अशीच एक काळरात्र...

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
4 Jan 2010 - 2:15 pm

२९/१२/२००९, वेळ रात्रीचे ११. ३०

मराठी महाजाल व वर्तमान स्थिती ह्या अश्या महत्त्वाचा विचारास बाजूला करून आम्ही शेयर मार्केट सारख्या दुय्यम गोष्टीवर चर्चा करत करत जेवण करत होतो, जेवण होऊ पर्यंत १ वाजलाच होता. माझ्या ही घरी वाट पाहणारे कोणी नव्हते व मित्राच्या घरी देखील वहिनी घरी गेल्यामुळे प्रेशर नव्हते. बैठक अमर्यादित काळासाठी तहकूब करून आम्ही आमचे आमचे वाहन बाहेर काढले.
नदीपात्राजवळील रास्तावरून आम्ही महादेव मंदिर चौकाकडे जात होतो, तोच मित्राला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आठवला म्हणून बाइक बाजूला घेऊन आम्ही परत बोलत उभे राहिलो, पाच एक मिनिटाची खडी चर्चा झाल्यावर पुन्हा आम्ही प्रस्थान केले.

३०/१२/२००९ वेळ रात्रीचे १. ३०

आमच्या वाहनांचे स्पीड असावे २०-२५ किमी कारण आम्ही हॅल्मेट घातल्यामुळे कानावर चर्चा कमी पडत होती, त्यासाठी आम्ही हळू हळू चालवत होतो. मेहंदळे गॅरेज रोडवरून आम्ही महादेव चौकाकडे आलो तेव्हा मित्राच्या बाजूला एक खड्डा आला त्यामुळे त्याने गाडी थोडी स्लो करून माझ्या मागे लावली, तो पर्यंत मी रोड चौक क्रॉस करू लागलो होतो...... बस्स्स!!!!!

मेहंदळे गॅरेज रोडवरून आम्ही महादेव चौकाकडे आलो तेव्हा मित्राच्या बाजूला एक खड्डा आला त्यामुळे त्याने गाडी थोडी स्लो करून माझ्या मागे लावली, तो पर्यंत मी रोड चौक क्रॉस करू लागलो होतो...... मी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर चौकाचे पार केले होते मागून प्रसन्नदा नी आवाज दिला " राज्या थांब. " पण हॅल्मेट मुळे अथवा नशिबामुळे समजा मला तो आवाज कानावर आलाच नाही व जर आला जरी असता तरी मी काही करू शकलोच नसतो. एक भरधाव वेगाने काळ्या रंगाची जीप अत्यंत वेगाने नळ स्टॉप वरून म्हात्रे पुलाकडे जात होता व मधोमध येवढ्या मोठ्या यामाहा बाइकवर असलेला मी त्या जीपवाल्याला शक्यतो दिसलोच नाही. प्रचंड वेगाने त्याने उजव्या बाजूने माझ्या बाइकच्या मधोमध टक्कर मारली व मी हवेत सात-ते-आठ फूट उंच उडालो. जीप माझ्या खालून निघून गेली मी व मी जीपच्या टपावरून खाली रस्त्यावर पडलो. डोक्यावर असलेले हॅल्मेट तेव्हाच कुठे तरी आदळा आपटी मध्ये डोक्यावरून दूर जाऊन पडले. माझी बाइक गोलगोल फिरत डिव्हाडरला टक्कर मारून जवळ जवळ ३०-४० फूट लांब जाऊन पडली. प्रसन्नदा आपली बाइक आहे त्या अवस्थेत सोडून पळत माझ्याकडे आले व हे सर्व नाट्य एवढ्या वेगाने घडले की प्रसन्नदाला जीपचा नंबर नोट करून घेताच आला नाही. व माझी अवस्था पाहून प्रसन्नदा प्रचंड टेन्शन मध्ये आलेच होते.

