जिवधन किल्ला

विनोदबाण़खेले's picture
विनोदबाण़खेले in जनातलं, मनातलं
24 Feb 2010 - 12:30 pm

सह्याद्रीच्या रांगेतील जो मानाचा तुरा तो शिवनेरी आपल्या सर्वाना माहित आहे , पण अजुन बर्याच जणांना माहित नसेल की या शिवनेरीला अजुन मित्र मंडळी आहेत .या जुन्नर ने अनुभवले आहे एक श्रीमंत साम्राज्य , ती श्रीमंती फ़क्त शिवजन्माचीच नव्हती ,तर ती होती येथील मातीच्या सुगंधाची ,खड्कांच्या कणखरतेची, युगायुगां पासून येथल्या भूमिपुत्रांनी आपल्या शिंपलेल्या घामाची, त्यांच्या श्रमांची .सह्यकड्या प्रमाणे पोलादी छाताडांची अन श्रुष्टीचा पसारा रचनार्या त्या निसर्ग देवतेच्या मुक्त हस्ताची .
-- शिवनेरी ह्या शिवजन्म स्थाना बरोबरच जुन्नर मधे आहेत चावंड ,हडसर ,निमगीरी,आणि जीवधन ही दुर्ग चौकड़ी सुद्धा .शिवरायांनी ह्या दुर्गांना देखिल आपल्या पदस्पर्शाने पावन केले असेल .पण त्याची नोंद काही कुठे आढळत नाही ,तरी देखिल त्यांचे अस्तित्व आहे अजूनही निसर्गाच्या आणि मानवाच्या तडाख्यांला पुरून उरलेल.आपल्या पराक्रमी पुर्वजांच्या प्रचंड वारश्याची आठवन जागवत, यातील प्रत्येक किल्ल्याची आज जरी पडझड झालेली असली तरी प्रत्येक ठिकाणी आहेत अजुन ही काही असे अवशेष की आयुष्यात एकदातरी प्रत्येकाने भेट द्यावी या रणतीर्थांना .

यापैकीच एक जीवधन हे रणतीर्थ निवडले आम्ही भेट द्यायला दीवाळीच्या मोसमात .गोडधोड खावुन आलेल शैथिल्य घालवायला.

