कधी कधी प्रेरणा एखादीच कविता असते पण काहीवेळा कवितेसोबतच इतरही धाग्यांचा दंगा एवढा भरपूर असतो की समजत नाही नेमकी प्रेरणा कोणती...जाऊ दे प्रेरणेची काळजी 'मंगेशाला'! ;)
वाळलाच तो चुना लावतो पुन्हा पुन्हा
जर्द पान लाल हे चघळतो पुन्हा पुन्हा
चांदणी दिली कुणी लेखनास ठाव ना
लेख मग उगाच का हरवतो पुन्हा पुन्हा
लेख काव्य पाडले मी लगेच ऑर्कुटी
का मिपाकरांवरी मी भेकतो पुन्हा पुन्हा
माज ही जुनाच शिरजोर आज मी पुन्हा
लोक हुच्च पेटती पोळतो कुला पुन्हा
हां...कबूल उंटचाल जन्मजात लाभली
मालकास मी थुका लावतो पुन्हा पुन्हा
तोंड पाडुनी उभे काव्य मजपुढे सदा
'रंग'तेच खाज ही खरडतो पुन्हा पुन्हा
चतुरंग
प्रतिक्रिया
11 Mar 2010 - 6:04 pm | भिडू
खतरनाक
11 Mar 2010 - 6:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आज रात्रीच बसणार होते .... माझी शब्दांची वही घेऊन विडंबन पाडायला, पण रंगरावांनी कामच केलं! 'मंगेशा'च्या कृपेचा वरदहस्त असाच रंगरावांच्या कीबोर्डावर असू देत.
विडंबन एकदम हिरवं माजुर्ड झालं आहे! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
अदिती
11 Mar 2010 - 6:22 pm | jaypal
रंगाजींस साष्टांग नमस्कार. (आम्हाला आता गंडा घालाच आपल ते बांधाच)
क्लायमॅक्स
माज ही जुनाच शिरजोर आज मी पुन्हा
लोक हुच्च पेटती पोळतो कुला पुन्हा
हां...कबूल उंटचाल जन्मजात लाभली
मालकास मी थुका लावतो पुन्हा पुन्हा
तोंड पाडुनी उभे काव्य मजपुढे सदा
'रंग'तेच खाज ही खरडतो पुन्हा पुन्हा
घाला नळी कितीही,मज काय गम्य त्याचे
जन्मजात खोड ती, वाकडीच राही पुन्हा पुन्हा
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
11 Mar 2010 - 6:18 pm | दत्ता काळे
माज ही जुनाच शिरजोर आज मी पुन्हा
लोक हुच्च पेटती पोळतो कुला पुन्हा
. . हा . . हा भारीच जमलंय.
11 Mar 2010 - 6:36 pm | श्रावण मोडक
विडंबन जोरदारच.
मालकास मी थुका लावतो पुन्हा पुन्हा
तुमच्या कल्पनाविलासाला दाद द्यावी तितकी कमीच!!!
11 Mar 2010 - 6:40 pm | बिपिन कार्यकर्ते
मायला.... कवितेच्या आधीच विडंबन तयार... आणि अगदी सद्यस्थितीनुसार... पर्फेक्ट.... कं लिवलंय कं लिवलंय!!!!!!!!!!!!!!
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
11 Mar 2010 - 8:08 pm | प्राजु
बाऽऽऽऽपरे!!!!
ठ्ठो ठ्ठो ठ्ठो!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/
11 Mar 2010 - 8:52 pm | प्रभो
जहबहरा!!!
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
11 Mar 2010 - 9:23 pm | मेघवेडा
आम्हांसही काही सुचले.. अर्थात रंगाशेठच्या विडंबनावरून आणि सद्य परिस्थितीवरून प्रेरणा मिळाली.
आपला सध्याचा सर्वाधिक लोकप्रिय मिपाकर 'मंपा'चे विचार आहेत असं समजू:
(तात्यांची माफी मागूण)
मालकांस लाविले धंद्याला मी परि
मालक *त्या देई समज मज पुन्हा पुन्हा..
मालकांस मी दिले सल्ले जरि भाबडे,
प्रतिसादांतून होति हल्ले पुन्हा पुन्हा..
मालक *त्या कुठे यमनामधि गुंतला
तोवर धागे मी असे काढितो पुन्हा पुन्हा..
मालक मिसळपावचा *त्या अभ्यंकर,
'चांदणी'त 'ता' असे, सांगतो पुन्हा पुन्हा!
;)
-- मेघवेडा
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
मेघवेड्याचे वेडे विचार!!
11 Mar 2010 - 9:45 pm | प्रभो
बेक्क्कार....ठ्यो..... =))
12 Mar 2010 - 12:38 am | विसोबा खेचर
फक्कड रे! :)
11 Mar 2010 - 9:41 pm | राजेश घासकडवी
चतुरंगराव,
विडंबन जबरदस्त जमलंय.
मान लिया उस्ताद...
राजेश
11 Mar 2010 - 9:48 pm | अविनाशकुलकर्णी
मजा येते वाचायला.... =))
11 Mar 2010 - 11:17 pm | जयवी
रंगाशेट.......हाणलंत की..... :)
माज ही जुनाच शिरजोर आज मी पुन्हा
लोक हुच्च पेटती पोळतो कुला पुन्हा
.......... हे तर लैच भारी !!!!!!!!!!!!!!!!!
12 Mar 2010 - 12:12 am | विसोबा खेचर
रंगा दी ग्रेट! :)
12 Mar 2010 - 12:22 am | अक्षय पुर्णपात्रे
श्री चतुरंग, समयोचित विडंबन. उचित व्यक्तिस उचित तो संदेश मिळण्याची शक्यता मात्र कमी वाटते. ती हिंदीत काहीतरी म्हण आहे 'लातोंके . .. ... .. ...'
12 Mar 2010 - 6:11 am | sur_nair
अस्सल मराठी बाणा, उफाळतो पुन्हा पुन्हा
दुसऱ्याचे पाय खाली, ओढतो पुन्हा पुन्हा
गम्मत म्हणून कधी कधी ठीक आहे पण मूळ कवितेपेक्षा विडंबनाची जास्त वाहवा होते. असे बरेच नमुने इथे पहिले. याचा नक्की हेतू काय? जो तो आपापल्या परीने लिहितो. नसेल आवडत तर नका वाचू पण असे त्याचे धुमारे तरी उडवू नका.
12 Mar 2010 - 6:45 am | शेखर
तुम्हाला जर विडंबन आवडत नसेल तर वाचत जाऊ नका. शेवटी ज्याची त्याची आवड असते. काय?
12 Mar 2010 - 7:04 am | पाषाणभेद
वाटच पहात होतो याची.
मस्त आहे.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३