मला इकडे सर्व काही सुन्न. काहीच संवेदना नाहीत किती वेळ माहीत नाही, पण मी सर्व पाहत होतो डोळे टंकाटंक उघडे होते.
मी रस्त्यावर डाव्याबाजूला कलंडलेल्या अवस्थेत.
कोणी तरी उठवून बसवत होते.
दहा-बारा अनोळखी चेहरे पळत येताना अंधुकसे दिसत होते समोर.
तोच एक प्रश्न कानावर आला.. " राज्या, ठीक आहेस.? "
मी काहीच उत्तर न देता समोरील व्यक्तीकडे बघत होतो.
पुन्हा प्रश्न.. " राज्या मी कोण आहे? मला ओळखतोस का? "
मग मी उत्तर दिले.. "हो, ओळखतो. प्रसन्नदा, प्रसन्न केसकर माझे मित्र. "
पुन्हा प्रश्न.. " कुठे लागले आहे? "
मी माझ्या उजव्या पायाकडे हात दाखवत म्हणालो.. " पूर्णं तुटला आहे. सांभाळून उचला. "
पुन्हा प्रश्न.. " अजून कुठे दुखत आहे "

मी थोडा थोडा सावरलो होतो पण अजून जखम इत्यादी काही समजत नव्हते, पण पाय तुटल्यामुळे ठणकत होता ते कळत होते. जवळच असलेली पोलिस गाडी व व्हॅन जेथे अपघात झाला होता तेथे काही क्षणामध्येच पोहचल्या. रास्तावर थोडे थोडे रक्त पडलेले दिसत होते पण शरीरावर जखम दिसत नव्हती तेव्हा अचानक प्रसन्नदाचे लक्ष माझ्या डाव्या कानाकडे गेले तेथून रक्त येत होते, प्रसन्नदा प्रचंड कासावीस झाले त्यांनी पुन्हा पुन्हा माझे कान तपासून पाहिले तोच मागून कोणी तरी म्हणाले "अहो, डोक्याला जखम आहे. घाबरू नका. " माझा हात मागे गेला तर मी पाहिले तर माझ्या डाव्या बाजूला डोक्यावर मोठी जखम झाली होती, पोलिसांनी जास्त वेळ न घेता मला सरळ उचलला व आपल्या जीपमध्ये मागील बाजूस घातले तेवढ्यात ही मी त्यांना.. " सर माझा उजवा पाय तुटला आहे पूर्णं लटकत आहे मधून, तो जरा जपून, माझी बाइक, हॆल्मेट, एक माझा बूट समोर पडलेले मला दिसत आहेत" ते हवालदार साहेब लगेच म्हणाले " अरे कुणीतरी ह्याची गाडी चौकीकडे घ्या व ह्याचे सामान देखील. " हवालदाराने दरवाजा बंद करून घेतला, पोलिस गाडीच्या मागून प्रसन्नदा आपली बाइक घेऊन येऊ लागले. तो पर्यंत पोलिसांनी मला नॊर्मल प्रश्न विचारत माझ्या जखमांकडे माझे दुर्लक्ष व्हावे म्हणून प्रयत्न चालू केले होते.

