हिवाळी ऑलिंपिक मध्ये देवदास मधील गाण्यांवर आईस डान्स

अश्विनीका's picture
अश्विनीका in जनातलं, मनातलं
24 Feb 2010 - 3:41 pm

सध्या व्हॅनकुव्हर , कॅनडा येथे हिवाळी ऑलिंपिक चालू आहे.
हे २१ वे हिवाळी ऑलिम्पिक आहे . इथे फेब्रुवारी १२ ते २८ ह्या दरम्यान बर्फावरील खेळ खेळले जात आहेत. ह्यात बर्फावरील हॉकी , फिगर स्केटिंग (बर्फावर पायात स्केट्स घालून नाच), स्पीड स्केटिंग (पळण्याच्या स्पर्धेसारखीच पण पायात स्केट्स घालून बर्फाच्या ट्रॅक वरून पळणे), स्की जम्पिंग, फ्री स्टाईल आणि क्रॉसकंट्री स्किइंग , स्नोबोर्डिंग, स्लेईंग अशा अनेकविध स्पर्धा चालू आहेत.

व्हॅनकुव्हर ला जाणे शक्यच नव्हते तरी घरच्या घरी टिव्ही वर ह्या स्पर्धा बघायला मजा येत आहे. फिगर स्केटिंग आणि स्किईंग हे त्यातल्या त्यात मला खूप आवडले.

(फेब २० - २१ )शनिवारी आणी रविवारी फिगर स्केटिंग ही स्पर्धा झाली. त्यात ओडी आणि एफ डी असे दोन प्रकार असतात. ओडी म्हणजे ओरिजिनल डान्स आणि एफ डी म्हणजे फ्री डान्स. अमेरिकेचे फिगर स्केटिंग मधील राष्ट्रीय विजेते मेरिल डेविस आणि चार्ली व्हाईट ह्या जोडीने ओरिजनल डान्स ह्या प्रकारात हिंदी चित्रपटातील गाण्यांवर बर्फावरील नृत्य सुंदर रित्या सादर केले. हिंदी गाण्यांमधे त्यांनी कजरारे , सिलसिला ये प्यार का आणि डोला रे डोला ही गाणी निवडली होती. त्यांचे कपडे पण गाण्याला साजेसे होते. हे नृत्य इतके छान झाले की ह्या स्पर्धेचे ते एक वैशिष्ठ्य ठरले. ह्या प्रकारात ह्या जोडगोळीने बाजी मारून १०८.५५ गुण पटकावले जे इतर स्पर्धकांपेक्षा सर्वात जास्त होते. नंतर मात्र फ्री डान्स मध्ये अगदी थोड्याशा चुकींमुळे त्यांचे गुण कमी झाल्याने कॅनडाची जोडी पुढे सरकली. मेरिल डेविस आणि चार्ली व्हाईट यांना रौप्य पदकाचे मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.

ह्या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण मला पाहता आले नाही. पण संध्याकाळच्या बातम्यांमधे त्यांच्या नृत्याची झलक बघायला मिळाली. संपूर्ण नूत्य बघायला हवे ह्या हेतूने जालावर नृत्याचा व्हिडिओ शोधला. छान वाटले बघायला. ऑलिंपिक मधे हिंदी गाणी वाजवली गेली ह्याचे कौतुक वाटले.
मिपाकरांना आवडतोय का बघा हा व्हिडिओ

http://www.nbcolympics.com/video/assetid=e713aa15-112f-4d1c-8665-77bec00...

नृत्यक्रीडाबातमीआस्वाद

प्रतिक्रिया

सनविवि's picture

24 Feb 2010 - 6:46 pm | सनविवि

यप! बघितला हा व्हिडिओ मी..अप्रतिम नाचली आहेत ती दोघं!

पक्या's picture

25 Feb 2010 - 12:30 am | पक्या

छान आहे विडिओ. धन्यवाद.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

मीनल's picture

25 Feb 2010 - 5:03 am | मीनल

मस्त आहे फ्युजन.
खूप आवडला व्हिडिओ.
मीनल.

मस्तानी's picture

26 Feb 2010 - 11:09 pm | मस्तानी

अश्विनिका ... ओलेम्पिक मधील विडीयो दिल्याबद्दल धन्यवाद !

मेरील व चार्ली ने २०१० च्या अमेरिकन फिगर स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते जानेवारी महिन्यात ... तेव्हा देखील त्यांनी हेच नृत्य (routine) केले होते पण गाणे मात्र 'जय हो', ते पण इंग्रजी शब्द अधिक असं होतं ... तो विडीयो येथे आहे ... http://www.youtube.com/watch?v=JUMOBMIGHC0

ओलेम्पिक मध्ये fusion असेल तरी गाण्यांचे हिंदी शब्दच कायम ठेवले होते ...

हे दोघे मिशिगन चे असल्याने जरा जास्तच आपुलकी वाटली हे मान्य करायला पाहिजे :) भारतीय नृत्य शिकण्यासाठी त्यांनी अनुजा राजेंद्र यांचे मार्गदर्शन घेतले होते ... या अनुजा चा BollyFit Dance Studio चांगलाच हिट आहे इथे मिशिगन मध्ये ... www.bollyfit.com

अश्विनीका's picture

27 Feb 2010 - 9:44 am | अश्विनीका

धन्यवाद मस्तानी ...छान माहिती दिलीत.
- अश्विनी

लंबूटांग's picture

2 Mar 2010 - 7:47 am | लंबूटांग

original नाही आहे.

