काठावरती तुम्ही उभे (बैठकीची लावणी)

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
16 Mar 2010 - 6:21 pm

काठावरती तुम्ही उभे (बैठकीची लावणी)

फुलपाकळ्या कुस्कूरूनी टाकल्या तलावी या पसरूनी
काठावरती तुम्ही उभे! पाण्यात उडी घ्याना ||धृ||
अहो सजणा, मनरमणा

दिवस नाही अन रातही नाही सुर्यफुल हे उमलू पाही
सुगंधीत या पाण्यामध्ये वत्रांकित पहूडले मी एकटी
धुकाळ या अशा पहाटे मोहरली मज काया ||१||

तरी तुम्ही काठावरती उभे? पाण्यात उडी घ्याना ||धृ||
अहो सजणा, मनरमणा

चुंबूनीया मी माझाच खांदा, केला इशारा धावत याया
पाण्याविण तडफे मीन, तशीच प्रेमाविण आहे मी नं?
जळ न भासे आता हे जाळ की मजला ||२||

तरी सच्या तुम्ही काठावरती उभे? पाण्यात उडी घ्याना ||धृ||
अहो सजणा, मनरमणा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
१६/०३/२०१०
गुढीपाडवा

(बैठकीची लावणी ही खड्या लावणीपेक्षा वेगळी असते. काही जणांना ती शास्त्रीय संगीत अन लोकसंगीत याच्या मधली वाटते. ज्या सामान्य जनांना शास्त्रीय संगीत उमगत नाही पण समजते अशा नागर जनांसाठी बैठकीची लावणी योग्य वाटते. म्हणूनच बैठकीची लावणी घोळवून घोळवून म्हटली जाते/ जावी.)
पाभे/दफो.

शृंगारप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

उल्हास's picture

17 Mar 2010 - 10:12 am | उल्हास

सही आहे

सुंदर

शानबा५१२'s picture

17 Mar 2010 - 10:20 am | शानबा५१२

पाण्याविण तडफे मीन, तशीच प्रेमाविण आहे मी नं?
हे चांगल आहे...कवितेतल्या यमक ह्या प्रकारांपेक्षा दुसर आपल्याला काही समजत नाही.(यमक म्हण्जे प्रकार कि अजुन काही ते काय माहीती नाही)
'आत हे कोण बनं?' अस नटरंग वर नजर टाकली तेव्हा एकल होत
बनं म्हण्जे?

*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

राजेश घासकडवी's picture

17 Mar 2010 - 11:02 am | राजेश घासकडवी

बैठकीच्या लावण्यांमध्ये जो एक लडिवाळपणा असतो तो आलेला आहे.

राजेश

पाषाणभेद's picture

18 Mar 2010 - 11:55 am | पाषाणभेद

इथं आलेल्या समद्या रसिकजनांना आमचा मुजरा आन परतिक्रीया टाकल्याबद्दल आभार आन धन्यवाद.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

विसोबा खेचर's picture

18 Mar 2010 - 3:43 pm | विसोबा खेचर

छान आहे..

तात्या.