३०/१२/२००९ वेळ रात्रीचे १. ५०

पाच-दहा मिनिटामध्ये आमची गाडी सरळ आत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये पोहचली. गाडीतून मला स्ट्रेचर वर इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेले गेले प्रसन्नदा लगेच माझा केस पेपर इत्यादी तयारी करण्यासाठी निघून गेले. स्ट्रेचरवर मला दोन-तीन डॉक्टर एक-दोन वॉर्डबॉय घेरून घेऊन चालले होते, डॉक्टर पटापट अवस्था / दुखणे ह्याची नोंद करू लागले, एका वार्डबॉय ने करा करा कात्रीने माझी अत्यंत आवडती ली कॉपरची जीन्स उजव्या बाजूने कापून काढली, तोच दुसऱ्या वॉर्डबॉय ने वस्तरा घेऊन माझ्या डोक्यावर जेथे जखम झाली होती तेथील चार-पाच इंचाचे मैदान साफ केले. एकाने माझ्या डाव्या हाताची एक नस पकडून एक प्लॅस्टिकची थ्री-वे सुई घुसवली व त्याचे फटाफट बँडेज करून एक-दोन पेनकिलर इंजेक्शन व सलाईन लावण्यात आले. तो पर्यंत डॉक्टरांनी माझ्या उजव्या पायाला सपोर्ट लावून बँडेज बांधून काढले व तत्काळ मला एक्स-रे रूम मध्ये वळवण्यात आले. एवढे सगळे होत असताना देखील मी टकटक सगळ्यांच्याकडे पाहत होतो. तो पर्यंत एका डॉक्टर ने झायलोकीन टचाटचा माझ्या डोक्यात टोचून जेथे जखम झाली होती तेथे पाच टाके घातले. तो पर्यंत प्रसन्नदा माझे ऍडमिशन करून केसपेपर घेऊन आले व रूम मोकळी नसल्याने मला सरळ सी विंगच्या पाचव्या मजल्यावर पोहचवले, बेड नंबर १३.
दिलेल्या औषधामुळे मला झोप येऊ लागली होती व हे सर्व होऊ पर्यंत सकाळचे पाच-साडे पाच वाजले होते. प्रसन्नदा नि मी घरी जाऊन कपडे बदलून येतो, काळजी करू नकोस मी आहे. सर्वांना सांगतो असा सल्ला देऊन निघून गेले. दुखणे वाढत होते पण औषधामुळे झोप येत होती. कळत नकळत कधी झोप लागली कळलेच नाही. सकाळी डॉक्टर देशमुख आले व त्यांनी तपासणी केली व काही औषधे व इंजेक्शन देणेच्या रतीब चालू केला. मित्रांच्यामध्ये बातमी तो पर्यंत पोहचली होती, फोन वाजला तेव्हा मला एकदम नवलच वाटले एवढे सगळे झाले हा कसा काय वाचला, डाव्या खिश्यातून बाहेर काढल्यावर तर चाट पडलो, जसा होता तसाच एकही स्क्रॅच देखील नाही, मी आनंदलो व ज्या ज्या मित्रांचे फोन येत गेले त्यांना उत्तर देत गेलो, जवळ जवळ मित्रांच्यामध्ये सर्वांना समजले होतेच. देश परदेशातून जेथे जेथे बातमी पोहचली तेथून फोन येऊन गेले. जेथे पोहचवणे गरजेचे होते तेथे हलकीच थाप मारली पोट दुखत आहे म्हणून ऍडमिट आहे काळजी नको. उगाच त्यांची पळापळ नको व आता जो त्रास होणार होता / होत आहे तो झाला आहे आता सांगून काय फायदा असा विचार केला व हळूहळू ठीक झाल्यावर व्यवस्थित सांगू हा निर्णय घेतला. पण दुपार पर्यंत ऑपरेशन व इत्यादी गोष्टी कळल्यावर कुणालातरी बोलवून घेणे गरजेचे झाले म्हणून घरी आईला अजून थोडी थाप मारली की थोडे पायाला देखील लागले आहे व कुणाला तरी पाठव, बंडूला पाठव त्याला पुणे माहीत आहे माझ्या बरोबर आला होता माझ्या मित्रांना देखील ओळखतो.

