्याकडे व्याकूळ नजरेन पाहतो. हे अस असत. झरकन पुढ होऊन मी लहानग्याला थांबवते."चल चहा करते" मी पुढ केलेला पदर धरून तो आत येतो. अगदी कुशीत शिरतो. इथ त्याला मी, अन मला तो. कुशीत शिरण्यासाठी दोघांचीही माहेर दूर. अर्थात पदर वास्तवात नसल्याने हातात येईल त्या न्याप्कीन ने मी त्याचा रुसवा पुसते. "चल खाली जाऊन बसू. मुलं खेळतील. आपण गप्पा मारू वां गाणी ऐकू" समोर त्यांनी पसरून ठेवलेला अस्ताव्यस्त पसारा नजरे आड करत मी त्यांच्यात सहभागी होते.
रात्री आम्ही सारीच एकमेकांच्या कुशीत झोपतो. जणू पुढ येणाऱ्या आठवड्यासाठीच रिचार्जिंग !!!
सोमवारी सकाळच्या घाई गर्दीत, तो अपराध्यासारखा पसरयाकड पाहतो. "ठेव तसंच. मी येवून करेन." अशी सारवासारवी करतो.
त्याला माहित असत सोमवार ते शुक्रवार माझी त्यांच्या कुणाकडून ही काहीच अपेक्षा नसते.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

अरुंधती's picture

5 Apr 2010 - 8:41 pm | अरुंधती

आवडलं वीकांताचं चित्रण! आणि शैलीसुध्दा! :)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

शुचि's picture

5 Apr 2010 - 8:46 pm | शुचि

:) मस्त!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सजनि कौन तम में परिचित सा, सुधि सा, छाया सा, आता?
सूने में सस्मित चितवन से जीवन-दीप जला जाता!

स्पंदना's picture

5 Apr 2010 - 8:46 pm | स्पंदना

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

मनापासून धन्यवाद. थोडा धिर आला लिहायला, तुमच्या प्रोत्साहनामुळे.

चतुरंग's picture

5 Apr 2010 - 8:49 pm | चतुरंग

तुमच्या ह्यांना तुम्ही शिस्त लावायला कमी पडलेला दिसताय! (हलके घ्या! ;) )

(बरीच शिस्त लागलेला)चतुरंग

हर्षद आनंदी's picture

5 Apr 2010 - 8:50 pm | हर्षद आनंदी

मनमोकळ्या लिखाणाने एक वेगळाच बाज आणला!!

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

रेवती's picture

5 Apr 2010 - 9:05 pm | रेवती

दोन्ही भाग आत्ताच वाचले. चांगले लिहिले आहेत.
मुलं मोठी होताहोता विकांताचं स्वरूप बदललेलं तुम्हाला दिसेलच.
आजकाल आमचा विकांत हा इतर कोणत्याही दिवसांसारखाच असतो. थोडासा निवांत्....इतकाच फरक!
मात्र दोन वर्षांपूर्वी वाढदिवसांच्या पार्ट्या देणे आणि घेणे बंद केले.....मुलालाच कंटाळा आला......ते एक बरे झाले! गेटटुगेदर्सही अगदी कमी........वर्षातून पाचेक असतात फक्त!

रेवती

स्वाती२'s picture

5 Apr 2010 - 10:13 pm | स्वाती२

छान लिहिलय. मजा आली वाचायला.

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Apr 2010 - 11:21 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम... हसवता हसवता हलकेच गंभीर करणं... उत्तम विनोदी लेखनाचे हे एक अंगभूत लक्षण आहे. लिहित रहा.

मी पुढ केलेला पदर धरून तो आत येतो. अगदी कुशीत शिरतो. इथ त्याला मी, अन मला तो. कुशीत शिरण्यासाठी दोघांचीही माहेर दूर.

बिपिन कार्यकर्ते

Nile's picture

6 Apr 2010 - 12:44 am | Nile

मस्त! कौटुंबिक 'जिव्हाळ्याचा' विकांत आवडला! :)

समंजस's picture

6 Apr 2010 - 1:57 pm | समंजस

छान!!
तुमच्या विकांताची कथा आवडली. एकदम खुसखुशीत होती :)

टुकुल's picture

6 Apr 2010 - 3:52 pm | टुकुल

दोन्ही भाग आताच वाचले, मजा आली वाचायला.

--टुकुल.

अरुण मनोहर's picture

11 Apr 2010 - 10:32 am | अरुण मनोहर

मनोरंजक लेख आहे.

छान लिहिले आहे.. दोन्ही भाग आत्ताच वाचले..
वीकांत येणार म्हटले की सध्या अंगावर काटाच येतो.