जुन्नर मधून नानेघाटा च्या रस्त्या वर डाव्या हाताला उभा आहे हां जीवधन किल्ला , सरकार च्या अन पावसाच्या कृपेने बराच चांगला असलेला डाम्बरी रस्ता अलगद घेउन गेला आम्हाला पायथ्याच्या एक गावात . एक घरा समोर मोटर सायकली लावून रस्त्या ची विचारपूस केली तेव्हा परत नेहमी प्रमाणे गावच्या प्रेमाच दर्शन झाले , अनेक रानवाटा मधून चुकाल म्हणून एकजन आम्हाला मुख्य वाटे पर्यंत सोडवायला तयार झाला ,आमचा वाटाडया म्हणून . बिचारा थोड़ेथोड़े अडखळत बोलत होता ,त्यानी चार वेळा नाव सांगुन ही आम्हाला काही समजले नाही , म्हणून आम्हीच त्याचे नाव ठेवले गिग्या.आता गिग्या म्हणजे काय? असे विचारू नका .तर हा गिग्या पुढे अन आम्ही मागे असा आमचा प्रवास सुरु झाला .आम्ही चुकू म्हणून आमच्या बरोबर आलेला गिग्याच तीन वेळा रस्ता चुकला पण परत परत प्रयत्नाने बरोबर एकदाचा मुख्य रस्त्यावर घेउन गेला .आता आमच्या समोर होता निष्पर्ण खडकाचा एक मोठा उभा कडा...येथे आमची चाललेली धडपड बघून आमच्यातला एक मावळा गळाठला ,म्हणायला लागला मला आता अट्याक येणार ,कसे तरीच होतय,
आम्ही ओळखले याला काही वर यायचे नाही ,त्याला विचारले इथेच एखाद्या झाडाखाली बसशील का? तेवढ्यात गिग्याने सांगितले इथे रान डुकरे असतात , हे सांगायला त्याला दहा मिनिटे लागली ,तरी आम्हाला कळले नव्हते ,पण आमच्या अट्याक वाल्याला बरोबर कळले .ते त्याने आम्हाला सांगितले . मग आता पर्याय काय ?एवढ्या लांब येउन आपण वर न जाता परत जाने बरोबर नाही असे ठरवून आम्ही त्याला गिग्या सोबत ख़ाली पाठवायचे ठरले. ख़ाली जायचे ते पण गिग्या सोबत असे ठरल्या वर हा लगेच नॉर्मल झाला ,मग त्याला भेळ पुडा आणि पाण्याची बाटली दिली आणि आमचा प्रवास सुरु झाला .त्या दोघांचा ख़ाली अन आम्हा तिघांचा वर किल्ल्या कड़े , त्याचे टेंशन घेउन आम्ही वर चढायला लागलो ,
मग आला तो टप्पा साधारण पंधरा फुटाचा उभा चढ़ ,अक्षर्शहा उभा चढ़ ,
खड्काच्या खोबनीत हात पाय रोवत एकदाचे आम्ही तिघे वर पोहचलो अन ख़ाली बघून हृदयाचा ठोकाच चुकला ! परत याच्यातून ख़ाली कसे जाणार ? पण ते नंतर बघू म्हणून वर चढायला सुरवात केली,पडझड झालेल्या प्रवेशद्वारा जवळ असलेली पाण्याची टाकी पाहिली ती अशी दिसत होती जशी डोंगरात गुहा खोदलेली आहे ,बरा आम्ही तेथे गेल्यावर एक बेडूक उडी मारून गेला ,तेव्हा समजले की ख़ाली पानी आहे ,म्हणालो वाचलो परत एकदा.
तिथे थोड़ी विश्रांति घेतली अन पुढे निघालो तर प्रवेशद्वारा समोरच आमच्या स्वागताला पन्नास एक माकडे ,पण ही माकडे बघून ती माकडे लगेच दूर गेली. कधी त्यांच्या कड़े तर कधी खालच्या भग्न वास्तु कड़े बघत आम्ही फिरत होतो तर समोर एका टेकडी वर दिसले थोडेसे दगडी बांधकाम ,थोडसे दिसत असेल तरी ते एवढे देखने होते की पावले आपोआप तिकडे वळली ,त्याच्या दारात पाउल टाकल अन नतमस्तकच झालो त्या अफाट बुद्धिमत्तेच्या निर्मात्या समोर ज्याने हे देखने वास्तुशिल्प बनवले , बाहेरून फक्त चार पाच फुट दिसणारी वास्तु आत मधे जवळ जवळ त्याच्या पाच सहा पट मोठी होती.अतिशय भव्य दालानांच्या रूपात rock cut architecture चा अप्रतिम नमुना ,
खुप पस्तावलो आम्ही दिवसा उजेडी टॉर्च न घेतल्या बद्दल कारण आत पूर्ण अंधार होता रात्री सारखा ,तरी फोटो फ्ल्याश च्या मदतीने आत गेलो तेव्हा एकदम अंगावर आली पाच पंचवीस वट वाघळ ,घाबरलोच अगदी वाटले आता मेलोच ,पण थोड्याच वेळात ती फड फड थांबली ,मग दबकत दबकत आत पाउल टाकले ,काही म्हणता काही दिसत नव्हते ,मग प्रत्येक दालनात फोटो काढायचा अन त्याच उजेडात दिसलेले लक्षात ठेउन पुढे पाय टाकायचा असे करत पहिली दोन दालने ओलांडली अन परत एकदा खुप वट वाघळ उडाली ,मग परत फिरलो नंतर पाहू म्हणून , हळूच बाहेर आलो .