सकाळपासून औषधाचा / इंजेक्शनचा ढोस चालू होता तो दुपार पर्यंत वाढला व मला सांगण्यात आले की रात्री तुमचे ऑपरेशन होईल ८ वाजता चालू. तुम्ही तयार राहा काही काही खाऊ नका पिऊ नका. बरोबर संध्याकाळी ७. ३० मला ऑपरेशन थेटर मध्ये घेऊन जाण्यात आले व कंबरे खालील भूल देण्यात आली. ऑपरेशन टेबल वर मी एकदम येशू ख्रिस्त स्टाइल मध्ये पडलो होतो, डाव्या हातात सलाईन / इंजेक्शन व उजव्या हातामध्ये रक्तदाब व इत्यादी यंत्रे. छाती वर कुठल्याश्या मॉनिटर मधून बाहेर काढलेली -१० रंग बेरंगी वायरी ज्या माझ्या शरीराला जोडलेल्या होत्या. कंबरेखालील भाग सुन्न होता पण मी शुद्धीत होतो, डॉक्टर लोक माझ्या पायाशी जी कुस्ती खेळत होते ते मला समजत होते, ठोकाठोकी, तोडातोडी, ड्रिलिंग, कापाकापी, मी सगळ्याची मजा घेत होतो. पेन किलर दिल्यामुळे जास्त त्रास होत नव्हता पण त्यामुळे हलकी हलकी गुंगी येत होती. ३-४ तासाने ऑपरेशन संपले व मला रेस्ट रूम मध्ये पोहचवला गेला. नंतर कळले की पायावर १३ टाके घातले गेले, एक मस्त पैकी स्टीलचा रॉड घातला गेला आहे व महिन्याभराची कमीत कमी सक्तीची विश्रांती घेणे आवश्यक आहे.

०४/०१/२०१० वेळ दुपारचे १. ३०

आता मी व्यवस्थित आहे आजच पायाचे ड्रेसिंग चेंज झाले, आजच थोडे चाललो आधार घेऊन. प्रगती उत्तम आहे लवकरच पूर्णं बरा होईन हि अपेक्षा. जीवावर बेतलेला अपघात फक्त हॅल्मेटमुळे पायावर निभावला. नाही तर येवढ्या मोठ्या अपघातातून मी वाचलो कसा हा प्रश्न जर कोणी मला विचारले तर मी वर बोट करेन. पुण्यात असलेल्या मित्रांनी प्रचंड मदत केली प्रसन्नदा, मोडक ह्यांनी तर अक्षरशः रात्री जागवल्या माझ्यासाठी, बिपीन कार्यकर्ते, परिकथेतील राजकुमार, धमाल मुलगा व कुटुंब, पुण्याचे पेशवे, छोटा डॉन, टिंग्या, डॉ. दाढे ह्यांनी भेटून तर निखिल देशपांडे, मस्त कलंदर, मनिष, सुहास, व इतर अनेक मित्र मैत्रिणींनी फोनवरून मला मानसिक आधार दिला त्यांचे आभार कसे व्यक्त करावेत तेच कळत नाही आहे. देवाचे अनेकानेक आभार आहेत की त्यांने मला हे सुंदर जग पाहण्यासाठी व ह्याचा परिपुर्ण आनंद घेण्यासाठी अजून एक मोका दिला... थॅक्स गॉड !

जीवनमानप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

प्रभो's picture

4 Jan 2010 - 2:29 pm | प्रभो

लवकर बरे व्हा राजे..

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

II विकास II's picture

4 Jan 2010 - 2:29 pm | II विकास II
सन्दीप's picture

4 Jan 2010 - 2:43 pm | सन्दीप

राजे
पहील्या प्रथम त्या परमेश्वराचे आभार.
चला आता विश्रान्ति घ्या सक्तिची.

टारझन's picture

4 Jan 2010 - 2:49 pm | टारझन

आता तरी सुधर चोच्या !
नाही तर आम्हाला "जाने नही देंगे " ते ३इडीयट्स मधलं "के व ळ अ प्र ति म" गाणं वाजवत बसायला लागेल .

- टारू_पायात_रॉड

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Jan 2010 - 2:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

राजा लवकर बरा हो. इतर गाडी चालवणार्‍यांनी शेवटच्या परिच्छेदातलं वाक्य पुन्हा एकदा नीट वाचावे:

जीवावर बेतलेला अपघात फक्त हॅल्मेटमुळे पायावर निभावला.

अदिती
-----------------------------------
नास्तिक असल्यामुळे माझा देवावर विश्वास नाही, पण स्वतःवर आहे.

