अतिरेक्यांनी श्रीनगरच्या एका मध्यवर्ती हॉटेलात घुसून अंदाधुंद गोळीबार व ग्रेनेड हल्ला केला आहे. आतापर्यंतच्या वृत्तानुसार एक पोलिस कर्मचारी बळी पडला आहे तर आठ जण जखमी झाले आहेत. शंभरावर लोकांना हॉटेलातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. चकमक अजूनही चालू आहे.
जम्मू-काश्मीर सरकारला कालच एक वर्ष पूर्ण झालं तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी सुरक्षिततेत वाढ झाल्याचं सांगितलं होतं. त्याला अतिरेक्यांचं हे उत्तर आहे.
प्रतिक्रिया
7 Jan 2010 - 12:10 am | टुकुल
च्या आयला, ह्या अतिरेक्यांच करायच तरी काय? एकाला मारल तर दहा तयार होत आहे, डोक्क सुन्न होत नेहमी वाचुन, तरी माहीती बद्दल धन्यवाद बहुगुणी
--टुकुल
7 Jan 2010 - 1:07 am | रेवती
शी! काय त्रास आहे या अतिरेक्यांचा!
लवकरच सर्व सुरळीत होवो अशी इच्छा!
रेवती
7 Jan 2010 - 1:18 am | विकास
(२६/११ शी तुलना करता) एकंदरीत परीस्थिती नियंत्रणात दिसते आहे. हा हल्ला हा त्या भागातील अतिरेकी संघटनेनी - जमातेउलमुजाहदीन ने केलेला आहे. अतिरेकी शक्ती आता कमकुवत होत आहेत असे जे सरकारी म्हणणे (propoganda) आहे त्याला त्यांचे हे उत्तर होते.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
7 Jan 2010 - 1:27 am | बहुगुणी
केवळ दोनच अतिरेकी कार्यरत आहेत म्हणूनच परिस्थिती नियंत्रणात असावी.
पण पोलिसांकडून अतिरेक्यांच्या प्रतिकारात अजूनही सुसुत्रता नसावी असं या व्हिडिओवरून वाटतं.
बरीच गोंधळाची परिस्थिती आहे असं दिसतं..