मग सुरु झाला शिखरा कड़े प्रवास ,वाटेतल्या टाकी तुन पाणी घेउन वर गेलो ,वर होते प्रचंड मोठाले दगड गोटे,अन हिरवेगार गवत ,शिखरा वरुन दुसर्या बाजूला काही पाण्याच्या टाक्या दिसल्या आणि तिकडून एक दरवाजा आहे ते आठवले .पण तिथे वर फिरताना डोक्यात एकच गणित चाललेले की आता परत उतरायचे कसे ?विचार करून डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली पण त्या दगडी खाचा मधून उतरताना कशी पोझ घ्यायची काही सुचत नव्हते .हीच अवस्था तिघांची पण होती, मी जरा जास्तच दमल्याने त्या दोघाना बसायला सांगितले तर ते ख़ाली जाउन येतो म्हणाले .ते दोघे अर्धा पाऊन तास गायब आणि मी आपला चालवतोय डोके आता उतरताना कसे उतरायचे ? खाचेत आधी पाय ठेवायचा का हात ?आपला बोजा पेलवेल का आपल्याला उतरताना ?आता कसे जाणार आपण घरी ?समजा नाही उतरताआले तर काय ?हे प्रश्न मनात असतानाच खालून त्यांनी आवाज दिला येथे पाणी चांगले आहे आपण जेवण करुया .जेवण म्हंटल्यावर थोड़ी हुशारी आली ,मनातल्या शंका ख़ाली बसल्या उतारा वरुन सुसाट त्यांच्या कड़े गेलो ,पाण्याच्या टाकी जवळ माकडे विष्टा विसर्जन करून गेलेली होती, पण पाणी स्वच्छ होते ,बाटल्या भरून बोलत बसलो .शेवटी ठरले पहिला रस्ता अवघड आहे ,दूसरा कसा आहे माहित नाही ,पण दैवा वर विश्वास ठेउन दुसर्या दरवाज्याने ख़ाली जायचे ठरवले,उतरायला सुरवात केली अन थोड्याच वेळात आला दरवाजा,
परत एकदा त्याच्या निर्मात्याचे कौतुक करून अन निसर्ग आणि मानवाच्या हेळसांडिला शिव्या घालत आम्ही त्या निम्म्या बुजलेल्या दरवाजातून बाहेर आलो तर काय ?
समोर पायर्या गायब ,पाण्यानी खडकाला कोरुन खाच झालेली ,आता काय करायच ?
विचार केला कदाचित यालाच आगीतून फुफाट्यात म्हणत असतील, पण नाही ही म्हणआम्हाला अजुन समजायची होती ,कसे तरी एक पाय ह्या टोकाला तर दूसरा त्या टोकाला असे करत उतरलो एकदाचे ,अन पुढे पायर्या दिसल्या .मग काय तिघेही सुसाट निघालो अन अचानक समोरची दरी बघून थांबलो ,पायर्या तर संपलेल्याच पण डोंगर देखिल संपलेला ,समोर फक्त घनदाट झाड़ी आणि मधे प्रचंड दरी ,
समोर रस्ता नाही ,मागे जायच तर वर चढायच दिव्य अन परत पलिकडे उतरायचे पण दिव्यच ! आता समजले आगीतून फुफाट्यात पड़ने म्हणजे काय ते ! आमच्या बरोबरचा मुम्बईचा अमित मात्र वस्ताद होता ,पाण्याच्या उतरनिला गडी रस्ता म्हणत होता ,अन त्या रस्त्याने चालू ही लागला होता .आम्ही येतोय की नाही हे न बघता हा बाबा गेला पण ख़ाली पंधरा विस फुट ख़ाली ,चालत घसरत ,आम्ही ओरडून ओरडून त्याला परत बोलावले ,तो वर येई पर्यंत सुनील सरांना बायकोचा फोन आला थोडा वेळ बोलले ,मग बसलो विचार करत ,आपली तर बुद्धीच बंद झालेली वाटत होते डिस्कवरी वर जसे डोंगरात अडकलेल्या लोकांना न्यायला हेलीकॉप्टर येते तसे आपल्याला न्यायला येईल का ?आपण जीवंत ,हाती पायी धड घरी जाऊ का ? या दरी तल्या झाडांवर उडी मारली तर हात पाय न मोड़ता ख़ाली उतरता येईल का ?उतरल्यावर रस्ता सापडेल का?एक ना दोन हजार प्रश्न ,
शेवटी सर्वानुमते ठरले की एवढा मोठा दरवाजा बनवणारा असा दरीत संपनार रस्ता बनवणार नाही ,तेव्हा दूसरा रस्ता नक्कीच असेल ,तो पाहू ,नाहीतर परत पलिकडे उतरु असा विचार करून परत वर चढायला सुरुवात केली, एका जागी उजव्या बाजूला कातळ कड्याला बिलगून एक पावुल वाट जाताना दिसली ,परत एकदा आमचे दैव आजमावयाला आम्ही तिघे तयार झालो ,ही वाट खरेच आम्हाला ख़ाली घेउन चालली होती ,आम्ही आता मस्त मूड मधे होतो ,एवढ्यात अचानक बंदुकीचा बार ऐकू आला ,आता मात्र हद्द झाली होती ,वाटले या झाडा मधून कुठुनही एखादी गोळी येउन आपल्याला हुतात्मा करणार. मग काय सुसाट सुटलो आम्ही, ख़ाली तीन चार जन झाडावरुन बंदुकीनी शिकार करत होते त्यांची दोन तीन कुत्री होती ,ती आली अंगावर धावून ,एक जन त्याना थाम्बवायला आला ,त्यातल्या एका कुत्र्याचे दोन्ही डोळे काढलेले होते ,फक्त लालेलाल खाचा दिसत होत्या ,ती माणसे आम्हाला घाबरली अन आम्ही कुत्र्यांना ,एकदाचे तिथून निघालो अन थोड्या वेळातच आम्हाला मोकळी जमीन अन समोर नानाचा अंगठा दिसला ,आमच्या आनंदाला पारावार उरला नाही ,मस्त पैकी झर्यात हात पाय धुतले ,जेवण केले ,आणि जीवधन ला जीवधन का म्हणतात ते कळले या आनंदात परतीची वाट धरली ,गावात पोहचलो तर आमचा चौथा शिपाई अन गिग्या आम्हाला सापडायला यायला माणसे ,आणि नंतर घरी न्यायला जीप गाड़ी जमा करत होते ,त्यानी पण आम्हाला पहिल्या वर सुटकेचा निश्वास टाकला.
आम्ही गिग्याला पैसे दिले अन त्या सगळ्यांचे आभार मानून परतीचा मार्ग पकडला .