विकास's picture

4 Jan 2010 - 7:24 pm | विकास

असेच म्हणतो:

इतर गाडी चालवणार्‍यांनी शेवटच्या परिच्छेदातलं वाक्य पुन्हा एकदा नीट वाचावे:

जीवावर बेतलेला अपघात फक्त हॅल्मेटमुळे पायावर निभावला.

राजे तुमची खुशाली वाचून बरे वाटले मात्र मोठे गंडांतर टळले त्याबद्दल अभिनंदन आणि ईश्वरीय शक्तीचे आभार!

तसेच हेल्मेटचा झालेला फायदा ठळक करत आपला अनुभव पुणे सकाळला पण अवश्य पाठवावा अशी विनंती.

काळजी घ्या.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

चित्रा's picture

4 Jan 2010 - 11:20 pm | चित्रा

अरे केवढा भयंकर प्रसंग? कसली वेळ आली असती?
काळजी घ्यावी.. राजेंना अंगाबाहेर जाऊन मदत केलेल्या सर्वांचेही कौतुक करावेसे वाटले.

स्वाती दिनेश's picture

4 Jan 2010 - 3:08 pm | स्वाती दिनेश

हे एवढे रामायण झाले ते माहितच नव्हते, गेट वेल सुन राजे,
स्वाती

केशवसुमार's picture

4 Jan 2010 - 9:42 pm | केशवसुमार

हे एवढे रामायण झाले ते माहितच नव्हते, गेट वेल सुन राजे,
केशवसुमार

स्वाती२'s picture

4 Jan 2010 - 3:32 pm | स्वाती२

लवकर बरे व्हा राजे.

टुकुल's picture

4 Jan 2010 - 3:56 pm | टुकुल

आजच विचार करत होतो कि एवढी मोठ्ठी सुट्टी असुन सुध्दा राजेंचा अजुन काही लेख आला नाही? आणी तुम्ही न चुकता लिहिल ते अस?
वाचुन वाईट वाटले, लवकर बरे व्हा आणी चालु करा परत भटकंती :-)

अवांतरः औषध क्रुपया शुध्द पाण्यातुनच घेणे (डॉक्टरने लिहुन दिलेले औषध :-) )

--टुकुल

चतुरंग's picture

4 Jan 2010 - 4:00 pm | चतुरंग

पुण्यातल्या घनचक्कर ट्रॅफिकने तुला हिसका दाखवलाच तर!!
नशीबवान आहेस राजा, काळजी घे.
हेल्मेटनेच वाचला आहेस ह्यात जराही शंका नाही.
तुला मदत करणारे सुहृद मिपाकर हे तुझे जिवाभावाचे झालेत आता.
लवकर बरा हो.

चतुरंग

वेळ आली नव्हती. (तरी बरे आपाण एकटेच नव्हता.) आराम करा.लवकर बरे व्हा.
दुचाकी स्वरांनी नेहीमी हेल्मेट आणि चारचाकी चालकांनी नेहमी सीटबेल्ट वापरावेच अशी कळकळीची आणि आग्रहाची विनंती.
प्रसन्नदा आपलंही मनःपूर्वक अभिनंदन.
जरासी सावधानी जिंदगीभर आसानी


***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

समंजस's picture

4 Jan 2010 - 4:47 pm | समंजस

राजे लवकरात लवकर बरे व्हा आणि भटकंती+लेखन सुरु करा
:S

पाऊसवेडी's picture

4 Jan 2010 - 5:05 pm | पाऊसवेडी

आराम करा.लवकर बरे व्हा

*-*-*-*-*-*-*-*-*--*
जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
---------सदिप खरे

प्रमोद देव's picture

4 Jan 2010 - 6:05 pm | प्रमोद देव

म्हणजे एकट्याने कुठे जाऊ नये,सोबतीला कुणी तरी असावे....अशा अर्थाची एक संस्कृतमधली गोष्ट आम्हाला शाळेतल्या अभ्यासक्रमात होती.
राजे, त्याचीच प्रचिती आपल्याला आली. प्रसन्नदा आपल्या बरोबर होते म्हणून बरे झाले. वेळीच मदत मिळाली. असो. राजे, आता जरा काळजी घ्या, डॉक्टरांनी सांगितलेल्या सुचनांचे योग्य ते पालन करून लवकर बरे व्हा!जीवघेण्या अपघातातून वाचल्याबद्दल आपलं मनःपूर्वक अभिनंदन आणि लवकर बरं होण्यासाठी माझ्या तर्फे तुम्हाला लाख लाख शुभेच्छा!