ज्याने video upload केला त्याने फक्त background चे गाणे बदलले आहे. उजवीकडे info pane मधे आणि Comments मधे वाचलेत तर तिथे दिसेल. :)

पक्या's picture

2 Mar 2010 - 1:47 pm | पक्या

कोणता व्हिडियो? मस्तानी यांच्या लिंक मधील का?
जय महाराष्ट्र , जय मराठी !

लंबूटांग's picture

2 Mar 2010 - 7:31 pm | लंबूटांग

अश्विनीका ह्यांनी दिलेला video original version आहे.

मस्तानी ह्यांच्या दुव्यामधील video मधे video तोच ठेवून audio बदललेला आहे.

शुचि's picture

2 Mar 2010 - 5:57 am | शुचि

सुंदर आहे चलचित्रफीत. धन्यवाद अश्विनी.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मस्तानी's picture

2 Mar 2010 - 10:00 pm | मस्तानी

श्री लंबूटांग, चूक ध्यानात आणून दिल्याबद्दल आपल्या 'detail oriented' दृष्टी चे धन्यवाद !

२०१० च्या अमेरिकन फिगर स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले तेव्हाचा audio न बदललेला video आता मिळाला मला ... http://www.youtube.com/watch?v=PYlXNoBiDSs

शानबा५१२'s picture

2 Mar 2010 - 11:03 pm | शानबा५१२

त्या गाण्यामधल्या आपण का?????????

'मिळवल' असे लिहलय म्हणुन विचारले

काही चुकत असल्यास क्ष्मा असावी

शानबा५१२'s picture

2 Mar 2010 - 11:04 pm | शानबा५१२

त्या गाण्यामधल्या आपण का?????????

'मिळवल' असे लिहलय म्हणुन विचारले

काही चुकत असल्यास क्षमा असावी.
उत्तर कळवा

मस्तानी's picture

2 Mar 2010 - 11:37 pm | मस्तानी

अश्विनिका यांनी मुळात ओलेम्पिक मधील नृत्याबद्दल लिहिले ते भारतीय पोशाख / भारतीय नृत्याचा आधार घेवून केलेले सुंदर सादरीकरण सर्वांपर्यंत पोहोचावे या हेतूने. मी त्यात भर घातली कारण मला आणखी काही माहिती इथे आजूबाजूला असलेल्या लोकांकडून मिळाली, ती सर्वांबरोबर share करावी म्हणून. मूळ गोष्ट बाजूला पडून आता इथे उगाच फाफटपसारा वाढतोय ...

तरीही तुमच्या प्रश्नाचे उत्तर ... माझ्या आधीच्या प्रतिक्रियेत "मेरील व चार्ली ने २०१० च्या अमेरिकन फिगर स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते जानेवारी महिन्यात ... तेव्हा देखील त्यांनी हेच नृत्य (routine) केले होते" असा उल्लेख आहे ... त्याला अनुसरून "मिळवले" हा शब्द आहे ...

शानबा५१२'s picture

2 Mar 2010 - 10:55 pm | शानबा५१२

GoodFellas ह्या तुफान गाजलेल्या सुमार (माझ्या मते) चिट्रपटात ह्या आशयाचे वाक्य होते..

हे जग कुठे जात आहे??............
मला ही तसचं वाटत

शानबा५१२'s picture

2 Mar 2010 - 11:18 pm | शानबा५१२

म्हणजे
देवदास व Olympic ह्यांचा संबंधाची कल्पनाही करवत नाही......
आणि जेव्हा हे कळले........."हिवाळी ऑलिंपिक मध्ये देवदास मधील गाण्यांवर आईस डान्स"
तेव्हा अ़जब वाटल.........
म्हणुन तसे लिहले.वेगळा अर्थ नव्हता Madam! Even then I take back my words if you don't like it.

मस्तानी's picture

2 Mar 2010 - 11:48 pm | मस्तानी

जग खूप जवळ येत चाललंय हो ... Global Village असा दोन पूर्णपणे भिन्न स्तरावरचे शब्द वापरून केलेला नव्या जमान्यातला शब्दप्रयोग बघा ना :) ... आहेच अजब ! असो ...

रेवती's picture

3 Mar 2010 - 1:21 am | रेवती

मलाही व्हिडिओ आवडला. आपली काही गाणी इथेही लोकांना आवडतात. आमच्या टाऊनमधल्या वाय एम सी ए मध्ये व्यायामासाठी नाचताना (एरोबीक्स) आपली गाणी लावलेली ऐकून मलाही मजा वाटत होती. आजच माझ्या मुलाच्या शाळेतल्या एका बाईंनी कपाळाला लावायच्या स्टिकर (टिकली)बद्दल विचारत होत्या. काल माझ्या मैत्रिणीचे तिच्या मुलीच्या वर्गात पाच मिनिटाचे भाषण इंडियन कल्चरबद्दल होते आणि आई व मुलगी भारतीय पद्धतीने नटून गेल्यावर सगळे जण छोट्या रम्याला प्रिन्सेस म्हणत होते.

रेवती

मदनबाण's picture

3 Mar 2010 - 9:49 am | मदनबाण

न्यूज चॅनलवर हा व्हिडीयो पाहिला होता...आपल्या संगीतावर हा नॄत्यआविष्कार पाहण्यास जास्त आनंद वाटला.
तसेच हल्ली फिरंगी तरुणींना लावणीचा ध्यास लागला आहे,कालच तीन फिरंगी पोरींना लावणीच्या तालावर थिरकताना पाहिले...
असेच काही इडियो :---

http://www.youtube.com/watch?v=GbkLaa5weSo

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

मस्तानी's picture

3 Mar 2010 - 9:29 pm | मस्तानी

मदनबाण ... कुठुन शोधलेत हे ...