संस्कृत२

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in जनातलं, मनातलं
14 Mar 2008 - 6:54 am

सत्यकाम जाबाली - मूळ कथा : छांदोग्य उपनिषद (IV 39-43)

छोटा सत्यकाम एके दिवशी आईला म्हणाला, "आई, मला शिकावेसे वाटते".

आई म्हणाली, "जरूर शिक. ब्रह्मज्ञानी हो."

सत्यकाम म्हणाला, "आई, आपण कोण, कुठले?"

आई म्हणाली, "बाळ, बस इथे, मी तुला सगळे सांगते."

दुसर्‍या दिवशी सत्यकाम हरिद्रुम गौतम ऋषींच्या आश्रमात गेला आणि म्हणाला, "गुरुजी, मला तुमच्याकडे शिकायचे, ब्रह्मज्ञानी व्हायचे आहे".

गौतम ऋषी म्हणाले, "बाळ बस. पाणी घे. कोण तू? कुठून आलास? तुझे वडिल काय करतात? तुझे गोत्र काय?".

सत्यकाम दृढतेने म्हणाला, "गुरुजी, माझे नाव सत्यकाम. काल मला जे आई म्हणाली तेच आज मी तुम्हाला सांगत आहे. आई म्हणाली, बाळा, मी तरुण असताना अनेक ठिकाणी दासी म्हणून राहिले. तेव्हाच तुझा जन्म झाला. तुझे वडिल कोण हे मी पण निश्चित सांगू शकत नाही. गुरुजी विचारतील तेव्हा हेच सांग की जबालेचा पुत्र म्हणून मी जाबाली."

त्यावर गौतम ऋषी म्हणाले, "जो सत्य बोलतो, निर्मळ मनाचा, निष्कलंक विचारांचा, अंतर्बाह्य पारदर्शक असतो तोच ब्राह्मण होय (नोंद घ्यावी). हे सौम्या, थोड्या समिधा आण. आपण सत्यकामाचा उपनयन विधी करू".

पुढे असा हा दासीपुत्र सत्यकाम गौतम ऋषींच्या आश्रमात राहिला. त्याने वेदाध्ययन केले. तो वेद पारंगत झाला.

[मात्र सत्यकामाला ब्रह्मज्ञानाची आस लागली होती. गौतम ऋषींचा शिष्य असतानाच त्याला ब्रह्मज्ञान मिळते पण अगदी वेगळ्या पद्धतीने ज्याची एक वेगळी कथा आहे. जी पुन्हा कधीतरी.]

हे ठिकाण

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Mar 2008 - 7:43 am | llपुण्याचे पेशवेll

ऐतर हा 'इतरा' हिचा पुत्र. त्याचे वडील देखील तपस्वी होते. त्याच्या आईला वडीलानी त्यागिलेले होते. त्यामुळे तो रागाने वडीलांचे नाव लावत नसे आईचे नाव लावत असे. ऐतरेयाने लिहीलेले वा सांगितलेले ते ऐतरेय उपनिषद. त्यात शेती विषयक ज्ञान सांगितलेले आहे.
त्याची पण कथा सुरस आहे. ती संपूर्णपणे मला माहीत नाही. कोणाला माहीत असेल तर सांगावी.
मी वरती पाजळलेले ज्ञान अपूर्ण असू शकते. काही चूक असेल तर कृपया सुधारण्यास मदत करावी.
सृलाताईंचा उपक्रम एकदम मस्त.

पुण्याचे पेशवे

सत्यकाम जाबालीची कथा छांदोग्य उपनिषदातील, आणि ऐतरेयाशी संबधित नसलेली.

छांदोग्य उपनिषदात ऐतरेय ऋषीचाही उल्लेख आहे. पण तिथे त्याला बाप नसल्याचा उल्लेख नाही, तो दीर्ध आयुष्य जगल्याचा उल्लेख आहे. बापाला ऐतरेय आवडत नसे, म्हणून त्याने आईचे नाव लावले अशी कथा फार पुढे १२-१३व्या शतकात सायणाचार्यांनी दिली आहे.