प्रसन्नदा, प्रसंगावधान राखून पुढची कारवाई केल्याबद्दल आपलंही मनःपूर्वक अभिनंदन.

जान बच गयी लाखो पाये!

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

ज्ञानेश...'s picture

4 Jan 2010 - 6:10 pm | ज्ञानेश...

लवकर बरे व्हा, हीच शुभेच्छा. :)

जे.पी.मॉर्गन's picture

4 Jan 2010 - 6:16 pm | जे.पी.मॉर्गन

राजे... खरोखरंच बोनस आयुष्य मिळालं हो ! काळजी घ्या न लवकर बरे व्हा

सुमीत भातखंडे's picture

4 Jan 2010 - 6:46 pm | सुमीत भातखंडे

काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा!

रेवती's picture

4 Jan 2010 - 7:13 pm | रेवती

अरे देवा!!
तरी सगळेजण सांगत होते तुला.......इतका फिरू नकोस म्हणून......
आणि तो जीपवाला गेला का पळून? सापडला असता तर मार खावा लागला असता त्याला. असो, तू लवकर बरा हो!
प्रसन्नदा पुणेरी यांना धन्यवाद!

रेवती

वेताळ's picture

4 Jan 2010 - 7:21 pm | वेताळ

राजे वाचताना काळजाचा ठोका चुकला.फार भयंकर अपघातातुन तुम्ही सहिसलामत बाहेर पडलात ह्याबद्दल देवाचे आभार मानायला हवेत. तुम्हाला वेळेवर मदत मिळवुन देण्यात प्रसन्न साहेबानी अतिशय जबाबदारीचे काम केले त्याबद्दल त्याचे ही आभार. खरतर हेल्मेट पेक्षा प्रसन्नसाहेबानी तुम्हाला वाचवले.
बाकी काल्जी घ्या व लवकर बरे व्हा.
वेताळ

मीनल's picture

4 Jan 2010 - 7:26 pm | मीनल

काळजी घ्या.
लवकर बरे व्हा.
लिहायला तर लागलाच आहात.
वाचनाला मिपा आहे आपल्यासोबत.
मीनल.

सखी's picture

4 Jan 2010 - 7:47 pm | सखी

लवकर बरे व्हा, हीच शुभेच्छा. वरती देवकाकांनी म्हंटल्याप्रमाणे जान बच गयी लाखो पाये हे खरचं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jan 2010 - 7:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजे, लवकर बरे व्हा.....!
तब्येतीला जपा....
देवाचे आभार मानायलाच हवे, आणि ज्या मित्रांनी धावपळ केली त्यांचेही..!

च्यायला, ते पायात रॉड वगैरे... :(

-दिलीप बिरुटे

अबोल's picture

4 Jan 2010 - 7:56 pm | अबोल

काळजी करू नका ,तुमच्या जिवावरचे स॑कट पायाच्या स्टीलच्यारॉडवर निभावले आहे.लवकर बरे होउन एक छानशी कथा येउ॑द्या.

प्राजु's picture

4 Jan 2010 - 8:01 pm | प्राजु

बापरे!!
राजे, लवकर बरे व्हा.
थोडक्यात बचावला आहात. नवं आयुष्या नव्याने जगायला सुरूवात करा. आणि हेल्मेट घालूनच गाडी चालवा.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

अनामिक's picture

4 Jan 2010 - 8:11 pm | अनामिक

राजे, लवकर बरे व्हा. काळजी घ्या.

