माताय! असला लॉलीपॉप हाफवॉली मिळाल्यावर काय करावं बरं म्या पामरानं? ;)
वेळी अवेळी, कविता भाळी
परज लेखणी नवी नव्हाळी
ओळ ढोबळी, सूर पाघळी
तळमळणार्या 'जालो'माळी
पिसे कवीला, वेड जनाला
झुळझुळ कोरा, कागद ओला
कोण मेंबरा, उगा हासला
तीट लावतो काव्या मेला
शब्दढोकळा सहस्र माळा
वाचक मेळा, रोज आगळा
बर्याच वेळा, त्याचत्या कळा
दंग लेखणी, शब्द पांगळा
गारठलेली, जनता ल्याली
पुन्हा विडंबन, भर्जरि शाली
ग्लेनफिडिचची मैफ़ल सजली
'पूनम'वरच्या, भव्य महाली
अस्सल बेणे, रंग उधळणे,
ढासू गाणे, चिकन तोडणे
'चतुरंगाचे' शब्द गुंफ़णे
कविते, हे तर तुझेच देणे..!
चतुरंग
(खुद के साथ बातां : आम्हाला 'कविता कसली अढळ वस्तरा, साफ दुहेरी कल्ले कटले!' ह्या ओळींची प्रकर्षाने आठवण झाली! ;) )
प्रतिक्रिया
8 Feb 2010 - 11:21 pm | शेखर
अर्ध्या तासात विडंबन?
अशक्य आहात रंगाशेठ....
बाय द वे: पुनम मध्ये ग्लेनफिडीच मिळते का?
9 Feb 2010 - 9:46 pm | संदीप चित्रे
विडंबन येणार हा अंदाज होताच पण इतक्या लवकर ?
9 Feb 2010 - 12:07 am | प्राजु
अशक्य आहात..!! __/\__
:)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
9 Feb 2010 - 1:14 am | अनामिक
__/\__
-अनामिक
9 Feb 2010 - 12:07 am | विसोबा खेचर
मस्त! बाय द वे, पूनम कुठे आहे? :)
तात्या.
9 Feb 2010 - 12:18 am | शेखर
बाय द वे, पूनम कुठे आहे?
रंगाशेठ ना अभिप्रेत असलेले पुनम पुण्यात जंगली महाराज रोड वर आहे.... (तेच अभिप्रेत असेल तर)
9 Feb 2010 - 2:11 am | बिपिन कार्यकर्ते
टपून बसलेला बोका... आली कविता की पाड विडंबन... ;)
बिपिन कार्यकर्ते
9 Feb 2010 - 3:52 am | शुचि
ढासू गाणे ..... ल्लय झक्कास शब्द .....वाह वाह!!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
9 Feb 2010 - 9:48 am | विजुभाऊ
शब्दढोकळा सहस्र माळा

वाहवा......मी कितीतरी दिवस विचार करत होतो की गुजराथी खाद्यपदार्थ कवितेत कसे आणावेत.
रंगाशेठ. आता उंधियो / फाफडा / खमण / खाखरो /हांडवो / थेपला हे पदार्थ सुद्धा वाट पहाताहेत तुमची कवितेत येण्यासाठी
9 Feb 2010 - 10:39 am | उदय सप्रे
चतुरंग साहेब !
आता आम्हाला असे म्हटले पाहिजे :
रसिक येऊदे काव्य चारोळी अथवा कधी आरोळी
लगेच करुया इनोदबुद्धिने आपुन त्याची खांडोळी
हात तोडतो , टांग मोडतो , तडफडशी जनू मासोळी ;
चतुरंग उभा , ललकारी सभा , अन् मिपा जाहली दंग !
हे कडकड टाळी वाजती वाचकांच्या वाहवाची
अन् खुसखुस होते मूळ कवीच्या दादीची वाहवाची
जमवून असे साहित्य झोडतो , हीच इनंती यावं जी
कवितेचं दान द्यावं जी , हे यावंजी , शब्दावर ध्यान द्यावं जी ,
हे यावं जी कवितेचं दान द्यावं जी...्ए हे हे हे हे हे हे हे !
उदय सप्रेम
9 Feb 2010 - 11:25 am | कपिल काळे
लय भार्री !!
9 Feb 2010 - 3:10 pm | मेघवेडा
लॉलीपॉप हाफव्हॉली भिरकावून दिलाय प्रेक्षकांत!!! सणसणीत!!
रंगाशेठ, मजा आली!!!
-- मेघवेडा
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
9 Feb 2010 - 3:44 pm | सुधीर काळे
तात्यांनी चुकीचा प्रश्न विचारला! त्यांना त्यांची आवडती ग्लेनफिडिच कुठे आहे असे विचारायचे होते. पण "लेकी बोले, सुने लागे" या न्यायाने त्यांनी ’पूनम’ची चौकशी केली!
तरी ग्लेनफिडिच कुठे आहे हे कळविणे. (मलाही तसा इंटरेस्ट आहे हं!)
कविता छान आहे. काव्य सुचतं तरी कसं बुवा? आपुनको आताइच नहीं!
अवांतर: तात्या नेहमी प्रत्येक खाद्यपदार्थ कुणातरी अफलातून नटीबरोबर खायचा सल्ला देतात. ग्लेनफिडिच कुणाबरोबर, तात्या?
------------------------
सुधीर काळे
बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!
9 Feb 2010 - 4:45 pm | जयवी
जबरी !! धन्य आहात :)
9 Feb 2010 - 8:37 pm | क्रान्ति
खरंच कमाल आहे! :)
क्रान्ति
अग्निसखा