ऐतरेय अरण्यक/ब्राह्मण/उपनिषद हे ऋग्वेदाच्या अनुषंगाने वाचावयाचे प्रमुख ग्रंथ आहेत. शेतीविषयक ज्ञान असेल - पण अग्निष्टोम वगैरे महत्त्वाचे यज्ञ करायचे तपशीलवार विधी त्यात (ब्राह्मणात) मुख्यत्वे आहेत. ऐतरेय उपनिषद आत्मा-ब्रह्माबद्दल आहे. त्यातील महावाक्य "प्रज्ञानं ब्रह्म" असे आहे.

प्राजु's picture

14 Mar 2008 - 7:52 am | प्राजु

ऐतर हा 'इतरा' हिचा पुत्र. त्याचे वडील देखील तपस्वी होते. त्याच्या आईला वडीलानी त्यागिलेले होते. त्यामुळे तो रागाने वडीलांचे नाव लावत नसे आईचे नाव लावत असे. ऐतरेयाने लिहीलेले वा सांगितलेले ते ऐतरेय उपनिषद. त्यात शेती विषयक ज्ञान सांगितलेले आहे.

हो बरोबर आहे. ही कथा मी पूर्ण वाचली होती पण आता आठवत नाही. मनोगतावर वाचली होती बहुतेक....

सृ.ला. ताई.. कथा चांगली आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु

व्यंकट's picture

14 Mar 2008 - 7:55 am | व्यंकट

मला वाटलेलं संस्कृत मधे सांगाल

व्यंकट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Mar 2008 - 9:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कथा चांगली आहे, मलाही वाटले कथा संस्कृत मधून सांगणार आहे की काय ?
मराठीत असेल तर आम्ही काहीही वाचू :)

लबाड मुलगा's picture

14 Mar 2008 - 10:39 am | लबाड मुलगा

मला वाटलेलं संस्कृत मधे सांगाल

ओ.... हे काय .... वाटलेलं... अं
म्हणे वाटलेलं....

वाटले किंवा वाटलं नाय चालणार का....

मुंबैचे काय तुमी ... मला वाटलेलंचः)

पक्या

आनंद घारे's picture

14 Mar 2008 - 8:55 am | आनंद घारे

सत्यकाम या नावाचा एक फार सुंदर चित्रपट आहे. त्यात धर्मेन्द्र, शर्मिला टागोर आणि अशोककुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनेक सदस्यांनी तो पाहिलाही असेल. यातील कथानक स्वातंत्र्योत्तर भारतामधील आहे. संजोपरावांना वेळ मिळाला तर या चित्रपटाचे रसग्रहण त्यांनी आपल्या मार्मिक शैलीत अवश्य करावे अशी त्यांना विनंती आहे.

व्यंकट's picture

14 Mar 2008 - 9:07 am | व्यंकट

हो सत्यप्रिय नाव असतं त्याचं त्यात. ह्रषीकेश मुखर्जींचा चित्रपट. सत्यप्रियचा चांगुलपणा अगदी वीट आणतो त्यात.

व्यंकट

अवलिया's picture

14 Mar 2008 - 10:27 am | अवलिया

व्हाय धिस कथा न इन संस्कृतम‍?
आय वाज वेटामि
नुतनम इस्टोरी संस्कृत भाषायाम लिखतु
त्वाम कथा पठित्वा संस्कृतस्य महती माधुर्य सुलभता च सर्वे जनाः जानन्ति
मम प्रार्थना अस्ति

भवदिय
नाना

नंदन's picture

14 Mar 2008 - 10:36 am | नंदन

सत्यकाम जाबालीची कथा येथे दिल्याबद्दल आभार. ती वाचून 'कोल्हाट्याचं पोर' लिहिणारे 'किशोर शांताबाई काळे' आठवले.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मनस्वी's picture

14 Mar 2008 - 10:45 am | मनस्वी

छान कथा आहे.
अजून विस्तार हवा होता असे वाटते.

मनस्वी

इनोबा म्हणे's picture

14 Mar 2008 - 11:04 am | इनोबा म्हणे

संजय लिला भन्साळीची कथाही अशीच आहे काय हो?
आपलं सहज वाटलं म्हणून विचारलं.

(चौकस)
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे