कलाजगतातील मुशाफिरी : संगीत : मोझार्ट : पियानो कॉन्चेर्टो क्र. २१

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in कलादालन
24 Mar 2010 - 12:49 pm

Wolfgang Amadeus Mozart:

http://www.youtube.com/watch?v=qjGuuyMW8ps&feature=related
आणि:
http://www.youtube.com/watch?v=df-eLzao63I

मोझार्टने ही संगीत रचना दिनांक ९ मार्च १७८५ रोजी पूर्ण केली.
धीम्या लयीतील या रचनेतील सौंदर्य स्थळे आणि अनेक सूक्ष्म बारकावे आपण जितक्या जास्त वेळा ऐकत जातो, तसतसे जास्त आकळत जातात, असा माझा अनुभव आहे.
ही प्रामुख्याने पियानो वर वाजवलेली रचना असली, तरी यातील इतर वाद्यांची साथही फार सुंदर आहे, उदहरणार्थ : बासरी, ओबो, बसून, शिंग (हॉर्न) व्हायोलीन, व्हायोला, चेलो वगैरे.

इथे जरी youtube चे दुवे दिलेले असले, तरी व्हिडियो पेक्षा जास्त आनंद रात्रीच्या शांत वेळी, अंधारात, आरामात पहुडून नुस्ते ऐकण्यात येइल....अवश्य अनुभवून बघा.
तसेच मोझार्ट च्या जीवनावरील अतिशय सुंदर चित्रपट अमेडिअस :
Amadeus

मोझार्त च्या काळचा श्रोतृवृंद :

पियानोवादनाचे व्हरमीर चे चित्रः
Vermeer
या रचनेबद्दलचे विकिपेडीयातील वर्णन :

The famous Andante is in three parts:
The opening section is for orchestra only and features muted strings. The first violins play with a dream-like melody over an accompaniment consisting of second violins and violas playing repeated-note triplets and the cellos and bass playing pizzicato arpeggios. All of the major melodic material of the movement is contained in this orchestral introduction and in either in F major or F minor.
The second section introduces the solo piano and starts off in F major. It is not a literal repeat, though, as after the first few phrases, new material is interjected which ventures off into different keys. When familiar material returns the music is now in the dominant keys of C minor and C major. More new material in distant keys is added which transitions to the music to the third section of the movement.
The third section begins with the dream-like melody again, but this time in A-flat major. Over the course of this final section, the music makes it way back to the tonic keys of F minor and then F major and a short coda concludes the movement.

याविषयी कुणी जाणकार, दर्दी मंडळी आणखी प्रकाश टाकतील, तर फार छान.

संगीत

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

25 Mar 2010 - 7:58 am | चित्रगुप्त

आम्ही इथे घातलेली चित्रे, चित्रपटाच्या डीव्हीडीचे आवरण-चित्र वगैरे मुळे मूळ मोझार्ट च्या संगीताच्या, यूट्यूब च्या दुव्याकडे दुर्लक्ष झाले की काय, असे वाटले, म्हणून या संगीताच्या व्हिडियो चा दुवा पुन्हा एकदा देतआहे.
हा साडेसात मिनिटांचा उत्कट आनंदाचा खजिना अवश्य न्याहाळा, ऐका.

वाटल्यास डोळे मिटून नुसते संगीत ऐका......

http://www.youtube.com/watch?v=qjGuuyMW8ps&feature=related

प्रमोद्_पुणे's picture

25 Mar 2010 - 3:17 pm | प्रमोद्_पुणे

Wolfgang Amadeus Mozart च्या वडीलांची म्हणजे Leopold Mozart ची Toy Symphony सुधा केवळ अप्रतिम आहे. एकदा जरूर एका.. नक्की आवडेल..आमादिअस मोझ्झार्तची तुम्ही दिलेली सुधा छानच आहे.. धन्यवाद..

चित्रगुप्त's picture

25 Mar 2010 - 7:05 pm | चित्रगुप्त

टॉय सिंफनी चा व्हिडियो बघितला, मजेशीर आहे, व्हिडियो मुळे कोणकोणती वाद्ये कसकशी वाजवतात वगैरे बघायला मिळते.... "Amadeus" चित्रपट बघितला आहे का?

प्रदीप's picture

25 Mar 2010 - 7:42 pm | प्रदीप

हे नाटक अलिकडेच पाहिले.

प्रमोद्_पुणे's picture

26 Mar 2010 - 10:41 am | प्रमोद्_पुणे

माझ्या कडे ऑडीओ कॅसेट आहे. व्हिडियो पाहिन आता यु नळीवर.. आमादिअस बघितला आहे. मला पण फार आवडला होता. Alliance Francaise de Poona मधे पाहिला होता फ्रेंच भाषेतून... पाहताना जाम tension होत कारण नंतर फालतू चर्चा असायची त्यामुळे जरा चिडचिड व्हायची.. तुम्हाला आवड असेल विदेशी चित्रपटांची तर शात्तो द मा मेर (Chateau de ma Mere) हा पण जरूर पहा.. यु नळीवर मिळेल कदाचित..

धनंजय's picture

25 Mar 2010 - 7:35 pm | धनंजय

धन्यवाद.

येथे सुरावटीचा दुवा घ्या.

पुढे इंग्रजी परिच्छेदातल्या फक्त या वाक्याचे स्पष्टीकरण मराठीत देतो आहे :

The opening section is for orchestra only and features muted strings. The first violins play with a dream-like melody over an accompaniment consisting of second violins and violas playing repeated-note triplets and the cellos and bass playing pizzicato arpeggios.

म्हटले आहे, की सुरुवातीच्या गाणार्‍या व्हायोलिनच्या स्वप्नाळू धुनीला साथ देतात
१) (+)-२-३, १-२-३, १-२-३, १-२-३ | असा ताल धरून अन्य व्यायोलिने आणि व्हियोला ही वाद्ये (प्रत्येक मात्रेला सा, ग, आणि प हे सुर धरले जात आहेत)
२) सा+--, ग--, प--, . | ... असा टाळ्यांना जोर देणारी खर्जातली चेलो आणि बेस ही वाद्ये. ही वाद्ये गज फिरवून न वाजवता तारा छेडून वाजवलेली आहेत.

ही साथ ऐकण्यासाठी ध्वनिमान (व्हॉल्यूम) खूपच वाढवावे लागते - तुम्हाला गाणार्‍या स्पनाळू धुनीच्या पूर्वी असे काही ऐकू येत नसेल, तर ध्वनिमान वाढवणे आवश्यक आहे!

चित्रगुप्त's picture

25 Mar 2010 - 9:00 pm | चित्रगुप्त

धन्यवाद...
असाच दुवा वेळोवेळी देत रहावा, ही विनंती.
चित्रगुप्त.

चित्रा's picture

26 Mar 2010 - 4:58 am | चित्रा

दुव्यांबद्दल धन्यवाद.
सुंदर सुरावट आहे.