-अनामिक

भाग्यश्री कुलकर्णी's picture

4 Jan 2010 - 8:27 pm | भाग्यश्री कुलकर्णी

बापरे कसलं भयानक आहे हे.लवकर बरे व्हा.आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेतच तुमच्यापाशी.

अक्षय पुर्णपात्रे's picture

4 Jan 2010 - 10:07 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री राजे, लवकरात लवकर बरे व्हा.

______________________________________________
We fight because we communicate.

शैलेन्द्र's picture

4 Jan 2010 - 10:15 pm | शैलेन्द्र

आयचा घो...

साला जीपवाला हरामी, एक वेळेला अपघात घडणे समजु शकतो मी, पण जखमी माणसाला तसचं टाकुन पळुन जाणे?

राजे, बरे तर तुम्ही व्हालच, पण एक सांगतो, तुम्ही बहुदा अ‍ॅक्सीडेंट प्रोन आहात, संभालुन रहा. नशीबाने कुणितरी जवळ होत... तुमच्या मित्राला आमचेही आभार कळवा.

पांथस्थ's picture

4 Jan 2010 - 10:29 pm | पांथस्थ

नमस्कार,
लवकर बरे व्हा आणि लिहिते पण व्हा :)

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

शेखर's picture

4 Jan 2010 - 10:51 pm | शेखर

लवकर बरे हो. पुर्ण बरे होई पर्यंत डॉ. सांगतिल तसे वागणे....

चाणक्य's picture

4 Jan 2010 - 10:55 pm | चाणक्य

आणि एक फुकटचा सल्ला देतो. फिजिओथेरपी ईमानदारीत करा. त्याने लई म्हणजे लई फायदा होतो.

हेल्मेटमुळे ३ वर्षांपूर्वी वाचलेला,
चाणक्य

निमीत्त मात्र's picture

5 Jan 2010 - 1:08 am | निमीत्त मात्र

राजे, लवकर बरे व्हा! प्रकृतीची काळजी घ्या.

शाहरुख's picture

5 Jan 2010 - 1:42 am | शाहरुख

काळजी घे दोस्त..

जीपवाला सापडला तर कळीव..तालमीतून पोरं नेऊन बदडू !!

विनायक प्रभू's picture

5 Jan 2010 - 8:49 am | विनायक प्रभू

नय.
रॉड वगैरे टेंपररी इनकन्विनियन्स.

दिपक's picture

5 Jan 2010 - 8:54 am | दिपक

काळजी घे रे राजा.. लवकर बरा हो.

लवंगी's picture

5 Jan 2010 - 9:14 am | लवंगी

पलायनवीर राजे, लवकर पळायला लागा..

अमित बेधुन्द मनचि लहर's picture

5 Jan 2010 - 9:59 am | अमित बेधुन्द मन...

राजे लवकरात लवकर बरे व्हा

सूर्य's picture

5 Jan 2010 - 9:59 am | सूर्य

राजे, लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा.

- सूर्य.

पाषाणभेद's picture

5 Jan 2010 - 10:04 am | पाषाणभेद

राजे अहो मी हा लेख वाचलाच नव्हता हो. लवकर बरे व्हा अन बरे झाल्यानंतरच भटकंती सुरू करा. काळजी करू नका. सगळे ठिक होईल.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

हर्षद आनंदी's picture

5 Jan 2010 - 10:20 am | हर्षद आनंदी

ईश्वरकृपेने आपण सही-सलामत आहात, वाचुन धन्य जाहलो.
तुम्हाला वेळोवेळी मदत करणार्‍यां मित्रांचे मनापासुन आभार!!

लिहिते व्हालच.. आधी तब्येतीची काळजी! ही मोहीम फत्ते करुन गडावर या, पोटभर मिसळ चापू...

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

विमुक्त's picture

5 Jan 2010 - 11:01 am | विमुक्त

राजे, आता लवकर तंदुरुस्त व्हा आणि पुढच्या भटकंतीचा लेख टाका...