विनोद बाणखेले .
मंचर .
९८५०२२९८२२

(सर्व फोटो नेट वरुन साभार)

इतिहासलेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

24 Feb 2010 - 2:00 pm | प्रचेतस

विनोद राव,
लेख मस्तच. मागच्या जीवधनाच्या काही भेटींची आठवण झाली.
तुम्ही लिहिताय इतका काही जीवधन अवघड नाही हो. सोपा कातळारोहण टप्पा आहे. अर्थात त्या कातळारोहणाच्या आधी जी वाट घाटघरमार्गे जाते तीच घसारा आणी दृष्टीभयामुळे अवघड भासते.
शिवाजी महाराजांपेक्षाही शहाजीमहाराजांचा उल्लेख जुन्नर जवळील किल्ल्यांवर अधिक आढळतो. शहाजीमहाराजांचा पायरव यांतील बहुतेक किल्ल्यांवर झालेला आहे.

आपला,
(जीवधनप्रेमी) वल्ली

विनोदबाण़खेले's picture

24 Feb 2010 - 2:09 pm | विनोदबाण़खेले

(जीवधनप्रेमी) वल्ली धन्यवाद ,
परत जेव्हा भेट द्याल जीवधन ला तेव्हा जरुर फोन करा आपण बरोबर जाउया.
आपला.
विनोद बाण़खेले,
९८५०२२९८२२

विनोदबाण़खेले's picture

24 Feb 2010 - 5:39 pm | विनोदबाण़खेले

विनोद बाण़खेले,
९८५०२२९८२२ :-C

बज्जु's picture

25 Feb 2010 - 3:07 pm | बज्जु

वल्लीशी सहमत

बज्जु - एक गड्प्रेमी

विनोदबाण़खेले's picture

25 Feb 2010 - 1:41 pm | विनोदबाण़खेले

:T :T :T :T :T :T :T :T :T :T :T :T :T :T :T :T :T अरे जरा वाचल्यावर प्रतिक्रिया देत जा.

विनोदबाण़खेले's picture

3 Mar 2010 - 6:14 pm | विनोदबाण़खेले

फोटो पाहिले क?

विनोद बाण़खेले,
९८५०२२९८२२

विसोबा खेचर's picture

3 Mar 2010 - 6:55 pm | विसोबा खेचर

सुंदर!

विनोदबाण़खेले's picture

6 Mar 2010 - 5:42 pm | विनोदबाण़खेले

विनोद बाण़खेले,
९८५०२२९८२२ =D>
धन्यवाद!!!!!