भूताच्या भूतकाळचे भूत
भग्न वाड्यात रोज मध्यरात्री...!!
सूडाच्या स्वप्नात मग्न,
तो बसलेला असतो
मृत्यू लादला गेलेला हा मृतयात्री ...!!
भूतकाळाचे भूत,
मानगुटीवर घेत "जगतो"
---------------------------
गूढ प्रेम
मध्यरात्री ती आली...
पायवाटेवर बसली,
डोळ्यात 'त्या'ची अतृप्त आशा घेवून!
त्या रात्री 'तो'ही आला...
तीच्यासोबत यायला,
स्वतःच्या जीवाला पारखा होवून!
प्रतिक्रिया
11 Jan 2010 - 10:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'गूढ प्रेम' ही कविता मस्त वाटली. अजून येऊ दे....!
-दिलीप बिरुटे