टोळभैरव's picture

6 Jan 2010 - 8:05 am | टोळभैरव

सहमत.

मी टोळ. :)
(मला खरडण्याचा /व्यनीचा अधिकार नाही, त्यासाठी काय करावे लागते ? )

झकासराव's picture

5 Jan 2010 - 11:37 am | झकासराव

हायला,
हे एवढ कधी घडुन गेल माहितीच नाही की.
राजे लवकर बरे व्हा.
आता नीट विश्रांती घ्या.

भडकमकर मास्तर's picture

5 Jan 2010 - 5:07 pm | भडकमकर मास्तर

अरे बाप रे..
हा धागा लै लेट उघडला..
एवढे सारे घडले आणि राजे हेल्मेटमुळे वाचलात...
... अता लवकर बरे व्हा...

ऋष्या's picture

5 Jan 2010 - 7:13 pm | ऋष्या

वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. माझा नेहेमीचाच रस्ता आहे तो.
काळजी घ्या हो. आणि ते हेल्मेट टाकून आता नवीन हेल्मेट घ्या (एका major impact नंतर हेल्मेट बदलावे म्हणतात).

विकास's picture

5 Jan 2010 - 8:03 pm | विकास

आणि ते हेल्मेट टाकून आता नवीन हेल्मेट घ्या (एका major impact नंतर हेल्मेट बदलावे म्हणतात).

चांगला मुद्दा

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

संदीप चित्रे's picture

5 Jan 2010 - 8:24 pm | संदीप चित्रे

हेल्मेटबद्दल १००% सहमत.
बर्‍याच वर्षांपूर्वी मला डॉक्टरांनी सांगितले होते की शरीरात कुठेही इन्टर्नल ब्लीडींग झाले तर आम्ही काहीतरी प्रयत्न करून थांबवू शकतो पण ब्रेन हॅमरेज झाले की परिस्थीती हाताबाहेर जाते.
त्यामुळे हेल्मेट अत्यावश्यक !

लवकर बरा व्हावास ह्या पुन्हा एकदा शुभेच्छा !

संजय अभ्यंकर's picture

5 Jan 2010 - 8:55 pm | संजय अभ्यंकर

ईश्वर आपणांस लवकर टुणटुणीत करो!

प्रसन्नदांचे आभार!

हेल्मेट, सिटबेल्ट, डिपर अत्यंत आवश्यक!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

नाखु's picture

6 Jan 2010 - 1:48 pm | नाखु

गणरायाचा आपल्यावर सदैव वरदान राहो

हिच शुभेच्छा.....

श्रद्धा.'s picture

6 Jan 2010 - 2:37 pm | श्रद्धा.

राज लवकर बरा हो रे....

प्रसन्नदांचे आभार.............

ब्रिटिश's picture

6 Jan 2010 - 7:24 pm | ब्रिटिश

ज्याआयला तू नाय त तो जीपवाला, कोनतरी नक्कीच पीलेला आसनार
तंगड्याव आटपल बर झाल बोल.
लवकर बरा हो.

मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, मगर गाडी चलाते टाईम शराब ना पीओ

योगी९००'s picture

18 Jan 2010 - 4:29 pm | योगी९००

अरेरे..मी हा लेख खुप उशीरा वाचला..

आता कसे आहात तुम्ही?

खादाडमाऊ

अनिल हटेला's picture

18 Jan 2010 - 7:52 pm | अनिल हटेला

लवकर बरे व्हा...

आणी काळजी घ्या राव...:-)

बैलोबा चायनीजकर !!!
© 2006-2010. All rights reserved.

राज,
जिवावरच्या संकटातून वाचलास यातच सर्व आले! देवाची कृपाच!!
जे वर्णन केलेले आहेस त्यावरून खरंच माझ्या हृदयाचे २-३ ठोकेच चुकले.
इतका मार लागला म्हणून खूप दु:ख झाले पण जीव वाचला याचा भरपूर आनंद झाला.
जीवेत् शरदः शतम्!
------------------------
सुधीर काळे
(जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया")